मुंजा

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
28 Sep 2010 - 1:08 pm

"दोन चार दिवसाकरता सर्व बाजुला ठेव आणि जाउन ये.
पण करु काय तिकडे जाउन?
"माहीत असलेले काहीही करु नकोस. फक्त जा. जे होइल ते आत्तपर्यंत जे झाले त्यापेक्षा वेगळे असेल."
अरे बाबा, डोक्यावर ४ कलर ब्रोशर ची डिलीवरी आहे. ते सोडुन ३ दिवस....? एक्झिबिशन ची डेड लाइन आहे."
" विझ्युअलायझेशन झाले आहे ना?तु फायनल कॉपी ओके कर. प्रिंटींग मी बघुन घेतो. प्रेस ला अ‍ॅडवान्स दे म्हणजे ऐनवेळी नडणार नाहीत".
नंतर गेले तर चालणार नाही का?
"आठ दिवसानी बँगलोर. मग २५ डीसेंबर ला मुंबई. जाणार का तु बॅगलोर ला.?"
नको. च्यायला यायला जायला ३ दिवस. पण..
"आता पण बिण काहीही नाही. हे ठरले. आर्टीस्टला दोनशे रुपये जास्त दे. एका रात्रीत कॉपी फायनल करेल. जाउन ये बाकी सर्व गोष्टींचा विचार न करता. काम कुठे पळुन जात नाही. तिथे मिळेल ते आयुष्यभर पुरेल. विश्वास ठेव. पण तिथे गेल्यावर जास्त शहाणपणा करायचा नाही हां."
आता अशा अटी घालायच्या म्हणजे...
"जस्ट डोन्ट बी युअरसेल्फ."
"नॉर्मल राहायचे. अजिबात अग्रेसिव व्हायचे नाही. सर्व काही लांबुन."
बर बर. प्रिंट कॉपी ड्रायर मधुन जाउ दे. नाही तर सगळे वांधे होतील. आणि प्रेस रश जॉब म्हणुन मोकळा होइल.
"ते मी बघतो. तिथे रश नको".
हॅहॅहॅ
-----------------------------------------------------------------------------------------
बेळगाव एअर पोर्ट वरुन टॅक्सी त बसल्यावर त्याला हे कळेना एवढ्या सगळ्या बंधनात अडकुन नेमके ३ दिवस करायचे तरी काय? संपुर्ण अ‍ॅडल्ट लाइफ मधे अगदी काहीही झाले तरी ६ तासा वर झोप शक्य नव्हती. टीवी आहे की नाही ह्याबद्दल काही ही कल्पना नव्हती.वेळ जायचा तर कसा?
-----------------------------------------------------------------------------------------
पोचता पोचता संध्याकाळचे पाच वाजले. चांगलेच थंड वातावरण होते. गावाबाहेरचे घर. नेहेमीच्या डेसिबल्सपासुन मुक्तता मिळाल्याने जरा फिल वेगळा आला होता. इकडच्या तिकडच्या गप्पात २ तास गेले. आयुष्यात पहील्यांदाच खरेदी केलेली
साडी त्याने बॅगेतुन बाहेर काढली. होणार्‍या बायकोच्या चेहेर्‍यावरचे भाव वेगळाच आनंद देउन गेले. का कुणास ठाउक सासु जरा जास्तच टेन्स वाटली. थंडी हळु हळु वाढत होती. आठ वाजता ताटावर गरमा गरम एथिनिक डिश बघुन तो अंमळ सुखावला. जेवण होता होता डोळ्यावरची पेंग हा अगदी नविन अनुभव. पायसम मस्त होता. पण जरा चव वेगळी होती. काय असावे बरे? विचारावे का?नको, जादागिरी नको पहील्याच दिवशी.
-----------------------------------------------------------------------------------------
मुंबईत उघडा झोपणारा तो. पण इथे दोन पांघरुणात सुद्धा थड्थडत होता. दया येउन बायकोने आणखी दोन गोंधड्या अंगावर टाकल्यामुळे आपण बचावलो ह्याची जाणिव सकाळी त्याला झाली. सकाळी जाग आली ती १०.३० वाजता. त्याला विश्वासच बसेना आपल्या डोळ्यावर. १३ तास दांडी गुल\ स्विच ऑफ\ हायपर अ‍ॅक्टीव मेंदु मृतवत. वेगळच होते सर्व काही.
कदाचित थंडीमुळे.? अकरा वाजता इडली सांबार. नंतर आंघोळ. बायकोचा फॅमिली आलबम बघता बघता १ वाजला. जेवणात आज कोलंबस होता. भातावर तुप चमचाने नाही तर डावाने वाढले गेले होते. इडल्यांचा प्रभाव १ तासात उतरुन आपण एवढा भात जेउ शकलो ह्या वर तो चकित होत होता. परत जेवता जेवता डोळ्यावर पेंग. काय भानगड काय?
पावणे दोन वाजता ते पावणे सहा स्वप्न नगरी.
-----------------------------------------------------------------------------------------
जरा फिरायला जाउ का? त्याने शक्य तेवढ्या नम्रपणे सासुला विचारले?
बायकोने एक स्वेटर दिला. जास्त लांब जाउ नका चा सल्ला घेउन तो फिरायला निघाला. एकटाच.
एवढी झोप कशी? मी एकटाच का फिरतोय?
-----------------------------------------------------------------------------------------
दुसर्‍या दिवशी सुद्धा पुरावृत्ती.१६ तास झोप. पण आज त्याने नक्की ठरवले. एकटे जायचे नाही. सासुला विचारले. सासुचा चेहरा झाकोळला. पण परवानगी मिळाली. दरवाजातुन बाहेर पडताना बायकोला सासुने लवकर या असे सुचवले. वाक्यात कुठेतरी मुंजा हा शब्द होता असे त्याला वाटले.
-----------------------------------------------------------------------------------------
नागमोडी रस्ता. दोन्ही बाजुला न संपणारी पठारे. अगदी निर्मनुष्य. रातकिड्याचा आवाज. ना रात्र. ना संध्याकाळ अशी त्रिशंकु वेळ. चांदण्या दिसायला लागल्या होत्या. त्यात किंचीत भुरभुरणारे पावसाचे थेंब. अगदीच कथा कादंबर्‍यातले वातावरण. आणि तो पहीला स्पर्श. स्वःत ला त्याने समजावले. जरा सबुरीने.
-----------------------------------------------------------------------------------------
मुंबईला जाताना एक वेगळ्याच विश्वात ३ दिवस काढल्याचे समाधान. आयुष्यभर पुरणारे. फ्लाइट मधे परत तोच विचार. रोज १६ तास झोप कशी?
सुमारे २४ वर्ष ह्या प्रश्नाने त्याला सतावले.
___________________________________________________

