नाचू या, गावू या, चला चला सारे या

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
10 Sep 2010 - 6:18 am

नाचू या, गावू या, चला चला सारे या

शेवटचा दिवस आहे परिक्षेचा
दिवस आहे मजा करण्याचा
कोणा नका सोडू सारे सामील होवूया
कॉलेज, अभ्यास सारे काही विसरूया

कोण आता कोठे दुर जाईल
नोकरी धंदा कोण कोण पाहील
विसरू नका एकमेकां पुन्हा भेटुया
भेट घेवून पुन्हा आनंद लुटूया

कॉलेजातली मस्ती तुम्ही आठवा
मस्तीतले दिवस मनात साठवा
मैत्री आपली सर्वकाळ टिकवूया
विसरू नका काही सारे काही आठवूया

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१०/०९/२०१०

शांतरसकविता