मित्रहो,
बर्याच दिवसांनी लिहितोय. जरा बिझी होतो.
पण आधी सातत्याने लिहूनही आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळूनही, `सध्या कुठे उलथलायंस बाबा?' असं विचारणारा एकही `माई का लाल' इथे भेटला नाही, याचं आश्चर्य वाटतंय.
असो.
सध्या हे वाचा.
-----------------------
तसे ते रोजच्या बोलण्यातलीच प्रश्न आणि वाक्ये. पण काही काही वेळा डोकं उठविणारी. तुम्हालाही अशाच प्रश्नांचा सामना अनेकदा करावा लागला असेल. बघा बरं आठवून...!
1. हा...कोन बोल्तय?
- अरे गाढवा! फोन तू केलायंस ना? मग तू आधी सांग, तू "कोन' बोल्तोय्स ते! मग माझं बघू.
---
2. कुठे आहेस?
- मसणात! तुला काय करायचंय? तुझं काम काय आहे, ते बोल ना!
---
3. काय म्हणतोस?
- वयाच्या साधारणपणे वर्षापासून, म्हणजे बोलता यायला लागल्यापासून मी बरंच कायकाय म्हणतोय. त्यापैकी काय काय सांगू?
---
4. काय, हल्ली भेट नाही, बोलणं नाही!
- तुझा मुडदा बशिवला! मसण्या, भेटायला वेळ आहे का तुला? कामाशिवाय तोंड उचकटतं का तुझं? समोर दिसलो, म्हणून काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं?
---
5. काय विशेष?
- डोंबल! आमच्यासारख्या यःकश्चित मध्यमवर्गीय जंतूंच्या आयुष्यात काय असणार आहे विशेष? अवशेष आहेत फक्त!
---
6. बाकी काय?
- शून्य. भाज्य आणि भाजक यांचा भागाकार पूर्ण होतोय. बाकी काहीच उरत नाही.
---
7. या की एकदा घरी!
- हो, येतो हां "एकदा' घरी! अरे कंजूषनारायणा, "कधीपण या' म्हण की! "एकदा' या म्हणजे काय? तुझ्या समोरच तर राहतो मी! घरात जोरात शिंकलास, तरी आम्हाला अभिषेक होतो. मग कधीही आलो, तर तुझी इस्टेट कमी होणारेय काय?
---
8. ठेवू का मग?
- प्लीज! अजून किती वेळ पिडशील?
----
हे पुढे ढकललेल्या इपत्रातील लेखन वाटते आहे! या संदर्भात काय तो खुलासा केल्यास बरे होईल. जर हे पुढे ढकललेल्या इपत्रातील लेखन असेल तर मिपाच्या धोरणानुसार व या निवेदनानुसार सदर लेखन हे येथून कधीही काढून टाकले जाऊ शकते याची संबंधितांनी नोंद घ्यावी!
--जनरल डायर.
प्रतिक्रिया
10 Apr 2008 - 11:28 pm | वरदा
अगदी अगदी खूप जण फोन वर बोलताना मग 'अजून काय' असं विचारतात कंटाळता कंटाळता हळूहळू मलाही सवय लागलेय आता तीच..:)))
10 Apr 2008 - 11:50 pm | प्राजु
छान आहे...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
11 Apr 2008 - 2:10 am | भाग्यश्री
कुणी 'बाकी काय?' विचारलं की माझं उत्तर असतं.. शून्य.. :) समोरचा माणूस काहीवेळ तरी गप राहतो..
(पण आता हे उत्तर जुनं झालं, माझ्या ओळ्खीमधे.. सगळे बाकी काय म्हणून पुढे जोडतात, ० सांगू नकोस! आताशा मी १०० सांगते... ) :))
11 Apr 2008 - 2:31 am | चतुरंग
फोन आला -
मी : हॅलो.
समोरून : हॅलो. राँग नंबर का?!?! (काय प्रश्न आहे?;))
मी : ...(दोन क्षण पॉज्) हो अगदी बरोब्बर राँग नंबर!!
चतुरंग
11 Apr 2008 - 2:38 am | ब्रिटिश टिंग्या
मस्त लेख....नजा आली वाचुन....
असो, मित्रपरिवारात आमची उत्तर साधारणत: अशी असतात......
1. हा...कोन बोल्तय?
मी बोलतोय.....(यावर पलिकडून प्रश्न येतो 'मी कोण'....मग मनाला वाट्टेल ते उत्तर द्यावे)
2. कुठे आहेस?
डान्सबारमध्ये
3. काय म्हणतोस?
