फोनवरचा संवाद व काही प्रश्न

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
9 Sep 2010 - 10:36 pm

नमस्कार,नमस्कार............

मी काही दीवसांपुर्वी "सल्ला हवा आहे" वगैरे काहीतरी एक लेख लिहला होता व विचारल होतं की अमुक व्यक्तीला फोन करायचा आहे.काय बोलु वगैरे.ती माझ्या वर्गात होती.आम्ही ५ ते १०वी एकत्र होतो.
मला ह्या लेखातुन काहीतरी सांगायच आहे व विचारायच आहे.आजचा संवाद सांगितल्यानंतर विचारतो.

"हॅलो"मी
"कोण?"ती.
"कोण लीना? मी सुशांत बोलतोय"
मी ८-९ वर्षांनी तिच्याशी बोलत होतो.पाहील्याला पण तेवढीच वर्षे झाली.

"सुशांत.....हा बोलना"तिचा शंकेने भरलेला सुर.
"कुठे आहेस?"मी
"कोण सुशांत?"
"मी तुझ्या वर्गात होतो ना?.............तो"
"तु कोणी वेगळ आहेस का? तुझा आवाज लहान मुलासारखा येतोय,तु कोणी वेगळा तर आवाज बदलुन बोलत नाहीयेस ना?"
"नाही मी सुशांत्,आपण स्टेशनच्या शाळेमधे होतो" हक्काने आवाज चढवुन बोललो.
"अरे हा!.......सुशांत तु!!!......बोल कसा आहेस?"
मग माझं आडनाव वगैरे आलं.काय करतोयस वगैरे सर्व बोलुन झाल.
"काय सुशांत्,मग लग्न झालं का?"
"कुणाचे एवढे खराब दीवस आलेत?.........मला अजुन पीएचडी पुर्ण करायला कमीतकमी ३ वर्ष आहेत."
"क्काय? आता पीएचडी पण करतोयस?"
"होय"
"I am proud of you!"
"thank you"
"so now what? any girlfriend?"
"no no"मी अगदी interview मधे देतात त्या पद्धीतीने बोललो.
"मग काय खुप वर्षांनी आठवण आली"
"सहज call केला,मला खुप कंटाळा आलाय"
"का काय झाल रे?" चौथी पाचवीतलेतले दोन विद्यार्थी बोलावेत तीच निरागसता व निष्पाप विचार.
"काही नाही,सांगेन कधीतरी"
"अरे वीकी बोलत होता,कुठेच दीसत नाहीस,कुणालाच भेटत नाहीस का रे?"
"मला chemistry शिवाय दुसरे सर्व आता nonsense वाटत.मी सर्वांना भेटायचे टाळतो."
"का रे,काय scientist झालास की काय?"
"नाही,पण होईन"
"कुणाशी बोलत नाहीस मग मला का call केलास?"
"सहज केला,तुला त्रास असेल तर सॉरी,ठेउ का फोन?..मला माहीती नव्हत तुला आवडणार नाही म्हणुन"
"अरे अस काय बोलतोस! मी विचारल काही काम वगैरे असेल अस वाटल"
"नाही काही नाही"
"काय मग आता सुधारलास का? की अजुन............"
"sorry? what do you mean?"
"look sushant,you know what I mean"
आता मला थोडा राग आला.
"ओह...........अच्छा अच्छा..................नाही मी आता फक्त सिगरेट पितो...........ते पण आता चार वर्षांनी सुरु करतोय्,ड्रींक्स पुर्ण बंद"
"अच्छा,मग आता कुठे जॉब करतोस?"
"ते जाउ दे now listen to me,मी तुला एवढ्या वर्षांनी फोन केला व तु मला तेच का विचारलस?"
"मला मधे तुझे मित्र दीसले होते,अजुन त्यांच तसच चालु आहे,तु त्यांच्याबरोबर असायचास म्हणुन विचारल? they are impossible!"
"to hell with them,मी त्यांना खुप वर्षांपासुन भेटलो नाही.मी T.Y ला chemistryमधे ८०% टक्के काढले,M.Sc ला first class काढला ते काय ह्या सवयी ठेउन नाही.I have dedicated myself that way!"
" तु मला फोन कर म्हणुन बोललास म्हणुन विचारल्,मी तुला तेव्हाही चांगलच मानायची पण तुझ्या त्या सवयी व रोज ते नवीन problems!!"
"हे बघ,नको करुस मला फोन व भेटुही नकोस्,पण माझ्याबद्दल स्वःताचे मत बदल..............मी तुला सहज फोन केला..........flirt वगैरे नाही करताय आणि मी सर्व सोडले आहे,मला एकदा भेट व बोल व नंतर हवे ते मत बनव"
"तु सर्व सोडलस हे बरं केलस्,मी तुला आपुलकीने विचारले, पण first impression is last impression....बोल कधी भेटुया?"
"wait,wait.....ya you are right..........first impression is last impression...........मी तुला नंतर call करुन सांगेन ओके?................bye and thanks a lot!"
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

काही प्रश्न :
१. एखादी चुकी माणसाला एवढी वर्षे चिकटुन रहावी? की कीत्येक वर्षांनीही तो कीतीही शिकलेला असला तरी आताही 'तेच' करत असावा ही शंका यावी?
२. Is first impression so important?

