सर

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
18 Sep 2010 - 12:18 am

नमस्कार,नमस्कार........

विशेष नोंद : मी मिपावर इतर लेखांवर प्रतिसाद देत नाही व ह्यापुढे देणार नाही.पण मी लेख वाचतो,काही चांगले असतात्,आभ्यासु,वैचारीक,नवीन माहीती देणारे असतात.माझ्या एका लेखाच्या प्रतिसादात आधीच सांगितल्याप्रमाणे माझ्यासारख्या फडतुस in turn थर्ड क्लास माणसाने एक भिकार लेख लिहावा व त्यावर आपल्यासरख्या प्रेमळ माणसांनी प्रतिसाद द्यावेत,ही गोष्ट माझी पातळी(पडलेली) उंचावल्याचा भास करुन देते.

हो,फुकट आपुलकी मिळावी म्हणुन लिहल आहे,आपण खवमधे आपले विचार कळवावेत्,भीक आनंदाने स्विकारली जाईल.असो.

आज माझ्या शाळेतल्या आवडत्या शिकक्षकाबद्दलचे व जुना आहे म्हणुन आवडायला लागलेल्या एका मित्राचे काही अनुभव सांगत आहे,आज काहीतरी मनाला लागलेले share करतोय.

माझ्या त्या सरांबद्दल फार काही लिहणार नाही.पण थोडक्यात सांगेन की हा तोच माणुस जो एका गरीबाची पोर मराठीत नापास झाली म्हणुन "अरे हीचे पुढे काय होणार?" अस छोट्या पोरासारख बोलला व भर वर्गात ढसाढ्सा रडला.हा तोच जो शाळेच्या व्यवस्थापनाशी भांडुन "गरीबांना फीमधे सवलत द्या" असे रडगाणे गात अनेकांशी वाकड्यात गेला.आणि हा तोच माणुस ज्याला मी बापाला घाबरायचो त्यापेक्षा जास्त घाबरायचो,पण त्याने माझ्यावर आईसारख प्रेम केल्,हो उगाच लिहत नाही,लिहीन कधीतरी सविस्तर.

आणि तो मित्र म्हणजे माझ्याबरोबर बसुन सिगरेट ओढणारा,लफडा,भाईगीरी वगैरेची पुर्ण माहीती असणारा.पण हो मनाचा चांगला म्हणुन मी त्याला सहन करायचो."साल्या मलापण शिकव ना" व "मला तुझे आर्धे मार्क्स देना,मी पास होईन" अस 'तपासलेले पेपर' हातात आले की बोलायचा.मी कधी त्याला गंभीरपणे घेतले नाही.

आता मेन स्टोरी सुरु.

"काय शॉन,घरात एकटाच का?" त्याने मला माझ्या जुन्या नावाने बोलावले.लगेच मनात काहीतरी झाल
"ये आत ये"
"कधीच घरात नसतोस्,त्यादीवशी पण वर्गणी घेतली तु नव्हतास.आज केबलचा प्रॉब्लम होता,तुला विचारायला आलो,तुझ्याकडे आहे का म्हणुन"
"अरे थॅन्क्स यार्,नसेल कदाचित्,ते सोड,बोल शाळेतले काही माहीती पडले का?"
मित्र बसला होता,आवडीने बोलु लागला
मग चिक्कार आठवणी निघाल्या...हा काय करतो,ती काय करते,ह्याच लग्न झाल,तिचा बॉयफ्रेंड आहे का,हा इकडे काम करतो,ह्याचे वडील वारले,ह्याला अमके व्यसन आहे,वगैरे वगैरे सर्व बोलुन झाले.खदखदुन हसलो.मग त्या विषयाला हात लागला.

