पितृपक्षातली स्वप्नं, योगायोग व श्रद्धा

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
30 Sep 2010 - 11:36 am

डिस्क्लेमर - या लेखांत श्रद्धांची चिकित्सा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांना अशी चिकित्सा केलेली मुळात आवडत नाही, किंवा अशा चिकित्सेने त्यांच्या विश्वासाला तडा जाईल असं वाटतं त्यांनी हे लेखन वाचू नये. ज्यांना अशा डिस्क्लेमरची गरज वाटत नाही, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करावे.

आपला एखाद्या गोष्टीवर विश्वास कसा बसतो? एका शब्दात उत्तर द्यायचं झालं तर 'अनुभवातून' असं म्हणता येईल. अगदी अडीच वर्षाच्या मुलालासुद्धा 'ब्लेडला हात लावू नकोस, त्याने लाल बाऊ होतो' हे सांगून, त्याच्याकडून दहावेळा वदवून घेतलं तरी त्याचा हात ब्लेडवरून फिरायला शिवशिवतोच. प्रत्यक्ष कापून रक्त वाहताना दिसल्याशिवाय व बोटाला बाऊ झाल्याशिवाय त्याचा विश्वास बसत नाही. (हे आमच्या घरी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. अनुभव आहे!) अनुभवातूनच आपण 'त्याच्याकडनं आम्ही आधी रतीब लावला होता, पण तो खूप पाणी घालतो दुधात. आता दुसऱ्याकडून दूध घेतो, त्याचं दीडपट लोणी येतं' वगैरे उपयुक्त गोष्टी शिकतो. हेच जर आपल्याला कोणी आधी सांगितलं असतं तर आपला विश्वास बसला असताच असं नाही. प्रत्यक्षात मोठा लोण्याचा गोळा बघितल्यावर जी खात्री पटते ती खरी.

पण अनुभव हा शब्द फारच अघळपघळ आहे. अघळपघळ म्हणण्याचं कारण असं की काही अनुभव तर्काच्या कसोटीवर मोजून पहाता येतात, तर काही इतके वैयक्तिक असतात की (सध्या तरी) मोजून पहाता येत नाहीत. म्हणजेच काही वस्तुनिष्ठ असतात, तर व्यक्तिनिष्ठ असतात. वर दिलेला अनुभव हा अर्थातच वस्तुनिष्ठ आहे. तो लोण्याच्या गोळ्याच्या आकारात मोजता येतो. तत्वतः त्या दोन गवळ्यांकडचं दूध आणून त्यावर काही निरीक्षणं करून किती लोणी येणार हे आधीच सांगता येतं. याउलट सूर्यास्ताच्या सौंदर्याचा अनुभव व्यक्तिनिष्ठ आहे. म्हणजे तो कुठच्याच स्वरूपात मोजताच येणार नाही असं नाही, पण ती मोजमाप करण्यासाठी व्यक्तीच्या अंतरातच डोकवावं लागतं (किती सुंदर वाटला ते सांग, असा प्रश्न विचारून वगैरे...)

पण हे वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ असे दोन नेटके खण नेहेमीच असतात असं नाही. कधी कधी काही साध्या नैसर्गिक घटनांतून, योगायोगाने लागणाऱ्या संगतींमुळे काहीतरी दिव्य अनुभव आल्याची प्रचीती येते. तेव्हा दिव्यत्वाच्या दुधापासून योगायोगाचं पाणी वेगळं करण्याचा हा प्रयत्न.

नुकतीच मिपावर पितृपक्षात सापांची, कावळ्यांची अथवा पितरांची स्वप्नं दिसण्याबद्दल चर्चा झाली. त्यात अशी स्वप्नं पितृपक्षातच का पडावीत हा प्रश्न आला. ज्या व्यक्तींना अशी अनेक स्वप्नं पितृपक्षात पडतात त्यांची या बाबतीत 'माझे पितर मला स्वप्नांतून संदेश देत आहेत' अशी श्रद्धा होणं स्वाभाविक आहे. पण यामागे केवळ योगायोग असू शकेल का? किंवा वेगळ्या प्रकारे हाच प्रश्न विचारायचा झाला, तर पितर स्वप्नातून संदेश नसतानाही काही लोकांना नेमकी पितृपक्षातच अशी स्वप्नं पडतील का?

हे जाणून घेण्यासाठी मी एक कौल घेतला - सर्वसाधारणपणे पितरांशी संबंधित असलेली चिह्नं किती वेळा स्वप्नात दिसतात, हे तपासून पहायला. त्यावरून असं दिसून आलं की कौलात भाग घेतलेल्या सरासरी व्यक्तीला आत्तापर्यंतच्या आयुष्यात सुमारे 12 वेळा अशी चिह्नं दिसलेली आहेत. हा अर्थातच काटेकोर वैज्ञानिक पद्धतीने घेतलेला कौल नाही. पण एक सर्वसाधारण अंदाज यायला त्यातून मदत होते. म्हणजे हा आकडा 1200 नसावा, अथवा 1-2 इतका लहान नसावा इतपत यातून कळतं. तसंच या गणितासाठी सरासरीचं प्रमाण वापरणं कितपत योग्य ठरेल हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. कारण मिळालेलं वितरण (डिस्ट्रिब्यूशन) हे नॉर्मल डिस्ट्रिब्यूशन नव्हतं. पण तूर्तास सर्व समाजाविषयीचे निष्कर्ष बाजूला ठेवून आपण तो सरासरीचाच आकडा वापरू. म्हणजे इथे काढलेले निष्कर्ष ज्यांना बरोब्बर बारा स्वप्नांत अशी चिह्नं दिसली आहेत अशांना तंतोतंत लागू होतील. ज्यांना कमी वा अधिक स्वप्नं पडतात अशांसाठीचे आकडे कमी अधिक होतील, मात्र युक्तिवाद तोच राहील.

गृहीतक - स्वप्नात दिसणारी चिह्नं कधी दिसतील हे सांगता येत नाही. पितृपक्षातच ती दिसतील असं नाही. ती यदृच्छेने कधीही दिसू शकतील.
माहिती - काही लोकांना प्रत्येकी 12 स्वप्नात अशी चिह्नं दिसलेली आहेत.

