एक होती म्हातारी .............

पियुशा's picture
पियुशा in जनातलं, मनातलं
1 Nov 2010 - 3:05 pm

हाय मि पियुशा पहिलच प्रयत्न आहे माझा ,लिखनतिल चुका बद्दल साम्भालुन घ्या,
एक होती म्हातारी .............

खूप खूप वर्षापूर्वी आट-पाट नगर होते , त्यात एक खावून पिवून सुखी असे कुटुंब राहत होते ,नवरा बायको आणि ४ मुले ,थोडीशीच शेती त्यावर संसार अवलंबून होता , मुले मोठी होऊ लागली तशा-तशा गरजा वाढू लागल्या ,त्यांची शाळा वही पुस्तके ,यांचा खर्चामुळे घरच्या माऊलीला शेतात मजुरी करावी लागायची ,आईबापाने जणू चंगच बांधला होता कि आपण अडाणी राहिलो पण मुलांना शिकवून मोठे साहेब करायचे , म्हणून मायबाप रात्रीचा दिवस करू लागली मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, मोठा मुलगा दहावी पास झाला आणि काळाने बापावर घाला घातला ,स्वप्न डोळ्यात साठवून बापाने जगाचा निरोप घेतला ,माउली ओक्साबोक्शी रडली ,धाय मोकलून रडली आम्हाला उघड्यावर टाकून काय मिळाले रे देवा तुला ?
घास गोड लागेना
दुख सरता सरत नव्हते आईबाप शेजारी पाजारी समजावून गेले " चार पोर हैत पदरी त्यंच्या कडे बघ बायो, माझे असा नग करू ग" बाय तुझ्याशिवाय कोण ग पिलांना ? माउलीने केविलवाण्या तोंडाकडे बघितले पदर खोचला ,कामाला लागली ,दिवसरात्र काम करू लागली ,धुनी भांडी ,मोलमजुरी ,खुरपणी ,जे मिळेल ते काम करू लागली ,"म्या माझ्या धन्याच सपान पूर करणार" माझ्या मुलांना शिकीवाणार मोठा साहेब बनविणार,
मुलगी मोठी झाली आई बरोबर कामालां जाऊ लागली ,दोन पैसे घरात अनु लागली पण लोकांच्या नजरा,बिन बापाची पोर जीवाला घोर ,म्हणून आईने तिचे दोनाचे चार करून दिले मुलगी नांदायला गेली,तेवढेच समाधान माऊलीला,
आता ती एकटीच कष्ट करू लागली मोठा मुलाचा नंबर D .e.d ला लागला धाकटा १० वी चांगल्या मार्कांनी पास झाला दिवस सरत होते मुंगीच्या पावलांनी , एक एक दिवस फार कठीण, हातपाय दुखयाचे,
अंग ठाणकायचे दवापाणी करायला पैसे कुठून आणायचे ?
सांगणार तरी कुणाला?
एक दिवस तिच्या आयुष्यातला सोनेरी दिवस आला मुलगा शिक्षक झाला ,

कष्टाचे चीज झाले आई चे डोळे समाधानाने भरून आले त्याला रुद्याशी गच्च गच्च कवटाळले

पण मुलाची नोकरी तालुक्याच्या ठिकाणी लागली छातीवर दगड ठेऊन त्याला निरोप दिला , आईला वाटले चला ,मुलगा
सोयीला लागला दुसर्या मुलाने रेलेवेचा फोर्म भरला तो पण परीक्षा पास होऊन नोकरीला लागला तालुक्याच्या गावी , शेजारी पाजारी माउलीचे तोंडभर कौतुक करू लागले पण छोट्याचे काय ? त्याचे अभ्यासात डोके चालत नव्हते म्हणून शेतीत डोके घातले ,लोक आता सुनबाई आण म्हणू लागले ,
आता डोळ्यात सुख स्वप्ना तरळत होती ,आता कुठे आराम मिळणार होता,

