तू येशील आणिक जाशीलकाही देशील ,काही घेशीलपहाटेच्या साखरस्वप्नांनागुलाबी बनवून जाशील!भरती-ओहोटीचा खेळ होईलकिनारा परत एकटा राहीलतेव्हा जपलेल्या खुणांनासांग नातं कधी देशील?अर्थ, संदर्भ गोठून जातीलजेव्हा तुझे शब्द ऐकू येतीलपण एकटं असतानातेच तर माझी साथ देतील!मग अशीच तू वेळ ठरवशीलभेटण्यासाठी इथं येशीलघड्याळातल्या काट्यांनासांग तेव्हा तू कसं बांधशील?वेळ संपली, आता तू निघशीलपण आता एक करशील?पुन्हा आपण भेटतानानिदान ह्या नात्याचं नाव सांगशील? --- मी अश्विनी
प्रतिक्रिया
12 Apr 2008 - 1:54 pm | फटू
कधीतरी अकरावी बारावीला असताना वाचलेल्या सुहास शीरवळ्करांच्या एका कादम्बरीतील ओळी आठवल्या...
तुझं येणं तुझं जाणं, तुझं हसण तुझं रुसण
तुझ्या नुसत्या असण्याने माझं जीवन समृद्ध केलं...
... तेव्हढच एक सांगायचं राहून गेलं...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो
मी शोधतो किनारा...
12 Apr 2008 - 2:24 pm | आनंदयात्री
भरती-ओहोटीचा खेळ होईल
किनारा परत एकटा राहील
याचा अर्थ नीट लागला नाही :( .. किनारा कधी एकटा होउ शकतो का ? जिथे पाणी संपते तिथुन किनारा सुरु होतो अशी सर्वसाधारण कल्पना जनसामान्यात असते, कवियत्रीच्या मनातली कल्पना जाणुन घ्यायला आवडेल.
12 Apr 2008 - 11:25 pm | मी अश्विनी
हो, किनारा एकटा होऊ शकतो .कारण पाणी सोबत असताना किनार्याला काय आणि किती आनंद होतो ते किनार्यालाच माहित असते.कोणी सोबत असण्याचे महत्तव,कोणी सोबत नसताना कळते. भरती आल्यावर किनार्याला आनंद होतो,आणि ओहोटी झाल्यावर दु:़ख होते.ते एकटेपणाचे दु:़ख असते.
अशी माझी कल्पना आहे.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
17 Apr 2008 - 8:19 am | विजुभाऊ
हो किनारा एकटा होउ शकतो.
कवीतला सोडा अगदी भुगोलाचे उदाहरण घ्यायचे झाले तर उझबेकिस्तान मधे "अरल" नावाचा समुद्र आहे/होता .तीस वर्षापूर्वी पर्यन्त तो चांगला मोठासा माशा/ जहाजांचा नान्दता समुद्र होता.
त्या समुद्राला मिळणार्या सगळ्या नद्या त्यावेळच्या रशियन सरकारने त्यांवर मोठी मोठीधरणे बान्धुन ते पाणी अडवले आणि ते पाणि सिन्चन साठी वापरले. त्यामुळे समुद्र अक्षरश: आटला.
त्या वेळेचे बन्दराचे शहर आता समुद्रापासुन जवळ जवळ १०० की.मी दूर आहे.
य इथे पहा अरल समुद्राची दुर्दशा http://youtube.com/watch?v=2hu0Hr9eS_g
आता दिसतात केवळ बुडलेली मोठी जहाजे , मिठाचे ढिगारे , आणि वाळवंट.
17 Apr 2008 - 10:45 am | आनंदयात्री
अरे बापरे, अरलचे उदाहरण खतरनाकच आहे, भयंकर.
>>हो किनारा एकटा होउ शकतो.
बाकी किनारा एकटा होउ शकतो याच्याशी असहमत. अहो किनारा अन सागर हे दोन्हीही एकमेकांना पुरक आहेत, किनार्याची व्याख्या काय ? जिथे समुद्राचे पाणी संपते तिथे असणारी जमीन, अशी काहितरी, बरोबर ? आता अरल च्या उदाहरणात किनारा कुठे आहे तुम्हीच सांगा, जुन्या बंदराच्या शहरात की सध्या १०० किमी लांब जिथे समुद्र आहे तिथे ? किनारा कधीच एकटा होउ शकणार नाही सर, तुमचा अरल जितका लांब जात राहिल तितका किनारा पण त्याच्याबरोबर जात राहिल, अंतापर्यंत. ज्या दिवशी अरल संपेल तेव्हा किनार्याचे पण अस्तित्व नसेल, असेल ते फक्त रखरखते वाळवंट.
