चौथा मजला (उत्तरार्ध)

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जनातलं, मनातलं
1 Oct 2010 - 9:53 am

पुर्वार्ध [ इथे ] वाचता येईल.. आता पुढे..

------
रोहन आज लवकर घरी आला.. तसा तो हल्ली तासन तास कारखान्यातच असे. त्याच्या असं सतत कारखान्यात असण्याने आईला फारच काळजी वाटत असे. बाबा तिला नेहमी त्यांनी स्वतः एकेकाळी रात्र-रात्र केलेल्या कामाची साक्ष देऊन गप्प बसवत असत. आज मात्र रोहन वेळेत घरी आला. त्याला काय तो सोक्षमोक्ष लावायचा होता. रात्रीची जेवणं झाली. आई, तो आणि बाबा बरेच दिवसांनी एकत्र जेवले. आई खुष होती. जेवणं झाल्यावर अंगणातल्या पायर्‍यावर आई बाबा बसले होते. रोहनही तिथेच जाऊन बसला. आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागली
"अरे बोल रे रोहन. हल्ली तु फारसा बोलतच नाहीस. फार टेंशन्स आहेत का रे कारखान्यात?"
"अं? कारखान्यात टेन्शन्स! हं ती तर आहेतच पण ती कारखान्यातल्या कामामुळे नव्हे. इतरच गोष्टीमुळे"
"म्हणजे?" बाबांची उत्सुकताही चाळवली
"बाबा, मला सांगा तुमची आई कोण?"
"काय रे डोकं ठिकाणावर आहे ना?" बाबांचा आवाज त्यांच्याही नकळत चढला. आईने त्यांना शांत रहायची खूण केली. ती म्हणाली "अरे रोहन काय हा प्रश्न. आधीच आजी गेल्यापासून त्यांना तिची आठवण येत असते"
"कोणती आजी?"
"कोणती म्हणजे? तुला काय दहा आज्या होत्या काय रे?"
"अजून दहा बद्दल माहित नाही.. पण दोन तर नक्कीच होत्या"
बाबांच्या चेहर्‍याचा रंग बदलला. ते गांगरून गेले.
"काय? काय बोलतोयस तु?"
"खरं की नाही सांगा!"
आईचे डोळे विस्फारले होते. ती आता अजिबात मधे पडणार नव्हती. ती फक्त बाबा रोहनला कसे समजावताहेत हे बघणार होती.
"काय खर?" बाबांनी विचारलं
"की आजी तुमची जन्मदात्री नव्हती. सांगा बाबा तुम्हाला हे माहित होतं की नव्हतं"
बाबांच्या डोळ्यात पाणी तरारलं होतं. ते मटकन खाली बसले. दोन मिनीटं काहिच बोलले नाहीत. जरा सावरल्यावर बोलु लागले "होय. माहित होतं. तुझ्या आजीला मूल होत नव्हतं. व मुल झालं नसतं तर हा कारखाना चुलत्यांच्या ताब्यात गेला असता. त्याच वेळी आपल्या वाड्यात पार्वती भाडेकरू म्हणून रहायला आली. अतिशय रेखीव, तरूण, फॅशनेबल आणि मुळची श्रीमंत. अगदी त्याकाळातही तुमच्या पंजाबी ड्रेससारखे कपडे घालणारी. काहि करायच्या इर्शेने घर सोडून आली होती. आजोबांना ती आवडली होती किंवा कसे हे माहित नाही. मात्र तुझ्या आजोबांनी त्याकाळात तिला मुलासाठी गळ घातली व भरपूर पैसे देऊ केले. पैशासाठी वाट्टेल ते करायची तयारीच करून आल्याने ती तयार झाली व गुपचुप एका मुलाला जन्म दिला"
