लखलखती त्या दीप कळ्या, अन पहाट ओली नवी नव्हाळी
मांगल्याचे समृद्धीचे, गीत छेडते पुन्हा दिवाळी..
चमचमती ते बिंदू ओले.. ओल्या नवथर सोनसकाळी
सलज्ज हिरव्या तृणांवरती, विसावते बघ पुन्हा दिवाळी
सजून जाते अंगण अवघे, रंग रंगूनी फ़ुले कळ्यांनी
दारी तोरण ऐश्वर्याचे, लावून जाते पुन्हा दिवाळी
अभ्यंगाची लज्जत ऐसी, गुलाब, चंदन, घेत ओंजळी
आणि प्रीतीचा दरवळ न्यारा, घेऊन येते पुन्हा दिवाळी
प्रेम-मायेचा झरा वाहू दे, परमेशा! भर माझी झोळी
चराचराला दान सुखाचे, देऊन जावो पुन्हा दिवाळी..
- प्राजु
सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
प्रतिक्रिया
4 Nov 2010 - 3:34 am | राजेश घासकडवी
कवितेत बद्ध केल्याबद्दल धन्यवाद. मिपावरील सर्वांनाच ही दिवाळी आनंदाची जावो.
दिवाळीचा मुहुर्त साधायच्या प्रयत्नात कविता थोडी अर्धीकच्ची राहिली आहे असं वाटलं. दोनतीन ठिकाणी वृत्ताची खेचाखेच झालेली आहे. पण या प्रकारच्या कवितेत शब्दांपेक्षा भावना महत्त्वाची, ती पोचते.
4 Nov 2010 - 5:20 am | अनामिक
मस्तं कविता. सर्वांना दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा!
4 Nov 2010 - 5:51 am | बेसनलाडू
प्रसन्न करणारी, सुंदर कविता. खूप आवडली.
(उल्हसित)बेसनलाडू
4 Nov 2010 - 7:41 am | गणेशा
अतिशय सुंदर कविता
लखलखती त्या दीप कळ्या, अन पहाट ओली नवी नव्हाळी
वा वा काय सुरुवात आहे .. जबरदस्त ....
लिहित रहा .. वाचत आहे ...
4 Nov 2010 - 4:38 pm | प्राजक्ता पवार
कविता आवडली .
4 Nov 2010 - 4:40 pm | यशोधरा
सुरुवातच आवडली प्राजू खूप! मस्त आहे कविता!
4 Nov 2010 - 6:42 pm | प्रभो
मस्त...आवडली......
4 Nov 2010 - 7:05 pm | विसोबा खेचर
सु रे ख....!!
4 Nov 2010 - 8:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली.
-दिलीप बिरुटे
5 Nov 2010 - 1:24 am | चित्रा
कविता आवडली, प्राजु, दिवाळीनिमित्त सर्वांना शुभेच्छा.
9 Nov 2010 - 8:48 am | सुधीर काळे
मूळ कविता झकास आहे, पण विडंबनाला जास्त प्रतिसाद मिळालेले दिसताहेत!!