"साला तुम कमजोर लोकं म्हणुन शाळेतच तुमच शिक्षण संपल" मी.(जैसा देस वैसा भेस)
मी अगदी हक्काने बोलतो माझ्या मित्रांशी.
"झालच तस ना!" तो मित्र.
"काय झालच तस!! नापास झालास?? मी कधीच नाही झालो का? T.Y ला ८० % काढले ना? पुढेही शिकलो,आता थोड्या महीन्यात अजुन शिकेन........मी कसा होतो पहील्यांदा?" मी.
"हे च्यायला खरय्,काय होतास नी कस काय सुधारलास?बर झाल ती संगत सोडलीस....."
"बस कर,तुझ बोल.....तु काय केलस?"
"तो सर होता ना,काय पुढे जाउन देईल?"
सरांविरुध्द ऐकल्याने मला राग आला.सरांबद्दल अस बोलणारा हा पहीलाच भेटला होता.
"सर के बारे मे संभाल के बोलना,आपल नशीब म्हणुन तो सर आपल्याला भेटला.स्वःताच्या चुका का लपवतोस?" आता मी गंभीर होतो.मुड पुर्ण बदलला होता.
"मला माहीतेय सरांनी ड्स्टर फेकुन मारला होता,आणि मला टेंबु आल होत"
मला तो 'टेंबु' हा शब्द ऐकुन गंमत वाटली.पण हा तस का बोलला ते मीहीती करायच होत
'हा मग,म्हणुन शाळा सोडलीस?"
"नाही,ते नववीत झाल्,मी दहावीत शाळा सोडली"
"का?"

मग सरांशी त्यांच्या केबीनमधे झालेल ह्याच भांडण with dialogues ऐकायला मिळाल.
"सरांच्या माराला समजला असतास्,तर आज खुप शिकला असतास"मी
"ऐकुन तर घे,त्यारात्री काय झाल माहीतेय.............मी सराला मारल"
मी दचकलो.
"क्काय?"
सरांना ह्याने मारल होत पण ते चुकुन होत्,चुकुन हात लागला.पण हेच पुरेसे होते.
"अरे वेड्या,एवढ काय झाल?"मी
"अरे मला बोलतो लाल शेरा देईन्,मी ओळख काढुन काम करुन घेतल पण रोज कोण तो राग सहन करणार"......................."माझी चुकी नसताना मला मारल वरुन मला लाल शेरा? कीती सहन करु?"
माझ्याकडे बोलायल काही नव्हत.चुक असेल त्याची पण सरांना समजुन घेतल पाहीजे होत.आमचे सर जाम खडुस्,रागीट्,मारकुटे पण आपला बाप आपल्याला का मारतो हे आपल्याला समजायला हव हे माझ मत.हे त्याला माहीती होत्,म्हणुन जास्त काही बोललो नाही.त्याला प्रतिक्षा होती की मी त्याला दुजोरा द्यावा.मी तस करणार नव्हतो.
"मलाही खुपवेळा चुक नसताना मारल्,मग?"
"चालेल मारल तर्,पण माझ ऐकुन तर घ्यायला हव ना?"
हा मुद्दा तगडा होता.चुक सरांची होती,समजावुन सांगायला हव होत.तसा हा मित्र ढ असला तरी मस्ती कधीच करत नव्हता.
" हो,पण तु शाळा सोडायचीस? कॉलेजला तो नव्हता"
"माझा मुडच गेला होता,एकदाची दहावी पुर्ण करुन मला मोकळ व्हायच होत"
" मी खुप सहन केल पण कधी शिक्षण सोडल नाही"
"मी पण नसत्,स्कॉलर झालो असतो.ती xyz मला भेटली असती,पण मला स्कॉलरशिप नव्हती ना? साला आपण मागेच राहीलो तुमच्या सगळ्यांच्या"
आता ह्याला कोणती 'स्कॉलरशिप' अभिप्रेत होती माहीती नाही,पण ते वाक्य माझ्य मनाला लागल.तो बोलला त्यात हतबलता होती,दु:ख्,पश्चाताप होता.

"तुमच सरांनी चांगल केल रे,मी काय कोणाच केल होत?" मित्र तळमळीने बोलला.
मला वाईट वाटल,"सरांनी अस का केल? मारल वरुन त्याला समजवायच सोडुन अजुन ओरडले" मला हे कदाचित मित्राच्य सहानभुती मुळे असेल पण सरांविषयी थोडासा राग आला.कारण मित्राने जे केल ते साफ चुकीच होत पण त्याला जे कारण पुरेसे झाले ते खरच पुरेसे होते का हा व्ययक्तीक प्रश्न होता
सरांच्या मुलांना समजुन न घ्यायच्या सवयी मुळे ते कधी चांगला बापही होउ शकले नाहीत हे मला अजुन माहीती मिळाल्यावर समजल.सरांच्या स्वभावातली समजुतदरपणाची उणीव एखाद्याला एवढी नडली हे मला अस्वस्थ करत होत.
माझ्य आवड्त्या,आदर्श सरांना मीच चुकीच ठरवत होतो.

