भुक

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
6 Oct 2010 - 11:07 pm

ही घटना त्याच काळातली ज्याबद्दल मी काल लिहल आहे.काल लिहलला लेख ह्याच बाबतीत लिहायचा होता.पण दारु कींवा तत्सम नशा करुन माणुस भरकटतो.तसा मी काही कारणांमुळे भरकटलो.म्हणुन गाडीला वेगळेच वळण देउन एका वेगळ्याच कोप-यात थांबवुन टाकली.:)
लहानपण आठवल की मला राग जास्त येतो.मी तसा लहानपणापासुन रागीट व माणुसघाण्या असल्याने मला जग व त्यात घडणा-या घटना एके ठीकाणी शांत उभा राहुन बघायला आवडतात.त्यात सहभागी होउन 'सामाजिक प्राणी' बणने(?) मला कधी जमले नाही.नाही माझ्यात मीपणा नाही हे ह्यासाठी सांगतोय की आता मला ज्या घटनेबद्दल (ह्याला घटना म्हणावे का ही शंका आहे,पण दुसरा पर्यायी शब्द मला माहीती नाही) बोलायचे आहे त्याबद्दल मी खुप काही आठवल की माझा तरकट (म्हणजे सारखा रुसलेला,तक्रारी करणारा म्हणुन सर्वांना न आवडणारा ह्या अर्थाने) स्वभावच लक्षात राहतो.ह्या घटनेत जे सांगणार आहे त्याबद्दलही मला तक्रार करायची आहे,पण कारणीभुत कोणाला धराव(?) हे माहीती नाही.सुरु करतो.

आम्ही मुंबईतच कोठेतरी कामासाठी जात होतो,कामासाठीच असणार फीरायला जाणे वडीलांना आवडत नव्हते.उन्हाळ्याच्या सुट्टीत दोन तीन ठीकाणी फीरुन आलो की त्याच आठवणीवर वर्ष घालवणे अपेक्षीत होते.सांगण्याचा उद्देश हा की वडीलांबद्दल मला खुप काही कौतुक वगैरे कधीच वाटल नाही.फक्त लिहुनच मी ते बोलु शकतो म्हणुन ईथे लिहतो.:) असो.

आम्ही बस स्टॉपवर उभे होतो.दीवस थंडीचे व वेळ सकाळची ६-७ची म्हणुन हवेत गारवा होता.मी माझे आवडते पिवळे शर्ट घातले होते.कदाचित दुसरी चॉईसच नसल्याने तेच आवडायचे.त्याखाली निळी जिन्स कींवा तत्सम पॅन्ट घातली होती,पण बुट घातले होते हे आठवतय,तेपण काळे बुट होते,म्हणुन माझी आत्मविश्वासाची पातळी खुप वाढली होती.थंडीत भुक लागते हे वडीलांना मान्य असाव म्हणुन त्यांनी "वडापावला पैसे द्याना" ह्या माझ्या मागणीला बिनविरोध पाठींबा दर्शवत दोन तीन रुपये सुपासारख्या पसरलेल्या हातावर टेकवले.'रस्त्यावरचा वडापाव खायचा नाही खराब असतो' ह्या अर्थाची वाक्ये मला कधी ऐकायला मिळाली नाहीत्,म्हणुन कदाचित माझी रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढली.
वडीलांनी पैसे दीले ह्याचे आश्चर्य व्यक्त करण्यात वेळ न घालवता वडापावच्या गाडीजवळ गेलो.

आता मेन सीन सुरु........

समोर एक घाणेरड्या चेह-याचा माणुस थंडीने फुटलेले ओठ पसरुन आतले खराब दात दाखवत माझ्याकडे बघत होता.शरीरातले कपडे घाण,मळकट वगैरे शब्दांच्या मर्यादा अनेक पटीने ओलांडल्यासारखे होते.तो माझ्याकडे बघत माझ्या दीशेने चालु लागला.मी तो जराही जवळ आला की सुरक्षीत धुम ठोकता येईल असे पोजीशन घेतले. तो आला त्याने माझ्याजवळ खाली पडलेल्या कच-याकडे बघितले,वडापाववाला त्याच्याकडे बघुन जोरात काहीतरी ओरडला तसा तो माणुस जरा लांब गेला.पाच सहा हातांवर लांब उभा राहीला,माझ्याकडुन त्याला काही अपेक्षा असावी म्हणुन तो माझ्याकडे बघत होता.मला आजही तो चेहरा पुसटसा आठवतो.माझ्या हातात वडापाव आला.तो माझ्याकडे बघतच होता.पण आता तो लांब होता,म्हणुन मला वडापाव तोंडात भरायचे धाडस झाले.मी त्याला माझा वडापाव देउ शकत नव्हतो.आता खुप विचार केला की अस वाटत की माझ्यात नी त्याच्यात फार काही फरक नव्हता.मीही पैसे मागुनच आणले होते,फक्त देणारे हात माझ्या वडीलांचे होते.असो.
तर तो माणुस माझ्याकडे बघतोय म्हणुन मी मान खाली घालुन वडापाव खात होतो.मी नंतर रहावल नाही म्हणुन परत त्याकडे बघितल्,आता तो थोड्या अंतरावर त्याच्या पायाशी पडलेल्या कच-यात काहीतरी शोधत होता.त्याने तो कागद वगैरे कच-याचा असलेला थर अस्ताव्यस्त (?) केला व त्याच्या तळाशी त्याला हवे ते मिळाले..........................................

