मी पाहीलेले मृत्यु

आप्पा's picture
आप्पा in जनातलं, मनातलं
9 Oct 2010 - 7:16 pm

नमस्कार मंडळी,
मा़झ्या आयुष्यातला एक प्रसंग. साधारणतः १९७७ किंवा ७८ ची घटना असावी. मी एका प्रथीतयश रुग्णालयात नोकरीला लागलो होतो. ठाण्यातील पहीलीच नोकरी. ऑपरेशन थियेअटरला मदतनिस होतो. एक रुग्ण ट्रेनमधुन पडला होता. पाय फ्रॅक्चर होता. त्याचे ऑपरेशन ठरले. अती विशाल देह.
डॉ.नी त्याच्या कमरेत एक इंजक्शन देऊन त्याचा कमरेखालील भाग बधीर केला. पायाचे हाड जोडले. हाडामध्ये स्टील रॉड टाकला. ऑपरेशन पुर्ण झाले. पेशंट शुध्दीवरच होता. त्याचे पायावर प्लॅस्टर घालण्यास सुरवात झाली. डॉ.नी रुग्णाला सांगीतले तुझे ऑपरेशन यशस्वी झाले. रुग्ण डॉ.ना थँक यु. म्हणाला. दर वेळी ऑपरेशन नंतर ज्याप्रमाणे तणाव कमी होतो त्या प्रमाणे तणाव थोडा कमी झाला.
अचानक रुग्णाचा रक्तदाब कमी होऊ लागला. सर्व प्रकारचे प्रयत्न करुनही सदर रुग्ण ऑपरेशन टेबलवर दगावला.
मा़झ्या आयुष्यात हा प्रसंग मी कधीही विसरु शकलेलो नाही.
तसेच एक चाळीशीची महीला ९०टक्के भाजलेली. फक्त चेहरा शाबुत हॉस्पीटलला अ‍ॅडमीट झाली होती. बघवत नाही अशी दशा. एका स्पेशल रुम मध्ये अ‍ॅडमीट होती. रुम पुर्ण निर्जंतुक केलेली. कुणालाही सहजा सहजी प्रवेश नाही. त्याकाळातील सर्वोत्तम सेवा उपलब्ध होत्या. पण ती वाचणे कठीण होते. त्या रुम ,मध्ये एक प्रकारचा जळाल्याचा वास असायचा. तेथे जाणे नकोसे वाटायचे. पण ति महीला ड्रेसिंगला मलाच बोलवायची. इतर कोणी गेले तर प्रचंड आरडाओरडा करायची. तीच्या म्हणन्या नुसार मी ड्रेसिंग करताना तीला कमी त्रास होतो. भाजलेले पेशंट ज्यानी पाहीले असतील त्यांना कल्पना असेल किती त्रास होतो ते. गेली बिचारी. हा ही प्रसंग विसरु शकत नाहीय.

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

प्रदीप's picture

9 Oct 2010 - 7:34 pm | प्रदीप

आप्पा, थोडक्यात वर्णन केलेले हे दोन्ही अनुभव आवडले.

तुमचे अनेक असेच अनुभव असतील, ते वाचायला आवडेल. लिहीत चला.

शिल्पा ब's picture

10 Oct 2010 - 12:25 am | शिल्पा ब

खरं सांगायचं तर असे अनुभव नकाच लिहू...कल्पना आहे कि असे अनुभवलेल्या , पाहिलेल्या लोकांना आठवण येऊन नाही म्हंटले तरी त्रास होतच असणार पण आम्हालाही वाचायला नाही चांगले वाटत.
मृत्यू या विषयावर लिहायला काहीच हरकत नाही पण "अशा " ग्राफिक स्थितीबद्दल न लिहिले तर उत्तम. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.

आनन्दा's picture

10 Oct 2010 - 12:53 am | आनन्दा

शिल्पाताईंशी सहमत.