थोड्यावेळाने पेये घेतली.त्या घटनेचा परीणाम मित्रावर खरच खोलवर झाला होता हे मला त्याच्या 'मोकळ्या मनाचे विचार' कळल्यावर वाटल.
पण ते सर म्हणजे आम्ही त्यांना पुजाव ह्या लायकीचा माणुस.ज्या गावात शिकवायचा तिथल्या घाण राजकरणाला कंटाळुन गाव सोडुन निघाला तेव्हा गावाच्या माणसांनी आंदोलनं केली असा तो माणुस.
रात्री तीनला गावावरुन येउन,दीवाळीच्या पहील्यादीवशीही रोजप्रमाणे सकाळी साडेपाचला ईंग्लीशचा क्लास घेणारा तो माणुस.
तो आमच्यासाठी झटला,आमच्या आवडीचा बनाला,आम्हाला खुप मारणारा तरी खुप आवडणारा होता.
माझ त्या सरांबद्दलचे मत बदलल हव होत की नाही माहीती नाही. पण मनात प्रश्नचिन्हं उभी राहीलीत.

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

चांगलं लिहिलंयस .... :)

मनातलं लेखणीतून उतरवता येणं फार मोठी गोष्ट असते शानबा....
तुला सहज जमतंय ते.
आता सरांचे व्यक्तिचित्रण येऊदे.

शुचि's picture

18 Sep 2010 - 4:07 am | शुचि

लेख आवडला. सरांचा तापट (हेड्स्ट्राँग) स्वभाव त्यामुळे विद्यार्थीच काय स्वतःच्या मुलाला समजावून न घेता येणं वगैरे पैलू किती लीलया दखवता तुम्ही शानबा.
आणखी कणव येते ती त्या मित्राची, मार खाऊन खाऊन कंटाळलेल्या, कोणीतरी समजऊन घ्यावं असं ज्याला वाटतं अशा ढ मित्राची. बिच्चारा.

>> आपला बाप आपल्याला का मारतो हे आपल्याला समजायला हव हे माझ मत>>
छानच!

इंटरनेटस्नेही's picture

18 Sep 2010 - 4:19 am | इंटरनेटस्नेही

खरोखर छान! असेच लिहीत रहा.

पैसा's picture

18 Sep 2010 - 8:40 am | पैसा

आता नाण्याची दुसरी बाजू, जी ओझरती दिसली ना, ती सगळी येऊ दे.

ईन्टरफेल's picture

18 Sep 2010 - 8:36 pm | ईन्टरफेल

आपला बाप आपल्याला का ? मारतो

हे आपनच समझुन घ्यायला हव

कारन तो आपला बाप आहे

आमच म्हातार बि आजुन आमाला

ऊचलुन टाकतय एक परस वर ऊचलत

आनि परत खालि टाकत !

स्वाती२'s picture

19 Sep 2010 - 6:48 pm | स्वाती२

लेख आवडला.
शिक्षक कितीही चांगले शिकवणारे असले तरी मुलांना मारणे हे चूकच. मी चौथी पर्यंत ज्या शाळेत शिकले त्या शाळेत भरपूर मार बसायचा. साधं एक गणित चुकलं तरी हातावर पट्टीचा मार. माझी मैत्रीण तर सतत टेंशन मधे असायची. सतत घाबरलेली. ५वी ला शाळा बदलायची. या शाळेत मार बसायचा नाही. नव्या शाळेत गेल्यावर अक्षरशः जेल मधून सुटल्यासारखे वाटले होते. या नव्या शाळेत मार बसायचा नाही म्हणून आम्ही अभ्यास केला नाही, बेशिस्त वागलो असेही नाही. मग चौथी पर्यंत शिस्तीच्या नावाखाली आम्हाला मारुन शिक्षक काय मिळवत होते?

शानबा५१२'s picture

19 Sep 2010 - 7:38 pm | शानबा५१२

आम्हाला मारुन शिक्षक काय मिळवत होते?

