विडंबनाची पार्श्वभूमी:
मला बर्याचदा काहीकाही शब्द काहीच्याकाही ऐकायला येतात. विशेषतः जुनं रेकॉर्डींग असेल तर गाण्यातले शब्द काही असतात आणि मी काहीतरी भलतंच ऐकून अर्थाचा अनर्थ करते. "कानपूर मे हडताल" हे मला पडलेलं नाव बरंच जुनं आहे. पण मिपाची कृपा, या अवगुणामुळे उगाच आपण भावही खाऊ शकतो हे लक्षात आलं.
भुंक न कुतऱ्या रात रे, शांत रे
तनमन जागे, डासही चावे
उपटला कुठून हा ताप रे, बाप रे॥
पाली घरी या धीट धावती, क्वचित चिचुंद्र्या सुधा नांदती
रातकिडे तरी काय वरडती, काय वरडती कली जमले परसात रे, बास रे॥
ये रे ये जवळ नि मारच खा तुला लाथही पेकाटात द्यायची
पळतील सगळे कुत्रे तरी ही झोप कधी कधी लागायची?
मशक मधातील काढ काढूनी अति दमले परी रात रे, शांत रे॥
मूळ गाणं
कवी - ग. दि. माडगूळकर
चित्रपट - कीचकवध
संगीतकार - मा. कृष्णराव
गायिका - लता मंगेशकर
धुंद मधुमती रात रे, नाथ रे
तनमन नाचे, यौवन नाचे,
उगवला रजनीचा नाथ रे, रात रे॥
जललहरी या धीट धावती, हरित तटांचे ओठ चुंबिती
येई प्रियकरा, येई मंदिरा, अलि रमले कमलात रे, नाथ रे॥
ये रे ये का मग दूर उभा, ही घटिकाही कधी ना यायची
फुलतील लाखो तारा, परि ही रात कधी कधी ना यायची
चषक सुधेचा ओठी लावूनी, कटिवरती धरी हात रे, नाथ रे॥
प्रतिक्रिया
21 Sep 2010 - 12:42 pm | अवलिया
ओढुन ताणुन केलेले विडंबन. खास नाही.
21 Sep 2010 - 6:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>ओढुन ताणुन केलेले विडंबन. खास नाही.
सहमत आहे.
-दिलीप बिरुटे
21 Sep 2010 - 7:38 pm | सूड
सहमत
21 Sep 2010 - 12:42 pm | पैसा
आता मी तुला अंगाई म्हणू का भरदुपारी?
नीज माझ्या "पाय" बाळा ......
(नीज माझ्या नंदलाला.. च्या चालीवर)
21 Sep 2010 - 1:14 pm | प्रीत-मोहर
पाय ला अंगाई म्हणणारी पैसा ताई ही काकु असावी का :?
21 Sep 2010 - 2:06 pm | पैसा
तुझी हापिसात झोप उडाली वाटतं?
21 Sep 2010 - 2:36 pm | प्रीत-मोहर
नाही...मी आजही घरीच आहे....तसही म्ला झोपु देत नाय ग म्यानिजर्बै......
21 Sep 2010 - 12:47 pm | अब् क
मजा आली वाचुन!!!
21 Sep 2010 - 12:54 pm | Nile
शी: बाई!!! कित्त्त्त्त्ती कित्त्त्त्त्त्ती* पाशवी!!!
(*रिमाइंडर)
21 Sep 2010 - 1:38 pm | मस्त कलंदर
हा हा हा.. तुझ्या पण कानपुरात हडताल का??? छे बै.. आता WPHA पण काढूयात आपण...
बाकी विडंबन झक्कास..
अवांतरः तुझ्या घरी आता पाल्केस्ट्राच्या साथीने चिचुंद्र्याही नाचतात की काय?
21 Sep 2010 - 1:58 pm | यशोधरा
पाल्केस्ट्रा ह्या शब्दाचा मूळ वापर, उगम वगैरे इथे, न विसरता पहाच! धन्यवाद! :)
21 Sep 2010 - 2:18 pm | मेघवेडा
© "पाल्केस्ट्रा"
अशी सही लिहायची होतीस की! ;)
21 Sep 2010 - 2:25 pm | मस्त कलंदर
मला शब्द लक्षात होता, पण त्याचा उगम विसरले होते. आता तुम्ही उप-प्रतिसाद दिल्याने इथे लिहितेय (सौजन्य यशोधरा) म्हणून.
