(1993 च्या आसपास कधीतरी आलेल्या दलाल या मिथुन चक्रवर्ती अभिनीत टुकार हिंदी चित्रपटातील "ठेहरे हुए पानीमें" या भावस्पर्शी गीताचा स्वैर मराठी अनुवाद...)
नको मारू खडा रे सख्या
संथ निवांत या पाण्यावर
उमटतील रे तरंग त्याचे
माझ्या स्तब्ध या मनावर
तुझ्यासाठी अनोळखी मी
अन् तुही तसा परका मला
कसं जाणल तू दु:ख माझं
घाव जगापासून लपलेला
सा~यानाच वेड असतं रे फुलांचं
कुणी प्रेम करत नाही काट्यांवर
मीही अशीच एक अभागी काटा
नसू दे रे त्याची सावट तुझ्यावर
तूच सांग रे सख्या मला आता
कसा घ्यायचा स्वप्नांचा झोका
अपुर्या राहतील इच्छा मनीच्या
चालत नसते कधी वाळूत नौका
नको मारू खडा रे सख्या
संथ निवांत या पाण्यावर
उमटतील रे तरंग त्याचे
माझ्या स्तब्ध या मनावर
आपला,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो
मी शोधतो किनारा...
प्रतिक्रिया
5 May 2010 - 5:24 am | शुचि
आवडली कविता
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||