आज खुप थकलोय. भरपुर झोपायचे आहे.
" तुम्ही आंघोळ करा. मी तोपर्यंत जेवण तयार करते".
जेवणात खीर पायसम होता. कुठेतरी ओळखीची चव. १२ तास बत्ती गुल.
----------------------------------------------------------------------------------------
आता नक्की काय ते सांग.
" अहो काही नाही हो. आईने पावडर दिली आहे. मुलांना देतात ना ती गुटी. त्यात जरा जायफळाची जास्त मात्रा घातली की मुले झोपतात कटकट न करता. अगदी आयुर्वेदिक. साइड इफेक्ट काही ही नाही."
च्या मारी ही आयडीया केली काय तुझ्या आईने 'मुंजाचे' साइड इफे़क्ट टाळायला.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

28 Sep 2010 - 1:43 pm | ब्रिटिश टिंग्या

हॅ हॅ हॅ

पैसा's picture

28 Sep 2010 - 2:45 pm | पैसा

शीर्षक पाहून मला वाटलं सध्या चालू असलेल्या "रामगोपाल वर्मा" फेस्टिव्हलचा पुढचा भाग आहे की काय! पण नाही. गोष्ट अत्यंत "बोधकारक" आहे.

गुर्जी, तुमच्या गोष्टीतल्या मामी (सासूमाय) अत्यंत थोर आहेत! जगातल्या सगळ्या बायका इतक्या हुषार असत्या तर!!

गांधीवादी's picture

28 Sep 2010 - 4:51 pm | गांधीवादी

>>जगातल्या सगळ्या बायका इतक्या हुषार असत्या तर!!
ऐर होस्टेस म्हणून केवळ पुरुषांनाच काम करावे लागेल असते.

अनिल २७'s picture

28 Sep 2010 - 6:18 pm | अनिल २७

फटके खायला तयार राहा आता...

विनायक प्रभू's picture

28 Sep 2010 - 1:50 pm | विनायक प्रभू

मुंजा=मुंबईचा जावई=डँजर

परिकथेतील राजकुमार's picture

28 Sep 2010 - 1:59 pm | परिकथेतील राजकुमार

___/\___

अब् क's picture

28 Sep 2010 - 2:28 pm | अब् क

___/\___

इंटरनेटस्नेही's picture

28 Sep 2010 - 2:35 pm | इंटरनेटस्नेही

+१ असेच म्हणतो.

(आकर्षण दे भुत) इंट्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Sep 2010 - 2:37 pm | बिपिन कार्यकर्ते

बहुतेक कळले... कळले ते असे की... मुंजाची किर्ती मुंजाच्या आधीच सासरी पोचली म्हणून सासुबाईंना एवढा जालिम उपाय करावा लागला.

