नेहमीप्रमाणे नाना चौपाटीवरची गंमत पाहुन निघाला.
रस्त्यातुन परा धावत आला आणि "नाना ! नाना ! " हाका मारुन थांबायला सांगु लागला.
"काय रे ? काय झाले ?"
"काही नाही रे ! हे बघ आज क्याफेत पाचशेचा धंदा झाला. चल दिवाळी अंक आणु विकत ... चार पाच तर सहज मिळतील"
"फक्त चार पाच... साला तु मराठी माणुस कधी सुधरणार नाहीस... अरे जुगाड करायला कधी शिकणार?"
"जुगाड? आणि तो कसा? च्यायला शंभर शंभर रुपये तर आहेच किंमत... डिस्काउंट देवुन देवुन किती देणार?"
"तुला नाही कळणार.. मी सांगतो तसे कर... चल जरा तिथे बसु निवांत आणि सांगतो.. "
"चल...."
"तुझ्याकडे कम्प्युटर आहे ?"
"हो..."
"लेजर प्रिंटर?"
"हो..."
"एक मस्त लेटरहेड बनवुन घे... संस्थेचे नाव मराठवाडा मराठी उत्कर्ष संस्था. रजिस्टर्ड पत्ता औरंगाबाद, जालना असला कुठला तरी टाक, पत्रव्यवहाराचा पत्ता तुझा क्याफेचा पत्ता टाक."
"कशाला?"
"सांगतो ते ऐक रे मुकाट्याने, पूर्ण बोलु दे मला. "
"बर बर सांग"
"त्यावर अध्यक्ष म्हणुन कुणी प्राध्यापक, किंवा गेला बाजार डाक्टर असला कुणीतरी लिहि, उपाध्यक्ष शक्यतो अनिवासी पहा.. पत्ता देवु नको शहराचे आणि देशाचे नाव टाक, माहित नसलेले .. सदस्य म्हणुन अजुन दोन चार नावे टाक, महिला प्रतिनिधी म्हणुन एक नाव विसरु नकोस. तुझे नाव सेक्रेटरी म्हणुन टाक."
"बर पुढे..."
"एक पत्र लिही, वृत्तपत्राच्या संपादकांना.. की दरवर्षीप्रमाणे मराठवाडा मराठी उत्कर्ष संस्था ही संस्था दिवाळी अंकासाठी विशेष स्पर्धा आयोजित करत असुन प्रथम क्रमांकास १००१, द्वितीय क्रमांकास ७०१, तृतीय क्रमांकास ५०१ आणि उत्तेजनार्थ दोन प्रत्येकी २५१ रुपयांचे बक्षिस ठेवलेले आहे. तरी यासाठी इच्छुक प्रकाशकांनी आपल्या दिवाळी अंकाच्या दोन प्रतिंसह अर्ज करावा. आणि तुझा पत्ता देवुन टाक..."
"अरे पण आपण कधी असे केले मागच्यावर्षी..."
"कोण येतंय पहायला... मोठ्या पाच पन्नास पेपरला ही बातमी देवुन टाक. ते छापतील"
"आणि छोट्या पेपरला? "
"त्यांना डायरेक्ट देण्याची गरज नाही. त्यांचे शोध पत्रकार असतात. आपल्या पेपरात न आलेल्या बातम्या हुडकुन ते छापतील. आपले काम होईल."
"पण मराठवाडा असेच नाव का?"
"हल्ली मराठीचा उत्कर्ष करण्याची जबाबदारी त्यांनी उचलली आहे म्हणुन..."
"बर पुढे..."
"पूढे काय? वाट पहा ... अधिकृत ४५० च्या आसपास आणि अनधिकृत अजुन तीनचारशे असे ७०० ते ८०० दिवाळी अंक निघतात पूर्ण महाराष्ट्रातुन.. कमीत कमी ५० तरी अंक नक्की येतील आणि मटका लागलाच तुझा तर तीन चारशे पण येतील. डिपेंन्डस.. ! "
"आणि समजा कुणी इथे तपासाला आले तर.. "
"कूणी येत नाही, येवढा वेळ कुणाला नसतो.. आलेच तर मुख्य कार्यालय तिकडे असुन सोईसाठी हा पत्ता आहे असे सांग, चहा पाज आणि दे परत पाठवुन. त्यातही जास्तीत जास्त तुला फोन येतील काय झाले? आमचा नंबर लागला का वगैरे.. "
"मग त्यांना काय सांगु... "
"*****, ***, **, *** सगळं मीच सांगु..."
"नाही .. नाही कळले.. कळले... "
"हं.. जा लाग तयारीला.."
"हो.. पण मला सांग त्यांच्याकडुन दोन प्रति का मागवायच्या? एकात काम नाही होणार? "
"आलेली दुसरी प्रत माझ्या घरी पोहोचती करायची.. सल्ल्याची फी म्हणुन."
(पुन:प्रकाशित - दिवाळीच्या आगाउ शुभेच्छा ! :) )
प्रतिक्रिया
19 Oct 2010 - 1:48 pm | विजुभाऊ
नाना जुन्या ( मिपावरच पूर्वी प्रकाशीत) गोष्टीच तू नवीन धागा म्हणून खपवतोयस.
जनाची नाही मनाची नाही डॉन्याची नाही निदान नानाची तरी लाज बाळग.
19 Oct 2010 - 1:50 pm | विजुभाऊ
नानाचा निषेध
19 Oct 2010 - 1:51 pm | विजुभाऊ
नानाचा निषेध
19 Oct 2010 - 1:51 pm | विजुभाऊ
नानाचा निषेध
19 Oct 2010 - 1:52 pm | विजुभाऊ
नानाचा निषेध
19 Oct 2010 - 2:57 pm | रन्गराव
आवरा आता, नाहीतर तुमचाच निषेध होईल इथ. ;)
19 Oct 2010 - 2:59 pm | रन्गराव
मला आता रद्दीच दुकान टाकायला हरकत नाही. तेवढच स्वस्तात वाचून होइल. आणि बरोबर जोडधंदा पन ;)
19 Oct 2010 - 7:30 pm | शुचि
>> "त्यावर अध्यक्ष म्हणुन कुणी प्राध्यापक, किंवा गेला बाजार डाक्टर असला कुणीतरी लिहि, उपाध्यक्ष शक्यतो अनिवासी पहा.. पत्ता देवु नको शहराचे आणि देशाचे नाव टाक, माहित नसलेले .. सदस्य म्हणुन अजुन दोन चार नावे टाक, महिला प्रतिनिधी म्हणुन एक नाव विसरु नकोस. तुझे नाव सेक्रेटरी म्हणुन टाक." >>
कसली हसतीये. आवरा या नानांना कोणीतरी!!!! :)
20 Oct 2010 - 10:26 am | ब्रिटिश टिंग्या
या नान्याच्या नादी लागुन पर्याचा आयडी ब्लॉक होईलसे वाटते!
20 Oct 2010 - 10:38 am | आनंदयात्री
तुम्ही मराठवाड्याचे का हो ?
(तरीबी ऐकायचे)
-
आंद्या फुले
20 Oct 2010 - 10:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:| (:|
20 Oct 2010 - 10:54 am | ज्ञानेश...
एवढ्या खर्चात किती दिवाळी अंक विकत मिळतील, याचा विचार करतोय.
असो.
दिवाळीच्या शुभेच्छा.
20 Oct 2010 - 4:36 pm | Nile
इतक्या लवकर लेख दिवाळी अंकात पण रीपिट होत नाहीत!