२ दिवस अक्षरभारती सोबत.

sandeepn's picture
sandeepn in जनातलं, मनातलं
12 Oct 2010 - 12:13 pm

        २ ऑक्टोबर ला अक्षरभारतीच्या टीम सोबत ग्रंथालय उभारण्यासाठी जाण्याची संधी आली. अक्षरभारतीच्या कामाची मला तशी सगळी माहीती होती पण प्रत्यक्षात काम करण्याचा योग आला नव्हता. म्हणुन यावेळेस आलेली संधी मि सोडली नाही.
        अक्षरभारती ही एक NGO आहे जी गरजु शाळांमधे जावुन त्यांना ग्रंथालय स्थापुन देते. बरयाचशा शाळांमधे अशी ग्रंथालये नसतात,तेथील मुलांमधे वाचनाची आवड निर्मान व्हावी या द्रुष्टीने अक्षरभारती प्रयत्न करते. अवांतर वाचनाची पुस्तके या ग्रंथालयात असतात. वेगवेगळ्या विषयांची अशी १००० पुस्तके यामधे पुरवली जातात. क्रमिक पुस्तके तर मुलं रोज वाचतात, पन त्याबरोबरच त्यांना इतरही पुस्तके मिळावीत असा स्वच्छ हेतु आहे अक्षरभारतीचा. यासाठी वेगवेगळ्या कंपनीतील लोक देणगी देतात. यातुन ही पुस्तके खरेदी केली जातात. यामधे जवळ जवळ ८०० स्वयंसेवक आहेत जे ही ग्रंथालये स्थापन करण्यास मदत करतात.
" Spreading Joy Through Reading " हे त्यांचे घोषवाक्य किती समर्पक आहे.जास्तकरून सॉफ़्ट्वेअर क्षेत्रातील लोक यात सहभागी आहेत.
   पहाटे ४.३० ला आम्ही पुणे सोडले व ९ च्या दरम्यान कोठे खुर्द , तालुका संगमनेर येथे पोहचलो. गावकरी लोकांनी आमचे स्वागत केले. फ़क्त २ खोल्यांमधे ही शाळा भरते. सुट्टी असुनही विद्यार्थी आले होते. त्यांच्या चेहरयावरील उस्तुकता दिसुन येत होती.मग शाळेच्या एका वर्गात ग्रंथालय फ़ित कापुन सुरु करण्यात आले.मी मात्र त्या निरागस चेहरयांकडे निट बघत होतो.पुस्तके त्यांना    बघायला दिल्यानंतर त्यांच्या चेहरयावरील आनंद तर बघण्यासारखा होता.कॅमेरयावाले त्यांचे हावभाव टिपन्यामधे मग्न होते,आणि मुले पुस्तके बघण्यात. एका छोट्या मुलीने इंग्लिश मधे भाषन केले. तिच्या हिम्मतीचे कौतुक करावे तेव्हडे कमीच होते. मग मुलांसोबत गप्पा मारत , फोटो काढत वेळ कसा गेला ते कळलेच नाही. मग गावातील एका घरी आमच्या नाश्ता आणि चहाची सोय होती. चुलीवर केलेल्या त्या पोह्यांची गोडी जरा जास्तच होती. एकदम निसर्गरम्य गाव होते ते. तिथुन आम्हे मग भंडारदरयाला निघालो.


शाळेतील मुले.


पुस्तके मिळाल्यावर केलेला जल्लोश.


मुलांसमवेत अक्षरभारतीची टीम.



हेच रे चुलीवर केलेले पोहे.

जाताना राजुरचे प्रसिद्ध कंदी पेढे घेतले. पहिल्यांदाच पेढे कसे बनवतात हे बघितले.खुपच मधुर चव होती त्यांना.


खवा.

