(कुजबुज)

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
21 Apr 2008 - 12:45 pm

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची कुजबुज खोलीतल्या दिव्याची का मंद वात झाली ?दोघांतल्या गुजाची जाहीर बात झालीमी डाव टाकला वा तू फेकलेस जाळेखेळात नेहमी या अमुचीच मात झालीपोटातगडबडाटा उच्छाद मांडलेलापरसी१ सकाळ गेली, परसात रात झालीफसलो सुवर्णकांती वरुनी मदालसेलारामा गडी म्हणोनी ओळख घरात झालीजाता जवळ जरासा, केकाटली नवोढाकानी बधीरता, अन एका 'करा'त झालीहोतो सदैव हाकत वेगात रथ असा मी अमुची रवानगी मग रुग्णालयात झाली !हसुनी खुणावणाऱ्या होत्या मुलीच दोषीअपकीर्ति मात्र अमुची साऱ्या जगात झालीकरूनी विडंबने हा "केश्या" अम्हास छळतोकुजबुज अशी कवींची आपापसात झाली१ : 'परस' या शब्दाचे 'परसी' हे रूप बरोबर आहे का याविषयी व्याकरणाच्या जाणकारांनी खुलासा/मार्गदर्शन करावे. वृत्ताच्या गरजेमुळे विडंबनात बऱ्याच ठिकाणी हृस्व चा दीर्घ आणि दीर्घ चा हृस्व केलेला असेल याची खुलासा/मार्गदर्शन करताना कृपया नोंद घ्यावी.

विडंबन

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

21 Apr 2008 - 3:03 pm | धमाल मुलगा

पुन्हा एकदा जबरान् ......

फसलो सुवर्णकांती वरुनी मदालसेला
रामा गडी म्हणोनी ओळख घरात झाली

:-)))) वा वा..हे असं का?

हसुनी खुणावणाऱ्या होत्या मुलीच दोषी
अपकीर्ति मात्र अमुची साऱ्या जगात झाली

सहमत शेठ! लय जोरात सहमत!

करूनी विडंबने हा "केश्या" अम्हास छळतो
कुजबुज अशी कवींची आपापसात झाली

पर्वा इल्ले ! बिनधास्त चालू द्या :-)))

....व्याकरणाच्या जाणकारांनी खुलासा/मार्गदर्शन करावे.

आमचा... पास! व्याकरणातलं काय कळतंय डोंबल?

एकूणातच....मज्जा आली :-)

अवांतरः 'मुळ कवितेपेक्षा विडंबन जास्त आवडलं' असा प्रतिसाद देण्याचं धाडस मी आता तरी करु शकत नाही...पुन्हा कोणितरी येऊन ठोकायचा मला :-)

आपला,
- (रामा गडी) ध मा ल.

मनस्वी's picture

21 Apr 2008 - 3:09 pm | मनस्वी

होतो सदैव हाकत वेगात रथ असा मी

हा हा हा

चतुरंग's picture

21 Apr 2008 - 8:52 pm | चतुरंग

मस्त विडंबन.

(परसी - हे रुप 'परसात' ह्या शब्दाचे वाटत नसून 'परसी' नामक पारशी परसात गेला असावा असे वाटते.:)) अतिशय ह.घ्या.))

चतुरंग

इनोबा म्हणे's picture

21 Apr 2008 - 10:40 pm | इनोबा म्हणे

आवडले बरं का!

फसलो सुवर्णकांती वरुनी मदालसेला
रामा गडी म्हणोनी ओळख घरात झाली

जबरा रे केसु

|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे

केशवसुमार's picture

22 Apr 2008 - 9:14 am | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(अभारी)केशवसुमार.

विसोबा खेचर's picture

22 Apr 2008 - 10:21 am | विसोबा खेचर

करूनी विडंबने हा "केश्या" अम्हास छळतो
कुजबुज अशी कवींची आपापसात झाली

हा हा हा! हे मस्त.. :)

तात्या.

मदनबाण's picture

22 Apr 2008 - 10:42 am | मदनबाण

हसुनी खुणावणाऱ्या होत्या मुलीच दोषी
अपकीर्ति मात्र अमुची साऱ्या जगात झाली

मस्तच आणि काय म्हणु ?

करूनी विडंबने हा "केश्या" अम्हास छळतो
कुजबुज अशी कवींची आपापसात झाली

व्वा !!!!!

("केश्या" अम्हास छळतो) असे न म्हणणारा,,,,,
मदनबाण