आता उरल्यात फक्त तुझ्या आठवणी,
खिडकीतून येणाऱ्या कवडश्यात समोर टेबलावर दिसतो तो तांब्या आणि त्यावर उपडं ठेवलेलं फुलपात्र, पूर्ण खोलीभर पसरलेला तो रातराणीचा सुगंध, टेबलाच्या पायापाशी पडलेलं ते वर्तमानपत्र.
रेदिओ वर लागलेलं ते मुकेशचं गाणं "जाऊन कहा बताये दिल...."
पूर्ण खोलीभर व्यापलेला अंधार ज्याच्या कुशीत संध्याकाळचा उन हळू हळू निजू पाहताय, आणि तो आपला पदर मायेना त्याच्या अंगावर पास्राव्तोय, खुद्ची एकसारखी लयीत मागेपुढे होतेय
आणि हळूच येणाऱ्या वार्याच्या झुळकीने तुझ्या फोटोवरचा चंदनाचा हार हलतोय...
.... आता... आता फक्त उरल्यात तुझ्या आठवणी....
प्रतिक्रिया
25 Oct 2010 - 5:32 am | प्राजु
चांगलं आहे मुक्तक.
25 Oct 2010 - 10:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झंम्प्यासेठ अजून भर पाहिजे होती राव...!
-दिलीप बिरुटे