मध्यप्रदेशमधे एका राजपुत घराण्यातील कुत्र्याने,ज्याचे नाव शेरु आहे, एका दलित वस्तीत राहणा-या स्त्रीने घातलेली भाकरी खाल्ली.त्यानंतर घडलेल्या काही घटना :
१. शेरुला अस्पृश्य ठरवुन त्याला राजपुत घराण्यात प्रवेश नाकारण्यात आला,कुत्र्याला 'बहीष्कृत' करण्यात आले असुन त्याला 'वाळीत' टाकण्यात आले आहे.
२.शेरुला भाकरी खाउ घालणा-या त्या दलित स्त्रीला १५,००० रुपयांचा दंड ठोठावला गेला.
३.पंचायत बोलवली गेली व राजपुत घराण्याने त्या शेरु कुत्र्याशी सर्व संबंध तोडावेत व शेरुने आता दलित वस्तीतच रहावे असे ठरले आहे.
४.पोलिसांनी त्या स्त्रीला अनुसुचित जाती-जमातीसाठीच्या विशेष पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवायला सांगितला आहे.ह्याघटनेबाबत चौकशी करण्यासाठी एक पोलिस पथक गावात पाठवले जाईल,असे अनुसुचित जाती-जमाती पोलिस ठाण्याच्या उपधिक्षकाने सांगितले.
नोंद : लेखाचा उद्देश कोणताही वाद निर्माण करणे नसुन ह्या घटनेला जबाबदार असलेल्या गोष्टींचा विचार करणे आहे.
जय हींद!
बातमीचे सौजन्य : नवाकाळ,अंक २०१, मुंबई २५ सप्टेंबर २०१०
प्रतिक्रिया
25 Sep 2010 - 1:31 pm | Nile
सर्व पेपरांचे आदरस्थान संध्याकाळ बनत चालले आहे की काय?
25 Sep 2010 - 1:32 pm | अवलिया
संध्याकाळ की संध्यानंद?
25 Sep 2010 - 1:37 pm | Nile
आनंदच आहे हो. धन्यवाद.
25 Sep 2010 - 8:54 pm | अशक्त
एका साधारण दैनिकाने (नवाकाळ) दखल घेतली म्हणून, बातमीचे महत्व कमी होत नाही...
http://www.bbc.co.uk/news/world-south-asia-11403486
25 Sep 2010 - 4:16 pm | शानबा५१२
ईथे सविस्तर वृत्त वाचता येईल.
http://timesofindia.indiatimes.com/india/Dog-caste-away-after-dalit-touc...
25 Sep 2010 - 4:19 pm | आप्पा
हि बातमी बर्याच पेपरला आली आहे. फक्त नवाकाळलाच नाही.
ज्या कुणी हे केले त्या येडचाप माणसाला व त्या पंचायतीलाच वाळीत टाकले पहिजे.
25 Sep 2010 - 4:41 pm | मितभाषी
आप्पा व्हौन जाउंद्या. मन्ग काय त्या गरम पन्चाइतीलाच वाळीत टाका.
आत्ताच आप्पानी मांडलेल्या सुअच्नेला आम्च अनुमोदन
अवान्तरः वाळीत म्हनल्यावर आपल्या अन्गातच् येत बॉ. काही ना काही खुसपट काधुन कोन्लानकोन्ला वाळीत टाकल्याबिगर चैनच पडत नाही.
समर्थाधरचे श्वान समर्थाहुनी महान,
25 Sep 2010 - 4:41 pm | शानबा५१२
ह्या घटना का होतात हा प्रश्न कोणाच्याच मनात येत नाही का?
जरी ह्या गोष्टींचा(जात वगैरे) उगम प्राचिन असलात तरी सरकार हे का थांबवु शकत नाही?
असमानतेची भावना लोकांच्या मनात जागृत ठेवायला 'आरक्षण' कारणीभुत नाहीये का?
25 Sep 2010 - 4:42 pm | स्पा
आईशप्पथ जग कुठे चाललाय....
आणि हि माणसं काय विचार करत बसतात.....
कदाचित ह्यांच्याकडे बराच रिकामा वेळ असेल....
मोठ्या शहरात........ एवढा वेळ कोणालाच नसतो....
आणि लोकल , बसच्या जीवघेण्या गर्दीत असा विचार करत बसलं तर मग त्या माणसालाच वाळीत काढायला हवा....
लाखो माणसांचे स्पर्श होतात...
तेव्हा काय करणार....?
25 Sep 2010 - 4:52 pm | मितभाषी
आईशप्पथ माला तर जिवच देवुशी वाटतो असं काही वाचल्याव्र.
अंधार्या रिक्षेत.........
25 Sep 2010 - 6:28 pm | प्रदीप
आता खर्या अर्थाने माणसात रहाणार म्हणायचा.
आणि तरी आम्ही येथे वाचले आहे की आता आपण अस्पृष्यतेहून दूर जात आहोत म्हणून. 'जिन्हे नाज़ है हिंद पर, वो कहाँ है' हा प्रश्नच मुळी काही वर्षांनी विचारावयास लागणार नाही असे दिसते :(
25 Sep 2010 - 7:13 pm | तिमा
त्या उच्च घराण्यातल्या लोकांना दलित वस्तीत राहून त्यांची भाकरी रोज खायला लावली पाहिजे.
26 Sep 2010 - 1:29 am | Pain
आवरा.
26 Sep 2010 - 12:22 pm | अनिल २७
ईथे शिव्या देणे...
27 Sep 2010 - 4:14 pm | sandeepn
अन्याय तर आमच्यावर पन झालाय. १२ ला ९२ % मार्क पडुन सुदधा COEP ला अॅड्मिशन नाही मिळाली. पन दलिताला ५५ % पन पुरेसे आहेत वरतुन स्कॉलरशीप तर वेगळीच. जावुद्या चुक आमचीच आहे, ओपन म्हणुन जन्माला आलो ना. भोगतोय.
पन झालेल्या घटनेचा तीव्र निशेध आहे. अन्याय कोनावरही झाला तरी तो आम्हास अमान्य आहे.
27 Sep 2010 - 4:14 pm | sandeepn
अन्याय तर आमच्यावर पन झालाय. १२ ला ९२ % मार्क पडुन सुदधा COEP ला अॅड्मिशन नाही मिळाली. पन दलिताला ५५ % पन पुरेसे आहेत वरतुन स्कॉलरशीप तर वेगळीच. जावुद्या चुक आमचीच आहे, ओपन म्हणुन जन्माला आलो ना. भोगतोय.
पन झालेल्या घटनेचा तीव्र निशेध आहे. अन्याय कोनावरही झाला तरी तो आम्हास अमान्य आहे.
27 Sep 2010 - 7:16 pm | शानबा५१२
काय करणार्,आम्ही ही तक्रार करणे खुप आधीच सोडुन दीले आहे.
अलिया भोगासी असावे साधन
(बारावीत असताना माझा व आभ्यासाचा काहीच संबंध नसल्याने तेव्हा हे प्रश्न भेडसावत नव्हते,नंतर ३-४ वर्षांनी अस वाटल होत एकदा)
जे होत ते चांगल्यासाठी होते हेच लक्षात ठेवायच.