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

पैसा's picture

9 Sep 2010 - 10:41 pm | पैसा

ते प्रत्येकाच्या विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे

अनामिक's picture

9 Sep 2010 - 10:53 pm | अनामिक

पहिले "कोण सुशांत?"... म्हणजे तू आठवणीतही नाहीस आणि ती तुझी ओळखही विसरली आहे असे वाटते... पण नंतर लगेच कोण तरी विकी तिला सांगतो की तू आजकाल मित्रांनाही भेटत बोलत नाही... म्हणजे तुझ्या बद्दल माहिती ठेवत असावी असे वाटते. याला विरोधाभास म्हणावा का? लेख काल्पनीक असेल तर चालेलही... पण अनुभव असेल तर काही नाही पटेश!

अहो, शाळेत एकापेक्षा जास्त सुशांत असतील तर नेमका कोण सुशांत अशा उद्देशाने विचारलेले असू शकते.
आणि एखाद्याशी प्रत्यक्षात खूप दिवसात / वर्षात संपर्क नसेल जरी कधीतरी इतरांकडून त्या व्यक्तीविषयी काही माहित मिळत असली तरी ..ती व्यक्ती अनपेक्षितपणे समोर आली किंवा फोनवर आली तर पटकन लक्षात येत नाही...काही क्षणच . शिवाय एकदम पटकन ओळख दाखवायाला नको..जरा चाचपडून बघू नक्की तिच व्यक्ती आहे ना असंही होतं .
माझ्या बाबतीत असं काहि वेळेस होतं म्हणून सांगितले.

@शानबा - फोन वर बोलण्यापेक्षा प्रत्यक्षात तुम्ही भेटला असता तर त्या मुलीचे मत कदाचित वेगळे झाले असते.
तरिही एखाद्याची इतक्या वर्षात नक्की काय प्रगती झाली असेल हे माहित नसेल तर त्या व्यक्तिशी तू आहेस तसाच आहेस का हे बोलणे मॅनरलेस वाटते.

शानबा५१२'s picture

9 Sep 2010 - 11:03 pm | शानबा५१२

विरोधाभास नाहीये.
मी ८-९ वर्षांनी कॉल केला म्हणुन "कोण सुशांत?"

वीकी माझा मित्र सर्वांना भेटतो,मी त्याला कामानिमित्त कधीतरी कॉल करतो तेव्हा अपडेट्स कळतात तस ईतर कोणाशीच बोलणे नसते.

आम्ही काल्पनिक लिहत नाही व शक्यतो वाचतही नाही.

>> "मला मधे तुझे मित्र दीसले होते,अजुन त्यांच तसच चालु आहे,तु त्यांच्याबरोबर असायचास म्हणुन विचारल? they are impossible!" >>
" मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स्" ........ हेच पुन्हा अध्यार्‍हुत झालं.

शिवाय काही वाईट सवयी लवकर पीच्छा सोडत नाहीत. त्यामुळे तिला तशी शंका आली असावी.

हर्षद आनंदी's picture

10 Sep 2010 - 1:12 am | हर्षद आनंदी

लेख वाचला, फारच कॉमन प्रोब्लेम आहे..

स्साला, ये फोन बहोत खराब चीज है, इधर से आदमी बोलता कुछ है, सोचता कुछ है, करता कुछ है... अश्या वेळी समोरा समोर भेटण्याला पर्याय नाही.

१. एखादी चुकी माणसाला एवढी वर्षे चिकटुन रहावी? की कीत्येक वर्षांनीही तो कीतीही शिकलेला असला तरी आताही 'तेच' करत असावा ही शंका यावी?
२. Is first impression so important?

दोन्ही प्रश्नांना उत्तर एकच आहे.

त्यात ह्या केसमध्ये तुम्ही भेटुन बराच काळ गेलेला आहे, इथे तुमची अचानक भेट मागचे सर्व रेफरन्स पुसुन टाकु शकते...वर दिलेली माहीती खरी असेल आणि वाईट सवयी सुटल्या असतील, तर त्याचा फरक व्यक्तिमत्वात नक्कीच पडतो.. then this would have been your first impression...आणि अचानकच भेटल्याने नसत्या शंका-कुशंका घेण्याचे कारणही नसते. (अर्थात अश्या अचानक भेटी प्लॅन कश्या करायच्या हे तुम्हाला माहीत असेलच.. )

If I am not getting too personal and u still have interest in her, u can manage it with some visits with her group first, then your common friends, then her alone. Slowly rebuild impression..this is time taking process but always works. one thing is for sure, nothing is permanent how can be the stupid impression??

शुचि's picture

10 Sep 2010 - 1:20 am | शुचि

>> nothing is permanent how can be the stupid impression?? >>
हे मस्त!! :)

पिवळा डांबिस's picture

10 Sep 2010 - 1:34 am | पिवळा डांबिस

जिच्या तुम्ही आठवणीतही नव्हतात तिला आता इतक्या वर्षांनंतर काय वाटतं, काय फरक पडतो? सोडून द्या झालं...
माझं ऐकाल तर तुमच्या केमेस्ट्रीतलीच एखादी चिकणी पटवा!!!:)
बाकी केमिस्ट्रीत पीएच डी करतांय? अभिनंदन!!
कुठे?
(आणि सिंथेटिक ऑर्गॅनिकवाले असाल तर आजवर इतक्या केमिकल फ्यूम्स फुफ्फुसात गेल्या असतील की सिगरेट्चा स्मोक काहीच नाही!!!)
होय की नाही?
:)

पाषाणभेद's picture

10 Sep 2010 - 6:50 am | पाषाणभेद

शानबा! तीने परत भेटायला बोलावले ना? मग त्यानंतरच खरे काय ते कळेल.
बाकी योग्य विचार करणारा माणूस फस्ट इंप्रेशनवर कधीच जात नाही. कधी कधी असले पुस्तकी विचार घातक ठरतात. अ मग चांगला माणूस हातातून जातो त्यांच्या.