Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 09/21/2010 - 12:33
विडंबनाची पार्श्वभूमी: मला बर्‍याचदा काहीकाही शब्द काहीच्याकाही ऐकायला येतात. विशेषतः जुनं रेकॉर्डींग असेल तर गाण्यातले शब्द काही असतात आणि मी काहीतरी भलतंच ऐकून अर्थाचा अनर्थ करते. "कानपूर मे हडताल" हे मला पडलेलं नाव बरंच जुनं आहे. पण मिपाची कृपा, या अवगुणामुळे उगाच आपण भावही खाऊ शकतो हे लक्षात आलं. भुंक न कुतऱ्या रात रे, शांत रे तनमन जागे, डासही चावे उपटला कुठून हा ताप रे, बाप रे॥ पाली घरी या धीट धावती, क्वचित चिचुंद्र्या सुधा नांदती रातकिडे तरी काय वरडती, काय वरडती कली जमले परसात रे, बास रे॥ ये रे ये जवळ नि मारच खा तुला लाथही पेकाटात द्यायची पळतील सगळे कुत्रे तरी ही झोप कधी कधी लागायची? मशक मधातील काढ काढूनी अति दमले परी रात रे, शांत रे॥ मूळ गाणं कवी - ग. दि. माडगूळकर चित्रपट - कीचकवध संगीतकार - मा. कृष्णराव गायिका - लता मंगेशकर धुंद मधुमती रात रे, नाथ रे तनमन नाचे, यौवन नाचे, उगवला रजनीचा नाथ रे, रात रे॥ जललहरी या धीट धावती, हरित तटांचे ओठ चुंबिती येई प्रियकरा, येई मंदिरा, अलि रमले कमलात रे, नाथ रे॥ ये रे ये का मग दूर उभा, ही घटिकाही कधी ना यायची फुलतील लाखो तारा, परि ही रात कधी कधी ना यायची चषक सुधेचा ओठी लावूनी, कटिवरती धरी हात रे, नाथ रे॥

Submitted by अवलिया on Tue, 09/21/2010 - 12:42

Permalink

ओढुन ताणुन केलेले विडंबन. खास

ओढुन ताणुन केलेले विडंबन. खास नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 09/21/2010 - 18:35

In reply to ओढुन ताणुन केलेले विडंबन. खास by अवलिया

Permalink

>>>>ओढुन ताणुन केलेले विडंबन.

>>>>ओढुन ताणुन केलेले विडंबन. खास नाही. सहमत आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 09/21/2010 - 19:38

In reply to ओढुन ताणुन केलेले विडंबन. खास by अवलिया

Permalink

सहमत

सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 09/21/2010 - 12:42

Permalink

अंगाई

आता मी तुला अंगाई म्हणू का भरदुपारी? नीज माझ्या "पाय" बाळा ...... (नीज माझ्या नंदलाला.. च्या चालीवर)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Tue, 09/21/2010 - 13:14

In reply to अंगाई by पैसा

Permalink

पाय ला अंगाई म्हणणारी पैसा

पाय ला अंगाई म्हणणारी पैसा ताई ही काकु असावी का :?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 09/21/2010 - 14:06

In reply to पाय ला अंगाई म्हणणारी पैसा by प्रीत-मोहर

Permalink

अंगाई

तुझी हापिसात झोप उडाली वाटतं?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Tue, 09/21/2010 - 14:36

In reply to अंगाई by पैसा

Permalink

नाही...मी आजही घरीच

नाही...मी आजही घरीच आहे....तसही म्ला झोपु देत नाय ग म्यानिजर्बै......
  • Log in or register to post comments

Submitted by अब् क on Tue, 09/21/2010 - 12:47

Permalink

मस्त झालिए!!

