कोहम! कोहम!

मराठमोळा's picture
मराठमोळा in जनातलं, मनातलं
9 Oct 2010 - 2:00 pm

दहावीत असताना टायटॅनिक पाहिला होता, ईंग्रजी अ‍ॅक्सेंट तेव्हा तेवढा कळत नव्हता, पण आज पुन्हा अचानक पाहिला.
मनात अनेक विचार उठले, कल्लोळ जाहला... माजला.... डोकं काम करेनासं झालं... का? कुणास ठाउक...
काही काही वाक्ये मनाला स्पर्शुन नाही तर घासुन गेली.. ओरखडली..
इतके विचार कल्लोळ माजवुन गेले.. त्यातलाच एक विचार.
(he exists in my memories).. अप्रतिम. त्यावरुन सुचलेलं काहीसं.

माणसं... एखादी कुत्री मांजरी मेली तर कदाचित दुख: होणार नाही, पण एखादा रोज दिसणारा भिकारी अचानक गेला तर मनाला हुरहुर लागते. का?
कितीही वाईट असो, मित्र, नातेवाईक कोणीही, पण एक नातं असतं जे ओढतं, जवळीक साधतं ते का? उगाचच?
आपण सरावाचे होउन जातो, कळत न कळत., आजुआजुच्या लोकांचे, रस्त्यांचे, अगदी कुत्र्या-मांजरांचे.. मग माणसं कशी अपवाद ठरणार?
पण शो मस्ट गो ऑन.. आणि आपण चालत रहातो.. आपल्याच तंद्रीत आणि एक वेळ येते. जेव्हा कुणीच जवळ नसतं.
"हे राम" नावाच्या सिनेमाची मला नेहमी आठवण येते अशा वेळी. सगळ कसं क्षणिक आहे. जग चालतय, मी चालतोय, सगळे चालतायत..
पण रात्री झोपायच्या आधी सगळे डोळे मिटताना आपापल्या जगात जाउन येतात हे नक्की.. बाहेर कितीही नालायक दिसले तरी.. चेहर्‍यावर कितीही खोटे भाव आणले तरी..
मग एक प्रश्न शेवटी उभा ठाकतो.... कोहम? आणि का?

मन विचार करणं थांबवत नाही.. दिवस रात्र, वेळ, काळ त्याला काही माहित नसतं.. अहोरात्र हे विचारचक्र अखंड चालु असते..

क्रमशः (?)

साहित्यिकप्रकटन

प्रतिक्रिया

गांधीवादी's picture

9 Oct 2010 - 2:54 pm | गांधीवादी

>>मन विचार करणं थांबवत नाही.. दिवस रात्र, वेळ, काळ त्याला काही माहित नसतं.. अहोरात्र हे विचारचक्र अखंड चालु असते.. आमचे पण असेच काहीतरी होते.

अवांतर : कमल हसनचा "हे राम" हा सिनेमा चांगला आहे, मला पण आवडला,

राजेश घासकडवी's picture

9 Oct 2010 - 8:55 pm | राजेश घासकडवी

आपण सरावाचे होउन जातो, कळत न कळत

माय फेअर लेडीमधलं
आय अॅम अॅकस्टम्ड टु हर फेस...
हे आठवलं. कितीही स्वतःशी निर्धार केला, तरी केवळ सवयीने, संपर्काने नाती जुळतात.

अरे किती डोक्याला त्रास करून घेशील?