"आणि ते मुल म्हणजे तुम्ही! बाबा तुम्ही. तुम्हाला जन्म दिल्यावर मात्र तिला पैशापेक्षा मुल महत्त्वाचं वाटु लागलं मात्र आजोबांनी तिला मुलाला हात लावायला देखील नकार दिला. पुढे ती मुलासाठी झूरत राहिली. तिला वेड लागलं. आजोबांनी तिला घराबाहेर काढलं. लोक तिला वेडी म्हणत मात्र ती पैशाचा कुलुपबंद-डबा हातात व त्याच्या किल्लीचा छल्ला कमरेला लाऊन गावभर फिरत राहिली"
बाबा काहि न बोलता उठले.
"उठू नका. मला सगळं कळून चुकलंय. मला स्वतः पार्वतीने हे सांगितलंय"
पार्वतीचं नाव ऐकलं आणि बाबा स्तब्ध उभे राहिले. दोन मिनीटं हा काय बोलतोय हेच त्यांना समजेना
"पार्वती कोण पार्वती?"
"वाटलंच मला. मला ती म्हणालीच होती की तुम्ही तिला ओळखही दाखवणार नाही म्हणून. ती अजूनही मॉडर्न कपडे घालत असली तरी ती तुमची आई आहे हे विसरू नका. आजोबा तर कृतघ्न निघालेच पण तुम्हीही सत्य समजल्यावरही तिला जवळ केले नाहित. पण वेळ अजूनही गेलेली नाही. ती वाट पाहतेय बाबा. तिला घरात घ्याल का? ती अजूनही मला भेटते. माझ्याशी बोलते."
"रोहनाऽऽ"
"मला ती त्याच दिवशी दिसली. कारखान्यात चौथ्या माळ्यावर पान ठेवायला गेलो असताना"
बाबा जवळजवळ ओरडलेच "अरे पण त्या माळ्यावरून तर तिने जीव दिला होता"
आता मात्र आई-बाबांना दरदरून घाम फुटला
"अरे काय बोलतोयस? ती कशी असेल?"
रोहन फक्त बोलला "ती आहे हे नक्की!" आणि सरळ आपल्या खोलीत गेला.
-----------
डॉ. कामत बाबांचे जुने मित्र आज ते दुपारी घरी आले. घरी आई-बाबा दोघेही त्यांचीच वाट पाहत होते.
"काय डॉक्टर, काय म्हणताहेत पेशंट"
डॉ. कामत म्हणजे नामवंत सायकायट्रीस्ट होते. बाबांचे खूप जवळचे मित्र असल्याने त्यांनी रोहनची केस हाती घेतली होती. आईने चहा आणून ठेवला. त्याचा आस्वाद घेत डॉ. कामत बोलु लागले
"केस फारच इंटरेस्टिंग आहे. रोहनने त्या मुलीला म्हणजे पार्वतीला बघितले अशी त्याला खात्री आहे. इतकेच नव्हे तर तो अजूनही तिला भेटतो बोलतो. तिच्याबद्द्ल खूप कृतज्ञता त्याला आहे. तिच्याबद्दल तो माझ्याशी खूप बोलला. मला ही स्कित्झोफ्रेनिआची केस असावी असा संशय आहे."
"काय? स्कित्झोफ.."
"स्कित्झोफ्रेनिआ. एक हॅल्युसिनेशनचा बराच पुढचा प्रकार. ज्यात माणूस स्वतःच काहि प्रसंग, व्यक्ती, स्थळे कल्पतो आणि त्यात रमून जातो. त्या वक्ती, प्रसंग त्याला खरे वाटु लागतात. भारतात दर लाखात जवळजवळ अडिचशे ते तीनशे लोकांना हा आजार आहे. तुमचयसाठी मी जितका खरा आहे तितकीच पार्वती त्याच्यासाठी खरी आहे"
