कालच्या रविवारी लोहगड आणि विसापूर किल्ल्यांवर जाऊन आलो. लोणावळ्याजवळ मळवली ठेसन आहे तिथून जवळच आहेत हे किल्ले.
कार्यबाहुल्यामुळे लेख लिहीता येत नाहिये. पण तोपर्यंत ह्या प्रकाशचित्रांवर नजर फिरवा.
इतर माहिती इथेच प्रतिसादांमध्ये येईल हळू हळू.
लोहगडाच्या पायथ्याशी भाजे गावात कडक मिसळ खाऊन आलेला अभिजित.
प्रतिक्रिया
1 Oct 2007 - 7:21 pm | धनंजय
सगळीच चित्रे ए-वन भिंतीवर टांगण्यासारखी आहेत. एक खास म्हणजे खासच लक्षात राहील ते पिवळ्या फुलांना मुख्यभागात घेऊन विंचूकाट्याला पार्श्वभूमीत टाकलेले. एखादी बाब ओझरत्या धूसर उल्लेखाने अधिक ठसा उमटवते, ही छायाचित्रातली शुद्ध कविता आहे, कविता.
ते रोडक्या गुराचे चित्र काहीही गाजावाजा न करता मोठी गोष्ट सांगून जाते. आता गप्प बसतो, कारण एकेका चित्राची प्रशंसा करायला लागलो तर मिसळपावाचे मेगाबाईट संपतील.
1 Oct 2007 - 8:32 pm | आजानुकर्ण
त्या चित्राचा विशेष उल्लेख मीदेखील केला होता. :)
सर्व चित्रे सुंदर आली आहेत. लोहगडाच्या मानाने विसापूर अधिक रांगडा आणि अवघड आहे. लोहगडावर मंदिर, दरवाजे, गुहा वगैरे बांधकामे जास्त तर विसापूरची तटबंदी अप्रतिम आहे.
पेशव्यांच्या काळात लोहगड हा लुटलेल्या खजिन्याचे कोठार तर विसापूर हा कैदखाना होता असे कळले. मीदेखील स्वतंत्रपणे गणेशविसर्जनाच्या दिवशी जाऊन आलो. अभिजितने लिहिले नाही तर माझे लिखाण सहन करावे लागेल.
1 Oct 2007 - 9:43 pm | सर्किट (not verified)
ते चित्र (पिवळी फुले) खरंच सुंदर आहे. प्रचंड आवडले.
- (आनंदित) सर्किट
1 Oct 2007 - 7:59 pm | प्रियाली
फोटो मस्त आहेत पण जरा लेख लिहा की वेळ मिळाला की. फोटोंची वर्णनेही तेवढीच मस्त असतील असे वाटते. ;-)
2 Oct 2007 - 8:14 am | विसोबा खेचर
अभिजिता,
अतिशय सुरेख चित्रे आहेत. क्या बात है..'फुलराणी इथेच तर नसेल ना खेळत.' या चित्राने तर मन वेडावून टाकलं. ढगाळलेल्या सूर्याचं चित्रंही मस्त! घनमेघांनी भास्कररावांची प्रखरता साफ निष्प्रभ करून टाकली आहे! :)
कार्यबाहुल्यामुळे लेख लिहीता येत नाहिये. पण तोपर्यंत ह्या प्रकाशचित्रांवर नजर फिरवा.
लेखाचीही वाट पाहात आहे रे अभिजिता!
लोहगडाच्या पायथ्याशी भाजे गावात कडक मिसळ खाऊन आलेला अभिजित.
आहाहा! हे वाचून मात्र तुझा हेवा वाटला रे अभिजिता!:)
तात्या.
2 Oct 2007 - 9:52 am | चित्रा
फुलांची प्रकाशचित्रे चांगलीच आहेत पण गडाच्या भिंतीची चित्रे जास्तीच आवडली. लेखही लिहा लवकरच.
2 Oct 2007 - 1:03 pm | स्वाती दिनेश
कितीतरी वर्षांपूर्वी केलेल्या लोहगड,कार्ले भाजे च्या ट्रेकच्या आठवणी ताज्या झाल्या,सुंदर चित्रे! सवड मिळाली की लेख टाकाच !
स्वाती
3 Oct 2007 - 9:42 am | जुना अभिजित
अजून हातपाय दुखायचे थांबले नाहीत तोवर लेख लिहून घेतो. :-)
सर्वांच्या उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
लोहगडाच्या पायथ्याशी भाजे गावात कडक मिसळ खाऊन आलेला अभिजित.
3 Oct 2007 - 11:53 am | ध्रुव
मस्त छायाचित्रे!! पुढे फुले आणि मागे विंचूकाटा छानच आहे.
लोणावळ्याजवळचा परिसर वेगवेगळ्या किल्ल्यांनी नटलेला आहे. प्रत्येक किल्ला काहीतरी वेगळेपण दाखवतो. फुले आणि हिरवाईने नटलेला हा भाग आपली एक वेगळीच आठ्वण ठेवून जातो.येथील काही किल्ले (लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, घनगड, राजमाची, तैल-बैला, कोराई, नागफणी) माझे करून झाले आहेत. काही राहीलेले (ढाक, मोरगिरी) आहेत ते करायला कोणी येत असेल तर कळवावे, कधीतरी जाउ.
जमेल तेव्हा लिहायचा प्रयत्नही करीन. तोपर्यंत टाटा
ध्रुव
3 Oct 2007 - 5:50 pm | जुना अभिजित
http://picasaweb.google.com/abhijit.yadav/KilleLohgad/photo#508801588160...
हे चित्र मोठे करून पाहिल्यास बरीच माहिती मिळेल.
रविवारी फक्त मिसळ मिळते अशा श्री मिसळ नारायण पेठ येथे नियमित मिसळ खाणारा अभिजित