सोयीसाठी आपण 24 पंधरवडे धरू. म्हणजे ही 12 स्वप्नं 24 पंधरवड्यांमध्ये अनेक लोकांसाठी विभागली गेली तर बऱ्याच लोकांना पितृपक्षात एक स्वप्न पडलेलं असणं साहजिक आहे. प्रश्न असा आहे की एखादं स्वप्न पडलं तर ते लक्षात राहीलच असं नाही, किंवा विशेष वाटेलच असं नाही. तेव्हा अधिक स्वप्नं पडण्याची शक्यता काय? तर त्याचं उत्तर आहे की सुमारे 1.3% लोकांना तीन किंवा अधिक स्वप्नं पितृपक्षातच पडतील. तीन किंवा अधिक स्वप्नं नेमकी पितरांची आठवण काढण्याच्या वेळी पडली तर एखाद्याला कदाचित वाटेल की अरे हो, मला असली स्वप्नं पितृपक्षातच पडतात.

पण हे झालं बरोब्बर 12 स्वप्नं पडणाऱ्यांविषयी. जर जास्त स्वप्नं पडत असतील तर त्यातली तीनपेक्षा अधिक - कदाचित 5-6 स्वप्नंदेखील पितृपक्षात पडू शकतील हे उघड आहे. समजा जर 5 किंवा अधिक स्वप्नं पितृपक्षातच पडली तर त्यांना 'मला जवळपास प्रत्येक पितृपक्षात सापाचं किंवा पितरांचं किंवा कावळ्याचं स्वप्न पडतं' हे खूपच ठामपणे म्हणता येईल. ज्यांना 50 स्वप्नं आत्तापर्यंत पडलेली आहेत अशांसाठी हा आकडा 5% इतका येतो. म्हणजे केवळ योगायोगामुळे अशा पॉप्युलेशनमधले पाच टक्के लोक विश्वास ठेवू शकतील की 'यात काहीतरी लपलेला अर्थ आहे खरा.' आणि हे केव्हा, तर आपल्या गृहीतकाप्रमाणे स्वप्नात दिसणारी चिह्नं कधी दिसतील हे सांगता येत नसताना.

एकदा असे लपलेले अर्थ शोधायला लागलं की मग अनेक संबंध डोळ्यासमोर येतात. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी (किंवा दोनच दिवस आधी, किंवा तीनच दिवस आधी...), परीक्षेच्या आधी मी आजारी होतो तेव्हाच नेमकं, मी ट्रिपला जायच्या आधल्या रात्री (नंतर तिथे अपघात झाला), माझी आर्थिक परिस्थिती वाईट होती तेव्हा (त्यानंतर लगेचच सुधारली)... अशा अनेक संगती योगायोगाने जुळवता येतात. कारण वर्षाच्या प्रत्येक दिवशी काही ना काही होत असतंच. तसं केलं तर या 1.3 ते 5 टक्क्यांपेक्षा कितीतरी अधिक लोक स्वप्नांमध्ये काहीतरी अद्भूत आहे असा विश्वास ठेवू शकतात. आणि अशा विश्वासापुढे तर्क चालत नाही. ती श्रद्धा बनते. कारण ती खोलवर असलेल्या आत्मानुभवातून आलेली असते.

पितृपक्षात पडणारी स्वप्नं - व त्यातून निर्माण होणारे विश्वास ही फक्त श्रद्धा मूळ धरण्याची एक पद्धत झाली. अमुक गुरूने दिलेली अंगठी, लहानपणी आईने शिकवलेला संकटप्रसंगी म्हणण्याचा श्लोक, कायम वापरण्याचा लकी शर्ट, अशा अनेक गोष्टींतून टक्क्या टक्क्यांनी लोक श्रद्धावान होतात. मी आधी एका लेखात निव्वळ नशीबाने 15% लोकांना बाबागिरीवर कसा विश्वास बसू शकतो ते दाखवलं होतं. वरची उदाहरणं त्याच जातकुळीतली. फक्त इथे आपल्याला मुद्दामून फसवणारा कोणी नसतो. आपणच यदृच्छेने दिसलेल्या काही आकारांमधून अर्थ काढतो. व एका अर्थाने स्वतःच स्वतःची फसवणूक करतो. अशी फसवणूक करून घेणारे सुखी आयुष्य जगतात, कदाचित. पण कधी कधी जैत रे जैत मधल्या नायकाप्रमाणे ते गरज नसताना राणीमाशीच्या मागे लागतात आणि तिला मारण्यापोटी आपल्या पत्नी व भावी बाळाचा बळी देतात.

मुळात 'स्वप्नात दिसणारी चिह्नं कधी दिसतील हे सांगता येत नाही. पितृपक्षातच ती दिसतील असं नाही. ती यदृच्छेने कधीही दिसू शकतील.' हे आपण गृहीतक म्हणून मानलं. योगायोगाने काही लोकांना ती पितृपक्षातही आधिक्याने दिसतील असा निष्कर्ष आपण काढला. मग योगायोग व खरोखर पितरं स्वप्नं पाडतात यापैकी कुठचं स्वीकारावं? इथे ऑकॅमचा वस्तरा कामी येतो - जी निरीक्षणं काहीच विशेष गृहीत न धरता समजून घेता येतात त्यासाठी क्लिष्ट गृहितकं का अंगावर घ्यावीत?

दिव्यतेच्या दुधातून योगायोगांचं पाणी काढून टाकण्याचा हा प्रयत्न. पण सगळं पाणी पिळून काढलं तर काय शिल्लक राहील असाही प्रश्न पडतो. शेवटी कधीतरी, कुठेतरी त्या दुधातून मोजता येण्यासारखा लोण्याचा गोळा यायला हवा. नाहीतर अश्वत्थाम्याला पाण्यात मिसळून दिलेलं पीठच हाती यायचं.

विज्ञानविचार

प्रतिक्रिया

तुमचा तो लेख मी तेव्हाच वाचला होता, इतरांनीही वाचला असेल. पण तरी त्याच लोकांना पुन्हा तेच सांगायची वेळ यावी म्हणजे...

कवितानागेश's picture

30 Sep 2010 - 6:49 pm | कवितानागेश

मला 'अयोध्या फैसला' वाचत असल्याचा अघळपघळ अनुभव आला ही चिकित्सा वाचताना...

