एक दिवस आठवणींचा....

sandeepn's picture
sandeepn in जनातलं, मनातलं
6 Sep 2010 - 2:49 pm

एकदा गावातल्या शाळेत काम होते म्हणुन गेलो होतो.शाळेसमोरच्या पटांगनावर मुले खेळत होती. याच ठिकानी आमचा रोज सकाळी परिपाठ भरत असायचा.वेगवेगळ्या प्रार्थना म्हणत तो सुरु व्हायचा. मग दिनविशेष , सुविचार , आजच्या घडामोडी अशा काही कार्यक्रमानंतर तो संपत असे.परिपाठाला उशीर झाला तर एका मारकुटया मास्तर चा मार खावा लागायचा. एव्हड्या सकाळी शाळेत जायला पार जिवावर यायचे. थंडीत तर विचारायचेच नाही. पण शाळेत मजा यायची. मस्त मित्र जमले होते.
मधल्या सुट्टीमधले खेळ ठरलेले असायचे. अबाधबी हा एकदम फ़ेमस खेळ. कसल्याशा चिंध्या गोळा करून केलेल तो बॉल असा काय लागायचा पाठीत विचारू नका. शाळेचा गणवेश म्हणजे पांढरा शर्ट , खाकी हाफ़ चड्डी आणि डोक्यावर गांधी टोपी. दहावीपर्यंत तोच गणवेश ! दहावीला तर ति हाफ़ चड्डी घालायला लाज वाटायची.मधल्या सुट्टीमधे मॅच असली की बाहेरच्या दुकानात जावुन स्कोर बघने हा पन कार्यक्रम असायचा. मग तिथे गोळ्या , बिस्किटे,बोरं,पेरू इ. विकत गेवुन खाणे हे ओघाने आलेच. आठवड्यातुन एक दिवस आमची कवायत असायची. मग त्या चक्रांना रंगीत कागद लावने हा ठरलेला प्रोग्राम असायचा. आमच्या बाई कवायतीला ढोल वाजवायच्या म्हणुन आम्ही उगाच भाव खायचो.जर कधी आमच्या बाई सुट्टीवर असल्या तर वर्ग विभागुन टाकायचे. मग तर काय धमाल व्हायची.कारण ग्रुहपाठ तपासयला कोणी नाही. आणी उद्याचा ग्रुहपाठ सांगायला पण कोणी नाही.पण असा योग फ़ार क्वचित यायचा. प्रत्येकाला आपला शिक्षकाचा खुप अभिमान असायचा. पुढे चौथीला बळेच स्कॉलरशीप साठी वेगळा वर्ग चालु केला. मला तो कधीच आवडला नाही. दिलेला ग्रुहपाठ पन करायचा कंटाळा असलेला मी कसला नवीन स्कॉलरशीपचा अभ्यास करतोय ? आणि त्यात त्या वर्गाला आमच्या बाई नव्ह्त्या.एक मारकुटा मास्तर होता :(
पुढे माध्यमिक शाळेत गेलो तेव्हा शाळेची वेळ पन बदलली. मग तिथे काही नविन मित्र पन भेटले. स्काऊट चा कॅंप म्हणजे एक वेगळाच अनुभव होता. तंबू बांधने,लाकडी गॅजेट्स बनवने. स्वत: हाताने स्वयंपाक करुन खाने अशा अक्टिविटी अजुनही आठवतात.कॅंप मधे एक बिन भांड्याचा स्वयंपाक अशी स्पर्धा असायची. तीची एक वेगळीच मजा असायची. रात्री उशिरा भजे, वडे काढुन खाण्यात जी मजा होती ती अजुनही मिस करतो.असाच एक जिल्हास्तरीय कॅंपला पन गेलो होतो. तिथे पन खुप मजा केली होती. शाळेमधे तशी कॉंपिटिशन पन बरीच होती.शिक्षक पन मनापासुन शिकवायचे. बुधवारच्या दिवशी शाळेच्या बाहेर बाजार भरायचा. मग कोणी ना कोणी बाहेर बघण्यावरुन शिक्षकांचे बोलणे खायचा. दहावीला मात्र एक हेडमास्तर आले होते. त्यानी पार जाम करुन टाकले. दिवस अभ्यासिका,मग जादा तास नंतर शाळा आणि कमी मार्क्स वाल्यांना रात्र अभ्यासिका असे सगळे टाईट वेळापत्रक बनवले होते. आता शाळा बदलली आहे. नवीन आकर्षक ईमारत झालीय.गणवेश बदललेत.फ़ुल पॅंट पन आलीय,आणि पॅंटचा रंग पन बदललाय.सर्वात महत्वाचे म्हणजे गांधी टोपी गायब झालीय.
तेव्हड्यात शाळेची तास संपल्याची घंटा वाजली. जरा शुध्धित आलो .वडिल वर्गातुन बाहेर आले होते, त्यांना घेवुन घरी आलो.
संध्याकाळी चहाचा कप घेवुन घराच्या मागच्या बाजुला आलो. घराच्या मागचे ग्राउंड मोकळेच दिसले. इथे आम्ही तासन तास क्रिकेट खेळत असायचो. बहुतेक आत्ताच्या मुलांना कॉंप्युटर गेम्सच जास्त आवडतात.शाळेतुन आल्या आल्या आईला चहाची फ़र्माईश द्यायची आणि लगेच तोंड हातपाय धुवुन व पटापट चहा संपवुन ग्राउंड वर जायची घाई असायची. मग पुढचे २ तास मनसोक्त क्रिकेट खेळायचो.मग थोडासा अंधार पडला की तिथेच गप्पा मारत बसायचो. तिथेच त सुट्टीच्या दिवशी तर मॅच मागे मॅच असायच्या. क्रिकेट सोडुन विटी दांडू हा एक फ़ेमस खेळ. पावसाळ्यात गज घेवुन तो चिखलात खुपसण्याचा एक खेळ असायचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत दिवसभर लपा-छपी , डब्बा-एक्सप्रेस, गोट्या हे खेळ खेळायचो. मग बैठे खेळांमधे चंफ़ल पानी, व्यापार असले खेळ असायचे. बहुतेक मैदानीच खेळ असायचे.एखाद्या ठिकानी बांधकाम चालू असेल तर तिथल्या वाळूमधे कोप्या करने हा एक आवडता ऊद्योग होता. शेजारी एक आजोबा रहायचे.ते रिटायर्ड गुरुजी होते. ते मात्र सुट्टीमधे लिखानाचा सराव रहावा म्हणुन शुध्धलेखन करुन घ्यायचे. पन तरीही माझे अक्षर आणि शुध्धलेखन कधीही सुधारले नाही :)
तेव्हडे झाले की बाकी दिवसभर खळेणे आणि हुंदडने एव्हडाच उद्योग असायचा.हे सगळं आठवत असतानाच आईने हाक मारली , चल रे गावात जावून येवु.......

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

गणेशा's picture

6 Sep 2010 - 3:15 pm | गणेशा

आम्च्या कडे मार्कुटा मास्तर नव्हता . पण मारकुटी मास्तरीन होती हो .
बाकी सेम आहे .. आणि अबाधाबी या खेळाला अप्पा रप्पी म्हणाय्चे आमच्याक्डे .

बाकी लिहित चला .. वाचत आहे

sandeepn's picture

7 Sep 2010 - 11:40 am | sandeepn

जवळ जवळ सगळ्या शाळेत साऱख्याच गमती होत्या.

पैसा's picture

6 Sep 2010 - 8:11 pm | पैसा

शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांची आठवण!