डिस्क्लेमरः सदर किनारा एकटा होण्याच्या स्पष्टीकरणाचा वरिल कवितेच्या भावार्थाशी काहिही संबध नाही/ लागत असेल तरी लाउ नये, प्रतिसादकाचा उद्देश फक्त "किनारा एकटा होणे" या कल्पनेवर उहापोह करणे आणी त्याचे संबधित मत पटवुन देणे एवढेचा आहे/असेल.
17 Apr 2008 - 11:38 am | मनस्वी
सहमत.
जिथे समुद्र / नदी धरणीला स्पर्श करते तो किनारा.
समुद्राला किनारा आणि किनार्याला समुद्र हा असणारच.
हेच म्हणते.
17 Apr 2008 - 11:50 am | धमाल मुलगा
आयला, इथं कवितेसारखा तरल विषय चालू आहे आणि तुम्ही काय भूगोलात शिरलाय रे? (आणि हे तरल विषय वगैरे 'मी' बोलतोय..च्यायला गंमतच आहे!)
अस्तो! आमच्याकडं किनारा एकटा असतो !!! काय म्हणणं आहे? किनारा पण एकटा, लाट पण एकटी, किनार्यावर पिउन टाकलेलं शहाळं पण एकटं आणि त्यातली स्ट्रॉ पण एकटी...
च्छ्या: लईच एकटं एकटं वाटायला लागलं बॉ !!!!
- (भर गर्दीत एकटा) ध मा ल.
17 Apr 2008 - 11:55 am | आनंदयात्री
डिस्क्लेमर वाच.
बाकी "वो तो है अलबेला .. हजारो मे अकेला" आठवले.
17 Apr 2008 - 12:02 pm | धमाल मुलगा
वाचला होता की...पण वाद घालायला कारण काय काहीही पुरतं की!
'नुसता डिस्क्लेमर टाकून तुम्ही पळवाट शोधली असा अर्थ होत नाही' असंही म्हणणारे म्हणू शकतात ना :-)
माझ्यावरून? कमाल आहे! मे कुठे अलबेला आहे? हां फारतर फार 'हललेला' म्हण...ते ग्रांटेड.
-(हललेला) ध मा ल.
17 Apr 2008 - 12:10 pm | आनंदयात्री
>>वाचला होता की...पण वाद घालायला कारण काय काहीही पुरतं की!
ह्यो गावला खरा मराठी माणुस !! :))
>>'नुसता डिस्क्लेमर टाकून तुम्ही पळवाट शोधली असा अर्थ होत नाही' असंही म्हणणारे म्हणू शकतात ना :-)
:))))))))))))) हहपुवा .. तुझ्या शब्दात "फुटलो ना मी"!
>>माझ्यावरून? कमाल आहे! मे कुठे अलबेला आहे? हां
तुझ्यावरुन नाय बे "(भर गर्दीत एकटा) ध मा ल." वरुन ..
17 Apr 2008 - 12:22 pm | धमाल मुलगा
ह्यो गावला खरा मराठी माणुस !! :))
हां मंग !!!! तुला काय वाटला?
तुझ्यावरुन नाय बे "(भर गर्दीत एकटा) ध मा ल." वरुन ..
असेल, तसेही असेल. ज्याला जे समजायचं तो ते समजू शकतो. आपण कोणाकोणाची तोंडं धरणार?
माझ्यासाठी हा विषय ईथेच संपला. ह्यापुढे ह्यावर मी तरी कोणतीही चर्चा करु ईच्छित नाही!
- (अलबेला'च')ध मा ल.
17 Apr 2008 - 12:24 pm | आनंदयात्री
>>माझ्यासाठी हा विषय ईथेच संपला. ह्यापुढे ह्यावर मी तरी कोणतीही चर्चा करु ईच्छित नाही!
बेक्कार डिप्लोमसी ... आयला शिकलं शिकलं .. बेण हुश्शार झालं !
12 Apr 2008 - 10:01 pm | प्राजु
कविता आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Apr 2008 - 2:18 pm | Bandopant
अर्थ, संदर्भ गोठून जातील
जेव्हा तुझे शब्द ऐकू येतील
पण एकटं असताना
तेच तर माझी साथ देतील!
झक्क्कास
16 Apr 2008 - 3:21 pm | शेवटचा बाजीराव
एकदम मस्त.
16 Apr 2008 - 8:06 pm | पिस्तुल्या
अबब!! लय भारी बुवा.
काय कविता आहे . आवडली बुवा.
असच॑ मनापासून लिहीत जा. आम्ही फक्त वाचणार बुवा!!
-तुमचा आमचा सर्वा॑चा
पिस्तुल्या
16 Apr 2008 - 11:44 pm | मी अश्विनी
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.....