पण पण ,मुलाने तर लग्न उरकून टाकले ,आईला न सांगता ,वाईट वाटले तिला पण जाऊ दे मुलाचे सुख तेच आपले सुख ,बायको नोकरी करणारी मिलाली ,खेड्यात
राहणे शक्य नव्हते ,म्हणून त्याचे बिर्हाड नोकरीच्या ठिकाणी
हलविले दुसरयानेही भावाच्या पावलावर पावुल टाकले,माय ने डोळ्यातले पानी डोळ्यात ठेवले , वर्षे गेली नातवंडे
झाली पण

संबध तेवढ्यापुरते तेवढे ठेवले मुलांनी ,आईला money order पाठवायचे , एखाद दुसर पत्र बस ,
लट्ठ पगार ,गाडी बंगला , त्यामुळे मुलांना हाय फाय जगण्याची सवय ,
खस्ता खालेल्या आईची काय माया राहिली, पैशापुढे भुते नाचतात बाकी काय ?

अडाणी भाऊ आणि आई नको ,अडानी गावंडळ आई ,कष्टाने रापलेली ,
पायांना भेगा पडलेली आई ,

दोघ नोकरी ला नातू छोटा म्हणून आईला नेले सांभाळायला ,

सुनेला हवा होता नवरा पण सासू नको होती,

हळू हळू सुनेच्या छोट्या छोट्या कुरबुरिंचे
रुपांतर मोठ्या भांडणात व्हयाला लागले , आईने नमते घेतले सुनेच्या मर्जिप्रमाने वागू लागली कारन नातू जीव की प्राण जाला होता ,राहणी आपली साधी नौ वारी साड़ी,वर चोलिची गाथ ,
पायात वाहणा,
नातवाला खूप खेळवायची,काऊ मौ च्या गोष्टी सांगायची
त्याला कडेवर घेउन सोसयटित फिरवायची, इतर बायकंशी गप्पा मारायची तेवढाच विरुंगळा!पण सुनेला का कोण जाने ते कमिपनाचे वाटायचे आपल्या
अडाणी सासूमुले आपली चव जाते आहे असे सारखे सारखे वाटायचे शेवटी रोज रोज काही न काही खुस्पट काढून सासूला परत गावी पाठविले , मुलगा पण काही बोलला नाही बायको पुढे !

दुसर्याने तर आधीच बदलीची नोकरी म्हणून हात वर केले होते,

गावी बायाबापड्यांनी विचारले का गो परतलीस? पोरांनी लैई जीव लावला पण गाव सोडून करमना म्हणून आली माघारी , काय सांगणार होती बिचारी या वयात प्रेम हवे होते , नातवाना खेळवायचे होते , खूप खूप लाड करायचे होते पण पण सर्वे अधुरेच ,तेच कमी होते कि काय मुलिला माहेरी सोडून गेला जावई कायमचा , मुल होत नाही म्हणून !
दोघी मायलेकी गळ्यात पडून रडल्या रात्रभर , आता दोघी आणि त्यांचा अडाणी भाऊ ,शेतात जेमतेम पिकायचे त्यावरचं गाडा चालू होता ,आता पुन्हा दोघीही जुंपल्या ,माउलीची दृष्टी कमी झाली हळू हळू , दातही पडले , पण तिला मासे फार आवडायचे म्हणून लेक पैसे साचवून आणायची ,एक एक तुकडा फार चवीने चघलयाची ,तुप्त व्हायची , (शहरात सुनेकडे एकदा म्हणाली होती आज मासे कर ना मला लैई आवडतात, " अहो आई या वयात कुठे खाता मासे गरम आणि पचायला जड असतात ते ,पुन्हा पोट-बिट बिघडायचे तुमचे , उत्तर अपेक्षित होते )