"अहो पण त्याला माझ्या इतिहासाबद्दलची माहिती कशी?"
"तोच प्रश्न मलाही पडला आहे. म्हणूनच मी अजून हा स्कित्झोफ्रेनिआच आहे हे खात्रीने सांगत नाहि आहे. मला सांगा तुम्ही कधी रोहनला याबद्दल सांगितलं होतं का?"
"छे कधीच नाहि. मागे पितृपक्षात त्याने विचारलं होतं,पण तेव्हा उत्तर दिलं नव्हतं" आईने सांगितलं.
"आणि त्याच दिवशी त्याला पार्वती भेटली"
"बरोबर."
"बरं कधी लहानपणी त्याच्यासमोर पार्वतीबद्द्ल कधी चर्चा, वाद"
आईने बाबांकडे पाहिलं बाबांनी संमतीदर्शक मन हलवली. आई सांगु लागल्या
"रोहन अडिच तीन वर्षांचा असेल. तेव्हा मला पहिल्यांदा ही कथा समजली तेव्हा मी फार चिडले होते ह्यांच्यावर आणि सासुबाईंवरही. आमच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं. आम्ही सहसा रोहनसमोर वाद घालायचे टाळायचो. मात्र त्या दिवशी माझा संयम राहिला नाहि. पण तेव्हा तो खूपच लहान होता. त्याला ते अजिबातच कळलंही नसेल किंवा लक्षातही नसेल"
"त्याच्या प्रकट मेंदूला लक्षात नसलं तरी सुप्त मनाने त्याची कुठेतरी नोंद घेतली असणार आणि तीच नोंद मूर्त रूप घेऊन त्याच्या समोर आली आहे. येत आहे. आपल्याला वेगाने पावले उचलायला हवीत. मी लगेच ट्रिटमेंट सुरू करतो. कारण त्याची पार्वतीमधील गुंतवणूक खूप वाढली आहे. देव न करो आणि काहि विपरीत घडो. उद्या पासून घ्यायला ह्या गोळ्या देतो."
इतक्यात कारखान्यातून फोन आला. बाबांनी तो कानाला लावला आणि ते ओरडलेच. "रोहन!ऽऽऽ"
"काय हो काय झालं?"
"रोहन.. रोहन"
"रोहन काय?"
"रोहननं कारखान्यातून फोन केला होता. म्हणाला, तुम्ही माझ्या खर्‍या आजीला घरात घेणार नाहिच त्यापेक्षा मीच ज्या आजीचा नातु आहे तिच्यासोबत तिच्या दुनियेत चाललोय. आणि फोन कट केला"
आई ला ऐकून भोवळच आली आणि ती खाली पडली.
--------
तेरावा दिवस संपला. घरी जमलेले पाहुणे एक एक करून गेले. आता घरात आई व बाबा दोघेच उरले होते. जेवायलाही तयार होतं पण दोघांचही मन नव्हतं
"अहो. तुम्ही जेऊन घ्या"
बाबांचं लक्षच नव्हतं. आईने त्यांना हलवलं
"अहो ऐकताय ना!"
"अं..हो.. ऐक ना गं. गेले काहि दिवस तुला मुद्दामच बोललो नाही"
"काय?"
"मी कारखान्यात पोचलो तोपर्यंत रोहनं त्याच चौथ्या मजल्यावरून उडी मारली होती. मी त्या मजल्यावर गेलो आणि तिथे मला हे मिळालं.."
बाबांनी ड्रॉवरमधून एका पिशवीतल्या वस्तु बाहेर काढून टेबलवर ठेवल्या. त्या वस्तु बघुन आईचा चेहरा पांढरा पडला. टेबलवर एक कुलुपबंद पेटी आणि एकच किल्ली असलेला चांदीचा छल्ला होता!!