विद्यार्थाला माराची भीती,अपमाणीत होण्याची भीती व तत्सम mental tensions आभ्यास करण्यास प्रवृत करावी हा प्रामाणिक हेतु असतो.पण कोणत्या शिक्षकाचा तो कीती प्रामाणिक असतो हा प्रश्न आहे व ह्या हेतुच्या नावाखाली स्वःताचा राग,मत्सर काढण्यात येतो हेही खरे.

ही गोष्ट मी कॉलेजमधे असतानाची.
माझ्या एका प्राध्यपकाने ज्याला वर्गात सारख अपमाणीत करुन "तु काय फर्स्ट क्लास काढणार" वगैरे बोलुन जी जिद्द निर्माण केली ती त्या विद्यार्थ्याने आपल्या नावामागे 'डॉक्टर' ही पदवी लागेपर्यंत शाबुत ठेवली.

जेव्हा तो विद्यार्थी आमच्या त्या प्राध्यपकाच्या बाजुला स्टेजवर उभा होता,तेव्हा ते प्राध्यापक सर्व गोष्ट सांगुन आम्हाला व त्या विद्यार्थाला उद्देशुन म्हणाले "आता कळले मी का अस बोलायचो व बोलतो ते.तुम्ही आता सोडुन जाणार आहात म्हणुन सांगतोय"
त्यामुळे मी बहुतेक वेळा प्राध्यापकांची बाजु घेतो पण कधीकधी ते चुकतात.

सर्वांचे प्रतिक्रीयेबद्दल आभार.

गणेशा's picture

20 Sep 2010 - 7:03 pm | गणेशा

वरील उदाहरण ही जास्त भावले..

बाकी स्वाती जी बोलत आहे ते ही खरे आहे.
माझेच उदाहरण देतो .. स्वता बद्दल पहिल्यांदा हे लिहित आहे आनंद वाटतो आहे .. धन्यवाद शानबा
-

गावाला चौथी पर्यंत २-३ विषयात कायम नापास व्हायचो .. विषय - गणित, शास्त्र आणि मराठी .
बाई खुप मारायच्या त्यामुळे कधी लक्ष दिले नाहीच कधी.. आणि वरुन तु पुढे कधीच जावु शकत नाही.. असे म्हणुन माझ्याच पाटीने माझ्याच डोक्यात मारले जाय्चे
पाचवीला ढकलला गेलो.
नविन शाळा .. नवे सोबती ..
मराठी ला मारक्याच madam होत्या, पण गणिताला भोर madam होत्या.
मला फक्त बेरीज येत होती आणि पाढे ही येत नव्हते .. बाकी त्यांना मी कसा आवडलो माहीत नाही . त्यांनी घरी बोलावले .. १ आठवड्यात माझा कायापालट झाला . पाचवी च्या सहामाई पासुन मी गणितामध्ये पहिला यायला लागलो.
सहावीला पैकी च्या पैकी मार्क ..
आणि बी.सी.एस मध्ये गणिता मध्ये सर्व year la topper होतो. त्या madam मुळे माझे सर्व काही बदलले गेले . शतश: आभार माणले तरी कमीच. अजुनही जातो मी त्यांच्या कडे.

मराठी ला ९ वी पर्यंत वाईट अवस्था होती, काठावर पास होतो कायम. शास्त्र, गणित मध्ये टॉप आणि मराठीत काठ . अजुनही लेखनातील शुद्धलेखनाच्या चुका जास्त आणि शब्द कमी हीच परिस्थीती आहे. नववीतील कणा कविता जास्त भावली खुप वेळा वाचली .. धुणं धडा खुप आव्डाय्चा वाचायला.. वर्गात आठवड्यात २ तास लास्ट चे होते .. madam वाचायला लावयच्या तोच वाचायचो.

हळु हळु वाचणाची आवड वाढली . कविता कधीच आवडत नव्हत्या .. पण आता ४०० + लिहिल्यात याला कारण आपले नेट वरील सर्वांचे लिखान आणि प्रतिसाद..

असो
-
गावाचे नाव : उरुळी कांचन
शाळा : महात्मा गांधी विद्यालय .
मला भेटलेल्या सर्व शिक्षकांचे आभार