यावर एक करकच्चुन शिवी घालावी......अन् वर म्हणावे असं म्हणतो....
4. काय, हल्ली भेट नाही, बोलणं नाही!
तेच तुला टाळायचा प्रयत्न करत होतो....पण आता तुझाच फोन आल्यावर नाइलाज झाला.
5. काय विशेष?
डोंबल! आमच्यासारख्या यःकश्चित मध्यमवर्गीय जंतूंच्या आयुष्यात काय असणार आहे विशेष? अवशेष आहेत फक्त! (तुमचचं वाक्य आवडलं)
6. बाकी काय?
निव्व्व्व्वांत!
7. या की एकदा घरी!
तेच, एक्चुअली आज दुपारीच येण्याचा प्लॅन आखतोय्.... आहात ना घरात?
8. ठेवू का मग?
अरे बोल ना.....इनकमिंग फ्री आहे मला ;)
एवढे होउनही त्याने फोन ठेवला नाही तर मग तो तुमचा खरा मित्र होय.
टिंग्या ;)
22 Apr 2008 - 3:16 am | llपुण्याचे पेशवेll
7. या की एकदा घरी!
तेच, एक्चुअली आज दुपारीच येण्याचा प्लॅन आखतोय्.... आहात ना घरात?
जरासा बदल..
7. या की एकदा घरी!
उ. हो मी आजच यायचा प्लॅन करत आहे, पण माझा उपास आहे आणि उपासाला मी फक्त साबुदाण्याची खिचडी खातो.
पुण्याचे पेशवे
11 Apr 2008 - 4:22 am | शितल
हसुन गाल दुखले आणि डोळ्याच्या फटी झाल्या.
11 Apr 2008 - 9:02 am | विद्याधर३१
शिरिष कणेकरांच्या ष्टाइलची उत्तरे वाचून मजा आली..
यातले बाकी ..शुन्य आणी विशेष.. अवशेष वापरात आहे.
विद्याधर
11 Apr 2008 - 11:20 am | धमाल मुलगा
अभिजीत भाऊ, खल्लास उत्तरं! सक्काळी सक्काळी वाचून दिवस सार्थकी लागणार दिसतंय :-)
बाकी `सध्या कुठे उलथलायंस बाबा?' हे खरंच 'ह्यो' माईचा लाल विचारण्याच्या विचारात होता...अरे खरंच. आता तुला ते खोटंच वाटेल...जाऊ दे!
ए टिंग्या...
तुझी उत्तरं पण जबरान् रे !!!
कट्ट्यावर आल्यासारखं वाटलं अगदी....
ह्यावरुन एक किस्सा आठवला..
माझ्या एका मित्राचे बाबा, डायरीत पाहून कोणालातरी फोन लावत होते, डायरीतला नंबर चुकीचा होता. पहिल्यांदा फोन लावल्यावर त्यांनी विचारलं, "हॅलो, अमुक अमुक आहेत का?"
उत्तरः राँग नंबर.
काकांनी फोन ठेवला. डायरीतून कंफर्म करुन परत डायल केला, परत तेच उत्तर. काका आता भडकले.
तिसर्यांदा त्याच नंबरवर कॉल केला...
काका: हॅलो, 'अमुक अमुक'?
उत्तरः राँग नंबर..अहो कितीवेळा सांगायचं तेच ते? कळत नाही का?
काका: राँग नंबर आहे तर उचलला कशाला?
आम्ही पुढे १० मिनिटंतरी पलिकडच्या माणसाचा चेहरा कसा झाला असेल ह्याची कल्पना करकरुन वेड्यासारखे हसत होतो !!!
11 Apr 2008 - 11:41 am | विजुभाऊ
माझ्या मित्राला त्याचा मुलगा बरोबर असताना कोणी तरी विचारले " काय मुलगा तुमचा वाटते"
हा तिरसिंगराव त्याने मस्त सदाशिवपेठी तिरकेपणाने उत्तर दिले " नाही कालच सापडला.घेउन जाताय?"
विचारणारा पार उलटा कोसळला.
आमच्या गृप मधल्या एका फटाका मुलीला एकाने डायरेक्ट फिल्मी ष्टाईल अगदी रोमँटीक पणे सांगितले " तुमचे डोळे छान आहेत हो"
तीने तेवढ्याच पटकन उत्तर दिले "काढुन देउ" त्या छबुरावाचे डोळे पांढरे व्हायचे बाकी होते.
बाकी काही पण म्हणा सदाशीव पेठ असल्या प्रकारात अगदी फेमस.
