नाही ...नाही म्हणायचेच होते तुला ..
तर हसुनच का बोलली नाहीस....
दुर...दुरच जायचे होते जर तुला ...
निरोप का घेउन गेली नाहीस..
तुला साथ नव्हती द्यायची जरी...
सवली तरी सोडुन गेली असतीस...
मनातुन निघायचेच होते जर तुला..
मनात खोलवर का गेलीस..
अलगदच निघुन गेली असतीस...
तुझ्या आठवणी ओसरायला जन्मच अपुरा पडेल..
पण नविन आठवणी करायला तुच आता नसेन...
नको नको येऊ समोर कधी सय्यम माझा सुटेल..
कितीही म्हटले तरी तुझ्या १ झलकसाठी मन हे तरसेल...
गहिरे हे बोल...
घुमसट्लेले हे मन...
विचारव्नत हा कवि...
पण तरिही...पण तरिही ....का अपुर्ण ही कविता............... कल्पेश इसई..(१४ जानेवारी २००५)
प्रतिक्रिया
11 Oct 2010 - 6:06 am | धनंजय
कवी चांगले काव्य लिहू शकेल अशी लक्षणे कवितेत दिसतात.
पुढील कवितांसाठी शुभेच्छा.
11 Oct 2010 - 9:52 am | शरदिनी
कितीही म्हटले तरी तुझ्या १ झलकसाठी मन हे तरसेल...
या ओळीतली गंमत आवडली..
विशेषतः एक असे न लिहिता १ असा अंक लिहून तुम्ही हजार शब्द न लिहिताही भावना पोचवल्या आहेत..
नतमस्तक आहे...