त्या दिवशीच्या पेपरात
कूठल्याशा गावची खबर होती
खबर जरी लहान असली
तरी तिची मजा जबर होती..
गाव म्हणे आकारानं
तसं जरा छोटं होतं
गावकुसाच्या शिवेवर
हनुमानाचं मंदिर मोठं होतं..
जेव्हा कधी गावात
लग्नाची वरात यायची
व-हाडी मंडळी मंदिराच्या
सावलीला आडोशाला हायची..
वरातीतल्या बायका मात्र
कधीमधी मंदिरात जायच्या
हनुमानच्या मुर्तीसमोर खुशाल
अंगावरच्या साड्या बदलायच्या..
सालोसाल असंच घडुन
अखेर ती एक रीत झाली
मात्र शेवटी हनुमंताच्या
ब्रम्हचर्याची जीत झाली..
एकदिवशी भक्तांच्या ध्यानी आलं
मुर्तीनं डोळे मिटले होते
कदाचित हनुमंताच्याही डोळ्याचे
आता पारणे फिटले होते...!
प्रतिक्रिया
9 Sep 2010 - 4:09 pm | परिकथेतील राजकुमार
येवड्या ओळी सोडुन बाकी कविता आणि कल्पना झक्कास हो.
9 Sep 2010 - 4:13 pm | अवलिया
सहमत
9 Sep 2010 - 4:27 pm | llपुण्याचे पेशवेll
सहमत.
9 Sep 2010 - 4:16 pm | चिगो
सॉरी... Disclaimer द्यायला विसरलो..
कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश्य नाही..
9 Sep 2010 - 4:18 pm | अवलिया
नाही हो.. गोतमारे.
आमच्या धार्मिक भावना नाही दुखावत.
कोण मुद्दाम लिहितं आणि कोण अजाणतेपणे लिहितं हे नक्की कळतं आम्हाला.
तेवढी बुद्धी आम्हाला बुद्धिमंत हनुमानाच्या आशीर्वादाने मिळालेली आहे.
:)
9 Sep 2010 - 4:24 pm | चिंतामणी
सहमत
9 Sep 2010 - 4:36 pm | मदनबाण
राजकुमाराशी सहमत...
बाकी, मारुती स्त्री राज्यात गेल्यावर तिथल्या स्त्रीया मारुतीच्या भुभु:कारापासुन गर्भिण राहत, असे वाचल्याचे स्मरते !!! ;)
संदर्भ:--- नवनाथ भक्तिसार (अध्याय ३)
(अल्लख निरंजन... ;) )
9 Sep 2010 - 5:44 pm | परिकथेतील राजकुमार
घामाचे थेंब पण चालत बहुदा ;) मकरध्वज आठवतोय ना ?
9 Sep 2010 - 6:13 pm | llपुण्याचे पेशवेll
ह्म्म. मग त्या मूर्तीचे डोळे पूर्वीपासून मिटलेलेच असतील. ध्यानस्थ मारूती असेल तो. ;) लोकांनी आत्ता पाहीले असे. जर त्याने बायकाना आत येताना पाहून भु:भुकार केला असता तर त्या सगळ्याच गाभण झाल्या असत्या ना.
9 Sep 2010 - 5:51 pm | मदनबाण
मकरध्वज आठवतोय ना ?
खी खी खी... ;)
9 Sep 2010 - 6:32 pm | पाषाणभेद
झकास रे
9 Sep 2010 - 7:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून येऊ दे....!
-दिलीप बिरुटे
10 Sep 2010 - 2:29 pm | परिकथेतील राजकुमार
कोण ? ;)
नाही कविता वाचुन भलतीच शंका आली म्हणुन विचारले हो प्रा. डॉ.
10 Sep 2010 - 2:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> कोण ?
अजून कविता येऊ दे असे म्हणायचे आहे.
च्यायला, या पराच्या...!
-दिलीप बिरुटे
10 Sep 2010 - 2:45 pm | परिकथेतील राजकुमार
खुलाशाबद्दल धन्यवाद हो. तुम्हाला कविता म्हणजे काव्य अभिप्रेत आहे हे मी समजुन घेतले आहे.
9 Sep 2010 - 8:27 pm | कार्लोस
एक दम सहि
9 Sep 2010 - 8:38 pm | उपेन्द्र
सुरेख...
10 Sep 2010 - 2:25 pm | स्पंदना
सुरेख सुन्दर पेक्षा मला ही एकदम ढिन्च्याक कविता वाटली.
सह्ही लिहिल आहे. आडोसा म्हणुन साड्या बदलताना ....बिचारा हनुमान अन बिच्चार्या स्त्रिया !!
10 Sep 2010 - 5:42 pm | चिगो
धन्यवाद !!
10 Sep 2010 - 5:50 pm | मी-सौरभ
कल्पना छान आहे...
13 Sep 2010 - 10:56 am | गंगाधर मुटे
अवलियाजींशी सहमत.
बाकी कविता एकदम भन्नाटच.