नमस्कार मंडळी
इथे आता मस्त लाल पिवळ्या फुलांनी झाडं भरुन गेल्येत आणि सगळ्यांना वेध लागलेत समरचे. समर मधली सगळ्यात मोठी करमणूक म्हणजे बार्बेक्यू. मस्त पैकी बागेत किंवा घराच्या अंगणात कोळसे पेटवून शेगडी करायची आणि भाजलेले वेगळे वेगळे पदार्थ खायचे. कोळशावर भाजलेल्या पदार्थाना येणारा तो खरपूस वास एकदम झकास असतो आणि त्यांची चव काही औरच! कुठल्याही ग्रिल वर करु शकू अशा पदार्थाची रेसिपी शेअर कराल का इथे?
पहिली रेसिपी आहे भाजलेल्या मक्याच्या कणसाची मस्त खरपूस भाजलेलं कणीस त्याला लिंबू, अमूल बटर, तिखट, मीठ लावून गरम गरम खायला सॉलिड मजा येते.
रगडा पॅटीस मधली पॅटी जर ग्रिल वर भाजली तर रगडा पॅटीस मस्तच लागतं.
(अजून खूप रेसिपीजच्या प्रतिक्षेत असलेली) वरदा
प्रतिक्रिया
19 Apr 2008 - 9:20 am | विसोबा खेचर
मी देखील अश्या रेसिपीजची वाट पाहात आहे..!
तात्या.
19 Apr 2008 - 11:08 am | प्राजु
वरदा.. मी इथे भारतात आल्यावर बार्बेक्यु आठवलं होय तुला???
असो... आपण इस्ट कोस्ट स्पेशल कट्टा करणार आहोत ना तेव्हा बार्बेक्यु नक्की करू... तो पर्यंत रेसिपिज जमवून ठेव. :)) स्वातीला विचार ती ५० पदार्थ सांगेल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Apr 2008 - 11:26 am | पिवळा डांबिस
माझी बायको माझ्या शेजारी बसून म्हणत्येय की,
'बर्रं झालं, सांगितलं कि कणसं कशी भाजायची ती!! आता पुढच्या वेळेस बार्बेक्यू चिकन आणि कबाबांबरोबर कणसंही भाजू!!! हा! हा!! हा!!!!
आज की नाही, आम्ही प्रॉन्स कबाब बार्बेक्यू करुन खाल्ले!! दर शुक्रवारच्या रिवाजाप्रमाणे!!! तुमचा काका राबतोय ग्रीलवर!!!!"
ए बायांनो! वरील मजकूर आमच्या पत्नीने (सुविद्य, सुंदर, सुशिक्षित वगैरे!!) लिहिला आहे! नाहीतर उगीच काकावर रागवाल!! राग आला असेल तर इथे या आणि काकूवर तुमचा राग काढा!!!
ग्रीलवर राबणारा (बिचारा),
डांबिसकाका
19 Apr 2008 - 11:48 am | नंदन
कोथिंबीर-मिरची-पुदिना यांची मिश्र चटणी करावी. त्यात पनीरचे घनाकृती तुकडे मुरवावेत आणि बार्बेक्यूवर टोमॅटो, सिमला मिरची इ. सोबत ग्रिल करावेत.
गेल्या उन्हाळ्यात केलेल्या बार्बेक्यूचा हा फोटू --
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
19 Apr 2008 - 12:02 pm | स्वाती दिनेश
वॉव नंदन, तोंडाला पाणी सुटले,माईन नदीला पूर आला,:))
वरदा,हा धागा मस्तच!
स्वाती
19 Apr 2008 - 12:38 pm | विसोबा खेचर
नंदनसायबा,
खल्लास फोटो रे! मार डाला...
आता लवकरच हा फोटो मिपाच्या मुखपृष्ठावर चढवतो! आणि त्याकरता तुझी परवानगी गृहीत धरतो..चालेल ना?! :)
तात्या.