.................................................................................................................................
..........
.
.
.

.
.
.................................:( हो,त्याखाली वडा पडलेला होता.कुणाच्यातरी हातातुन पडलेला असावा पुर्ण शाबुत होता.To my surprise,त्याने तो वडा एकदाही,एकदाही हाताने साफ केला नाही,जसा हातात आला तसाच त्याने वड्याचा चावा घेतला.वड्याचा अर्धा तुकडा त्याच्या तोंडात गेला.त्याच्या त्या घाणेरड्या तोडांत तो वडा उठुन दीसत होता.त्याने दुस-या घासात तो वडा संपवुन टाकला.त्यावेळी त्याच्या घशातुन काहीतरी विचित्र आवाज आला,कदाचित समाधान मिळ्याल्याच स्वःतालाच दीलेले सिग्नल असाव.आताही तो वडा त्याच्या तोंडातच होता.तो तसाच चावत चावत तो अधाश्याप्रमाणे कचरा हाताने पसरवु लागला.आता त्याचे साईड फेस अगदीच विद्रुप दीसत होते.त्याला दुसरा वडा भेटला नाही,तो पुन्हा माझ्या दीशेने बघायला लागला.मी जन्माचा हावरट,हे बघुन मी काही माझा वडापाव टाकणार नव्हतो,ना त्याला खायला देणार होतो.मी कसातरी वडापाव घशात कोंबला व तिथुन पळुन गेलो.
त्यानंतरच मला ईतकच आठवत की मला वडापाव घशाखाली गेल्यावर कमालीची तहान लागली होती,obviously मी ज्याच्याकडुन वडापाव विकत घेतला होता,पाणीही त्याच्याकडेच पिणार होतो,पण हींमत होत नव्हती म्हणुन भावाला सोबत घेउन गेलो.आता तो माणुस(का मीहीती नाही पण मी तो वेगळा शब्द कधी वापरत नाही) तिथे नव्हता,मी मनसोक्त पाणी पिले.पण माझ्या डोळ्यासमोर तोच त्याचा चेहरा व तो घटनक्रम येत होता.अगदी आजही मला ते दृश्य तसच्या तस आठवत.
त्याचे ते अधाश्यासारख वड्याला अमानुषपणे चावणे आजही आठवत व समाधान दर्शवणारा त्याच्या घशातुन निघालेला आवाज आठवला की खुप बरं वाटत.:(

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

chipatakhdumdum's picture

6 Oct 2010 - 11:22 pm | chipatakhdumdum

वाजले आता सव्वादहा, हे असल वाचल की दारू उतरते.
सकाळच्यावेळी वाचायला काय वाटत नाही.
असल या वेळी लिहू नको प्लेअसे.

शानबा५१२'s picture

7 Oct 2010 - 12:22 am | शानबा५१२

ओ काकामामाभाउ,

टाटा तुम्हालापण मी चाललो गाव सोडुन!!!!!!!!!!

मिपा,
अखेरचा हा तुला दंडवत...............तुला दंडवत..............सोडुन जातो गाव!!!!!!!!

शानबा५१२'s picture

7 Oct 2010 - 12:20 am | शानबा५१२

अरेरे ६२ वाचने एक प्रतिसाद????

टाटा मिपा!!!!!!!!!!!!!!!

शानबा, चांगलं लिहिलं आहेस. भूक माणसाला कोणत्या थराला घेऊन जाईल काही सांगता येत नाही. तू लिहित जा. वाचायचं ते वाचतील. प्रतिसाद द्यायचा ते प्रतिसाद देतील. प्रतिसाद आले नाही म्हणून काढता पाय कशाला घेतोस?