(समाप्त)
[लेख एकटाकी लिहिल्याने टंकनदोष व शुद्धलेखनाच्या चुका असतील याची खात्री आहे. स्वसंपादन नसल्याने तेवढे नजरे आड करावे]

कथा

प्रतिक्रिया

गुंडोपंत's picture

1 Oct 2010 - 9:59 am | गुंडोपंत

अरे काय टर्न देतो रे कथेला?
रंगत येत असतांना रोलरकोस्टर मधून एकदम खाली फेकून दिलेस...
मस्त!

श्रावण मोडक's picture

1 Oct 2010 - 10:00 am | श्रावण मोडक

??
पूर्वार्धातील बीज हरपलं दिसतं.

ॠषिकेश

छान गोष्ट. चांगला प्रयत्न. अजून खुलवता आली असती. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

प्रिया

नितिन थत्ते's picture

1 Oct 2010 - 10:33 am | नितिन थत्ते

असेच म्हणतो.

ब्रिटिश टिंग्या's picture

1 Oct 2010 - 10:23 am | ब्रिटिश टिंग्या

मस्त रे!

दत्ता काळे's picture

1 Oct 2010 - 10:35 am | दत्ता काळे

सुरवातीला ( पूर्वार्धात ) दमदार बॅटींग. खेळ संपेतोवर सेन्च्युरी लागेल असं वाटंत होतं. पण लंच नंतर लगेचच आउट ?

विसोबा खेचर's picture

1 Oct 2010 - 11:22 am | विसोबा खेचर

ऋष्या, छान रे.. लिहित राहा..

तात्या.

--
काही नगण्य अपवाद वगळता मराठी भावसंगीताची हल्ली बोंबच आहे!

dipti's picture

1 Oct 2010 - 12:32 pm | dipti

खुप मस्त...

सहज's picture

1 Oct 2010 - 12:40 pm | सहज

असा फटकन व दुर्दैवी शेवट यामुळे तितका प्रभाव नाही पडला पण पहील्या भागामुळे अपेक्षाही वाढल्या होत्या म्हणुन असावे.

प्रभो's picture

1 Oct 2010 - 6:55 pm | प्रभो

असेच म्हणतो.

मेघवेडा's picture

1 Oct 2010 - 8:53 pm | मेघवेडा

पण पहील्या भागामुळे अपेक्षाही वाढल्या होत्या म्हणुन असावे

असेच म्हणतो. मस्त लिहिलंयस पण. लिहीत राहा! :)

ढब्बू पैसा's picture

1 Oct 2010 - 1:40 pm | ढब्बू पैसा

छान झालीये कथा! पण शेवट खूप अचानक झाला!

पैसा's picture

1 Oct 2010 - 8:26 pm | पैसा

सहमत

वाचता वाचता चटकन शेवट आला.. कथा चांगली लिहिली आहेस पण अजुन थोडी खुलवता आली असती. :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Oct 2010 - 4:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अजून एक भाग लिहीता आला असता रे! एवढ्या पटकन का संपवलंस?

(ही तक्रार नसून लिखाण्/कथा आवडल्याची पावती आहे.)

स्वाती२'s picture

1 Oct 2010 - 4:45 pm | स्वाती२

+१
सहमत!

प्रियाली's picture

1 Oct 2010 - 5:03 pm | प्रियाली

या कथेचे ४ भाग होतील. किमान ३ तर नक्कीच. :) ज्या पेसने कथा सुरू केली तिच पेस इतर भागांतही राहणे गरजेचे आहे. (हा सल्ला दुसर्‍यांना देणे अतिशय सोपे असते. तरीही. ;))

भाग दोन आणि पुढले भाग पुन्हा लिहून बघ. उरकू नकोस. कथा चांगली होईल.

राजेश घासकडवी's picture

2 Oct 2010 - 12:56 am | राजेश घासकडवी

पहिल्या भागात चौथ्या मजल्याचं गूढ छान वाढलं होतं. मधले काही कथाभाग पार्वतीच्या काळातले लिहिता येतील का? मग काळामध्ये मागे पुढे करून मस्त रोलरकोस्टर होईल असं वाटलं. अर्थात प्रियाली म्हणतात त्याप्रमाणे सूचना देणं सोपं असतं...

पण लेखन थांबवू नका, अजून गूढकथा येऊ द्यात.

अनामिक's picture

1 Oct 2010 - 7:03 pm | अनामिक

चांगली मांडणी, पण आटोपती घेतल्या सारखे वाटले.
शिवाय मागच्या भागात व्हिलचेयरवर असणारे बाबा या भागात मटकन खाली बसतात, त्यात करेक्शन करता येईल तर बघ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Oct 2010 - 7:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकदम झकास.......!

-दिलीप बिरुटे

शिल्पा ब's picture

1 Oct 2010 - 8:45 pm | शिल्पा ब

मस्त...कथा खूप आवडली...अजून फुलवता आली असती..
एक प्रश्न : इतके वर्ष त्या मजल्यावर ताट कशासाठी ठेवत होते? म्हणजे जर पार्वती मेली आहे हे माहिती होते तरी..

विश्वनाथ मेहेंदळे's picture

2 Oct 2010 - 2:38 am | विश्वनाथ मेहेंदळे

ताई, तुम्ही तुमच्या पितरांना जेवायला देत नसाल, बाकीचे देतात हो. त्या पार्वतीसाठीच ते ताट ठेवत असणार ना ?