श्रावण मोडक's picture

28 Sep 2010 - 4:23 pm | श्रावण मोडक

अगदी, अगदी... संपादकांशी सहमत!!!

नगरीनिरंजन's picture

28 Sep 2010 - 2:41 pm | नगरीनिरंजन

धन्य!

धमाल मुलगा's picture

28 Sep 2010 - 6:05 pm | धमाल मुलगा

हॅ हॅ हॅ!!!

कसं ना कसं...
शेरास भेटला (भेटली) सव्वाशेर. ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Sep 2010 - 6:31 pm | बिपिन कार्यकर्ते

मला अश्या 'शेरास भेटली सव्वाशेर' सारख्या बर्‍याच केसेस माहित आहेत.

श्रावण मोडक's picture

28 Sep 2010 - 6:40 pm | श्रावण मोडक

मग लिवा की... आत्मकथन!

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Sep 2010 - 6:40 pm | बिपिन कार्यकर्ते

वैयक्तिक रोखाचा मजकूर संपादित होऊ शकतो. म्हणून नाही लिहित आहे. ;)

बिकाप्रेमी ब्लॉग करा अपडेट.. हाय काय अन नाय काय !

श्रावण मोडक's picture

28 Sep 2010 - 6:44 pm | श्रावण मोडक

आत्मकथन! त्यात वैयक्तिक रोख असला तरी ती आत्मटीका असेल. ती संपादित करणार? स्वतःच?

धमाल मुलगा's picture

28 Sep 2010 - 6:40 pm | धमाल मुलगा

ह्म्म्म......

(आपल्या विनंतीत मान देऊन केवळ वाचनानंद घेतला आहे, नायतर दांडपट्टा चढवलाच होता हातावर.)

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Sep 2010 - 6:42 pm | बिपिन कार्यकर्ते

या आता!!!

धमाल मुलगा's picture

28 Sep 2010 - 6:46 pm | धमाल मुलगा

कुठं?

काय सोय आहे?

विनायक प्रभू's picture

28 Sep 2010 - 6:48 pm | विनायक प्रभू

म्हणजे एक मुंजा बरोबर एक बाजा

धमाल मुलगा's picture

28 Sep 2010 - 6:51 pm | धमाल मुलगा

हा हा हा ;)
मिश्टर कार्यकर्ते अंमळ गंडलेच बुवा.

अवलिया's picture

28 Sep 2010 - 6:10 pm | अवलिया

हा हा हा

मास्तर मी सुद्धा मुंजाच आहे.

रामदास's picture

29 Sep 2010 - 9:04 pm | रामदास

सोडमुंजा आहात.

विनायक प्रभू's picture

28 Sep 2010 - 6:22 pm | विनायक प्रभू

तुमच्यात फिरायला भालदार आणि चोपदार पण बरोबर पाठवतात म्हणे.

नुसते भालदार चोपदार च नव्हे तर स्कूटरला सुद्धा ड्रायव्हर दिला होता.

धमाल मुलगा's picture

29 Sep 2010 - 6:42 pm | धमाल मुलगा

मग तुम्ही काय स्कुटरच्या फुटबोर्डावर उभे राहुन फिरलात काय? =))

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2010 - 9:50 pm | मिसळभोक्ता

प्रत्येक गोष्ट व्हिज्युअलाईझ करण्याची आमची खोड आज मोडली !

कारण स्कूटरचा ड्रायव्हर आणि हँडल ह्याच्या मधे एक मिनि-विजुभाऊ दिसले.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Sep 2010 - 9:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मिभोकाका, तुम्हाला काय माहित, त्यांचा असेलही बालविवाह!

विजुभाऊ's picture

29 Sep 2010 - 11:25 pm | विजुभाऊ

धम्या आडनाव बदल.

दोन स्कूटर्स आणि आणि प्रत्येकी एक ड्रायव्हर असा फिरलोय लोकांचे कुर्नीसात घेत त्या ऐतीहासीक शहरात.

चिंतामणी's picture

28 Sep 2010 - 6:23 pm | चिंतामणी

पितृपक्ष-१ आणि २, स्वप्नात नाग, साप, अजगर, कावळा, किंवा तुमचे मृत पुर्वज, कावळे येती आणिक..., पितरांचा कौल वगैरे वगैरे झाले.

याचीच कमी होती. ती भरून काढल्याबद्दल आभार.

असे म्हणायचे होते.

पण मी माझे शब्द मागे घेतो.

:-O

हाहाहा..लै भारी हो मास्तर....

