अंतिम भाग गुरवारी (७ आक्टोबर) ला
प्रसिद्ध ब्रिटीश सेनानी फिल्ड मार्शल फिलिप चेटवुडच्या शब्दात थोडा बदल करुन राष्ट्रव्रती कसा असावा हे थोडक्यात सांगतो -
आपल्या राष्ट्राची सुरक्षा, राष्ट्राचा सन्मान आणि राष्ट्राचे कल्याण - नेहमीच सगळ्यात आधी.
तदनंतर आपल्या परिवाराचा सन्मान, परिवाराचे कल्याण आणि परिवाराची सोय.
स्वतःची सोय, स्वतःचे कल्याण व स्वतःची - सुरक्षा शेवटी, नेहमीच शेवटी.
हनुमानाचा शाप व त्यावर उतारा – पहील्या भागात आपण प्रामुख्याने खालील निर्देशित मुद्द्यांवर चर्चा केली.
हिंदु धर्म - विषय प्रवेश
मानवाचे अस्तीत्व
त्या अस्तीत्वाचे उद्दीष्ट – मानसिक प्रगती व उत्कर्ष
देश व राष्ट्रांची संकल्पना
राष्ट्राची विचारसरणी
राष्ट्रासमोर ठाकलेले महत्वाचे प्रश्न
राष्ट्राबद्दलची तळमळ
बहुतेक वेळा प्रस्तुत संकल्पना किंवा विचारसरणी मनाला पटेल अशी व आकर्शक वाटते पण ती अनुसरायची म्हणजे नक्की काय करायचे ह्या प्रश्नाचे उत्तर न दिल्या मुळे – वाचायला छान वाटते, अध्ययन करायला आवडते पण तुमच्या आमच्या सारख्याने प्रस्तुत विचारसरणी रोजच्या जिवनात उपयोगात कशी आणायची असा प्रश्न पडतो.
आपण जेव्हा म्हणतो व ऐकतो की प्रत्येक हिंदु मनाला आपण हिंदु आहोत ह्याचा आभिमान असला पाहीजे व तो योग्य त-हेने प्रगट करता आला पाहीजे हे महत्वाचे. हिंदु धर्माचा अभिमान बाळगणे व तो योग्य त-हेने प्रगट करणे म्हणजे नक्की काय करणे? कारण हे जर स्पष्ट केले नाही तर लोकांच्या मनात आधी गोंधळ उडतो, नंतर संभ्रम उत्पन्न होतो व तदनंतर आपल्या कृतीवरचा व धर्मावरचा विश्वास उडतो. काही लोकं मग वाटेल ते करुन हिंदु धर्माचा आभिमान प्रगट करायला निघतात त्यात – प्रामुख्याने राष्ट्रिय संपत्तीची तोडफोड करणे, दारु पिऊन गणपतीच्या मिरवणुकीत धिंगाणा घालणे, आचार विचार सोडुन वागणे, दुस-यांशी उर्मटपणाने वागणे वा बोलणे इत्यादी गोष्टी प्रामुख्याने आढळतात.
पुढच्या दोन भागातुन (भाग २,३) राष्ट्रव्रताची दहा सु्त्रांबद्दल लिहीले आहे. धर्मा बद्दल अभिमान बाळगणे म्हणजे नक्की काय करणे हे स्पष्ट केले आहे. दहा सुत्र अशी आहेत.
- आपल्या व आपल्या भोवतालच्या लहान मुलांना योग्य वळण लावणे व जागृत करणे, राष्ट्रव्रती बनवणे.
- अहंभाव कमी करणे.
- राष्ट्र सुधार कार्यात नेहमी अग्रेसर राहणे.
- लाचखोरी व वित्तिय घोटाळ्यां पासुन स्वतः दुर रहाणे व दुस-याला परावृत्त करणे.
- आपल्यातले कला, नैपुण्य सतत वाढवणे व छंद जोपासाणे. शरीराला व्यायामाची सवय ठेवणे.
- कामाच्या चागल्या सवयी लावुन घेणे. तसेच कोणच्या ही कामाची व काम करणा-यांची उपेक्षा टाळणे.
- नितीमत्ता व चांगल्या आचारणांचा वापर सतत करणे.
- टोकाच्या आवडी-निवडी टाळणे. छांदीष्टपणा टाळणे व स्वतः बद्दलची कीव कमी करणे.
- दुरदर्शी बनायचा प्रयत्न करा व स्वतःचे विचार उत्तम, उदात्त व उत्तुंग बनवा.
- आपल्या धर्मातल्या चागल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करणे.
ब-याच वेळेला वाचणा-यांना असे वाटेल की इतक्या बारकाईने वर्णन करायची गरज आहे का? मला स्वतःला वाटते आहे. आपला धर्म सोपा, आकर्षक व आकलनिय करण्यासाठी एवढ्या बारकाईची गरज आहे. कारण विचारसरणीचा गोषवारा माहीती असला तरी नेमके प्रत्येकाने कसे वागयचे हे स्पष्ट नसेल तर आधळीकोशिंबीरीचा खेळ ठरेल. माझी अशी विनंती आहे की वाचणा-यांनी हे विचारात घेऊन लेख वाचावा.
राष्ट्रर्पण
प्रतिक्रिया
6 Oct 2010 - 9:13 pm | पक्या
दहा सूत्री छान आहे. लेख ही चांगला वाटला.
6 Oct 2010 - 10:57 pm | पैसा
प्रत्येकाने असं राष्ट्रव्रत घ्यायला पाहिजे.