वर्षे सरली नातू डॉक्टर झाला ,आणि एकदा आजी ला भेटायला गावी आला आजीची दशा पहिली स्वतावरच चरफडला ,आजी अधू झाली होती दृष्टी कमी झाली होती पलंगावर पडून असायची मुलगी मनाने सेवा करत होती ,नातवाला रडू फुटले हीच का ती आपली लाडकी आजी आपले लाड पुरविणारी ,आपल्याला अंगाखांद्यावर खेळवणारी ,गोष्टी सांगणारी चोरून खाऊ देणारी
त्या क्षणी ठरविले आजीला घेऊन जायचे आपल्याबरोबर, उपचार करायचे ,आई वडिलांचा प्रचंड राग आला पण आवरते घेतले , सासुबैंची सेवा नको म्हणून नंदेला पण बरोबर घेतले सुनेने! आता त्यांना स्वतंत्र खोली दिली,दोघीच गप्पा मारायच्या नातू फार गुणी खूप काळजी घ्यायचा ,हाताने औषधपाणी द्यायचा आजीशी खूप बोलयच,आजी बोटे मोडायची त्याच्या गोड चेहऱ्यावरून दृष्ट लागू नये म्हणून
एकदा नातू घरी नव्हता , सुनेने मासे आणले होते पार्टी होती म्हणून ,पण सासूला नाही दिले ,खाऊन उरलेले fridge मध्ये ठेवले ,खाण्याची खूप इच्छा झाली पण पण ,मुलीला राहवले नाही गेली माशाचा एक तुकडा आणि भाकरी चोरून आणली माउली साठी ,सूनेन तांडव केले कारणच
हवे होते तिला "काय पद्धत आहे कि नाही तुम्हाला ?"

घास कडू झाला डोळे पाणावले , सगळे झोपी गेले आणि माऊलीही कायमची झोपी गेली ,मुलगी आणि नातू फार फार रडली ,गावी आले ,नातेवाईक आले ,क्रियाकरम झाले नातवाने केले सगळे ,त्याच्या जीवाला घोर लागला ,इतक्या जणांना वाचवले मी आणि माझ्या लाडक्या आजीसाठी काही करू शकलो नाही ,काय उपयोग माझा, अंतर्मन खात राहिले त्याला ,

लोकांना दिसावे म्हणून रडली मुले
सुना ,माया केव्हाच आटली होती ना? मुलांनी दहावा केला मोठा खर्च केला, समाधी बांधली मार्बलची ,फुलांच्या माळा,आवडते पदार्थ सगळे सगळे ठेवले पण कावळा नाही शिवला पिंडाला ,गावकरी हळहळले,काहून असे झाले ग बाय काय विच्छा होती म्हातारीची देव जाने ? माहिती होते ते फक्त नातवाला ,आनि लेकीला...

आटपाट नगरातील म्हातारीची हि कहाणी ..........

कथालेख

प्रतिक्रिया

स्पा's picture

1 Nov 2010 - 3:23 pm | स्पा

काय पियुषा.................

लिहिलस खूप छान ...पण अगं...

आपल्या मराठी चित्रपटात हेच तर दाखवतात वर्षानुवर्ष ............................
रडकथा......... अन्याय....... अलका कुबल..................... :(

पण....

पुढील लिखाणास शुभेछा.... :)

utkarsh shah's picture

1 Nov 2010 - 3:52 pm | utkarsh shah

छानच. आपल्यापैंकी पण खुपजणांचे आयुष्य असेच जाते.......
लिहीत रहा...

पर्नल नेने मराठे's picture

1 Nov 2010 - 4:15 pm | पर्नल नेने मराठे

वाइट वाटले वाचुन :(

विसोबा खेचर's picture

2 Nov 2010 - 1:17 pm | विसोबा खेचर

सहमत..

परिकथेतील राजकुमार's picture

1 Nov 2010 - 4:21 pm | परिकथेतील राजकुमार

छान आहे कथा. (हे बळच ! खरेतर म्हातारी,धुणीभांडी, धन्याचे स्वप्न हे शब्द आल्याबरोब्बर मी 'प्रतिक्रीया' कडे वळलो.)

टंकनातली सुधारणा वाखाणण्याजोगी.

असल्या नालायक पोरांचा लय राग येतो ...

लिखान आवडले .. पण काही ठिकाणी प्रसंग अर्धे ठेवुन पुढे गेल्यासारखे वाटले

उदा.