मजा आली वाचुन!!!
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Tue, 09/21/2010 - 12:54

Permalink

शी: बाई!!! कित्त्त्त्त्ती

शी: बाई!!! कित्त्त्त्त्ती कित्त्त्त्त्त्ती* पाशवी!!! (*रिमाइंडर)
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Tue, 09/21/2010 - 13:38

Permalink

हा हा हा.. तुझ्या पण कानपुरात

हा हा हा.. तुझ्या पण कानपुरात हडताल का??? छे बै.. आता WPHA पण काढूयात आपण... बाकी विडंबन झक्कास.. अवांतरः तुझ्या घरी आता पाल्केस्ट्राच्या साथीने चिचुंद्र्याही नाचतात की काय?
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Tue, 09/21/2010 - 13:58

In reply to हा हा हा.. तुझ्या पण कानपुरात by मस्त कलंदर

Permalink

पाल्केस्ट्रा ह्या शब्दाचा मूळ

पाल्केस्ट्रा ह्या शब्दाचा मूळ वापर, उगम वगैरे इथे, न विसरता पहाच! धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Tue, 09/21/2010 - 14:18

In reply to पाल्केस्ट्रा ह्या शब्दाचा मूळ by यशोधरा

Permalink

© "पाल्केस्ट्रा" अशी सही

© "पाल्केस्ट्रा" अशी सही लिहायची होतीस की! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Tue, 09/21/2010 - 14:25

In reply to पाल्केस्ट्रा ह्या शब्दाचा मूळ by यशोधरा

Permalink

मला शब्द लक्षात होता, पण

मला शब्द लक्षात होता, पण त्याचा उगम विसरले होते. आता तुम्ही उप-प्रतिसाद दिल्याने इथे लिहितेय (सौजन्य यशोधरा) म्हणून.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 09/21/2010 - 14:11

In reply to हा हा हा.. तुझ्या पण कानपुरात by मस्त कलंदर

Permalink

पाल्केस्ट्रा. हे आर्केस्ट्रा

पाल्केस्ट्रा. हे आर्केस्ट्रा सारखे वाटतय बाकी ठाणेरीताई हे इडंबन काय मात्रेत बस्ले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 09/21/2010 - 14:43

In reply to हा हा हा.. तुझ्या पण कानपुरात by मस्त कलंदर

Permalink

अवांतर

(म.क., अपाशवी लोकाना WPHA मधे वेंट्री देऊ नका हां. तसे त्यांचे कान पहिजे तेव्हा आपोआप बंद होतात!)
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Tue, 09/21/2010 - 13:43

Permalink

माडगुळकारांच्या आत्म्याला आज

माडगुळकारांच्या आत्म्याला आज शांति लाभली असेल...
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on Tue, 09/21/2010 - 14:06

Permalink

बळस्कर.कॉम

बळस्कर.कॉम ला छापा...
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Tue, 09/21/2010 - 14:23

Permalink

क्या बात है, आदिती मॅम!

क्या बात है, आदिती मॅम! सुर्पब!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Tue, 09/21/2010 - 14:40

In reply to क्या बात है, आदिती मॅम! by इंटरनेटस्नेही

Permalink

पाय तै इं स्नेही अर्थात जुने

पाय तै इं स्नेही अर्थात जुने इं प्रेमी यांना शिकवत तर नाय ना?
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Tue, 09/21/2010 - 15:12

Permalink

काही कळले नाही

एक गाणे आठवले.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 09/21/2010 - 15:16

Permalink

कुत्रे

ते गाणं जोरात लावलं तर कुत्रे पण पळून जातील!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Tue, 09/21/2010 - 15:39

In reply to कुत्रे by पैसा

Permalink

हॅहॅहॅ

ते गाणं जोरात लावलं तर कुत्रे पण पळून जातील!
आम्ही त्यांच्यासाठी भुभुगीत गाउ
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Tue, 09/21/2010 - 15:42

Permalink

@ प्री-मो, तसं काही नाही.