डिस्क्लेमरः
ही चिकित्सा गंभीरपणे केलेली आहे, कुठलेही विडंबन करायच्या हेतूने केलेली नाही असे गृहीत धरून मी हे लिहीत आहे.
१. जर का ५०% (एक ठोक गृहीतक म्हणून ५०-५० %) लोकाना स्वप्न आठवतच नसतील, तर ५०% डेटा 'हरवला आहे' असे म्हणावे लागेल.
२. स्वप्न का पडतात याबद्दल जर का पुरेसे ( निदान ३५% कॉमन स्वप्नाचा अर्थ नक्की लावता येतो ईतपत) शास्त्रीय संशोधन झाले नसताना ( खरे तर निग्लिजिबल), एकाच ठराविक स्वप्नाच्या अर्थासाठी, आपण ईथे आपल्या इवल्याश्या आळशी आणी सुखी जगातून (= मिपा) डेटा घेणे, हे 'शास्त्रीय' ठरेल का?
मिपाचे सदस्य किती, भाग घेणारे किती, स्वप्न पडूनही भाग न घेणारे किती, स्वप्न अजिबात न पडणारे/ न आठवणारे किती हे देखिल कौल घ्यावे म्हणते मी!
३ .मी आधी एका लेखात निव्वळ नशीबाने 15% लोकांना बाबागिरीवर कसा विश्वास बसू शकतो ते दाखवलं होतं. >>>>
नशीब या शब्दाची शास्त्रीय व्याख्या मज पामराला स्पष्ट करून मिळेल काय?
४. जे संख्याशास्त्राच्या आधारे ठरते तेच फक्त 'सत्य' असते का?
बाकीचे अनुभव 'खोटे' ठरवायचे का?

माझ्या मते अनुभव ही गोष्ट अघळ्पघळ नसून जाणीवेच्या वेगवेगळ्या पातळीवरची आहे.
ज्याची ज्या जाणीवा अनुभवण्याची जी 'कुवत' ( ईथे 'लायकी' असा अर्थ अभिप्रेत नाही!),
त्याप्रमाणे त्याचे अनुभव.
एक उदाहरणः जर माझा पाळलेला कुत्रा कूंकूं करतोय, त्याला घरातल्या १० जणानी खायला दिले, बॉल दिला, आणी मी एकटी म्हणाले की त्याला आता फक्त फिरायला जायचंय.
..तर संख्याशास्त्राच्या आधारे माझे म्हणणे चुकीचे ठरेल,
...पण गोम अशी आहे की, फक्त मला त्याची भाषा कळते आणे ईतराना नाही,
हा आमच्या 'सेन्सिटिविटी लेवेल' मधला फरक आहे.!
शिवाय कुत्रा 'मुका' असल्याने मला त्याची भाषा कळते हे काही मी काही केल्या पटवून देउ शकणार नाही. मग मी अर्थातच 'यडपट' ठरणार....
शिवाय कुत्रा फिरायला नेल्यावरच खुष झाला, हे काही तो घरातल्या ईतराना पटवून देउ शकणार नाही, कारण तो 'मुका' आहे.
यावर उपाय हा, की कुत्र्याची भाषा सगळ्यानाच कळणे!

तसेच, मेंदूतल्या नक्की सगळ्या प्रकारच्या हालचाली, संपूर्ण मेटाबोलिझम, जोपर्यन्त आपल्याला कळत नाही, तोपर्यन्त 'स्वप्न' का पडतात हे आपल्याला कळू शकणार नाही.
त्यासाठी निदान लाखभर माणसांच्या डोक्याला मोजणीसाठी यंत्र अडकवून, त्यांच्या मेंदूतल्या सर्व घडामोडी, निदान वर्षभर तरी टिपल्या गेल्या पहिजेत, आणी त्या माणसांनी, सतत आपल्या सर्व विचारांचा 'डेटा' घेतला पाहिजे.

पण म्हणून तोपर्यंत तरी, एखाद्या व्यक्तीचा नेहमीचा अनुभव, केवळ, आपल्याला स्वतःला तसा आला नाही, म्हणून वेडेपणाचा न ठरवण्याची माणुसकी, विज्ञाननिष्ठ माणसे दाखवतील काय?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Oct 2010 - 12:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रतिसादासाठी रूमाल टाकला आहे.

एखाद्या व्यक्तीचा नेहमीचा अनुभव, केवळ, आपल्याला स्वतःला तसा आला नाही, म्हणून वेडेपणाचा न ठरवण्याची माणुसकी, विज्ञाननिष्ठ माणसे दाखवतील काय?

कोणीही हा अनुभव वेडेपणाचा ठरवलेला नाही याची नोंद घ्यावी.

नेत्रेश's picture

30 Sep 2010 - 12:06 pm | नेत्रेश

कालच 'फिल्मी' वर 'बनारस - एक म्युझीकल लव्ह स्टोरी' पाहीला आणी विलक्षण प्रभावित झालो, त्यामळे गुरुजींनी कितीही प्रमेये मांडुन दाखवले तरी आम्ही 'त्या' गोष्टींवर विश्वास ठेवणार :)

सहज's picture

30 Sep 2010 - 12:14 pm | सहज

गुर्जी लेख अतिशय आवडला.

थोडक्यात काय तर पितृपंधरवड्यात यथा शक्ती यथा मती दानधर्म कराच पण तेच इतर ३५० दिवसही लागू होते.

प्रकाश घाटपांडे's picture

30 Sep 2010 - 12:23 pm | प्रकाश घाटपांडे

गृहीतक - स्वप्नात दिसणारी चिह्नं कधी दिसतील हे सांगता येत नाही. पितृपक्षातच ती दिसतील असं नाही. ती यदृच्छेने कधीही दिसू शकतील.