   १ च्या दरम्यान रंधा फ़ॉलला पोहचलो. सध्या पाऊस थांबल्यामुळे नेहमीइतके पाणी नव्हते. तरीपण तेथील निसर्ग लक्ष वेधणारा होता. तेथील नदीच्या पाण्यामधे खेळुन सगळे लोकांनी प्रवासाचा थकवा घालवला. मग शेंडी गावात जेवन करुन व धरणाचे दर्शन करुन अम्रुतेश्वर ला रवाना झालो.भंडारदरा ते अम्रुतेश्वर हा एक विलक्षण सुखद अनुभव देणारा प्रवास आहे. भंडारदरयाचे बॅकवॉटर,मोठ मोठे डोंगर त्यावर नटलेली हिवराई सगळे काही अप्रतीम. हे बघत असतानाच अम्रुतेश्वर आले.


रंधा धबधबा


धबधब्याचे पाणी



Add caption


धरणाचे पाणी.

  अम्रुतेश्वर हे रतनगड च्या पायथ्याशी असलेले एक सुंदर व प्राचीन असे शिवमंदीर आहे. इ.स. ८०० मधे ते बांधले असावे. नंतर परकीय आक्रमनांनी त्याचे फ़ार नुकसान केले तरीही ही फ़ार सुंदर कलाक्रुती आहे. सुंदर असे कोरीवकाम केलेले आहे. महादेवाची पिंड बहुतेक वेळा पाण्याखाली असते. तेथील स्वामींनी आम्हाला बरीच माहीती दिली. नंतर स्वामींनी म्रुदुंग ,पेटी, टाळ यांची व्यवस्था केली व गावकरयांच्या साथीने मस्त भजन म्हटले. आमच्या बरोबरील प्रशांतने म्रुदुंग संभाळला होता. त्याने एक भजन देखील म्हटले. मग येथील अक्षरभारतीने उभारलेल्या ग्रंथालयाला भेट दिली. फ़ारच छान अनुभव होता अम्रुतेश्वरचा. वर दिसनारा रतनगड आमच्या एक दोघांतल्या ट्रेकरला खुनावत होता. पन तो प्लॅन मधे नसल्यामुळे पुढे कधीतरी हा ट्रेक करायचाच असे मनोमन ठरवले.


अम्रुतेश्वर चे मंदिर


भजन म्हणताना गावकरी.

नंतर कोकण कड्याला गेलो पन तोपर्यंत अंधार झाला होता. मधे आम्हाला कळसुबाई ने लांबुन दर्शन दिले. आम्ही नुसते त्याला लांबुन बघुन सुद्धा खुश झालो.


बॅकवॉटर मधील एक मनोहरक द्रुश्य.

   नंतर परत शेंडी गावात जेवन करुन रात्री उशीरा इंदुरी गावात(तालुका अकोले) पोहचलो. आमच्या बरोबरील एका स्वयंसेवकाचे ते गाव आहे.तेथे त्यांच्या शेतातील बंगल्यावर आमची रहाण्याची सोय केली होती.रात्री शेकोटी केली होती. सकाळी तर शेतात फ़िरायला गेलो होतो. ऊस,भेंडी,झेंडू,काकडी,गाजर,बीट,चवळी अशा अनेक पिकांची शेतं फ़िरुन फ़ार बरे वाटले.आमच्यातल्या बरयाच लोकांनी पहिल्यांदाच हा अनुभव घेतला होता.मि शेतकरी कुटुंबातलाच असल्यामुळे जास्त अप्रुप नव्हते,पण खुप लोकांबरोबर जरा वेगळीच मजा येत होती.


Add caption


हाच तो शेतातील बंगला.

थोडासा नाश्ता करुन मग आम्ही  ग्रंथालय स्थापण्यास गुहक विद्यार्थी वस्तीग्रूह, अकोले येथे गेलो. तिथे गेल्या गेल्या तेथील काही लोकांनी आम्हाला त्यांच्या कार्याबद्दल माहीती दिली.
येथे ४५ आदिवासी विद्यार्थी राहतात. त्याची सर्व जबाबदारी वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र संभाळते. या मुलांना पुस्तकांची खरी गरज आहे असे मनोमन वाटले. मग पुढे लायब्ररी सेटअप चा कार्यक्रम झाल्यानंतर काही मुलांनी गीते म्हणुन दाखवली. नंतर सुरजने काही गमतीशीर प्रयोग करुन दाखवले.आम्ही मुलांशी मग संवाद साधुन त्यांना वाचनाचे महत्व पटवुन देण्याचा प्रयत्न केला.