19 Apr 2008 - 1:28 pm | नंदन
धन्यवाद, स्वातीताई :)
तात्या, परवानगी कसली त्यात. फोटो मुखपृष्ठावर आला त्याचाच मला आनंद होईल.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
19 Apr 2008 - 6:57 pm | चित्रा
उगाच माझे दोन पैसे! -
बार्बेक्यू करून चांगल्या लागणार्या भाज्या खालीलप्रमाणे (चू. भू. द्या. घ्या.) - झुकिनी, वांगी, भोपळी मिरच्या (रंगीत -हिरव्या, लाल केशरी), अस्पॅरॅगस, मशरूम्स, भोपळे, कांदे, छोटे बटाटे, टोमॅटो. भाज्या अर्थातच लगेच शिजत असल्याने त्यांच्यावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे असते. त्या फार मऊ होऊ न देता ग्रिलवर ठेवाव्यात. जर काडीला लावून बार्बेक्यू करायचे असले तर त्या काड्या बाजारात मिळतात तशा आणाव्यात आणि बार्बेक्यू करण्याअगोदर १५ मिनिटे ते अर्धा तास पाण्यात पूर्ण बुडवून ठेवून त्यावर कापलेल्या भाज्या लावून मग ग्रिल करावे. वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या काडीला टोचताना साधारण एकाच आकारात कापाव्यात. पण घट्ट भा़ज्या (बटाटे, भोपळे, गाजरे) ग्रिल करायला वेळ लागत असल्याने त्या थोड्या कमी आकाराच्या कापाव्यात. टोंमॅटो फार वेळ ठेवू नये, घट्ट टोमॅटो वापरावे. भोपळी मिरच्यांसोबात किंचित गोडपणाची चव आवडत असल्यास अननस घालता येतो. अननस अर्थातच जास्त वेळ ग्रिल करायचा नाही. भाज्या ग्रिल करून नुसते वरून ऑलिव्ह ऑइल आणि मीठ-मिरपूड घालूनही छान लागतात. बार्बेक्यूत सर्व भाज्यांना धुराचा वास लागून त्यांचे मूळ स्वाद अधिक प्रसन्नपणे समोर येतात, त्यामुळे खूप वेगवेगळे सॉस वगैरे घालूनही त्या चांगल्या लागत असल्या तरी मला वैयक्तिक तसे विशेष आवडत नाही.
बार्बेक्यू करून कुठचेही मीट चांगले लागतेच! माझ्या एका इराणी सहकार्याने सांगितले होते की कुठचेही कबाब करण्याआधी मीटचे हवे त्या प्रमाणात तुकडे करून ते त्याला जे मॅरिनेड लावायचे ते लावून रात्रभर फ्रीजमध्ये खाली (वर बर्फाच्या ट्रेमध्ये नाही!) ठेवून द्यावे म्हणजे कबाब आतपर्यंत मऊ होतात. आणि तसे कधी केले नसल्यास नक्की करून पहावे. यासाठी व्हेजिटेबल/ऑलिव्ह ऑईल, वूस्टरशायर सॉस, लिंबाचा रस किंवा व्हिनेगर, मीरपूड, लसूण असे घटक आपल्याला आवडतील त्या प्रमाणात एकत्र करून वापरावेत. अर्थात आंबटपणासाठी जपावे. मॅरिनेडमध्ये खूप प्रमाणात आंबटपणा असल्यास त्याचा वेळ कमी करावा असे मी अनुभवाने शिकले.
19 Apr 2008 - 7:54 pm | स्वाती राजेश
बार्बेक्यू चा उपयोग आपण चिकन टिक्का आणि पनीर टिक्का करताना करू शकतो.
इथे चिकन टिक्का करताना:
१/२ किलो बोनलेस चिकनचे २ इंच लांबीचे तुकडे करून
पहिल्यांदा १/२ तास(२ मोठे च.व्हीनेगर,२मोठे च. आले-लसूण पेस्ट,चवीपुरते मीठ्)या मसाल्यात ठेवावे.
दुसर्यांदा २-३ तास (१/२ कप दही, १५ मि.कपडयात बांधून टांगून ठेवावे,१/२ कप फेटलेली साय,३० ग्रॅम चीज किसलेले,१ अंडे,१ मोठा च. कॉर्नफ्लोअर,१च.हिरव्यामिरच्या बारीक कापून, पाहिजे असल्यास कोथिंबीर)यात ठेवावे.