रेवती's picture

28 Sep 2010 - 8:00 pm | रेवती

होणार्‍या बायकोच्या चेहेर्‍यावरचे भाव
मला शाबासकी द्या हो सर!
ही लग्ना आधीची गोष्ट आहे म्हटल्यावर एका क्षणात मनात जायफळाचाच विचार आला होता.
ही हा हा हा!

धमाल मुलगा's picture

28 Sep 2010 - 8:03 pm | धमाल मुलगा

_/\_

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Sep 2010 - 11:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा हा हा

चतुरंग's picture

28 Sep 2010 - 11:55 pm | चतुरंग

हेचि काय जाय'फळ' मम तपाला! असे वाटले असेल नाही? ;)

बाकी तुमची कीर्ती तिकडे पोचल्याशिवाय राहिली असेलच कशी म्हणा?
त्यातून बेळगावी हवा तिथल्या लोण्याइतकीच शुद्ध आणि थंड्....वगैरे वगैरे असल्यामुळे सासूबाई रिस्क घेतीलच कशा? ;)

(बेळगावप्रेमी)जायफळरंग

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2010 - 1:14 pm | मिसळभोक्ता

मास्तर चालू आहे, हे फार पूर्वीपासूनच बेळगावाला ज्ञात होते, तर !

नंदन's picture

29 Sep 2010 - 12:23 am | नंदन

मस्त! :)
[हा सीमाप्रश्नावर तोडगा म्हणावा काय? ;)]

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Sep 2010 - 1:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मास्तरांना सीमा-प्रश्नालाही तोंड द्यावं लागलं का काय?

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2010 - 1:20 pm | मिसळभोक्ता

अहो तै,

मास्तरांनी कशालाही तोंड देऊ नये, म्हणूनच तर जायफळाचा प्रयोग झाला ना !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Sep 2010 - 1:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हणजे, 'सीमा' प्रश्नामुळेच मास्तरांची 'प्रतिमा' खालावली का काय?

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2010 - 1:28 pm | मिसळभोक्ता

छ्या !

खालावली नाही, उंचावली !

की आम्हीच शीर्षासन करून र्‍हायलो ?

सहज's picture

29 Sep 2010 - 1:36 pm | सहज

मास्तर येतील व सांगतील काही लोकांना झोपेत बोलायची, चालायची सवय असते. तशी मास्तरांना झोपेत .... दुसर्‍या दिवशी ३ तास एक्ट्रा झोपेसाठी जायफळ वाया घालवले असे वाटते का?

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2010 - 1:40 pm | मिसळभोक्ता

संपादक,

येथे "मास्तर" ही व्यक्ती नाही, प्रवृत्ती मानावी. ह्यात वैयक्तिक रोखाचे काहीच नाही.

विनायक प्रभू's picture

29 Sep 2010 - 5:28 pm | विनायक प्रभू

ठोक आवडले.

वाटाड्या...'s picture

29 Sep 2010 - 2:04 am | वाटाड्या...

हॅ हॅ हॅ......

नंतर म्हणजे तुमचा अगदी 'जायफळाट' झाला असेल...

- (जायफळ झोपेनी सुजलेला) वाटेकरु जायफळ्या..

स्पंदना's picture

29 Sep 2010 - 6:16 am | स्पंदना

गुड ! गुड !

आमच सासर बेळगाव, त्यामुळे धनी येताना पेंगत का आले होते ते आज कळल!
त्रिवार धन्यवाद !!!

जायफळाचा हा गुणधर्म माहीत होता पण त्याच "ऑप्टीमम अ‍ॅप्लीकेशन" पहील्यांदाच पाहीलं.

अनिल २७'s picture

29 Sep 2010 - 10:21 am | अनिल २७

तुमचा हा अनुभव आम्हास पुढील वाटचालीत ऊपयोगी पडेल हे निश्चित...

धमाल मुलगा's picture

29 Sep 2010 - 3:33 pm | धमाल मुलगा

>>तुमचा हा अनुभव आम्हास पुढील वाटचालीत ऊपयोगी पडेल हे निश्चित...
=)) =))

>>{ हे ही दिवस जातील.. }
अहो, गेल्यावर काय उपेग?

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Sep 2010 - 5:57 pm | बिपिन कार्यकर्ते

अहो, गेल्यावर काय उपेग?

खराय.

धमाल मुलगा's picture

29 Sep 2010 - 6:43 pm | धमाल मुलगा

मोडक म्हणतात तसं आत्मकथन लिहायला कधी घेताय साहेब?
बर्‍याच दिवसात तुमचं सिध्दहस्त लेखन नाही वाचलं. :P

वेताळ's picture

29 Sep 2010 - 7:12 pm | वेताळ

मास्तर आयडिया एकदम झक्कास आहे.