21 Sep 2010 - 2:11 pm | विजुभाऊ
पाल्केस्ट्रा. हे आर्केस्ट्रा सारखे वाटतय
बाकी ठाणेरीताई हे इडंबन काय मात्रेत बस्ले नाही.
21 Sep 2010 - 2:43 pm | पैसा
(म.क., अपाशवी लोकाना WPHA मधे वेंट्री देऊ नका हां. तसे त्यांचे कान पहिजे तेव्हा आपोआप बंद होतात!)
21 Sep 2010 - 1:43 pm | अविनाशकुलकर्णी
माडगुळकारांच्या आत्म्याला आज शांति लाभली असेल...
21 Sep 2010 - 2:06 pm | नावातकायआहे
बळस्कर.कॉम ला छापा...
21 Sep 2010 - 2:23 pm | इंटरनेटस्नेही
क्या बात है, आदिती मॅम! सुर्पब!
21 Sep 2010 - 2:40 pm | प्रीत-मोहर
पाय तै इं स्नेही अर्थात जुने इं प्रेमी यांना शिकवत तर नाय ना?
21 Sep 2010 - 3:12 pm | सहज
एक गाणे आठवले.
21 Sep 2010 - 3:16 pm | पैसा
ते गाणं जोरात लावलं तर कुत्रे पण पळून जातील!
21 Sep 2010 - 3:39 pm | प्रकाश घाटपांडे
आम्ही त्यांच्यासाठी भुभुगीत गाउ
21 Sep 2010 - 3:42 pm | इंटरनेटस्नेही
@ प्री-मो,
तसं काही नाही. ३_१४विक्षिप्त आदिती यांना मी केवळ आदरार्थी 'मॅम' (मॅडम) असे संबोधित केले.
21 Sep 2010 - 6:33 pm | sagarparadkar
>> मला बर्याचदा काहीकाही शब्द काहीच्याकाही ऐकायला येतात. ... <<
मी अगदी लहान असताना "उगवला चंद्र पुनवेचा " मधील "दाही दिशा कशा फुलल्या " च्या ऐवजी "दाढी मिशा कशा फुलल्या" असं म्हणत असे. माझ्या अवती भवतीची मुले पण असेच भलतेच काहीतरी ऐकत / गात असत. माझ्या वडिलांनी हे शब्द त्यांच्या एका दाढीधारी मित्राला सांगितले, तर तो एव्हढ्या जोरात हसायला लागला कि आता खुर्चीतुन पडतो कि काय असे वाटायला लागलं ....
कुठ्ल्याशा गाण्यात शब्द होते "साजन घर आये, दुल्हन क्यूं शरमाये" तर आमच्या परिचयातील एका लहान मुलीने त्याचे " साजन घर आये, दुल्हन ट्यूशन जाये" करून टाकले ...
एका १लीत शिकणार्या मुलीला शाळेत सांगितले होते की 'सोलर इक्लिप्स' पहाण्यासाठी खास चष्मे शाळेतच मिळतील ... तर तिने घरी येऊन सांगितले "सोलारीस क्लब पहाण्यासाठी खास चष्मे शाळेतच मिळतील" . तर तिची आई शाळेत शिक्षिकांना भेटायला गेली, दोघी खूप हसल्या, आणि मग बाईंनी सर्वच मुलांना परत नीट समजावून सांगितले.
21 Sep 2010 - 6:40 pm | sagarparadkar
लहान असताना मी पुण्यातील रमण बाग शाळेच्या मागील बाजूस रहात असे. रमण बागेत श्री गजानन महराजांची पालखी येत असे, त्यांच्या गाण्यात "गण गण गणांत बोते ..." असे काहीतरी शब्द होते. ते आम्हा मुलांना कधीच कळले नव्हते. १९७९ च्या आणीबाणी नंतरच्या निवडणुका होणार होत्या किंवा पालखी येण्याआधी नुकत्याच पार पडल्या होत्या. तेव्हा अचानक भवतालच्या एका मुलाला ते शब्द उमगले: "जय जय म्रुणाल गोरे" ....:)
21 Sep 2010 - 8:36 pm | तिमा
माझा एक मित्र
जय जय 'डबाडबड' श्रीरंग असे गाणे म्हणत असे. (भालजींच्या बोबड्या उच्चारांमुळे असेल)
21 Sep 2010 - 9:15 pm | मेघवेडा
गौरीशंकर मी एकदा माणगावात पाहिलं होतं (सावंतवाडीजवळचं). नारदाचं पात्र ज्याने केलं होतं त्याने हे गाणं इतकं सुंदर म्हटलं होतं की क्या केहेने! "जय जय" चा उच्चार तो "जैं जैं" असा सानुनासिक करी! त्यामुळे कित्येक वर्षे, वास्तविक अजूनही, माझ्या मनात हे गाणं तसंच वाजतं.. रमारमण श्रीरंग जैं जैं!