ही यदृच्छाच इश्वरेच्छाच आहे असे मानणारे लोक आहेतच ना! इथे तर्कबुद्धीच्या कसोट्या, विवेकवाद , वैज्ञानिक दृष्टीकोण या बाबी उपयोगास येत नाहीत.
ज्योतिषाने वर्तवलेली भाकिते संख्याशास्त्रीय कसोट्यांवर उतरत नाहीत. पण फलज्योतिष अजुन टिकून आहे व आम्ही वर्तवलेल्या भाकिताप्रमाणे ते टिकून रहाणार.
फलज्योतिषातील प्रवाद समजुती यावर आम्ही लिहिले आहेच.
व्यवहारात निर्णय घेताना जेव्हा कठीण होत त्यावेळी सुद्धा यदृच्छेचा वापर कौला सारखा होतो. कुणी त्याला अंतर्मनाचा कौल म्हणत.
श्रद्धा अश्रद्धा अंधश्रद्धा हा साला मेंदुतला केमिकल लोच्याच असतो.

योगप्रभू's picture

30 Sep 2010 - 1:30 pm | योगप्रभू

आपल्याला एखादी गोष्ट स्वप्नात का दिसते, याचे सोप्या शब्दात वर्णन म्हणजे आपली म्हण 'मनी वसे ते स्वप्नी दिसे'

दिवसभर आपण अनेक चित्रे बघत असतो आणि मेंदू त्याचे अर्थ लावत असतो. त्यातील वापर न झालेल्या फाइल्स मेंदूच्या रीसायकल बिनमध्ये पडून असतात. झोप ही शरीराची विश्रांती असली तरी ह्रदय आणि मेंदू त्यांचे काम अखंड करत असतात. पण शरीर विसावले असताना मेंदूच्या कामाचा ताण एरवीच्या वेळेपेक्षा हलका झालेला असतो. अशा वेळी या डीलिट न झालेल्यातील काही फाईल ऑटो रिस्टोअर आणि रन होतात. मग स्वप्नात काहीही दिसते. कशाचीही संगती लागते. श्रावणात नागपंचमीचा सण होऊन गेल्याने लगतच्या काळात स्वप्नात नाग-साप येणे स्वाभाविक आहे. तसे बघितल्यास डिस्कव्हरी आणि नॅशनल जिऑग्राफिकवरचे ते नाग-सापांचे शो बघितले तरी स्वप्नात ते दिसतात.

मनात घोळत असलेले किंवा दबलेले विचार आणि भावभावनाच स्वप्नांच्या माध्यमातून दिसतात. आपले धर्मवेत्ते सांगतात, की अमुक कोटी इतका जप केल्यास तुमचे उपास्य दैवत स्वप्नात येऊन दर्शन देते. त्यावर माझा एक मित्र म्हणाला, 'त्यासाठी इतका वेळ घालवायची काय गरज आहे. अर्धा तास मल्लिका शेरावतचे फोटो बघितले तर ती त्याच दिवशी माझ्या स्वप्नात येते.'

एखाद्याच्या स्वप्नात येणार्‍या गोष्टींचा शेजारच्या व्यक्तीला त्रासही होऊ शकतो. उदा:

बंडूला रात्री स्वप्न पडले. तो स्वर्गात गेला आणि त्याला चक्क भगवान श्रीकृष्ण दिसले. ते अर्जुनाचा रथ चालवत होते. बंडूने आश्चर्याने विचारले, 'देवा! हा सात घोड्यांचा रथ तुम्ही कसा कंट्रोल करता?' त्यावर भगवान म्हणाले, 'अरे ते कौशल्य आहे. या सात घोड्यांमध्ये वेगवेगळ्या खोड्या आहेत. त्यामुळे मी त्यांच्यासाठी सात वेगवेगळ्या रंगांचे लगाम केले आहेत. कोणता लगाम कोणत्यावेळी ओढावा, हेच ते कौशल्य.' एवढे बोलून भगवान थांबले नाहीत तर ते बंडूला म्हणाले, 'ये. तुला पण बघायचाय का रथ चालवून?' बंडू आनंदाने खूप वेळ रथनियंत्रणाचे कौशल्य शिकत बसला.

सकाळी बंडूचे बाबा बंडूच्या आईला सांगत होते, 'अगं आता बंडूला दुसरीकडे निजू दे. रात्रभर माझ्या लेंग्याच्या नाड्या ओढून वैताग आणला कार्ट्याने.'

शिल्पा ब's picture

30 Sep 2010 - 11:31 pm | शिल्पा ब

तुमचे स्पष्टीकरण आवडले...
किस्सा तर भरपुर हसवुन गेला..

बेसनलाडू's picture

30 Sep 2010 - 12:33 pm | बेसनलाडू

लेख रोचक आणि अभ्यासपूर्ण आहे खरा. वाचून मजा आली. आता बाकीचे काय म्हणतात हे वाचेन :)
(वाचक)बेसनलाडू

विजुभाऊ's picture

30 Sep 2010 - 12:47 pm | विजुभाऊ

काहीच कळले नाही बॉ.
आमचे डोके बहुतेक पितृ पक्षातील स्वप्न बनले आहे.

राजेश घासकडवी's picture

1 Oct 2010 - 11:07 am | राजेश घासकडवी

बऱ्याच जणांनी लेख कळला नाही असं म्हटलं, याचा अर्थ मला काय म्हणायचं हे स्पष्टपणे सांगण्यात मला यश आलेलं नाही. कळण्यासाठी सोपं व्हावं म्हणून गणिताच्या पायऱ्या गाळल्या, पण दुर्दैवाने त्यातून थोडी संदिग्धता वाढली.

संदेश:
"श्रद्धा खोट्या असं म्हणायचं नसून, त्या तपासून घ्यायला हव्या." असं म्हणायचं होतं. अनेक वेळा विशिष्ट प्रसंगी विशिष्ट घटना घडणं याला आपण महत्त्व देतो आणि त्यातून काही अतर्क्य गोष्टी सत्य असू शकतील असं मानतो. हा श्रद्धेचा उगम आहे. मात्र, या विशिष्ट घटना निव्वळ योगायोगाने घडू शकतात, हे दाखवून द्यायचं होतं.