तेल लावलेल्या सळईवर सर्व भाज्या(१ सिमला मिरची, १ कांदा, १ टोमॅटो १ इंचाचे तुकडे करून), व चिकनचे तुकडे नीट खोचून १५ मि.ग्रील करणे किंवा चिकन मऊ होइपर्यंत.
अधून मधून परतवत राहणे.
वरून लिंबाचा रस किंवा चाट मसाला भुरभुरवून भातावर ठेऊन वाढा.
19 Apr 2008 - 7:54 pm | स्वाती राजेश
बार्बेक्यू चा उपयोग आपण चिकन टिक्का आणि पनीर टिक्का करताना करू शकतो.
इथे चिकन टिक्का करताना:
१/२ किलो बोनलेस चिकनचे २ इंच लांबीचे तुकडे करून
पहिल्यांदा १/२ तास(२ मोठे च.व्हीनेगर,२मोठे च. आले-लसूण पेस्ट,चवीपुरते मीठ्)या मसाल्यात ठेवावे.
दुसर्यांदा २-३ तास (१/२ कप दही, १५ मि.कपडयात बांधून टांगून ठेवावे,१/२ कप फेटलेली साय,३० ग्रॅम चीज किसलेले,१ अंडे,१ मोठा च. कॉर्नफ्लोअर,१च.हिरव्यामिरच्या बारीक कापून, पाहिजे असल्यास कोथिंबीर)यात ठेवावे.
तेल लावलेल्या सळईवर सर्व भाज्या(१ सिमला मिरची, १ कांदा, १ टोमॅटो १ इंचाचे तुकडे करून), व चिकनचे तुकडे नीट खोचून १५ मि.ग्रील करणे किंवा चिकन मऊ होइपर्यंत.
अधून मधून परतवत राहणे.
वरून लिंबाचा रस किंवा चाट मसाला भुरभुरवून भातावर ठेऊन वाढा.
20 Apr 2008 - 9:35 am | वरदा
नंदन तो फोटो एकदम सॉलीड आहे...आणि पनीरची रेसिपीही मस्तच...
प्राजु आपल्या बार्बेक्यू साठीच गं जमवतेय रेसिपी...तुझासाठीच थांबलोय सगळेजण्..तू तर मस्त आंबे खात असशील तुला काय आता ह्याचं विशेष.....
डांबिसकाका काकूंना म्हणावं आम्ही वेजी लोक काय खाणार अजून कणसं नाहीतर पनीर भाजला की झाला बार्बेक्यू...मला अजुन काही येत नाही म्हणून तर ही चर्चा..
गेल्यावर्षी एका मैत्रीणीने बार्बेक्यू केला तर आर्धे वेज आणि अर्धे नॉन्वेज्..नॉन्वेज वाले मस्त विकन वगैरे चापून झाल्यावर पनीरही खायला आले..आणि आम्ही पनीर आणि एक एक कणीस खाऊन उपाशीच्....कसली भूक लागली लवकर जायचय सांगून पळ काढला आणि बाजूचं रेस्टॉरंट गाठलं....
चित्रा दोन पैसे काय छानच टिप्स दिल्यास...
बार्बेक्यूत सर्व भाज्यांना धुराचा वास लागून त्यांचे मूळ स्वाद अधिक प्रसन्नपणे समोर येतात,
आहा ! हे अगदी खरं...मस्तच वाट्टात त्या भाज्या.. मला ऑलिव्ह ऑइल घालून खायची आयडीया सुचली नव्हती ते करतेच थँक्यू गं
स्वाती (राजेश) हा पनीर टिक्का भराभर व्हावा म्हणून काय करता येईल कारण ते खूप करावं लागतं आणि आम्ही साध्या वेजीज करत असल्याने खूप मोठ ग्रिल नाही घेणार मग जास्त लोकांसाठी मी किती आधी तयार करुन ठेवू शकते? वेजी कटलेट पण चांगलं लागेल का ग्रिल केलं तर? आणि पोट भरतील अशा वेजी रेसिपी काय करता येतील?
स्वाती (दिनेश) अगं नुसता छान धागा काय रेसिपी टाक की..
वरदा