अडाणी भाऊ आणि आई नको ,अडानी गावंडळ आई ,कष्टाने रापलेली ,
पायांना भेगा पडलेली आई ,

दोघ नोकरी ला नातू छोटा म्हणून आईला नेले सांभाळायला ,

सुनेला हवा होता नवरा पण सासू नको होती,

---

बाकी सर्व जबर्दस्त .. खरी कहाणी वाटली

छोटा डॉन's picture

1 Nov 2010 - 4:38 pm | छोटा डॉन

पहिल्याच प्रयत्नात उत्तम कथा जमतेय असे वाटले.
अर्थात अशा कित्येक सत्यकथा माहित असल्याने जास्त गलबलुन वगैरे नाही आले.

टंकनात आणि लिखाणात अजुन सुधारणा जमल्यास त्याचा नक्की फायदा होईल.
पुलेशु.

- छोटा डॉन

हि कथा कल्प् निक नाहि खरिच आहे ,पन मला नित जमत नहिये ना शब्दाचि बान्ध् नि हलु हलु शिकते आहे

नरेशकुमार's picture

1 Nov 2010 - 4:48 pm | नरेशकुमार

असले डोकं हालतं हे असलं काहीतरी दळभद्री वाचून.
हे अशी रडारडी करणं बस झाला आता.

ह्या किव्वा असल्या म्हातार्यांना आमच्या मातोंश्रीकडे जरा काहीदिवस शिकवणीला ठेवायला पाहिजे, मग त्यांची मुलेच इथे लेख लिहितील, आमची आई कशी हिटलर आहे ते. मुलांच्या , सुनांच्या दोन थोबाडीत अशी ठेऊन द्यायची कि तोंडच फुटलं पाहिजे. ते सगळं शिकवतील आमच्या माता.

मृत्युन्जय's picture

1 Nov 2010 - 4:59 pm | मृत्युन्जय

मुलांच्या , सुनांच्या दोन थोबाडीत अशी ठेऊन द्यायची कि तोंडच फुटलं पाहिजे. ते सगळं शिकवतील आमच्या माता.

:). मुलाने तुमच्या आईला सून आल्यानंतर मार खाल्ला की आधीच? आणि सूनेने ४९८अ लावला नाही त्याबद्दल अभिनंदन.

नरेशकुमार's picture

1 Nov 2010 - 5:09 pm | नरेशकुमार

मुलाने तुमच्या आईला सून आल्यानंतर मार खाल्ला की आधीच?
हॅ हॅ हॅ

आणि सूनेने ४९८अ लावला नाही त्याबद्दल अभिनंदन.

हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ, ............................त्याला डेरींग लागते.

मार खाण्याचे सोडा, पण हे फ्रीज मध्ये अन्न लपवून ठेवले आहे हे जर का आमच्या मातेला कळले तर, तो फ्रीज अक्षरशः उचलून डोक्यात घालेल.

मुलांना (मला) आणि सुनेला जास्ती फाजील स्वातंत्र्य न देता व्यवस्थित धाकात ठेवलंय.

हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ

हे कसं type करायचं?

"hya " असं केलं कि "ह्या" अस type होतं..............

नरेशकुमार's picture

1 Nov 2010 - 5:20 pm | नरेशकुमार
स्पा's picture

1 Nov 2010 - 5:23 pm | स्पा

हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ ....................... ;)

डॉ.श्रीराम दिवटे's picture

1 Nov 2010 - 5:20 pm | डॉ.श्रीराम दिवटे

उत्तम लिहलेत खरे परंतु लेखन सुधारणे गरजेचे आहे.

मनि२७'s picture

1 Nov 2010 - 5:22 pm | मनि२७

मस्त लिहलय पियुषा... अजून येऊ देत...
पुढील लिखाणास शुभेच्छा!!!
:-)

प्रियाली's picture

1 Nov 2010 - 5:28 pm | प्रियाली

लिहित चला पण रुद्य, मिलाला, साम्भालुन, क्रियाकरम, बिर्हाड आणि असे अनेक शब्द सुधारण्याची गरज आहे तेव्हा लिहिताना शब्द योग्य लिहिण्याचीही काळजी घ्या. शेवटी मराठीही आपली आईच आहे नाही का? तिला असे चुकीचे लिहिणे म्हणजे तिच्यावर अन्याय करणेच झाले. :)

असो.