उदाहरण
जर एखाद्या व्यक्तीला पितृपक्षातच कावळ्यांची वा पितरांची स्वप्नं पडत असतील तर त्यामागे योगायोगाचा भाग किती आहे हे कौलाच्या आधारे तपासण्याचा प्रयत्न होता. आपल्याला जर बारा वेळा स्वप्नात कावळा वा साप दिसला तर तो निव्वळ योगायोगाने पितृपक्षात तीन किंवा अधिक वेळा किती लोकांना दिसेल? या प्रश्नाचं उत्तर गणिताने देता येतं. ते १.३% असं येतं. म्हणजे ३०० लोकांना बरोब्बर प्रत्येकी बरोब्ब १२ स्वप्नात कावळा वा साप वा पितर दिसले तर त्यातल्या ४ जणांना तीन किंवा अधिक वेळेला ती स्वप्नं नेमकी पितृपक्षातच दिसली असतील. अशा चार लोकांना आपल्याला पितरांकडून काहीतरी संदेश मिळतो आहे अशी श्रद्धा निर्माण होणं साहजिक आहे.

गणित
हे गणित अगदी प्राथमिक संख्याशास्त्रीय गणित आहे. स्वप्न वगैरे म्हणण्याऐवजी ते असं करून बघू. १२ लोकांचा एक गट घेतला तर त्यात बरोब्बर ३ व्यक्ति पितृपंधरवड्यात जन्मलेली असण्याची शक्यता काय?

12 C 3 * p^3 * (1-p)^9

इथे p म्हणजे त्या पंधरवड्यात जन्म होण्याची शक्यता = 1/24 = 0.042. (कारण २४ पंधरवडे, व कुठच्याही पंधरवड्यात जन्माची शक्यता सारखीच आहे)

220 * 0.000074 *0.6822
याचं उत्तर 0.0111 येतं. म्हणजे 1.11%. त्यात 4 जन्म व 5 जन्माच्या टर्म्स मिळवल्या की 1.3% होतात. पुढच्या टर्म्स इतक्या लहान आहेत की त्याला अर्थ राहात नाही.

आता तेच गणित वेगळ्या शब्दात मांडता येतं. म्हणजे "१२ स्वप्न पडलेली एक व्यक्ती घेतली तर त्यात ३ स्वप्न पितृपंधरवड्यात 'जन्मलेली' असण्याची शक्यता काय?"

मी आख्ख्या पॉप्युलेशनसाठी गणित करत नाही. एक सबसेट घेतो (बरोब्बर 12 स्वप्न पडलेल्या व्यक्तींचा समूह) त्यांच्यासाठी गणित करतो. नंतर दुसरा सबसेट घेतो (बरोब्बर 50 स्वप्न पडलेल्या व्यक्तींचा समूह) त्यांच्यासाठी गणित करतो.

निष्कर्ष
यातून श्रद्धा खोट्या असा निष्कर्ष काढण्यापेक्षा, श्रद्धा तपासून बघितल्या तर बरं असा निष्कर्ष आहे. त्यातल्या काही चमत्कारिक वाटणाऱ्या घटनांचं स्पष्टिकरण केवळ यदृच्छेतून देता येऊ शकतं.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Sep 2010 - 1:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कौल पाहिला होता तेव्हाच या गोष्टी चमकून गेल्या; आणि हा लेख वाचल्यावर WPTA आठवलं. १५% चं गणित मी नीट समजावून घेतलेलं नाही, पण त्यातलं लॉजिकमात्र मान्य आहे.

एक अतिदवणीय विचारः दिव्यतेच्या दुधातून, अंध(?)श्रद्धेच्या रवीने घुसळल्यास, पितृपक्षातील कावळा-सापांच्या स्वप्नांचा लोण्याचा गोळा डोळ्यात भरण्याएवढा मोठा दिसेल. पण जगण्यासाठी पाणी अत्यावश्यक आहे, लोणी नव्हे; तेव्हा त्या लोण्याचं काय श्राद्ध घालायचं का?

परिकथेतील राजकुमार's picture

30 Sep 2010 - 1:43 pm | परिकथेतील राजकुमार

लेख काहिही समजला नाही गुर्जी.

असो..

ह्यावरुन भाद्रपद महिन्यात काही विशीष्ठ लोकांना विशीष्ठ प्रकारची स्वप्ने पडतात का? असा विचार मनात आला.

इन्द्र्राज पवार's picture

30 Sep 2010 - 3:21 pm | इन्द्र्राज पवार

(१) 'अनुभवा'तून येणार्‍या गोष्टीवर विश्वास बसतो हे अमान्य करण्याचे काहीच कारण नाही; पण म्हणून त्यासाठी एखाद्या गोष्टीचा अट्टाहासाने अनुभवच घेतला पाहिजे असे म्हटले तर ती आपल्याच बुद्धीची वंचना ठरेल. ब्लेडला हात लावण्यास थरथरत का होईना हात शिवशिवतोच पण त्यातील सत्यता रक्त पाहिल्यावरच कसावर उतरेल की काय ते पाहण्यासाठी नसून तो 'मोठा' सांगतोच ते खरे कशावरून अशी एक सुप्त बंडाळी मनात वेटोळे घालून बसलेली असते; त्यामुळेदेखील 'प्रयोग करावा काय?' चे बुडबुडे उमटतात. हे निसर्ग करतो, पण त्याचवेळी हाच निसर्ग 'तसे करू नको, मोठ्यांचे ऐक अशी दटावणी देत असतोच.' इथे एक गुणोत्तर काढले तर असे दिसेल की 'ब्लेड' चा अनुभव रक्त आल्यावरच खरे मानणार्‍यांचा आकडा हा 'मोठ्यांचे' ऐकणार्‍यापेक्षा लक्षणीयरित्या कमी आहे. [हा प्रयोग आत्ताच, हा लेख वाचल्यावर, चहापानाच्यावेळी माझ्या सहकार्‍याच्यात केला. नऊपैकी दोघांनी कबूल केले की त्यांनी ब्लेडवर ~ एकाने रेझरवर ~ बोट फिरविले होते. पाचांनी वडिलांचे/थोरल्या भावाचे ऐकून तसा प्रयोग केला नाही, तर दोघांनी 'ब्लेडबाबत काही आठवत नाही; पण गॅलरीतून वाकून उभे राहू नये, पडलास तर गुडघे फुटतील...' या सल्ल्यावर बंड करावे की काय अशी खुमखुमी आली होती असे सांगितले....या दोघांना 'ब्लेडवर बोट फिरविले नाही'च्या फोल्डरमध्ये घातले आहे; कारण त्यांनी गॅलरीतून उडी टाकण्याची कसरत केली नव्हती.]