21 Apr 2008 - 2:36 pm | प्रभाकर पेठकर
ह्यावर उत्तर असे आहे की, 'छे: छे: खर तर तुमचा स्कर्ट जास्त छान आहे.'
21 Apr 2008 - 2:41 pm | धमाल मुलगा
अग्ग्ग्ग्गआयायायायाईईईईई....ग्ग!
काका...??????
फु...ट...लो !!!!!
वाचूनच मला चक्कर आल्यासारखं झालं....
21 Apr 2008 - 2:45 pm | स्वाती राजेश
पेठकर काका, धमाल मुलाला वाचवा....:)))))
21 Apr 2008 - 2:52 pm | धमाल मुलगा
आता कसलं वाचवा? मी चाललो...आता मी काही रहात नाही.....
ठ्या: करुन स्क्रीनवर कॉफी उडवण्याची नक्की कितवी वेळ आहे हे सुध्दा आठवत नाहीय्ये. हापिसातला हाऊसमन हल्ली माझ्याकडे लैच चिवित्र नजरेने बघत असतो....त्याल बहुतेक माझ्या मानसिक संतुलनाबद्दल शंका यायला लागली आहे.
21 Apr 2008 - 4:48 pm | नारदाचार्य
कारण, प्रतिसाद अगदी चित्रदर्शी की काय म्हणतात तसा आहेच. नारायण नारायण...
22 Apr 2008 - 7:09 am | छोटा डॉन
धमाल, तुमच्या कंपनीची कमाल आहे राव,
आमच्याकडे अशी केस असली असती तर लगेच त्याला " मानसीक संतूलन ढासळलेला" ठरवले असते,
त्याला तात्काळ "प्रमोशन" मिळाले असते व "मॅनेजर" होऊन आमच्या बोडक्यावर बसला असता ...
बघ, तुझ्या "फ्युचर प्रॉस्पेक्ट्स" साठी माझ्या कंपनीत येऊ शकतो ...
साथ मे मॅनेजरची "काटा पी. ए." फ्री मिळेल, बघ विचार कर ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
22 Apr 2008 - 10:41 am | धमाल मुलगा
आयला, हे म्हणजे भारीच आहे की!
ऊठसुठ कॉफी स्क्रिनवर उडवायची की लगेच "मा.सं.ढ." टेस्ट पैकीच्या पैकी मार्क मिळवून पास...की लगेच म्यानेजर...वर "काटा पी.ए. फ्री" लय लय मज्जा!!!
ए...ते मज्जा मी नाय लिहिलं हां. मला नाही माहित कोणि लिहिलं. नायतर ही मनस्वी लगेच "सांगू का बहिणीला" म्हणून धमक्या द्यायला सुरुवात करेल.
(भौ, ते पी.ए. प्रकरण आपण गपचुप सुंबडीत बोलू, काय?)
अरे पण एक लफडा आहे. तुझी कंपनी इंजीन डिझाईनवाली...आणि आम्ही तिच्याआयला त्यात इतके 'ढ' की "फोर-बाय-फोर चं इंजीन म्हणजे त्याला ४-४ सिलेंडरं असतात का, ४" लांब आणि ४" रुंद असं इंजीन असतं?" असा प्रश्न इचारणार.
छ्या:! नीट अभ्यास केला असता तर आज म्यानेजर झालो असतो का न्हाई?
-(हमाल) ध मा ल.
22 Apr 2008 - 12:46 pm | छोटा डॉन
"नायतर ही मनस्वी लगेच "सांगू का बहिणीला" म्हणून धमक्या द्यायला सुरुवात करेल."का
य सांगतो ? खरं आहे का हे? तुझ्या बहिणीला ओळखती की काय ?
मग अवघड आहे गड्या ...
"(भौ, ते पी.ए. प्रकरण आपण गपचुप सुंबडीत बोलू, काय?"
अरे १०० %, प्रॉब्लेम इल्ला, प्रॉब्लेम इल्ला ....
"फोर-बाय-फोर चं इंजीन म्हणजे त्याला ४-४ सिलेंडरं असतात का, ४" लांब आणि ४" रुंद असं इंजीन असतं?""
हा हा हा ... आता मात्र हद्द झाली ....
बाय द वे, अजून असं ४ बाय ४ इंजिन निघालं नाही, सध्या आम्ही ४ स्ट्रोक, २ स्ट्रोक वर काम चालवतो ...
पण तुझ्या डोक्यात जर "४ बाय ४ " ची कल्पना असेल तर तुझे स्वागत आहे ...
आम्हाला अशाच माणसांची गरज आहे ....
बाकी "पी ए " चं नको टेन्शन घेऊ ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....