कुल-२

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
8 Oct 2010 - 12:19 pm

पेरेंट ऑफ द इयर ह्या परिक्षेत भाग घ्याल का? हा प्रश्न मी मिपावरील काही असलेल्या,होउ घातलेल्या, नुकत्याच झालेल्या पालकांना विचारला.
उतरः नाही.(कारणे वेगवेगळी दिली पण नकार हा कॉमन फॅक्टर होता)
-----------------------------------------------------------------------------------------
खालील प्रकटनातले प्रश्न पालकांना विचारले जातात. काही खाजगी शाळातुन तर अगदी 'कठीण' प्रश्न विचारले जातात. 'कठीण' प्रश्न विचारणार्‍या शाळांची फी सुद्धा जरा कठीणच असते.त्यातील काही पालकांना असे प्रश्न विचारले गेले नाही तर आपली फी वसुल झाली नाही असे वाटते. अशा प्रश्नाना मराठीत सायको प्रोफाइल म्हणतात.
विचारले गेलेल्या प्रश्नांची स्थळ, काळ आणि वेळ वेगळा आहे. त्याचे एकत्रीकरण करुन एका ठीकाणी प्रस्तुत केले आहे.
काही प्रश्नाना लेखकाला सुद्धा सामोरे जावे लागले आहे.
-----------------------------------------------------------------------------------------
"बापु तुझा परवा इंटरव्ह्यु आहे. येणारेस ना?"
कोण घेणार.
"पाचवीतली माझी क्लास टिचर"
तर मग नक्की.
"जरा जपुन. अगदी महमद अली नको हां"
मी डायरे़क्ट येइन. आईला वेळेवर यायला सांग.
-----------------------------------------------------------------------------------------
बाई:आपले नाव?
......
बाई:अगदी मनमोकळेपणाने उत्तरे द्यावी अशी आमची अपेक्षा आहे."
बापु: इंग्रजी का मराठी.?
गुर्जी: तुम्हाला जे कंफर्टेबल वाट्ते ते.
बापु: विचारा.
बाई: तुम्ही दारु पिता का? डोळे लाल दिसताहेत तुमचे. वास ही येतोय.
बापु: माय मिस्टेक. त्याचे काय झाले, डायरेक्ट आलोय कामशेत वरुन. रात्रपाळी होती. अगदी मॅरॅथॉन. २०००० चिक्स बरोबर आठ हजार स्क्वेअर फुटात अक्खी रात्र.
गुर्जी खुर्ची मधुन पडायचा तेवढा बाकी.
बाई: क्काय?
बापु: अहो मी लाईव स्टॉक फार्मिंग मधे आहे. २०००० कोंबडीची वन डे ओल्ड चिक्स आली होती. पहीला दिवस अगदी महत्वाचा असतो. कामशेतला आहे आमचा फार्म.
बाई: (हुश्श) बर बर. मुलांबरोबर बाँडींग करण्याकरता काय करता?
बापु: ते काय असते?
बाई: मुलांबरोबर स्नेहसंबध वाढवण्याकरता काही स्टेप घ्याव्या लागतात. तुम्ही कुठल्या घेता?
बापु: हे नविन आहे माझ्या करता.
(बाई वहीत काही तरी नोंद करते)
बाई: होमवर्क बद्दल काय करता?
बापु: त्या मधे काँप्रमाईज नाही हां. कितीही बिझी असलो तरी ते अपुर्ण ठेवत नाही. हो की नाही ग.?
आई: (हळुच) गबसा. काहीतरी चहाटळ्पणा.
गुर्जी: मुलाच्या होमवर्क बद्दल विचारताहेत मॅडम.
बापु : असां काय? मला वाटल, माझा इंटरव्ह्यु आहे तर....... . ते मी काही नाही बघत.
बाई: तुम्ही मॅडम.
आई: मला त्यातले काही कळत नाही.
गुर्जी: तुम्ही विचारता का?
आई: हो. ते माझे मी बघतो म्हणाला.
गुर्जी वहीत नोंद करतो.
बाई: पुढचा प्लान काय?
बापु: रिसर्च पुर्ण झाल्यावर कंपनी बदलायचा प्लान आहे.
गुर्जी: मुलाबद्दल बोलताहेत मॅडम.
बापु: त्याचा प्लॅन मी कसा करणार.
बाई: काही तरी कल्पना असेल ना मनात.
बापु: त्या पोराचा काय सांगता येत नाही. चुकुन जरा चांगले मार्क मिळाले तर...?
गुर्जी: बोला बोला.
बापु: सायन्स ला गेला तर चांगलीच धुलाई होइल. सध्या आपली बॅलन्स शीट जरा विक आहे. बघु करु काय तरी.
बाई: म्हणजे तुमची पैशाची व्यवस्था नाही म्हणुन कॉमर्स.
बापु: त्यात काय चुक आहे.
बाई वहीत पुन्हा नोंद करते.
गुर्जी: तुमच्या मुलाचे नाव एखाद्या मुलीबरोबर झळकले तर तुम्हाला काय वाटेल?
बापु: झळकलय का?किती मुलींबरोबर? माझा रेकॉर्ड १७ चा आहे.
बाई आणि गुर्जी एकमेकांकए अर्थपुर्ण नजरेने बघतात. बाई पुन्हा नोंद करते.
गुर्जी: तुम्ही स्मोकींग करता का? ड्रिंक्स घेता का?
बापु: हो.
बाई: मुला समोर.
बापु: आहे तर लपवायचे कशाला?
पुन्हा नोंद
गुर्जी: १ टू १० स्केल वर तुम्ही तुमच्या बायकोला एक आई म्हणुन किती मार्क द्याल.?
बापु: ८
बाई: का?
बापु: रेड्याला अजुनही जेवण भरवते कधी कधी.
गुर्जी: १४ वर्षाच्या मुलाला?
बापु: आई म्हणजे काय?
बाई: तुम्हाला हे जर ऑड नाही वाटत.
बापु: अजिबात नाही.
बाई: मुले स्वावलंबी व्हायला पाहीजेत.
बापु: व्हाय्ची अस्तात तेंव्हा बरोब्बर होतात. कोणीही थांबवु शकत नाही.
बाई: ठीक आहे. तुमची मुला समोर भांडणे होतात.
बापु: हो. अगदी खुल्लम खुल्ला.
परत नोंद. आता बाईने परत कॉमेंट करायचा नाद सोडला आहे.
बाई: तुमच्या कामाबद्दल मुलाबरोबर बोलता का?
बापु: नाही. फोन वर जे बोलतो त्यावरुन बरीच शी कल्पना असावी.
बाई: त्याचे मत काय आहे तुमच्या कामाबद्दल?
बापु: मला फुकटचा धोबी म्हणतो.
गुर्जी: मुलगा उशीरा घरी आला तर तुम्ही त्याला काय म्हणता.?
बापु: काहीच नाही. कारण मीच रात्री ११ ला येतो.
बाई: मॅडम तुम्ही.
आई: आज पर्यंत तरी तसे कधी झाले नाही. त्याला जास्त मित्र नाही.
गुर्जी: मित्र नाही?
आई: ह्या बाबतीत अगदी ह्यांच्या वर गेला आहे.
बापु: थॅक्यु फॉर कन्फर्मेशन.
बाई आणि गुर्जी परत अर्थपुर्ण.
गुर्जी: तुमचे शाळेबद्दल काय मत आहे?
बापु: काही ही नाही.
बाई: काही सजेशन?
बापु: केजी ला घेतलेले डीपॉझिट परत मिळाले तर बरे होइल. १०००० म्हणजे दोन महीन्याची सोय.
बाई: कळवते मॅनेजमेंट ला. ते ज्युनियर कॉलेज काढायचे ठरले आहे ना?
बापु: राम राम गोविंदा न गोविंदा ...... गोविंदा.
गुर्जी: म्हणजे:
बापु: मॅनेजमेंट च्या वाघाचे पंजे. बाय बाय १००००.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

