प्रश्न..

चन्द्रशेखर गोखले's picture
चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी...
25 Sep 2010 - 9:29 am

फार पूर्वी पासून मी जेव्हा
स्वतःला बघत आलो..
तेव्हा मला जाणवलं की
मी आजिबात
बदल्लेलो नाही..

..आणि बदल होणं हे
जीवंतपणाचं लक्षण असेल
तर मी जीवंत कसा..?
असाही मला प्रश्न पडतो

मला असही वाटतं
की मी जीवंत नसतो
तर या प्रश्नानीही मला
सतावलं नसतं

कारण मढ्याला पडत नाहीत
प्रश्न आणि स्वप्नही...!
मला तर दोन्ही ही पडतात...!!

शांतरसमुक्तक

प्रतिक्रिया

एक अनामी's picture

25 Sep 2010 - 8:33 pm | एक अनामी

आवडली कविता...
छान आहे...

धनंजय's picture

25 Sep 2010 - 9:00 pm | धनंजय

कल्पना आवडली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Sep 2010 - 9:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>कल्पना आवडली
असेच म्हणतो.

-दिलीप बिरुटे

राजेश घासकडवी's picture

26 Sep 2010 - 12:00 am | राजेश घासकडवी

विचारांतून अस्तित्व नाकारणं हा वदतोव्याघात आहे. मी विचार करतो म्हणजे मी आहे. माझे विचार बदलले नाहीत तरी बेहत्तर...

पंचम's picture

26 Sep 2010 - 4:56 pm | पंचम

तुमच्याच कवितेला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे... आपल्या संम्मतीने....
कारण सुंदर गोष्टींना शेवट नसावा असे प्रत्येकाला वाटते... कदाचित त्याला तुमच्या विचारांची ऊंची नक्कीच नसेल.. पण भावनेची खोली मात्र नक्कीच असेल्......चूका झाल्यास माफी....!

तुमच्या सारखाच मला ही
हा प्रश्न नेहमी पडतो......
श्वास असणे म्हणजे जगणे का हो....?
तसंच जर असतं तर माझं वय किती....?

मेलेल्या मढ्याला स्वप्ने पडत नाहीत हे खरे आहे....पण मी ही स्वप्ने बघायची केव्हाच सोडली....तरी मी जिवंत आहे..
कारण मढ्याला एक आशा असते पुर्नजन्म घेण्याची..
कदाचित त्याच आशेवर मी ही जिवंत आहे.......आणि तुम्ही ही......!

चन्द्रशेखर गोखले's picture

26 Sep 2010 - 9:31 pm | चन्द्रशेखर गोखले

पंचमदा तुमची काव्यात्मक प्रतिक्रिया लाजवाब ! तुमची प्रतिक्रिया ही स्वतंत्र कविताच आहे!

पंचम's picture

30 Sep 2010 - 9:55 pm | पंचम

धन्यवाद ! आपली प्रतिक्रिया अमुलाग्र होती........

माझे अस्तित्व नेहमीच
तुमच्याविना अपुरे आहे.....
मी निर्जीव शब्द
तुम्ही माझे अस्तित्व आहे.....

मी जे काही सावरले ओंजळीत माझ्या
त्या ओंजळीखाली तुमचा हात आहे..
हे तुमचेच देणे आहे..
तुम्हालाच वाहात आहे....

आपले आशिर्वाद...

बेसनलाडू's picture

1 Oct 2010 - 2:11 am | बेसनलाडू

(आस्वादक)बेसनलाडू