@ प्री-मो, तसं काही नाही. ३_१४विक्षिप्त आदिती यांना मी केवळ आदरार्थी 'मॅम' (मॅडम) असे संबोधित केले.
  • Log in or register to post comments

Submitted by sagarparadkar on Tue, 09/21/2010 - 18:33

Permalink

लहान असताना ...

>> मला बर्‍याचदा काहीकाही शब्द काहीच्याकाही ऐकायला येतात. ... << मी अगदी लहान असताना "उगवला चंद्र पुनवेचा " मधील "दाही दिशा कशा फुलल्या " च्या ऐवजी "दाढी मिशा कशा फुलल्या" असं म्हणत असे. माझ्या अवती भवतीची मुले पण असेच भलतेच काहीतरी ऐकत / गात असत. माझ्या वडिलांनी हे शब्द त्यांच्या एका दाढीधारी मित्राला सांगितले, तर तो एव्हढ्या जोरात हसायला लागला कि आता खुर्चीतुन पडतो कि काय असे वाटायला लागलं .... कुठ्ल्याशा गाण्यात शब्द होते "साजन घर आये, दुल्हन क्यूं शरमाये" तर आमच्या परिचयातील एका लहान मुलीने त्याचे " साजन घर आये, दुल्हन ट्यूशन जाये" करून टाकले ... एका १लीत शिकणार्‍या मुलीला शाळेत सांगितले होते की 'सोलर इक्लिप्स' पहाण्यासाठी खास चष्मे शाळेतच मिळतील ... तर तिने घरी येऊन सांगितले "सोलारीस क्लब पहाण्यासाठी खास चष्मे शाळेतच मिळतील" . तर तिची आई शाळेत शिक्षिकांना भेटायला गेली, दोघी खूप हसल्या, आणि मग बाईंनी सर्वच मुलांना परत नीट समजावून सांगितले.
  • Log in or register to post comments

Submitted by sagarparadkar on Tue, 09/21/2010 - 18:40

In reply to लहान असताना ... by sagarparadkar

Permalink

आणखी एक ...

लहान असताना मी पुण्यातील रमण बाग शाळेच्या मागील बाजूस रहात असे. रमण बागेत श्री गजानन महराजांची पालखी येत असे, त्यांच्या गाण्यात "गण गण गणांत बोते ..." असे काहीतरी शब्द होते. ते आम्हा मुलांना कधीच कळले नव्हते. १९७९ च्या आणीबाणी नंतरच्या निवडणुका होणार होत्या किंवा पालखी येण्याआधी नुकत्याच पार पडल्या होत्या. तेव्हा अचानक भवतालच्या एका मुलाला ते शब्द उमगले: "जय जय म्रुणाल गोरे" ....:)
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Tue, 09/21/2010 - 20:36

Permalink

जय जय

माझा एक मित्र जय जय 'डबाडबड' श्रीरंग असे गाणे म्हणत असे. (भालजींच्या बोबड्या उच्चारांमुळे असेल)
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Tue, 09/21/2010 - 21:15

In reply to जय जय by तिमा

Permalink

जैं जैं

गौरीशंकर मी एकदा माणगावात पाहिलं होतं (सावंतवाडीजवळचं). नारदाचं पात्र ज्याने केलं होतं त्याने हे गाणं इतकं सुंदर म्हटलं होतं की क्या केहेने! "जय जय" चा उच्चार तो "जैं जैं" असा सानुनासिक करी! त्यामुळे कित्येक वर्षे, वास्तविक अजूनही, माझ्या मनात हे गाणं तसंच वाजतं.. रमारमण श्रीरंग जैं जैं!
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 09/22/2010 - 00:16

In reply to जय जय by तिमा

Permalink

डबाडबड आईग्ग! हसून पोट

डबाडबड आईग्ग! हसून पोट दुखायला लागलं. आमच्या नात्यातला एक मुलगा लहान असताना त्याचे पूर्ण नाव सांगताना वडिलांचे नाव जयंत सांगण्याऐवजी जंत म्हणत असे. असो, मुलगा आता मोठा झाल्याने फार काही सांगत नाही. अदितीने केलेले विडंबन बरे आहे. तिने माझ्या धाग्याला बरेच प्रतिसाद दिल्याने बळेबळे हा प्रतिसाद देते आहे.;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 09/22/2010 - 00:21