8 Oct 2010 - 12:36 pm | श्रावण मोडक

लय भारी. त्या गुर्जी आणि बाईंनी चाळणीत पाणी घालून जीव नाही का दिला? च्यायला, आमच्या मास्तरला नडू पाहतात... ;)

श्रावण मोडक's picture

8 Oct 2010 - 12:37 pm | श्रावण मोडक

लय भारी. त्या गुर्जी आणि बाईंनी चाळणीत पाणी घालून जीव नाही का दिला? च्यायला, आमच्या मास्तरला नडू पाहतात... ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Oct 2010 - 12:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आमचा एक "बाणेदारपणा"! यत्ता: आठवी किंवा नववी.
क्लासटीचरः पालकसभेला तुझे आईवडील कधीच का येत नाहीत?
मी: बाहेरच्या गोष्टी (मनातल्या मनातः क्लासटीचरशी भांडणं) घरी घेऊन यायच्या नाहीत असं त्यांनीच आम्हाला सांगितलं आहे म्हणून ...
क्लाटी: तू घरी सांगत नाहीस पालकसभेबद्दल?
मी: सांगते, पण आला नाहीत तरी चालेल असंही सांगते.
क्लाटी: घरी माहित आहे तू शाळेत काय करतेस ते?
मी: न सांगण्यासारखं काही करत नाही आणि सांगण्यासारख्या गोष्टी त्यांच्या कानापर्यंत पोहोचतात.
क्लाटी: काय करतात तुझे आईवडील?
मी: आई अमुकतमुक शाळेत मुख्याध्यापिका आणि बाबा अमुकतमुक कॉलेजात आहेत. पूर्वी बाबा एक वर्ष याच शाळेत होते...
क्लाटी: बस खाली.

