सार्वजनिक गणेशोत्सव : जनजागृती
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवाहन -उत्सव त्याच्या मूळ उद्देशानुरूप साजरा करा !
१०७ वर्षांपूर्वी लोकमान्य टिळक यांनी समाजसंघटन, राष्ट्ररक्षण, पाश्चात्त्य संस्कृतीच्या आक्रमणाचा प्रतिकार व धर्मजागृति या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला; परंतु सध्या उत्सवाच्या दरम्यान निधिसंकलनातील जबरदस्ती, गणपतीच्या दर्शनासाठी येणार्या महिलांशी असभ्य वर्तन, मंडपात मद्यपान करणे जुगार खेळणे, मिरवणुकीत दारू पिऊन नाचणे, ध्वनिप्रदूषण अशा अनेक गैरप्रकारांमुळे उत्सवाचा मूळ उद्देश हरपला आहे. उत्सवातील शास्त्रविसंगत मूर्ति, सजावटीवर होणारा अनावश्यक खर्च, उत्सवातील रेकॉर्ड ,डान्स, लैंगिकता असणारे चित्रपट यांसारख्या कार्यक्रमांमुळे त्याचे पावित्र्यही नाहीसे झाले आहे. आपल्या उत्सवाचा मूळ उद्देश साध्य करणे आवश्यक आहे.
गणेशोत्सवकाळात फटाके लावू नका !
गणेशोत्सवाच्या काळात सर्वत्र गणपति पहाण्यासाठी लोकांची गर्दी झालेली असते. अशा वेळी फटाके लावणे अगर फटाक्यांच्या पेटत्या माळा हवेत फेकणे यांमुळे लोकांना, विशेषत: लहान मुलांना इजा होण्याचा संभव असतो. तसेच ध्वनिप्रदूषणाचा त्रासही मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो. ही बाब सर्व गणेशोत्सव मंडळांनी व नागरिकांनी लक्षात घेऊन फटाके लावण्याचे टाळावे. यातूनही गणेशोत्सवाचे पावित्र्य राखण्यात व तो शांततेत साजरा करण्यात आपण खारीचा वाटा उचलू शकतो.
गणेशोत्सव मंडळांनो, गणेशोत्सवाचे आर्थिक नियोजन असे करा !
निधीचा सर्वांत जास्त उपयोग अध्यात्मप्रसारासाठी करावा. अध्यात्मप्रसाराची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
१.परिसरातील देवळांची साफसफाई, डागडुजी, देखभाल व जीर्णोद्धार करणे,
२. नजीकची तीर्थक्षेत्रे, देवळे यांचे उत्सव साजरे करण्यास मदत करणे,
३. भारतीय संस्कृतीची जोपासना करणार्या व्यक्ती व संस्था यांना मदत करणे,
४. वेद आणि योगशास्त्र यांचा अभ्यास करणार्या, तसेच दुर्मिळ आध्यात्मिक ग्रंथांचे जतन व अभ्यास करणार्या संस्थांना मदत करणे,
५. अध्यात्मप्रसार करणार्या संस्थांना वस्तुरूपाने किंवा आर्थिक रूपाने मदत करणे, उदा. प्रवचनासाठी ध्वनियंत्रणा अल्पदरात वा विनामूल्य उपलब्ध करून देणे.हेसुद्धा जनप्रबोधनात्मक असावे, उदा. समाजाचे प्रबोधन करणारे पथनाट्य, स्फूर्तिप्रद गीते, पोवाडे, इत्यादि.
आदर्श गणेशोत्सव मंडळांना आवाहन !
गणेशोत्सवाचे पावित्र्य सांभाळून तो सण साजरा करायचे उद्दिष्ट आपण आपल्यासमोर ठेवले असले, तरी,, तसे न करणारीही गणेशोत्सव मंडळे आहेत. हे लक्षात घेऊन केवळ आपल्या गणेशोत्सवाचा विचार न करता, जेथे गैरप्रकार होतात ते बंद करा . .त्याने व्यापक विचार करायची सवय होऊन पुढे राष्ट्राचाही विचार करता येतो.
गणेश मंडळांना गणेशोत्सव अश्याप्रकारे साजरा करण्यात अडचण काय आहे ? गणेश मंडळांना एक छोटासा गणेशोत्सव का साजरा करता येत नाही ?
