हे क्रांतिकारकांनो!

अजय जोशी's picture
अजय जोशी in जे न देखे रवी...
20 Apr 2008 - 10:27 am

हे क्रांतिकारकांनो,

बरं झालं तुम्हीच क्रांतिकारक झाला
देशासाठी आता वेळ आहे कुणाला?

बरं झालं तुम्हीच देशासाठी लढला
खाणं, पिणं, मौजमजेला वेळ आम्हाला दिला

बरं झालं तुम्ही रक्त, मांस सांडलं
प्रत्येकानं आपापलं घर त्यावर बांधलं

बरं झालं तुम्ही चलेजाव म्हटलं
संस्कार नि संस्कृतीला सहज आम्ही सोडलं

बरं झालं तुम्ही तिरंगा फडकाविला
प्रत्येकानं आपापला रंग वेगळा निवडला

बरं झालं तुम्ही वेळीच शहीद झाला
खुर्चीसाठी भांडायला चान्स आम्हाला दिला

चू.भू.दे.घे.

कविता

प्रतिक्रिया

विदेश's picture

20 Apr 2008 - 5:29 pm | विदेश

बरं झालं तुम्हीच देशासाठी लढला
खाणं, पिणं, मौजमजेला वेळ आम्हाला दिला

सद्य वस्तुस्थिती अशीच . ते कुठे आणि आम्ही कुठे?

स्वाती राजेश's picture

20 Apr 2008 - 10:04 pm | स्वाती राजेश

सध्याची परिस्थिती छान मांडली आहे...

विसोबा खेचर's picture

21 Apr 2008 - 7:38 am | विसोबा खेचर

सुंदर कविता...!

आपला,
(अंतर्मूख!) तात्या.

धमाल मुलगा's picture

21 Apr 2008 - 10:36 am | धमाल मुलगा

बरं झालं तुम्ही तिरंगा फडकाविला
प्रत्येकानं आपापला रंग वेगळा निवडला

बरं झालं तुम्ही वेळीच शहीद झाला
खुर्चीसाठी भांडायला चान्स आम्हाला दिला

जबरदस्त! अजयभाऊ, आवडलं !!!!

-ध मा ल.

अजय जोशी's picture

22 Apr 2008 - 9:07 am | अजय जोशी

सर्वांना धन्यवाद!
(आपला पुणेरी)
अ. अ. जोशी

सत्या's picture

25 Apr 2008 - 10:06 am | सत्या

मस्त

नादचखुळा's picture

25 Apr 2008 - 11:19 am | नादचखुळा

अजय भाउ कविता नाद्चखुळा

विसोबा खेचर's picture

25 Apr 2008 - 11:41 am | विसोबा खेचर

अजय भाउ कविता नाद्चखुळा

म्हणजे काय? कृपया स्पष्टीकरण द्या अन्यथा आपला प्रतिसाद उडवण्यात येईल..

तात्या.