>>प्रतिसाद आले नाही म्हणून काढता पाय कशाला घेतोस?>>
+१
आणि ती सही अशी काय विचित्र आहे - ६ वाजता मृत्यूबरोबर मुलाखत टाईप्स?

शानबा५१२'s picture

7 Oct 2010 - 1:56 am | शानबा५१२

आणि ती सही अशी काय विचित्र आहे - ६ वाजता मृत्यूबरोबर मुलाखत टाईप्स?

मी त्यादीवशी अचानक हा सीन बघितला,आवडला म्हणुन टाकला ईथे.
मी पिक्चर वगैरे बघत नाही,गॉडफादर तो गॉडफादर १ काय २ काय दोन्ही ग्रेट!!!

स्कारफेस पण आवडतो,असो,जास्त जागण्याचे परीणाम.

मी आता कधीतरी लिहीन पण चांगले लिहीन्,आपण वाचता हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट!

शानबा तुम्ही नेहमी "आपण वाचता हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट"" असं का म्हणता? इज धिस नॉट अ म्युचुअल प्लेजरेबल रिलेशन्शिप? एक लेखक आणि वाचक हे परस्परांवर दोघही अवलंबून नसतात का, आनंदाच्या देवाणघेवाणीकरता? मला नेहमी कोडं वाटतं की तुम्ही स्वतःकडे थोडा कमीपणा घेता त्याचं.
मला तुमचं बरचसं लिखाण आणि नीरीक्षण आवडतं. आणि सर्वात कौतुक याचं वाटतं की शानबा प्रथम इथे आले तेव्हा स्वतःच्या कोषात होते मग ते बाहेर पडले : ) ही डिड नॉट गिव्ह अप : )
चू.भू.द्या. घ्या.

इंटरनेटस्नेही's picture

7 Oct 2010 - 2:49 am | इंटरनेटस्नेही

+१

असेच म्हणतो.

सद्दाम हुसैन's picture

7 Oct 2010 - 5:34 am | सद्दाम हुसैन

म्युचुअल प्लेजरेबल रिलेशन्शिप?
उई उई उई उई ... ओपन रिलेशनशिप सुना था .... शुचि ताई ये क्या है उई ? प्लिज एलॅबोरेट उई!
बाकी ये लेखकमियां आप का उम्र क्या है ? आप का प्रतिसाद वाच के आपको और १० साले बडा होने की जरुरत है ऐसा लगता है उई ~
सद्दाम की मानो तो लिखो आप कोई पढे ना पढे छोड दो .. प्रतिसादोंपे तो बिल्कुल गौर मत कर उई ..
आज कोई अच्छा प्रतिसाद देंगा तो कल गंदा .. चालुंच असतं हे उई.

सद्दाम हुसैन

काही गोष्टी अजिबात विसरता येत नाहीत.. हेच खरं!

जानम's picture

7 Oct 2010 - 2:55 am | जानम

छान ...

गुंडोपंत's picture

7 Oct 2010 - 4:44 am | गुंडोपंत

काही गोष्टी कडवट असतात पण म्हणून त्या किती काळ चघळत बसायच्या हे आपल्यावरच अवलंबून असते! वडिलांकडे हात पसरला त्यात इतके वाईट काय आहे? एखाद्या रिलेशनशीपमध्ये कडवटपणा आला असला तरी तो आपण किती घ्यायचा हे आपल्यावर अवलंबून नसते का?
माझे वडील वाईट होते असे मला वाटले तरी त्याला त्यांची बाजू पण असेलच ना? काही परिस्थिती असेल...

बाकी अनुभवा विषयी म्हणाल तर असे अनुभव जागोजागी येतात. माझ्यासारख्या माणसाला त्याचा अतोनात त्रास व्हायचा - होतो. समोरचा माणूस भुकेला आहे, वेदनेत आहे आणि तो माझ्या समोर आहे - हा मानसिक त्रास फार भयंकर असतो माझ्यासाठी!

हा त्रास कमी कसा करावा यावर विचार केल्यावर, मी तो क्षण त्याच क्षणी भीडून संपवायचा असे ठरवले. म्हणजे त्या माणसाला वडा हवा आहे. मी तो त्याला देऊ शकतो. पण मलाही भूक आहे. मी त्याला तेथेच अर्धा तोडून देतो. असा पर्यायही उपलब्ध होताच.
यात मी माझ्या भुकेला न्याय देतो. मनालाही त्या क्षणीच कृती केल्याने दिलासा देतो.