प्रतिक्रिया
14 Sep 2010 - 12:29 am | प्राजु
तळमळीने लिहिलेला आहे लेख. आवडला.
15 Sep 2010 - 5:04 pm | लीना सचिन चौधरी
जास्तीत जास्त लोकांना माहिती ह्वावी यासाठीच हा प्रयत्न.
संदर्भ: http://dainik.sanatan.org/visheshank/lokmanya_tilak/
15 Sep 2010 - 5:56 pm | नितिन थत्ते
सनातन प्रभातची साईट पाहतोय असे वाटले.
15 Sep 2010 - 6:00 pm | परिकथेतील राजकुमार
खडूफळावाली बै...
जो लोग बरसो से गीता, रामायण, कुराण पढके जागृत नाही हुए, वो तुम्हारे कॉपी पेस्ट किये हुए लेख पढके क्या खाक जागृत होंगे ??
परा पाटेकर
15 Sep 2010 - 6:08 pm | छोटा डॉन
गणेशोत्सवाचा सामाजिक कार्यासाठी उपयोग, तिथल्या कार्यकर्त्यांच्या मनुष्यबळाचा विधायक उपयोग आदी बाबी मान्य असुन पटल्या असल्या तरी लेख तितकासा आवडला नाही.
लेख अत्यंत बाळबोध, पुस्तकी आणि एकांगी वाटला.
प्रत्येक वाक्यावर वाद घालत बसत नाही पण आपणच एकदा गणेशोत्सव मंडळांचे कार्य पहावे ही विनंती करतो.
आपण लेखात लिहलेल्या कित्येक चुकीच्या गोष्टी केव्हाच हद्दपार झाल्या आहेत.
राहता राहिला प्रश्न तो उत्सवाच्या पद्धतीचा ( म्हणजे सजावत, धामधुम, खर्च, झगमगाट, केव़ळ करमणुकीचेच कार्यक्रम वगैरे वगैरे ) तर ते बंद केल्यास अथवा त्यावर अशीच टिका होत राहिल्यास 'उत्सवातील जान निघुन जाईल' असे आमचे स्पष्ट मत आहे.
एकदा ह्या वारंवार होणार्या टिकेमुळे किंवा बंधनांमुळे मंडळात कार्यकर्ते जमणे बंद झाले की मग बसा शांततेचे ढोल वाजवत.
मात्र हेच कार्यकर्ते किती वेळा समाजाच्या मदतीला धावुन आले ह्याचीही आठवण जरुर काढाच ...
- ( सार्वजनिक गणेशोत्सवाचा कडवा समर्थक ) छोटा डॉन
15 Sep 2010 - 6:21 pm | अवलिया
जनजागृती होवो न होवो... बाप्पा स्वकोषमग्नाल्पबुद्धीविचारवंतांना सुबुद्धी देवो अशी प्रार्थना आम्ही लालबागच्या राजाला नुकतीच केली आहे.
15 Sep 2010 - 6:23 pm | llपुण्याचे पेशवेll
नान्याशी बाडिस.
15 Sep 2010 - 6:25 pm | छोटा डॉन
>>जनजागृती होवो न होवो... बाप्पा स्वकोषमग्नाल्पबुद्धीविचारवंतांना सुबुद्धी देवो अशी प्रार्थना आम्ही लालबागच्या राजाला नुकतीच केली आहे.
+१, हेच म्हणतो.
" जनजागृती, माहितीचा अधिकार, मानवी हक्क, सामाजिक हक्क" आदी बाबतीत आजकाल पब्लिकची भयंकर गल्लत होत आहे असे वारंवार वाटत आहे.
- ( दहीहंडी /गणपतीच्यावेळी कानात बोळे घालुन मस्तकाला झेंडुबाम चोळणारा आणि उत्सवाच्या नावाने खडे फोडत दुसर्या दिवशी उच्चभ्रु लेख लिहणारा ) छोटा डॉन
15 Sep 2010 - 11:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आजच दोन भविक लोकांनी फोनवर "काय मेले हे सार्वजनिक गणेशोत्सववाले आवाज करून जीव नकोसा करून टाकतात" ही तक्रार माझ्यासमोरही केलेली ऐकून अंमळ गंमत वाटली.