पुढील लेखनाला शुभेच्छा! अवश्य लिहा. जमेल प्रयत्नाने.

चिगो's picture

1 Nov 2010 - 5:48 pm | चिगो

आपलं.... सहमत..!!

स्पंदना's picture

1 Nov 2010 - 6:30 pm | स्पंदना

पियुषा छान लिहिल आहेस.

स्वानन्द's picture

1 Nov 2010 - 7:25 pm | स्वानन्द

च्छ्या.... मूड गेला राव... कशासाठी म्हणून जगावं आयुष्यात हा एक प्रश्नच आहे :(

लेखन आवडले. पूर्ण कथेमध्ये छान वेग होता.

पु.ले.शु.

ईन्टरफेल's picture

1 Nov 2010 - 8:50 pm | ईन्टरफेल

योग्य शब्द लिहिण्याचीही काळजी घ्या...
शेवटी मराठीही आपली आईच आहे नाही का?
तिला काहि कळत नाहि का ?
घेईल सांभाळुन! नका काळजी करु ?
प्रियालि ताई ................

प्रियाली's picture

1 Nov 2010 - 9:02 pm | प्रियाली

तिला काहि कळत नाहि का ?
घेईल सांभाळुन! नका काळजी करु ?

सर्वांना सर्व कळत असतं हं! इथे येणारे अनेक सज्ञानच असतात पण एखाद्याला सल्ला देऊन जर त्यांच्यात सुधारणा होणार असेल तर हरकत नसावी. लेखिकेने जर सुधारणा केल्या तर सर्वांना हव्या आहेतच. हा त्यांचा पहिला प्रयत्न आहे तेव्हा चुका होणारच. प्रेमाने कोणी सल्ला देत असेल तर तो स्वीकारण्यात काहीही गैर नाही. :)

मराठीची काळजी करणे आवश्यक आहे.

पियुशा's picture

2 Nov 2010 - 1:00 pm | पियुशा

thanx priyali point to be noted पुढे एक विनोदी लेख देणार आहे,तेव्हा आधी चूका नक्की दुरुस्त करेन

अप्पा जोगळेकर's picture

1 Nov 2010 - 9:08 pm | अप्पा जोगळेकर

हं. चालायचच. जगरहाटी. जन्माला आलेल्या पोराच्या नरड्याला नख लावणारे आईबापही असतातच की. मगच्या आथवड्यात एका पोराला केईम मधून नाही का फेकून दिलं.
बाकी, लेखनातील चुका सांभाळून घेतल्या आहेत. अक्खाच्या अक्खा प्रविन्भप्कर पचवला लोकांनी तर हे काय अवघड आहे? पुढील लिखाणासाठी शुभेच्छा.

प्रियाली's picture

1 Nov 2010 - 9:14 pm | प्रियाली

प्रवीणभ्पकरचे काय झाले हे सर्वांना माहित आहे. त्याच्या लेखनाचे हसूच झाले होते. तेव्हा चुकीच्या गोष्टी कृपया पसरवू नयेत आणि त्यांची भलावणही करू नये.

वरील लेखिकेला लेखनाचे अंग आहे. पहिल्या लेखातील चुका सर्वच सांभाळून घेतात परंतु भविष्यात त्यांनी यापेक्षा चांगले लेखन करावे असे सांगणे आवश्यक आहे.

शिल्पा ब's picture

1 Nov 2010 - 11:33 pm | शिल्पा ब

हम्म...गोष्ट एकदम मराठी पिच्चरसारखी आहे..
वर लेखिकेने सत्यकथा आहे असे म्हंटले आहे...तसे असेल तर खूपच वाईट...

पैसा's picture

1 Nov 2010 - 11:48 pm | पैसा

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

पीयुषा, पु ले शु
हे उपयोगी पडेल - http://www.misalpav.com/node/1312

पुण्याचे वटवाघूळ's picture

2 Nov 2010 - 7:41 pm | पुण्याचे वटवाघूळ

वचुन वैत वतले.