चालता डौलात तू ग, मी असे न्याहाळले-
का कुणाला वाटले मी कैक प्याले रिचवले !
खरडुनी अपुला गळा तू गीत कोमल गाइले-
छान ! कळले नाहि तुज, मी कर्णयंत्रा काढले !
मिरवशी स्कूटीवरी तू ऐटिने रस्त्यावरी-
वाटते गजराज बसुनी मूषकावर चालले !
इकडुनी जातेस तिकडे- तू जरी हळु चंचले-
भासती भूकंप भारी भूतलावर जाहले !
चंद्र तुझिया चेह-यावर छान कोणा भासतो-
डाग मुखकमलावरी ते पाहुनीया मानले !
प्रतिक्रिया
10 Nov 2010 - 3:02 am | प्राजु
मिरवशी स्कूटीवरी तू ऐटिने रस्त्यावरी-
वाटते गजराज बसुनी मूषकावर चालले !
=)) =))
मस्त आहे .
10 Nov 2010 - 7:24 am | स्पंदना
हा हा हा. गोड आहे हो कविता.
10 Nov 2010 - 8:37 pm | गणेशा
आवडली कविता .. मस्त