शिल्पा ब's picture

2 Oct 2010 - 4:26 am | शिल्पा ब

असं ए होय? बरं चालु द्या..

कथेचा शेवट अजूनही फुलवता आला असता. एकदम शेवट केल्यासारखा वाटला. रोहन ची पार्वतीशी होत असलेली जवळीक दाखवायला आणखी एखादा प्रसंग दाखवला असता तर कथेमधील उत्सुकता कायम राहिली असती.
पहिला भाग जितका प्रभावी झाला होता.. तितका दुसरा भाग नाही वाटला. कथा गुंडाळल्यासारखी वाटली. या कथेचा आणखी एक भाग नक्की होऊ शकेल. पुन्हा एकदा लिहून बघ.
रोहन ने आत्महत्या करण्या इतकं पार्वती आणि त्याच्यामध्ये काय झालं.. याचा संदर्भ आई-बाबांच्या बोलण्यातून किंवा रोहन्-बाबांच्या बोलण्यातून येऊ शकला असता.

तुझी शैली खूप चांगली आहे.. केवळ वेळ कमी आहे किंवा नाहीये.. या कारणांसाठी इतकं चांगलं कथाबीज गुंडाळलं जाऊ नये असं वाटतं.. आणि ते फुलवण्याची क्षमता आहे तुझ्या लेखनामध्ये म्हणून हा प्रतिसाद.

पुढील लेखनास शुभेच्छा!

नंदन's picture

2 Oct 2010 - 12:16 am | नंदन

तुझी शैली खूप चांगली आहे.. केवळ वेळ कमी आहे किंवा नाहीये.. या कारणांसाठी इतकं चांगलं कथाबीज गुंडाळलं जाऊ नये असं वाटतं.. आणि ते फुलवण्याची क्षमता आहे तुझ्या लेखनामध्ये म्हणून हा प्रतिसाद.

--- सहमत आहे. कथा आवडली, पण अजून एक भाग असता तर अधिक खुलवता आली असती.

शेवट अनपेक्षित आहे.
रोहन असं काही करेल यापेक्षा त्याचे वडील काहीतरी गूढ सांगतील असे वाटत होते.

सुनील's picture

2 Oct 2010 - 4:39 am | सुनील

कथा छान. बाकी, पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध चटकन उरकल्यासारखा वाटला. कथा अजून थोडी खुलवता आले असती, ह्या वरील बहुतेक मंडळींच्या मताशी सहमत.

बाकी कथा "समयोचित"!

ऋषिकेश's picture

2 Oct 2010 - 11:23 am | ऋषिकेश

सगळ्यांचे प्रतिक्रीयांबद्द्ल आभार
कथा आटोपशीर ठेवायची(च) असं काहिसं डोक्यात होतं.. चौथ्या मजल्यावरचा प्रसंग लिहिलाही होता. पण कथा इतकी लांबली की ते अध्याहृत ठेवलं.. कथेचा वेग तोच ठेवायला हवा होता हे आता समजलं आहे.
पुन्हा जेव्हा प्रयत्न करेन तेव्हा नक्की लक्षात ठेवेन

पुन्हा एकदा सगळ्यांचे मोकळ्या प्रतिक्रीयेबद्दल अनेक आभार!

प्राजक्ताचि फुले's picture

2 Oct 2010 - 11:51 am | प्राजक्ताचि फुले

छान आहे...

अवांतर :मागच्या भागात उल्लेख केलास की : 'मागे बाबा व्हीलचेअरवरून येत होते.'
आणि ह्या भागात 'ते मटकन खाली बसले.' असं कसं बुवा???

अरे हो..... तुम्ही म्हटल्यावर मला पण आठवलं...

बाकी कथा छान....... कथा अजून फुलवता आली असती या बाकी बर्‍याच लोकांच्या मताशी सहमत.

निखिल देशपांडे's picture

4 Oct 2010 - 10:52 am | निखिल देशपांडे

मस्त रे ॠ..
कथा आवडली

सुवर्णमयी's picture

6 Oct 2010 - 3:42 am | सुवर्णमयी

कथा आवडली