आमच्या संगीत तबकडीवर खेबूडकरांचे चंद्र आहे साक्षिला वाजत होते आणि आम्ही मिपावर प्रियालीताईंचे भयंकर, भेसूर आणि अमानवी काव्य वाचायला सुरवात केली .. आणि पान जागे फूल जागे च्या ऐवजी भलतेच काही गुणगुणायला लागलो..
हडळ जागी भूत जागे, खविस सुद्धा जागला,
प्रेत आहे साक्षिला, प्रेत आहे साक्षिला
लाकडांचा गंध आला, पौर्णिमेच्या रात्रिला,
प्रेत आहे साक्षिला, प्रेत आहे साक्षिला!
कफन हे रेशमी, सुतळकाथ्या बोचतो
सूर हा, ताल हा, धूप थोडा लावतो
तेरड्यांच्या या फुलांनी, देह आहे झाकिला!
कावरा, बावरा, हा कुणाचा आतमा
अंग ना सोडिसी, हो जीवाचा खातमा
आज मुक्तीच्या भयाने, देह त्याचा कंपिला!
प्रतिक्रिया
8 Oct 2010 - 10:45 am | बिपिन कार्यकर्ते
_/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_
_/\_ _/\_ _/\_ _/\_
_/\_ _/\_ _/\_
_/\_ _/\_
_/\_
_/\_ _/\_
_/\_ _/\_ _/\_
_/\_ _/\_ _/\_ _/\_
_/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_
8 Oct 2010 - 10:21 pm | प्राजु
अगदी हेच...! :)
_________/\___________
8 Oct 2010 - 10:47 am | श्रावण मोडक
च्यायला... लॉगआऊट व्हावं आता.
8 Oct 2010 - 10:49 am | बिपिन कार्यकर्ते
इकडं येता का?
8 Oct 2010 - 10:54 am | श्रावण मोडक
नको. आज मंतरलेला ताईत नाहीये सोबत. उगा फटका बसायचा... ;)
8 Oct 2010 - 10:58 am | बिपिन कार्यकर्ते
चालेल हो... बारा पिंपळावरच्या मुंजोबाला कसली भिती?
8 Oct 2010 - 11:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
वेताळाची!
संदर्भासाठी खरडवह्यांचा अभ्यास करणे
8 Oct 2010 - 11:06 am | श्रावण मोडक
बारंबाराच्यांकडे जाताना भीती वाटतेच बाराच्या मुंज्याला! ;)
8 Oct 2010 - 10:54 am | नितिन थत्ते
मस्त.
हेच राहिले होते.
एक सूचना:
'सूर हा ताल हा' ऐवजी 'धूर हा वास हा, धूप थोडा लावतो' कसे वाटते?
8 Oct 2010 - 10:57 am | बिपिन कार्यकर्ते
+१
अवांतर: थत्तेचिच्चा, कवित वगैरे करतात की काय?
8 Oct 2010 - 11:01 am | केशवसुमार
थत्तेशेठ,
'धूर हा वास हा, धूप थोडा लावतो' असेच काहीसे अधी सुचले होते.. पण रडण्याचा / भजनांचा सूर ताल आणि धूप असे करावे वाटले..
(पर्यायी)केशवसुमार
प्रतिसाद आणि सुचवणी बद्दल धन्यवाद..
(आभारी)केशवसुमार
8 Oct 2010 - 11:00 am | प्रशांत
नशीब...
चांदण्यात फिरताना..... वाजत नव्हते.....
प्रशांत......
8 Oct 2010 - 11:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
8 Oct 2010 - 11:07 am | राजेश घासकडवी
मस्त.
8 Oct 2010 - 11:19 am | चेतन
गुर्जी मस्त जमलयं
अवांतरः नशिब या विडंबनात स्वतःची स्वाक्षरी नाही टाकली ;)
8 Oct 2010 - 11:26 am | परिकथेतील राजकुमार
'कावरा, बावरा, हा केसुचा आतमा' असेपण चालुन गेले असते ;)
अवांतर :- थत्ते चाचांना शेठ म्हणल्याबद्दल ह्या बालदिनी तुम्हाला गुलाबाचे काटे फेकुन मारण्यात येतील.
