दोघे

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
10 Sep 2010 - 12:49 pm

दोघे
एक देशातला
एक परदेशातला
दोघांचीही लग्ने होउन साधारण १० वर्षे झालेली.
............................................................................................................................
देश
"हलो"
बोल्,आता काय झाले?
"अहो काय म्हणायचे तुमच्या ह्या विसराळुपणाला.? की मुद्दाम असते हे"?
आयला आता नेमके काय ते बोल की.
"ती पिशवी माळ्यावर टाकायला सांगितले होते ना?"
घरी आल्यावर टाकतो.
"तुमचे हे नेहेमीचेच"
असु दे.
"असु दे काय? माझ्या मैत्रीणी येणार आहेत ना"
मग घे स्टूल आणि तुच टाक.
मी नाही टाकणार.
"मग बोलव वॉचमनला आणि त्याच्याकडुन टाकुन घे"
"मग तुमचा काय उपयोग"?
तेजायला इथे ऑफिस मधे घोळ झालाय. तुझे टोमणे आल्यावर ऐकतो हां.
............................................................................................................................
"पहील्यांदा ती पिशवी वर टाका. नाहीतर उद्या पण ती तशीच राहील".
अग घरात तर घुसु दे. चहा नाश्ता दे. नंतर टाकतो.
"आधी वर टाका. नंतर बाकी सर्व"
बाकी कुठे काय राहीले आहे.
"तर तर. आता ३ तास क्रिकेट बघणार. जेवणार. लगेच घोरायला सुरु. आणि म्हणा बाकी काय"?
............................................................................................................................
परदेश
हलो
येस डार्लिंग.
अरे हनी तु पिशवी माळ्यावर टाकायचे विसरलास.
हाउ फरगेट्फुल ऑफ मी. सॉरी डार्लिंग. आता घरी आल्यावर पहीले काम तेच करतो.
अरे तसे नाही रे माझ्या मैत्रीणी येणार आहेत.
एक्स्ट्रीमली सॉरी. तुला स्टुल घेउन जमेल का? का वॉचमनला बोलवतेस? जरा ऑफिसमधे घोळ आहे. नाहीतर मीच आलो असतो.
ठीक आहे. मी बघते काय करायचे ते. टेक केअर.
राईट. लव यु डार्लिंग.
............................................................................................................................
हलो हनी मी आलो घरी. कुठे आहे ती पिशवी?(%$#@$%^)
"असु दे रे. आज ऑफिसचा दिवस कसा गेला? घोळ संपला का"?
काही ही प्रॉब्लेम नाही.
"तु फ्रेश हो. मी नाश्ता करते."
अग नको. आज आपण बाहेर जाउ जेवायला.
"पण आज बेसबॉल च्या मॅच ची फायनल आहे ना टीवी वर"?
मरु दे. तुझ्या बरोबर डिनरसमोर ती मॅच महत्वाची नाही.($#@^&%$%^&&)
"हाउ नाईस ऑफ यु डार्लिंग. मला आज तु बाहेर नेणार ह्याची खात्रीच होती."
(%$$#@$%%^^%^%$$#%^&& पिशीवीच्या)
................................................................................................................................... ...........
....... ...........
....... . .........
...........
...........
...........
___________________________________________________

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

प्रभाकर कुळ्कर्णी's picture

10 Sep 2010 - 12:54 pm | प्रभाकर कुळ्कर्णी

खुप हसलो बुवा. आवडलं.

ब्रिटिश टिंग्या's picture

10 Sep 2010 - 12:56 pm | ब्रिटिश टिंग्या

तुम्ही परदेशी की देशी?

परिकथेतील राजकुमार's picture

10 Sep 2010 - 1:15 pm | परिकथेतील राजकुमार

ते वॉचमन ;)

काय गुर्जी बरोबर ना ?

नाईट वॉचमन

धमाल मुलगा's picture

10 Sep 2010 - 2:00 pm | धमाल मुलगा

कमी वाच रे, कमी वाच रे....ते मच्याकन कमी वाच रे.

परिकथेतील राजकुमार's picture

10 Sep 2010 - 2:34 pm | परिकथेतील राजकुमार

कमी वाच रे, कमी वाच रे....ते मच्याकन कमी वाच रे.

लेखक सगळे लेखन वाचतोच असे नाही. तुझे मात्र आवर्जुन वाचतो ;)

बाकी माझी प्रतिक्रीया म्हणजे गुर्जींची दाबली गेलेली सुप्त इच्छा आहे हे येथे नमुद करावेसे वाटते. काल रातीच आम्ही गुर्जींना फोन केल्ता तेंव्हा काठी आपटल्याचा आवाज येत होता.