स्वैर परी's picture

8 Oct 2010 - 12:59 pm | स्वैर परी

झक्कास!!!

मृत्युन्जय's picture

8 Oct 2010 - 1:21 pm | मृत्युन्जय

कोण होत्या क्लाटी? हा सातवीतला किस्सा असावा. नववीतला तर नक्की नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Oct 2010 - 1:25 pm | बिपिन कार्यकर्ते

नववीतला तर नक्की नाही.

तुझं मेल्या बरोब्बर लक्ष हां अगदी... नववीत.

मृत्युन्जय's picture

8 Oct 2010 - 1:46 pm | मृत्युन्जय

नववीतले माझे प्रगतीपुस्तक (???) बघितलेत तर संशय अजुन बळावेल तुमचा.

पण नववी नक्की नाही. कारण संभाषणात एकदाही आयला किंवा च्यायला हा शब्द नाही. त्यामुळे नववीच्या क्लाटी असणे केवळ अशक्य.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Oct 2010 - 1:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

यत्ता आता आठवत नाही, पण दोंदे बाई होत्या एवढं नक्की; त्यामुळे आठवी किंवा नववीच! त्यांच्याशी माझे हमखास असले संवाद व्हायचे.

मृत्युन्जय's picture

8 Oct 2010 - 1:47 pm | मृत्युन्जय

आठवी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Oct 2010 - 2:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नै रे! राजे बाई रजेवर होत्या तेव्हा दोंदे बाईच होत्या ना पुन्हा क्लासटीचर! राजे बाईंशी असा पंगा, शक्यच नाही... त्या आमच्या शेजारच्याच गल्लीत र्‍हायच्या आणि आमच्या मातोश्रींबरोबर त्यांचं कायतरी सेटींग होतं.

मृत्युन्जय's picture

8 Oct 2010 - 1:47 pm | मृत्युन्जय

आठवी

विनायक प्रभू's picture

8 Oct 2010 - 2:54 pm | विनायक प्रभू

मॅटर सुरु झाले वाट्टे.

सहज's picture

8 Oct 2010 - 1:54 pm | सहज

कूलभूषण खरबंदा!!!

विनोदी लिखान आवडले.
मागील भाग संदेश पुर्ण ही वाटत होता .. या मध्ये विनोदाबरोबर तसेही काहीसे आले असते तर आनखिन छान झाले असते ..

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

स्वाती२'s picture

8 Oct 2010 - 4:43 pm | स्वाती२

खी! खी! खी!

अवलिया's picture

8 Oct 2010 - 6:45 pm | अवलिया

जै हो !

नन्दादीप's picture

8 Oct 2010 - 7:21 pm | नन्दादीप

मस्त.....!!!!!

उपास's picture

8 Oct 2010 - 7:21 pm | उपास

मास्तर, (आपली) सरोज खरे आठवली बघा ;)

संजय अभ्यंकर's picture

8 Oct 2010 - 7:25 pm | संजय अभ्यंकर

गुर्जी व बाईंशी खुल्लमखुल्ला बोलला!

त्यांनी पुन्हा पालकांची मिटींग घेण्याचे धाडस केले नसेल!
हीहीही! तुम्ही भारी आहात हां!;)

शिल्पा ब's picture

9 Oct 2010 - 12:31 am | शिल्पा ब

लै भारी...
माझे शाळेतले दिवस आठवले.

कालेजात शेवटच्या वर्षाला असताना हजेरी अगदीच म्हणजे अगदीच कमी होती म्हणून मला सांगून फरक पडत नाही म्हणून पत्र पाठवून आई-बापाला बळच बोलावून घेतले...
प्रिन्सि: हि लेक्चरला अजिबात बसत नाही...
वडील : हो का? घरातून तर कालेजला जाते सांगून रोज येते..
प्रिन्सि: मी एवढा प्रिन्सिपल आहे पण माझा लेक्चरचा attendance सुद्धा पूर्ण वर्षात फक्त ३ च आहे..
वडील: बरं...मग आता आम्ही काय करायचं?
प्रिन्सि: आता हा शेवटचा महिना सगळे लेक्चर नाही बसली तर हॉल तिकीट देणार नाही अन परीक्षेला बसता येणार नाही..
वडील : चालेल
आई घाबरून : अहो चालेल काय? प्रिन्सि ला : बसेल हो ती सगळे लेक्चर आता...काय गं?
मी : हो