8 Oct 2010 - 12:08 pm | चेतन
'कावरा, बावरा, अभयंकर आतमा' असेपण चालले असते ;)
8 Oct 2010 - 3:59 pm | केशवसुमार
पराचाचा नेक्स्ट टाईंबला लक्षात ठेवेन..
'कावरा, बावरा," केशवा"चा आतमा'
8 Oct 2010 - 11:28 am | मितान
मस्त कि वो !
8 Oct 2010 - 11:53 am | पुष्करिणी
फारच छान
8 Oct 2010 - 2:22 pm | पैसा
राम राम राम
राम राम राम राम
राम राम राम राम राम राम
(रामाचं नाव घेतलं की भुतं शांत होतात असं लहान असताना कोणीतरी सांगितलं होतं..)
8 Oct 2010 - 5:49 pm | प्रियाली
हो कारण रामरामराम म्हणत राहीलं की मरामरामराही होतं. भुतं शांत होतील नाहीतर काय?
8 Oct 2010 - 5:57 pm | पैसा
सर्वपित्रीला मरा.. मरा.. हेच बरोबर!
शिवाय रामाचं नाव घेतलं तर दुसरीच भुतं मानगुटीला बसतील!
8 Oct 2010 - 6:21 pm | परिकथेतील राजकुमार
तुम्ही लहान असताना , का सांगणारा लहान असताना ?
8 Oct 2010 - 6:22 pm | पैसा
भुतं लहान असताना.
8 Oct 2010 - 6:41 pm | परिकथेतील राजकुमार
खुलाशाबद्दल धन्यवाद.
पैशाचीक परा
8 Oct 2010 - 9:12 pm | पैसा
खरं तर हे आताच वाचलं होतं त्यामुळे तुमचं नाव बघताच माझी भीतीने गाळण उडाली होती!
(घाबरट)
30 Oct 2010 - 1:23 am | चिगो
=)) =))
(जिवंत भुत) चिगो
8 Oct 2010 - 5:11 pm | प्रियाली
काय भयंकर लोक आहेत एकेक आणि बिचार्या भुतांना भयानक म्हणतात.
8 Oct 2010 - 5:40 pm | अमोल केळकर
सुपर . :)
अमोल
8 Oct 2010 - 5:47 pm | सुहास..
हा हा हा
8 Oct 2010 - 6:25 pm | अवलिया
केसुशेट की जय हो !!
8 Oct 2010 - 6:43 pm | वेताळ
भयकविता मस्त केली आहे.
8 Oct 2010 - 9:15 pm | बेसनलाडू
(नतमस्तक)बेसनलाडू
या कवितेला प्रियालीताईंकडून निर्विवाद पहिले पारितोषिक मिळावे.
(परीक्षक)बेसनलाडू
8 Oct 2010 - 9:27 pm | चतुरंग
<०()8=<
खूप दिवसांनी साष्टांगनमस्काराची स्माईली वापरायला दिल्याबद्दल खूष आहे! ;)
भयरंग
8 Oct 2010 - 9:32 pm | अविनाशकुलकर्णी
मस्त...
8 Oct 2010 - 10:32 pm | चन्द्रशेखर गोखले
भ.. भ.. भ...भयंकर सुंदर रचना !!!!
9 Oct 2010 - 12:46 am | प्रियाली
केसुंचे आजचे विडंबन वाचून त्यांचे एक जुने अमर काव्य आठवले.
पिश्याच दिसे बाई पिश्याच दिसे
या काव्यानंतर अनेकजण त्यांचे जबरदस्त फ्यान झाले असे आठवते.
9 Oct 2010 - 8:38 am | केशवसुमार
हे विसरलोच होतो..धन्यवाद प्रियालीताई..
(विसराळू)केशवसुमार..
मस्त धमाल आली तेव्हा
9 Oct 2010 - 5:14 pm | केशवसुमार
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!
(आभारी)केशवसुमार.
10 Oct 2010 - 3:09 am | भडकमकर मास्तर
लै भारी
आज मुक्तीच्या भयाने, देह त्याचा कंपिला
झकास