श्री.राजेश म्हणतात तसा 'अनुभव' हा शब्द अघळपघळ आहे. खरंय. म्हणून सोयीस्कर पळवाट म्हणून तो अनुभव कुणी सांगतो म्हणून स्वीकृत करण्यात धोका असतोच. कुठलाही अनुभव (विशेषतः ऐकीव) तर्काच्या कसोटीवर पाहणे फार फार आवश्यक आहे. सप्टेंबर १९९५ मधील एका दिवशी या राज्यात 'दूध पिणार्याा गणपतीने' जो हलकल्लोळ माजवला व पाठोपाठ थोड्याच वेळात सर्व देशात विजेच्या वेगाने जे गोंधळाचे वातावरण तयार झाले, तो एक इतिहासच आहे....'मास' ने हा चमत्कार झटक्यात ~ कुठलाही 'अनुभव' न घेता कसा काय स्वीकारला याची छाननी केल्यास 'हिस्टेरिया' वावटळीसारखा कसा पसरला जातो हे प्रकर्षाने पुढे आले. इथे वस्तुनिष्ठतेला महत्व न देता व्यक्तिनिष्ठतेला महत्व दिले जाते (म्हणजे ती धावत धावत सांगत आली, सांगू लागली, "अगं मी स्वतः गणपतीला तांब्याभरून दूध पाजवून आले....सगळे दूध, शेवटचा थेंबदेखील गणेश प्याला. काय हा चमत्कार !!! मी खरंच पावले आज !!" ~ हे म्हणणारी 'ती' प्रा.शाळेत हेडमिस्ट्रेस असणारी खुद्द माझी मावशी होती). माझ्या आईने व तिच्या अन्य दोन मैत्रीणीनी हा ऐकिव अनुभव प्रत्यक्ष न पाहता जसाच्या तसा तिथल्यातिथे स्वीकारला आणि तात्काळ तांब्यात दूध घेऊन नजीकच्या गणपतीच्या देवळाकडे धावल्यादेखील. हा अनुभव कोणत्या मापाने मोजणार आपण? बरे यातील फोलपणा/असत्यता दुसर्‍याच दिवशी लक्षात आल्यानंतर समाजाच्या मनघडणीमध्ये काही फरक झाला काय? बिल्कुल नाही. कारण मला वाटते २००५ की ०६ मध्ये 'माहिमचा समुद्र गोड झाला' या बातमीने असाच फेरउन्माद उफाळला व टीव्हीवर असे दिसू लागले की मुंबईकर चक्क गाड्या काढून हा 'चमत्कार' बाटलीबंद करून घेण्यास माहिमकडे धावले. मग या व्यक्तींच्या अंतरात डोकावून अशा मनःस्थितीचा छडा लावायचाच तर त्याला मीटर तरी कुठले लावायचे?

यातही आपले (पुरोगामी समजल्या गेलेल्या महाराष्ट्राचे) दुर्दैव असे की, 'गणपती दुग्धप्राशन' या चमत्काराला भारलेल्यामध्ये त्यावेळचे सरकारही सामील झाले होते; आणि दुसरीकडे ओरिसाच्या जे.बी.पटनाईकांनी 'ताबडतोब हा मूर्खपणा बंद करा व गणेशाची मंदिरे बंद करून चमत्काराची अफवा पसरविणार्‍याना.. प्रसंगी पुजार्‍यानांही अटक करा...' असे आदेश दिले होते.

(२) अनेक स्वप्नं पितृपक्षात पडतात त्यांची या बाबतीत 'माझे पितर मला स्वप्नांतून संदेश देत आहेत' अशी श्रद्धा होणं स्वाभाविक आहे.

~ असे कोण म्हणतात? तर ज्यांची पितृपक्ष संकल्पनेवर श्रद्धा आहे, विश्वास आहे ते लोक. त्यांच्या स्वप्नातील घटनांची, दृश्याची (उदा. कुणाला साप दिसला, कावळा, मोर दिसले इ...) सत्यता पडताळणी परक्याला (म्हणजे तुम्हाआम्हाला) करता येणे केवळ अशक्य, कारण त्यासाठी कोणतेही वैज्ञानिक उपकरण त्याच्याकडे उपलब्ध नसते. याचाच अर्थ असा की, सापाचे स्वप्न सांगणार्‍यावर तुमचा विश्वास असेल तर मग तो/ती त्यामुळे करीत असलेल्या पितृपक्षाच्या सोपस्कारावर डावी टीका करता येणार नाही. पण याला दुसरीही बाजू अशी आहे की, पितृपक्षात जर कोणाला 'तसली' स्वप्ने पडली नाहीत म्हणजे त्यांचा त्यांच्या पितराप्रती आदर कमी होता काय? असेही होत नाही. मी पाहिलेले एक गृहस्थ या पंधरवड्यात (यथाशक्ती) दानधर्म करतात, वडिलांच्या, आजोबाचे गुणगान गातात, तसविरीना नमस्कार-चमत्कार करतात. पण दुसरीकडे त्यांचाच धाकटा भाऊ याला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात परड्यातून शिव्या घालत असतो... का तर, जिवंतपणी थोरल्याने बापाच्या आजारपणावर होत असलेल्या खर्चामुळे 'कधी म्हातारा मरतोय...' असे लावलेले तुणतुणे ! त्यामुळे एका भावाला जी गोष्ट पारंपरीक पुण्याची वाटते तीच गोष्ट दुसर्‍याला भावाच्या ढोंगीपणाचे उदाहरण वाटते. श्री.राजेश म्हणतात त्याप्रमाणे इथे थोरल्या सदाशिवरावांची "'माझे पितर मला स्वप्नांतून संदेश देत आहेत' अशी श्रद्धा होणं स्वाभाविक आहे." तर त्याचवेळी केवळ २५ फुटावर शेजारील घरात राहात असलेल्या धाकट्या सुरेशरावांची "कसला डोंबलाचा संदेश !!! भडवा पोरगीचा मंगळ आम्हाला पुढे लग्नाच्यावेळी त्रास देवू नये म्हणून त्याची शांती वरच्यावरच करावी म्हणून पितरांना लाच देऊ करत आहे.." असली तिखट प्रतिक्रिया. दोन्ही सख्खे भाऊ....दोघांचाही पितृपक्षावर विश्वास...पण पितरांना खाऊ घालण्यामागील त्याची कारणमीमांसा एकमेकाशी फटकून राहणारी.