Add caption


शिवचरित्र गीत म्हणताना आश्रम शाळेतील मुले.

 नंतर अगस्ती आश्रम मधे दर्शन घेवुन मग परत वस्तीवर आलो. जेवन तयार होते. मग जेवन केले. काय अप्रतीम जेवन होते ते. सगळ्या ताज्या भाज्या वापरल्यामुळे त्याची चव खुपच छान होती. पोटभर जेवल्यानंतर मग आम्ही थोड्यावेळाने परतीच्या प्रवासाला लागलो. जाता जाता तेथील शाळेला एक संगण्क देणगी म्हणुन देण्याचे आश्वासन दिले. अशा तर्हेने या अविस्मरणीय ट्रीप ची सांगता रात्री ९.३० ला पुण्यात पोहचुन झाली.
        या प्रवासात खुप लोकांशी ओळखी झाल्या.मुख्य म्हणजे अक्षरभारती साठी काम करता आले. बाकी सर्व गोष्टी बोनस होत्या. आपन पन या समाजाचे घटक आहोत आणि आपन पण समाजासाठी  काहीतरी केले पाहिजे. यासाठे खुप संस्था काम करतात. आपन सर्वजन कशा तरी प्रकारे आपले योगदान दिले पाहिजे. काही लोक उगाच सॉफ़्टवेअरवाल्यांच्या नावाने खडे फ़ोडत असतात. पण हा अंदाज त्यांनी फ़ार थोड्या लोकांच्या वरुन बांधलेला असतो.असो आपन आपले काम करत रहायचे. बोलणारे बोलत असतात.

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

अब् क's picture

12 Oct 2010 - 12:26 pm | अब् क

मस्तच!!

मितान's picture

12 Oct 2010 - 1:39 pm | मितान

वा ! लेख आणि माहिती छानंच :)

अक्षरभारतीने निवडलेल्या पुस्तकांची यादी उपलब्ध आहे का ?

छान !

पण फोटो दिसत नाहियेत मला.
बहुतेक कंपणीत बर्याच साईट ब्लॉक आहेत , त्यामुळे ब्लॉगस्पॉट वरील फोटो दिसत नाहीयेत
येथेच फोटो अपलोड केले असते तर दिसले असते .. त्यामुळे पुन्हा रि[प्लाय देइन फोटो पाहुन

चालुद्या

अवलिया's picture

12 Oct 2010 - 2:56 pm | अवलिया

सुरेख !!

sneharani's picture

12 Oct 2010 - 3:16 pm | sneharani

मस्त!!
छान माहिती!

परिकथेतील राजकुमार's picture

12 Oct 2010 - 4:40 pm | परिकथेतील राजकुमार

छान उपक्रम :)

satish kulkarni's picture

12 Oct 2010 - 4:45 pm | satish kulkarni

मस्त!!

स्वाती२'s picture

12 Oct 2010 - 5:13 pm | स्वाती२

चांगला उपक्रम!

चिंतामणी's picture

12 Oct 2010 - 5:40 pm | चिंतामणी

चांगला उपक्रम!

विकास's picture

12 Oct 2010 - 6:56 pm | विकास

खूप चांगली माहीती आणि स्तुत्य उपक्रम!

चांगला उपक्रम....

चांगला उपक्रम....

sandeepn's picture

13 Oct 2010 - 2:59 pm | sandeepn

अक्षरभारती बद्दल अधिक माहितीसाठी या संकेतस्थळावर जरुर भेट द्या.
http://www.aksharbharati.org/