22 Sep 2010 - 12:16 am | रेवती
डबाडबड
आईग्ग! हसून पोट दुखायला लागलं.
आमच्या नात्यातला एक मुलगा लहान असताना त्याचे पूर्ण नाव सांगताना वडिलांचे नाव जयंत सांगण्याऐवजी जंत म्हणत असे.
असो, मुलगा आता मोठा झाल्याने फार काही सांगत नाही.
अदितीने केलेले विडंबन बरे आहे.
तिने माझ्या धाग्याला बरेच प्रतिसाद दिल्याने बळेबळे हा प्रतिसाद देते आहे.;)
22 Sep 2010 - 12:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>तिने माझ्या धाग्याला बरेच प्रतिसाद दिल्याने बळेबळे हा प्रतिसाद देते आहे.
खुलाशाबद्दल आभारी.......!
-दिलीप बिरुटे
21 Sep 2010 - 9:08 pm | प्रभो
हॅहॅहॅ!!
22 Sep 2010 - 12:59 am | नंदन
>>> मला बर्याचदा काहीकाही शब्द काहीच्याकाही ऐकायला येतात. विशेषतः जुनं रेकॉर्डींग असेल तर गाण्यातले शब्द काही असतात आणि मी काहीतरी भलतंच ऐकून अर्थाचा अनर्थ करते. "कानपूर मे हडताल" हे मला पडलेलं नाव बरंच जुनं आहे. पण मिपाची कृपा, या अवगुणामुळे उगाच आपण भावही खाऊ शकतो हे लक्षात आलं.
--- हा एक मायबोलीवरचा धागा आठवला
>>> पाली घरी या धीट धावती, क्वचित चिचुंद्र्या सुधा नांदती
--- हॅ हॅ हॅ, चित्रदर्शी का कायसंसं म्हणतात तशी ओळ!
>>> मशक मधातील काढ काढूनी अति दमले परी रात रे, शांत रे॥
--- 'कीटकवध' नावाचा स्पूफ शिनुमा काढला, तर त्यात हे विडंबन खपून जाईल :)
22 Sep 2010 - 9:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
धाग्याबद्दल धन्यवाद रे!
याच 'धुंद मधुमती'मधेच पहिल्या कडव्याच्या शेवटी "अली रमले कम लात रे" याचा अर्थ माझ्या बालबुद्धीला बरीच वर्ष लागला नव्हता. कोणीतरी "अली नावाच्या माणसाला कमरेत लाथ दे" असं काहीसं मला वाटायचं.
कीटकवध ... ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ... पटकथा लिहायला सुरूवात कर!
22 Sep 2010 - 9:31 am | मनीषा
तुझ्या कॅम्पस वर बरीच कुत्री आलेली दिसतात ..
काही वेळा त्यांची सोबत चांगली असते गं .
पण तु त्यांना नासलेले दूध दिलेस म्हणून भुंकत असतील बिचारी .
आता दूध नासले कि त्याची नासकवणी करुन दे ... मग कदाचित नाही भुंकणार !!!
22 Sep 2010 - 11:30 am | स्पंदना
बाकि काहीही असो पण अदिती चाल मात्र तशीच्या तशी गो बाय...
मी म्हणुन बघितल्...आता जरा ऐकणार्यांच्या नजरा विचित्र होत्या पण चालायचच नाही का?
वरचे दाढीमिश्या, डबाडबड, अन बाकि सारे हुच्च कलंदर!!
एकुण पुरा ह. ह. पु. वा. पो. दु. ला.
22 Sep 2010 - 11:36 am | राजेश घासकडवी
कानपुरातल्या हडताळाचे मिपावर उठलेले पडसाद आवडले.
22 Sep 2010 - 1:06 pm | सुहास..
हत्तैच्या !! ही पोग्री जरा 'यिक्षिप्त'च हाय !!