In reply to डबाडबड आईग्ग! हसून पोट by रेवती

Permalink

:)

>>>>तिने माझ्या धाग्याला बरेच प्रतिसाद दिल्याने बळेबळे हा प्रतिसाद देते आहे. खुलाशाबद्दल आभारी.......! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Tue, 09/21/2010 - 21:08

Permalink

हॅहॅहॅ!!

हॅहॅहॅ!!
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Wed, 09/22/2010 - 00:59

Permalink

खी: खी: खी:

>>> मला बर्‍याचदा काहीकाही शब्द काहीच्याकाही ऐकायला येतात. विशेषतः जुनं रेकॉर्डींग असेल तर गाण्यातले शब्द काही असतात आणि मी काहीतरी भलतंच ऐकून अर्थाचा अनर्थ करते. "कानपूर मे हडताल" हे मला पडलेलं नाव बरंच जुनं आहे. पण मिपाची कृपा, या अवगुणामुळे उगाच आपण भावही खाऊ शकतो हे लक्षात आलं. --- हा एक मायबोलीवरचा धागा आठवला >>> पाली घरी या धीट धावती, क्वचित चिचुंद्र्या सुधा नांदती --- हॅ हॅ हॅ, चित्रदर्शी का कायसंसं म्हणतात तशी ओळ! >>> मशक मधातील काढ काढूनी अति दमले परी रात रे, शांत रे॥ --- 'कीटकवध' नावाचा स्पूफ शिनुमा काढला, तर त्यात हे विडंबन खपून जाईल :)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 09/22/2010 - 09:40

In reply to खी: खी: खी: by नंदन

Permalink

धाग्याबद्दल धन्यवाद रे! याच

धाग्याबद्दल धन्यवाद रे! याच 'धुंद मधुमती'मधेच पहिल्या कडव्याच्या शेवटी "अली रमले कम लात रे" याचा अर्थ माझ्या बालबुद्धीला बरीच वर्ष लागला नव्हता. कोणीतरी "अली नावाच्या माणसाला कमरेत लाथ दे" असं काहीसं मला वाटायचं. कीटकवध ... ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ... पटकथा लिहायला सुरूवात कर!
  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on Wed, 09/22/2010 - 09:31

Permalink

तुझ्या कॅम्पस वर बरीच कुत्री

तुझ्या कॅम्पस वर बरीच कुत्री आलेली दिसतात .. काही वेळा त्यांची सोबत चांगली असते गं . पण तु त्यांना नासलेले दूध दिलेस म्हणून भुंकत असतील बिचारी . आता दूध नासले कि त्याची नासकवणी करुन दे ... मग कदाचित नाही भुंकणार !!!
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Wed, 09/22/2010 - 11:30

Permalink

बाकि काहीही असो पण अदिती चाल

बाकि काहीही असो पण अदिती चाल मात्र तशीच्या तशी गो बाय... मी म्हणुन बघितल्...आता जरा ऐकणार्‍यांच्या नजरा विचित्र होत्या पण चालायचच नाही का? वरचे दाढीमिश्या, डबाडबड, अन बाकि सारे हुच्च कलंदर!! एकुण पुरा ह. ह. पु. वा. पो. दु. ला.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 09/22/2010 - 11:36

Permalink

कानपुरातल्या हडताळाचे मिपावर

कानपुरातल्या हडताळाचे मिपावर उठलेले पडसाद आवडले.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Wed, 09/22/2010 - 13:06

Permalink

हत्तैच्या !! ही पोग्री जरा

हत्तैच्या !! ही पोग्री जरा 'यिक्षिप्त'च हाय !!
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 6646 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com