भारतातील प्राथमिक शिक्षण व्यवस्था: एक बट्ट्याबोळ

प्रमोद सावंत१'s picture
प्रमोद सावंत१ in जनातलं, मनातलं
11 Nov 2010 - 5:19 pm

शिक्षणपध्दतीचा विचार करता देशाची साक्षरता आकडेवारीत वाढवण्यावर आपण भर देतो. पण माध्यमिक शाळांतून विद्यार्थांची होणारी गळती ही आपली खरी समस्या आहे. गावात तर ही समस्या अतिशय जास्त आहे. भारतातील साडेसहा लाख खेड्यांमध्ये जवळजवळ सर्वत्र पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. पण आठवीपर्यंत शिक्षण देणा-या फक्त सवादोन लाख व मॅट्रीकपर्यंत शिक्षण देणा-या शाळा , तर दीड लाखांहून कमी आहेत. ही सरकारी आकडेवारी झाली . शाळा आहे म्हणजे तेथे शिक्षक,फळा,छत असलेली ईमारत,पटांगण इत्यादी सुविधा आहेत, असा गोड गैरसमज करुन घेणे चुकीचे होईल. निम्म्यापेक्षा अधिक शाळांना छ्त व स्वच्छ मुता-या नाहीत.आपल्या साडेसहा लाख खेड्यांपैकी सुमरे पाच लाख खेड्यांत माध्यमिक शिक्षण देणा-या शाळाच नाहीत. तेथील मुलांना चौथी पास झाल्यावर तालुक्यातील दुस-या गावी जावे लागते किवा शिक्षण सोडून घरी बसावे लागते...
एका दिशेचा शोध,संदीप वासलेकर,राजहंस प्रकाशन,पुणे.

भारतातील प्राथमिक शिक्षण व्यवस्स्थेचे खरे स्वरुप काय आहे हे आपल्या वरिल परिच्छेद वाचल्यावर लक्षात आलेच असेल. का आजही आपल्या देशात निरक्षरता आहे ? आपली शिक्षण व्यवस्था कशा प्रकारे शिक्षित बेकार निर्माण करण्याचे काम करते ? शिक्षणाबद्द्ल आपल्या शासनाचे धोरण कसे चुकीचे आहे हे मला वासलेकरांचे पुस्तक वाचल्यावर समजून आले. असेच अनुभव व निष्कर्श आपल्यासोबत शेअर केलेले आहेत स्ट्रॅटेजिक फ़ोरसाईट ग्रुपचे संस्थापक आणि एका दिशेचा शोध या पुस्तकाचे लेखक संदीप वासलेकर यांनी. एका दिशेचा शोध या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी आपले आतापर्यंतचे स्वानुभव आपल्यासाठी खुले करुन दिलेले आहेत . शिक्षणपध्दतीचा विचार करता दर्जात्मक सुधारणांपेक्षा का आपण आकडेवारीला एवढे महत्व देतो? जगात अशी कुठली ताकद आहे जी संपूर्ण विश्वाचे भवितव्य ठरवते ? महासत्ता शब्दाआड जागतीक राजकार कसे खेळल्या जाते ? चौथी औद्योगीक क्रांती म्हणजे काय ? का आपला देश आजही मागास आहे ? या सर्व प्रश्नांनी माझं पण डोकं भंडावून सोडलं होतं. या सर्व प्रश्नांची उत्तरं मी शोधत होतो जी मला मिळाली याच पुस्तकात... या पुस्तकात आपण कुठे आहोत? आपण कुठे असायला हवं? आपली दिशा कोणती असावी ?या संदर्भात व्यवसतीतपणे दिशा दर्शन केलेले आहे. मला हवे असणा-या , निर्माण झलेल्या बहुतेक प्रश्नांची मला उत्तरं मिळाली. त्यामुळे ज्यांच्या समोर माझ्याप्रमाणे प्रश्न निर्माण झालेले आहेत, ज्यांना हे जग आणि आपल्यातले अंतर मोजायची इच्छा आहे त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं.
अधिक माहितीसाठी पहा- http://www.facebook.com/home.php?#!/pages/Eka-Dishecha-Shodh/12610408744...

धोरणविचार

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Nov 2010 - 6:17 pm | llपुण्याचे पेशवेll

चांगला आढावा घेतला आहे. याबद्दल अजून भरपूर काही लिहीण्यासारखे आहे. आमच्या कोकणामधील गावामधे सरकारी शाळेला छत, मुतार्‍या, पंखे बिंखे सगळं अगदी छान आहे. कारण गावकर्‍यांचा पुढाकार. गावात मुलांसाठी शाळा चांगली असली पाहीजे म्हणून. हि शिक्षणविषयीची आस्था गावागावात जोपासली गेली तर आहे ही परीस्थिती बर्‍याच प्रमाणात सुधारेल असे वाटते. एका महत्वाच्या विषयावर चर्चा चालू केल्याबद्दल लेखकाचे आभार.

रन्गराव's picture

11 Nov 2010 - 9:36 pm | रन्गराव

पेशव्यांशी सहमत!

निकित's picture

12 Nov 2010 - 1:50 am | निकित

अहो बास आता पुस्तकाची जहिरात !

अविनाशकुलकर्णी's picture

12 Nov 2010 - 6:19 am | अविनाशकुलकर्णी

गुणात्मक सुधारणा होणार कशी..आता तर सा~यांना पास करणार आहेत.. परीक्षा हा प्रकार नाहि असे ऐकिवात आहे.

नगरीनिरंजन's picture

12 Nov 2010 - 7:47 am | नगरीनिरंजन

मला काय त्याचे?

नरेशकुमार's picture

12 Nov 2010 - 7:59 am | नरेशकुमार

english medium मधे चान्गल शिकवितात. माझि मुलगि तिथेच आहे. काय प्रोब्लेम नाहि.