(३) ....पण यामागे केवळ योगायोग असू शकेल का?
योगायोगाचाच प्रश्न काढला आहे तर.....पितृपक्षात फक्त प्राण्यांचीच स्वप्ने पडली असे तुमच्या विश्लेषणाचा विदा सांगतो का? त्याचे गुणोत्तर काय दर्शविते? साप, अजगर, पाल, सरडा वा कावळा या पंधरवड्यात स्वप्नात आले की त्यांचा संबंध पितरांशी लावायचा, पण मग अशा स्वप्नावर विश्वास असणार्‍यांच्या स्वप्नी पितृपक्षातच 'मधुबाला/मीनाकुमारी' आली तर त्याची तर्कसंगती कशी लावली जाईल? तेव्हा सापाला जसा नैवेद्य दाखवून थंड करायचा तसे मग मधु आणि मीनालाही करायचे काय? आणि तसे कुणी करत असतील काय?

(.....थोडे थांबतो इथे....कारण धाग्यापेक्षा प्रतिक्रिया मोठी होणार याची भीती वाटत आहे. तरीही श्री.घासकडवी यांनी सुरुवातीस दिलेली डिस्क्लेमरची चेतावणी या प्रतिसादालादेखील लागू आहे, असे नम्रपणे सांगतो. कुणीही वैयक्तीक घेऊ नये.).

इन्द्रा

परिकथेतील राजकुमार's picture

30 Sep 2010 - 3:26 pm | परिकथेतील राजकुमार

इंद्रदा रोजच्या रोज हे येवढे सगळे तु स्वतःचा टंकतोस का कोणी टंचकनिका ठेवली आहेस ?

इन्द्र्राज पवार's picture

30 Sep 2010 - 3:42 pm | इन्द्र्राज पवार

"......का कोणी टंचकनिका ठेवली आहेस ?....!!

है शाब्बास.... !! निदान माझ्याबद्दलची ही कल्पना तरी मनाला मिलिंद इंगळे स्टाईलचा 'गारवा' देवून गेली. बट इन फॅक्ट, मला जे वेतन मिळते ते पाहिल्यावर बॅन्केतील ती क्लार्कमुलगीदेखील चक्क लाजून पासबुकात एंट्री करते, व माझ्याकडे 'भूतदये'ने कटाक्ष टाकते, जो मी लिलया चुकवितो....त्यामुळे टंकनिका...कनिका... वगैरे इल्ला !!

आपुनका काम हम्मीच करताय, भाईसाब.....कोई सिंडी क्रॉफर्ड या पॅरिस हिल्टन नही आती !!

इन्द्रा

अहो पवार, त्या बँकेतल्याच एखाद्या टंच क्लार्कला एखादे असेच लांबलचक अन फर्मास लव्ह लेटर लिहुन टाका की राव. म्हणजे टंकनिकापण मिळेल अन भुतदयेचे परमनंट अकाउंट पण उघडुन जाईल. काय म्हणता? ;)

इन्द्र्राज पवार's picture

30 Sep 2010 - 5:22 pm | इन्द्र्राज पवार

"एखादे असेच लांबलचक अन फर्मास लव्ह लेटर लिहुन टाका...."

~~ झालं मग कल्याण ! अरे बाबा, असं लांबलचक एलएल लिहिलं तर ती थर वाळवंटात वा नेफा आघाडीवर असलेल्या ब्रॅन्चमध्ये बदलीसाठी अर्ज करेल, हे नक्की....अन् मी तर 'आदतसे मजबूर' मॅटर कमी करू शकत नाही. कारण इकडे खरडीत आपल्या विविवि. अदितीला साधं 'हॅलो....' लिहायचं झालं तरी एक फुल पेज मजकूर असतो, जो वाचून समुद्रातल्या माशाला तहान लागल्यासारखी तिची अवस्था होते.

~~ सो, सबब....आपली आपुलकीची सूचना प्रॅक्टिकली अप्लिकेबल होणार नाही, आणि इन टर्न, तिची भूतदयेची नजरही हटणार नाही (नशीब ती मराठी नसून 'भटिंडा की सीखनी' स्टाईलची आहे, त्यामुळे मिपा वाचण्याशी शक्यता अजिबात नाही.)

इन्द्रा

आनंद घारे's picture

30 Sep 2010 - 5:05 pm | आनंद घारे

आपणच यदृच्छेने दिसलेल्या काही आकारांमधून अर्थ काढतो. व एका अर्थाने स्वतःच स्वतःची फसवणूक करतो.
१०० टक्के सहमत

दिव्यतेच्या दुधातून योगायोगांचं पाणी काढून टाकण्याचा हा प्रयत्न. पण सगळं पाणी पिळून काढलं तर काय शिल्लक राहील असाही प्रश्न पडतो
पेलाभर पाण्यात चमचाभर दूध टाकले तरी तो द्रव पांढुरका दिसतो, पण जो द्रव पूर्णपणे पारदर्शक आहे हे स्पष्ट दिसत आहे त्यातले पाणी काढून किती दूध उरले ते पहाण्याची काय गरज आहे? राजहंसाला उगाच ताप कशाला?

प्रत्येकाला पडलेलं स्वप्न हे फक्त तोच पाहू शकतो..माझ्या अनुभवानुसार झोपेत पड्लेली सर्व स्वप्ने तशीच्या तशी लक्षात रहात नाहीत.. (ती RAM वरती store होत असावीत.) अशा परिस्थितीत स्वप्न पडलेल्या व्यक्तीच्या सांगण्यावर विसंबून कोणताही निष्कर्ष काढणं हे मला योग्य वाटत नाही. कारण त्याला काय स्वप्न पडले हे पडताळणार कसे?
यामुळे कधी कसले स्वप्न पडले यावरुन त्याचा अर्थ लावत बसणे मला हास्यास्पद वाटते. स्वप्न म्हणजे एक ज्यात आपण कामही करू शकतो असा फुकटचा सिनेमा असे मी समजतो..

