पावसाच्या आठवांत
माझा जीव चिंब झाला
निथळत्या अंगणात
गंध दरवळ ओला
तगमग झाली शांत
तृष्णा धरेची भागली
काळी माझी माय
पुन्हा कामाला लागली
सृष्टी झाली झाली दंग
गान वृक्षांचे आगळे
साज मोत्यांचे लेऊन
उभे पूजेला ठाकले
असे भिजले गं मन
जशा श्रावणाच्या सरी
काया झाली हलकीशी
निळ्या कान्ह्याची बासुरी....
प्रतिक्रिया
11 Sep 2010 - 8:39 pm | शुचि
खूप सुंदर!
>> काळी माझी माय
पुन्हा कामाला लागली >>
ही ओळ विशेष आवडली.