"जगी सर्व क्रूर असा कोण आहे" ?

गांधीवादी's picture
गांधीवादी in जनातलं, मनातलं
25 Sep 2010 - 7:21 am

हि धरती आपल्याला आंदन म्हणून दिल्यासारखी मानवाची वागणूक आहे. ह्या धरतीवर केवळ आणि केवळ मानवाचाच हक्क असल्यागत मानवाची इतर प्राण्यांबाबत क्रूर वागणूक असते. हि क्रूर वागणूक दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. स्वतःच्या सुखासाठी, चवीसाठी, सौंदर्यासाठी मानव हा इतर प्राण्यांचा बळी देताना जराही मागे पुढे पाहत नाही. मुख्यत्वे मांस, दंत, आणि कातडी यासाठी मानव स्वताच्या हव्यासासाठी त्याची हत्या करतो. मानवाने कुठेतरी विचार करून हि धरती जशी आपली आहे तशीच इतर प्राण्यांची देखील आहे हे मान्य करून, त्यांच्या बद्दल आदर दाखवून जर कार्य केले तरच हि धरती मानवावर खुश होऊन त्याला दीर्घ आयुष्याचे वरदान देईल अन्यथा महाकाय डायनासोर जसे क्षणात नाहीसे झाले तसे मानवाचे हि व्हायला वेळ लागणार नाही. आणि त्याला कारणीभूत असतील अनंत निष्पाप प्राण्यांचे श्राप.

http://www.thehindu.com/news/national/article790866.ece

हि बातमी, हत्ती होते म्हणून प्रसिद्ध तरी झाली पण इथे पुणे लोणावळा लोकलखाली कितीतरी शेळ्या, गायी, बेवारस कुत्री, सर्रास मरण पावतात, कुणाला त्यांची ना खंत ना पर्वा.

मी स्वतः (चवीसाठी) मांसाहार करत नाही, आणि प्राण्यांच्या कातडीने बनविलेल्या वस्तू टाळतो. आणि कोणत्याही प्राण्याच्या दातांनी बनविलेल्या वस्तू घरात आणण्याची इच्छा नाही. (आणि ऐपतहि नाही हा भाग वेगळा)
---------------------------------------------------------------------------------------------------------------
मानव निर्मित CWG, राम मंदिर गदारोळात ह्याचाहि विचार व्हावा म्हणून हा लेख.
ज्यांनी त्यांनी प्रत्येकाला जितके जमेल तितके, ह्या सृष्टीचे असलेले विविध अंग प्रेमाने सांभाळण्याचा प्रयत्न करावा हीच विनंती.

मेरी धरती महान. (बाकि सब झूठ है)

राजकारणविचार

प्रतिक्रिया

बाप रे! एवढा मोठा अपघात. वन्य जीव संरक्षण खातं या हतींना अभयारण्यात सोडू शकत नाही का? ते रेल्वे रूळ तिथनं हलवायला पाहीजे.

कुक's picture

25 Sep 2010 - 7:42 am | कुक

भयानक आहे हे सर्व

गांधीवादी's picture

25 Sep 2010 - 10:35 am | गांधीवादी

http://www.thehindu.com/news/national/article790866.ece
ह्या बातमीतील काही दृश्ये.

ह्या बालकाने बागडणे नुकतेच चालू केले असेल, आणि काळरुपी मानवाने त्याच्यावर झडप टाकली .

खरे सांगू,
ह्या प्रत्येक फोटोत मला आपला चीत्कारणारा गणराया दिसत आहे. तीच सोंड, तेच डोळे, तेच कान.

ह्या मृतात्म्यांना शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

पाषाणभेद's picture

25 Sep 2010 - 9:44 am | पाषाणभेद

नको तिथे रेल्वे गाड्या वेगात धावतात अन नको तिथे त्या हळू धावतात. जंगलातून गाडी जाते तर ती योग्य वेगात आवरता येईल अशीच नेली पाहीजे. जंगलातल्या प्राण्यांना त्यांच्या हक्कासाठी मोर्चा, संप करता येत नाहीत.

बापरे!!! आपल्याकडे माणसांनाच किंमत नाही तर प्राण्यांना काय असायची...
:-(

सुत्रधार's picture

25 Sep 2010 - 10:43 am | सुत्रधार

फार भयानक आहे. राष्ट्रीय महामार्गावर पण रोजच असे अपघात होतात.
आशा मृतात्म्यांना शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

अविनाशकुलकर्णी's picture

25 Sep 2010 - 11:36 am | अविनाशकुलकर्णी

मी स्वतः (चवीसाठी) मांसाहार करत नाही,

हम भि वोह चिजे नहि खाते जिनके चेहेरे होते है