या स्वप्नांचा कधी अभ्यास केला नाही की डायरी ठेवली नाही की अमक्या तीथीला सरपटणारे प्राणी आले बुवा स्वप्नात. पण खूपसे संस्कारदेखील या समज-गैरसमज, श्रद्धा-अंधश्रद्धांच्यामागे आहेत. आईचे वडील (माझे आजोबा) ज्योतीषी होते. आईकडून २-३ वेळा ऐकलं होतं की आजोबा म्हणत की स्वप्नात पाणी दिसलं की धनलाभ होतो. हे लहानपणी ऐकलेलं. अर्थात मूळात माझा कल अद्भुत सृष्टीत रमण्याचा असल्याने असल्या श्रद्धा पचनी पडल्या. त्यात रमले.

मंगळ ज्या घरात जातो त्या घराचा (कुंडलीतील) सर्वनाश करतो वगैरे. मी हे डोळे विस्फारून ऐकायचे, त्यावर विचार करायचे - हा विचार नाही की ते खरं असेल का? तर हा की माझ्या कुंडलीत मंगळ कुठे आहे, इतर ग्रह कुठे आहेत? थोडा भोळसट, चटकन विश्वास टाकणारा स्वभाव याला कारणीभूत.

मिपावर वैचारीक, तर्कट, सांगोपांग चर्चा घडवून आणणारे लोक पाहीले. नक्कीच मनानी दखल घेतली आहे. कोणताही बदल लगेच, ताबडतोब घडत नाही पण घडू शकेल. शेवटी आयुष्याला वळण देण्यासाठी जितके संस्कार महत्त्वाचे तितकेच नंतर आयुष्यात भेटणारे लोक, येणारे प्रसंग महत्वाचे .
सांगायचा मुद्दा हा क्लिंटन, घासकडवी यांचे लेख अतिशय आवडले तसेच ज्या प्रतिसाद्कर्त्यांनी त्यामधे भाग घेतला त्यांचेदेखील आभार. माझ्या मानसिकतेत फरक पाडण्यास कारणीभूत होतीलही. विचारचक्र तर सुरु झालं. मी जो एकांगी विचार करत होते त्याला दुसरी दिशा तर मिळाली.

चित्रा's picture

1 Oct 2010 - 1:23 am | चित्रा

नक्कीच मनानी दखल घेतली आहे. कोणताही बदल लगेच, ताबडतोब घडत नाही पण घडू शकेल. शेवटी आयुष्याला वळण देण्यासाठी जितके संस्कार महत्त्वाचे तितकेच नंतर आयुष्यात भेटणारे लोक, येणारे प्रसंग महत्वाचे .

मनापासून अभिनंदन, शुचि. मोकळेपणा आवडला.

शुचि's picture

1 Oct 2010 - 1:59 am | शुचि

धन्यवाद चित्रा :)

संख्याशास्त्रातले गणित कळलेले नाही. क्षमस्व.

सोयीसाठी आपण 24 पंधरवडे धरू. म्हणजे ही 12 स्वप्नं 24 पंधरवड्यांमध्ये अनेक लोकांसाठी विभागली गेली तर बऱ्याच लोकांना पितृपक्षात एक स्वप्न पडलेलं असणं साहजिक आहे. प्रश्न असा आहे की एखादं स्वप्न पडलं तर ते लक्षात राहीलच असं नाही, किंवा विशेष वाटेलच असं नाही. तेव्हा अधिक स्वप्नं पडण्याची शक्यता काय? तर त्याचं उत्तर आहे की सुमारे 1.3% लोकांना तीन किंवा अधिक स्वप्नं पितृपक्षातच पडतील. तीन किंवा अधिक स्वप्नं नेमकी पितरांची आठवण काढण्याच्या वेळी पडली तर एखाद्याला कदाचित वाटेल की अरे हो, मला असली स्वप्नं पितृपक्षातच पडतात.

येथे "१.३%" हा आकडा कुठून आला, त्याबद्दल अगदी-अगदी तपशीलवार पायर्‍या देता येतील काय? "यदृच्छा" हे उत्तर मला पुरेसे वाटत नाही. वाटल्यास ० स्वप्ने किती लोकांना दिसतील, त्याचे गणित करून दाखवाल काय? प्रत्यक्षात ० स्वप्ने कौलातील ३५-४०% लोकांना दिसतात. तुमच्या यदृच्छेच्या गणिताचा आकडा साधारण इतपत येतो काय, हे तपासून बघता येईल. (आयुष्यभरात ० स्वप्ने पडतात, तर पितृपंधरवड्यातही ० स्वप्ने पडतात, हे आलेच.) तुमचे गणित ३५-४०% च्या खूप जवळ असले, तर तुमच्या >=३ स्वप्ने -> १.३% गणिताबद्दल थोडा अधिक विश्वास वाटेल. मात्र ०-स्वप्नांबद्दल तुमच्या "यदृच्छे"चे गणित ३५-४०% पेक्षा खूप वेगळे असले, तर तुमच्या गणिताचा तुमच्या कौलातील तथ्याशी फारसा संबंध नाही, असे वाटू लागेल. मग ते गणित खोडून बाकी लेख मी वाचायला घेईन.

(कयास : तुम्ही "यदृच्छा = प्वासॉन डिस्ट्रिब्यूशन" वापरलेले आहे, असा माझा कयास आहे. त्या डिस्ट्रिब्यूशनप्रमाणे ० स्वप्ने पडणारे ~६१% लोक येतात. हा आकडा ३५-४०% पेक्षा बराच वेगळा आहे. तुमच्या कौलामधील निरीक्षणे "प्वासॉन" तर नाहीतच. "प्वासॉन" वापरण्याबद्दल अनेक मोठाले अडथळे आहेत, ते दुर्लक्षण्याइतके क्षुल्लक नाहीत.)

शिल्पा ब's picture

30 Sep 2010 - 11:33 pm | शिल्पा ब

एक तर लेख काय कळलाच नाय..अन त्यातून हे sssssss एवढाले प्रतिक्रियेचे डोंगर !!

विसोबा खेचर's picture

1 Oct 2010 - 11:23 am | विसोबा खेचर

सवडीने वाचतो..

तात्या.

--
काही नगण्य अपवाद वगळता मराठी भावसंगीताची हल्ली बोंबच आहे!