कधी कधी तत्काळ असे परिस्थितीला भिडणे सुचत नाही. मग मी चक्क असे क्षण शोधतो आणि तेथे काही तरी करतो. उदा. सर्कल सिनेमा समोर वडापावची गाडी आहे. तेथे मी एकदा वडापाव खात होतो. फार मस्त असतो. गरमागरम सोनेरी रंगाचा तो वडा, मऊ छानसा पाव आणि चुरचुरीत मिरची! पण एकदा हा आनंद घेतांना कुणीतरी हळूच हाताला हात लावला. वळून पाहिले तर एक लहान मुलगी. पिंजारलेले केस पण त्यावर एक पीन, मळके कपडे. माझ्या हातातल्या वड्याकडे आशेने पहात होती. दुसरी-तिसरीत शाळेत जाण्याच्या वयात कुठे कुणी वडापाव देईल का या आशेने फिरत होती. माझ्या मनात कळच आली. मी ती ला तेथेच दोन वडापाव घेऊन दिले. ते पाहून अचानक माझ्या भोवती पाच सहा लहान मुले मुली उगवले. मला सुचेचना काय करावे ते! मग त्या सगळ्यांनाही वडे घेऊन दिले. किमान तो दिवस तरी त्यांना खायला मिळाले असेल. असा माझ्या मनात विचार.

हा माझा तद्दन स्वार्थीपणा आहे. कारण नंतर मनाची कुतरओढ सहन होत नाही. त्यापेक्षा परिस्थितीला तेथेच भिडून तो क्षण संपवणे मी योग्य मानतो.

मात्र याचाही कधी कधी त्रास होतो. असे वाटते. की हा स्वार्थीपणा पुरे. काही तरी भरीव असे या मुलांसाठी मी करू शकत का नाही? यांना अशी अन्नाची भीक मागण्याची वेळच येऊ नये या साठी मी काही का करत नाही. हा विचार त्रास देत राहतो. मग कधी तरी गंगेवरच्या गाडगेबाबा ट्रस्ट ला देणगीच देऊन येतो. अंध पंगूं साठी अन्नछत्र चालवले जाते.

सहज's picture

7 Oct 2010 - 8:22 am | सहज

त्यापेक्षा परिस्थितीला तेथेच भिडून तो क्षण संपवणे मी योग्य मानतो.!

पैलवान गुंडोपंत लै भारी बोल्लात!

गुंडोपंत's picture

7 Oct 2010 - 8:35 am | गुंडोपंत

पैलवान गुंडोपंत लै भारी बोल्लात!
कस्चं कस्चं... होऊन जातं कधी कधी चुकून! धन्यवाद :)

मी त्यावेळी चौथीत वगैरे होतो म्हणुन हे सर्व सुचल नाही.
आता हेच करतो.

काही तरी भरीव असे या मुलांसाठी मी करू शकत का नाही? यांना अशी अन्नाची भीक मागण्याची वेळच येऊ नये या साठी मी काही का करत नाही.

अगदी हेच विचार माझे आहेत.रोजगार त्यावर उत्तम उपाय आहे,पण सर्वांच्या अवाक्यातली गोष्ट नाही ही.

मग कधी तरी गंगेवरच्या गाडगेबाबा ट्रस्ट ला देणगीच देऊन येतो. अंध पंगूं साठी अन्नछत्र चालवले जाते.

मी लहान मुलांच्या आश्रमाला प्राधान्य देतो.

थॅन्क्स्,आपला प्रतिसाद व विचार आवडले,जास्तीत जास्त लोकांना असे करायला प्रवृत्त करा.

वाचक's picture

7 Oct 2010 - 8:09 am | वाचक

ज्यांच्या संवेदना अजून जागृत आहेत त्यांना असा त्रास होणारच. गुंडोपंतांचे 'क्षणाला भिडण्याचे' विचार आवडले, काही वेळा जरी प्रत्यक्षात आणता आले तरी बरेच बदलू शकेल.

पाषाणभेद's picture

7 Oct 2010 - 8:17 am | पाषाणभेद

बारीक निरीक्षण आहे शानबा. काही वेळा असल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावे हेच बरे. अन लिहीत रहा. प्रतिक्रीयांचा सोस नको.

स्वैर परी's picture

7 Oct 2010 - 10:37 am | स्वैर परी

तुम्हि लिहिलेल्या लेखाचे संपूर्ण द्रुश्य डोळ्यांसमोर उभे राहिले. खुप मस्त लिहिले आहे.

प्रमोद्_पुणे's picture

7 Oct 2010 - 12:18 pm | प्रमोद्_पुणे

लिहिले आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Oct 2010 - 1:04 pm | बिपिन कार्यकर्ते

शानबा, लिहिताय ते चांगलं करताय.