-आह..हिअर वुई गो....!!

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
9 Nov 2010 - 5:10 pm

-वॉच इट..

-वुई आर फिनिश्ड..

- पीट..सॉरी..

-हे व्हॉटस हॅपनिंग हियर?

-देअर ही इज..लूक एट हिम...गॉडडॅम्ड दॅट सन ऑफ बिच इज कमिंग. गेट ऑफ..

-मा आय लव्ह यू..

-हिट द वॉटर..हिट द वॉटर...हिट द वॉटर...!!!

- ओह फक. धिस कान्ट बी..!!!

-दॅट्स इट..आय एम डेड..

-देअर इट गोज..देअर इट गोज..ओह नो..!!

-एमी, आय लव्ह यू..!!

-माउंटन्स ..!!!!!

- आआआ ..अल्लाह अकबर..

-ओह माय गॉड ! ओह माय गॉड !

- ओके..वुई आर डिचिंग..!!

-आह..हिअर वुई गो....!!

-दॅट्स ऑल गाईज..फक..

ही सगळी वाक्यं वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या लोकांनी म्हटली आहेत.
ती काही फारशी खास वाटत नाहीत.

आता त्यातला कॉमन पॉईन्ट बघू.

सर्व वाक्य एकाच ठिकाणी म्हटली गेली आहेत.

विमानाचं कॉकपिट..

आणि वेगवेगळ्या लोकांनी म्हटली आहेत अशासाठी की प्रत्येक वाक्य हे त्या बोलत्या जिवाचं शेवटचं वाक्य आहे. विमान क्रॅश होण्यापूर्वी कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरवर रेकॉर्ड झालेलं. शेवटचं वाक्य..पायलटचं..

प्रवासमाहिती

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

9 Nov 2010 - 5:32 pm | धमाल मुलगा

गूऽऽऽड हेवन्स!

चिरोटा's picture

9 Nov 2010 - 5:35 pm | चिरोटा

कुठचा अपघात? डीटेल्स येवू द्यात जरा.

गवि's picture

9 Nov 2010 - 9:50 pm | गवि

चिरोटा..
वेगवेगळे क्रॅश..तपशिलात जायला हरकत नाही पण सेन्सेटिव्हिटी जाईल..
उदा. डायरेक्शनल जायरोमधे बिघाड होऊन तैवानमधे डोंगरावर क्रॅश झालेल्या विमानात पायलट मरताना 'अमुक अमुक' म्हणाला..वगैरे.कॉमेंटबद्दल Thanks. Will try to post separately about crashes.

सहज's picture

9 Nov 2010 - 5:44 pm | सहज

छोटेखानी लेख सही आहे असे तरी कसे म्हणावे. रोचक!

परिकथेतील राजकुमार's picture

9 Nov 2010 - 5:50 pm | परिकथेतील राजकुमार

अरे रे ! काय हि अधोगती ?

ह्यात एकही मनुष्य 'हे राम' म्हणणारा नसावा ?

अवलिया's picture

9 Nov 2010 - 7:01 pm | अवलिया

सहमत आहे.

शिल्पा ब's picture

9 Nov 2010 - 11:32 pm | शिल्पा ब

हे राम वाल्यांच्या मनातलं अल्लाह अकबर म्हणणारा आहे ना? मग झालं तर..

शुचि's picture

9 Nov 2010 - 6:52 pm | शुचि

सह्ही! पण वाचून वाईट वाटले.
मा आय लव्ह यु
आणि
एमी आय लव्ह यु
नी डोळ्यात पाणी आलं.

( यावेळी विमानात बसताना कधी नव्हे ते भीती वाटणार आहे :()

इंटरनेटस्नेही's picture

10 Nov 2010 - 1:52 am | इंटरनेटस्नेही

+१

chipatakhdumdum's picture

9 Nov 2010 - 6:49 pm | chipatakhdumdum

हे सगळे उच्चार बहुदा कॉकपीट या एकाच जागेतले नसावे. विमानात लोक बसतात, त्या ठिकाणी सुध्दा उच्चारले गेले असावेत. कॉकपीट मध्ये एवढी माणस मावणं, जरा पटत नाही. मात्र तीन चार लोकांचेच उच्चारलेले हे सगळे शब्द असतील, तर मात्र शक्य आहे.

Dhananjay Borgaonkar's picture

9 Nov 2010 - 7:02 pm | Dhananjay Borgaonkar

आहो chipatakhdumdum

जागा एक जरी असली तरी वेगवेगळ्या अपघाताच्या वेळी रेकॉर्ड झालेली ही वाक्य आहेत.
एकाच अपघातातली नव्हे.

गवि's picture

9 Nov 2010 - 7:48 pm | गवि

Thanks धनंजय..

You got it right..

सर्व्यांनी जरा दम खावा... एक फर्मास कथा येतीय गगनविहारींची!

प्रियाली's picture

9 Nov 2010 - 7:11 pm | प्रियाली

आपले मरण आपल्या डोळ्यांनी पाहणे कठिण असावे, पण ते झटक्यात येते हा मोठा दिलासा असावा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Nov 2010 - 11:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत आहे.

ब्लडी'एल, हादरले मी हे वाचून!

प्राजु's picture

10 Nov 2010 - 3:39 am | प्राजु

हेच म्हणते..
हे वाचून .. फार काही चांगलं नाही वाटलं. मरणाच्या दारात कोणाला काय कसे विचार येतात.. !!
चांगले कसे म्हणावेत?

तिमा's picture

9 Nov 2010 - 8:11 pm | तिमा

लेख अम्मळ इंग्रजाळलेला वाटला.

आळश्यांचा राजा's picture

9 Nov 2010 - 9:49 pm | आळश्यांचा राजा

काय सांगायचं (म्हणजे सांगण्यासारखं काय आहे), आणि ते उत्तम प्रकारे कसं सांगायचं याची उदाहरणं आहेत तुमचे लेख.

पुष्करिणी's picture

9 Nov 2010 - 11:44 pm | पुष्करिणी

रोचक पण शोकांतिके सारखा.

रेवती's picture

10 Nov 2010 - 1:55 am | रेवती

अग आई गं!

चिगो's picture

10 Nov 2010 - 12:56 pm | चिगो

देव सर्वांना शांती देवो, ही प्रार्थना.. माझ्या मनात आता हा विचार डोकावतोय की, माझ्यावर जर ही वेळ आली तर मी काय करणार / बोलणार... :-(

नगरीनिरंजन's picture

10 Nov 2010 - 4:06 pm | नगरीनिरंजन

माणसं नक्की केव्हा अंतर्मुख होत असावीत बरं? मरणापूर्वी आयुष्याचा सगळा पट नजरेसमोरून सरकतो म्हणतात. खरं खोटं मरणाराच जाणे.