कोजागिरी पौर्णिमा

स्वप्निल मन's picture
स्वप्निल मन in जे न देखे रवी...
21 Oct 2010 - 9:38 pm

कितीही रात्री जागल्या तरी
पौर्णिमेच्या चंद्राला तोड नाही
आणि प्रेमात हरलेल्याला तर
कोजागिरीची बासुंदीही गोड नाही

करुणचारोळ्याकविता

प्रतिक्रिया

अथांग's picture

22 Oct 2010 - 3:40 am | अथांग

अजून कडवी जोडायचा प्रयत्न करावा तुम्ही - छानशी कविता तयर होईल!

मराठमोळा's picture

22 Oct 2010 - 5:15 am | मराठमोळा

अरे वा. लै भारी.

>>आणि प्रेमात हरलेल्याला तर
कोजागिरीची बासुंदीही गोड नाही

का बरे? प्रेमात हरलेले लोकं बासुंदी मधे साखर घालत नाहीत का?

गणेशा's picture

26 Oct 2010 - 1:23 pm | गणेशा

अतिशय आवडले ..

एक आमच्याकडुनही :

पोर्णिमेच्या चंद्रास कोठे
चांदण्यांची संगत असते
प्रेमाच्या उंबरठ्यावरच
नाउमेद व्हायचे नसते