धमाल मुलगा's picture

10 Sep 2010 - 2:49 pm | धमाल मुलगा

धन्यवाद. आपला आभारी आहे.

-पोलाईट धम्या. ;)

>>काल रातीच आम्ही गुर्जींना फोन केल्ता तेंव्हा काठी आपटल्याचा आवाज येत होता.
=)) =)) =)) =)) =))
बास...आम्ही बास.......ह्यापुढचं खवमध्ये बोलु.

चतुरंग's picture

10 Sep 2010 - 4:23 pm | चतुरंग

तू ऐकलास तो आवाज काठीचा नसणार, प्रभूच्या काठीला आवाज नसतो! ;)

धमाल मुलगा's picture

10 Sep 2010 - 4:33 pm | धमाल मुलगा

अगाबाबो....
=)) हम कुच्च नै बोलेगा

परिकथेतील राजकुमार's picture

10 Sep 2010 - 4:39 pm | परिकथेतील राजकुमार

ख प लो !!


प्रभुच्या काठिला नसावा पण देवाच्या भिमटोल्याला असावा असे वाटते.

रामदास's picture

11 Sep 2010 - 2:58 pm | रामदास

जो अंकल दिखता हय वो अंकल नही ऐ साबजी.

विनायक प्रभू's picture

10 Sep 2010 - 1:39 pm | विनायक प्रभू

मी 'अस्सल देशी'
कंप्लीटली,सबजेक्टीवली आणि ऑब्जेक्टीवली हेनपेक्ड.

ब्रिटिश टिंग्या's picture

10 Sep 2010 - 4:49 pm | ब्रिटिश टिंग्या

मी पिण्याबद्दल विचारत नाहीये! :)

विसोबा खेचर's picture

10 Sep 2010 - 1:33 pm | विसोबा खेचर

छान रे मास्तरा..

अवलिया's picture

10 Sep 2010 - 1:39 pm | अवलिया

हा हा हा

काय मास्तर, मॅरेज काउंसेलिंग सुरु केलत की काय? ;-)

गणपा's picture

10 Sep 2010 - 4:41 pm | गणपा

हा हा हा मास्तर. आवडल. :)

अशी बुद्धी परमदयाळू प्रभूने त्यांना का नाही दिली.

बाकी १९५० पासुन प्रभु कौंसेलिंग करुन करुन दमले असतील.

पाषाणभेद's picture

10 Sep 2010 - 7:01 pm | पाषाणभेद

मास्तरांचे लिखाण म्हणजे मेजवानी असते अगदी. एकदम जोरकस सुरूवात.
मास्तर इतके दिवस कुठे होते?

अन मास्तर माळ्यावरचा तो डबा काढला की नाही. तो दुसर्‍या दिवशी काढायचा मग.

बाकी हे चित्र अन ते चित्र डोळ्यासमोर उभे राहीले.

हाहाहा......भारी हो मास्तर!!!

पिवळा डांबिस's picture

10 Sep 2010 - 9:27 pm | पिवळा डांबिस

बाकी सर्व सलामत तर पिशव्या पचास!!!!:)

-हनी हबी
:)

प्रियाली's picture

10 Sep 2010 - 9:26 pm | प्रियाली

लेखन क्रिप्टिक नाही आणि आवडलं. ;)

मुक्तसुनीत's picture

10 Sep 2010 - 11:09 pm | मुक्तसुनीत

लय भारी.
- परदेशी.

राजेश घासकडवी's picture

12 Sep 2010 - 6:26 am | राजेश घासकडवी

हे वाचायचंच राहिलं होतं. हलकाफुलका लेख. जळजळीत देशी असो की स्मूथ विलायती असो, चढते ती चढतेच.

$#@^&%$%^&&

ही अकरा अक्षरी शिवी पुन्हा डोकं वर काढते आहे. तुम्ही, बिपिन वगैरे थोरामोठ्यांना असलेलं ज्ञान असं लपवू नका...

%$$#@$%%^^%^%$$#%^&&

इथे तर मी हातच टेकले. अक्षरं मोजण्याच्या भानगडीतही पडलो नाही.

विजुभाऊ's picture

13 Sep 2010 - 2:14 pm | विजुभाऊ

@#@$%^&^%*&@#@$#$%%$ यापेक्षा जास्त बटणे कळफलकावर असती तर कित्ती बरे झाल्ये असते ना ! ;)
ही ज्योत्यीने तेज्या(यला) ची आरती

जागु's picture

13 Sep 2010 - 3:24 pm | जागु

मस्त मस्त मस्त.