वाक्याचा अर्थ सांगाल का?

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जे न देखे रवी...
5 Sep 2010 - 2:35 pm

A xyz family's peace rests on the lack of sexual tension within it;it is an oasis from the lusts of the world.

हे वाक्य 'Maximum City' ह्या सुकेतु मेहतालिखित पुस्तकातील आहे.अधोरीखित शब्द एका हिंदु समाजाबद्दल असल्याने बदलला आहे.
Oasis :1. a fertile place in a desert where water rises to ground level
2.a pleasant area or period in the midst of difficult situation.

सौजन्य : माझ्या मोबाईलमधील ऑक्सफर्ड डीक्शनरी.
हींदी अर्थ,
1. शाद्वल
2. नख़लिस्तान
सौजन्य :Google translate.
मला ह्या वाक्यातील सर्व शब्दांचा अर्थ समजतो,पण संदर्भ लागत नाहीये.तेव्हा जाणकारांनी मदत करावी.
संपादकांनी एका ओळीचा धागा म्हणत ह्याला delete करु नये,ही विनंती.

भयानकव्याकरण

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

5 Sep 2010 - 2:40 pm | विनायक प्रभू

ह्याचा अर्थ आल इज वेल.

शानबा५१२'s picture

5 Sep 2010 - 2:52 pm | शानबा५१२

नमस्कार सर,
ह्या प्रतिसादाच्या निमित्ताने मी हे सांगु ईच्छीतो की मी कोणताही वाईट,खोडसर(?) हेतु ठेउन हा लेख(?) लिहला नाही.मला हे पुस्तक फार आवडते म्हणुन अर्थ समजुन घ्यायचा आहे.

'ऑल ईज वेल' हा ह्या शब्दाचा अर्थ मुळीच नसावा.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

विनायक प्रभू's picture

5 Sep 2010 - 2:56 pm | विनायक प्रभू

कमाल आहे तुमची शानबा.
वाईट, खोडसर हेतु आहे असे मी कुठे म्हटले आहे.
अर्थ अगदी बरोब्बर सांगितला आहे आणि तोच आहे ह्याच्च्च्ची खात्री बाळगा.

शानबा५१२'s picture

5 Sep 2010 - 3:03 pm | शानबा५१२

झक मारली आणि हा लेख लिहला.

शि़क्षकांकडुन योग्य मार्गदर्शन मिळेल ही माझी अपेक्षा फोल ठरत आलेय आणि आजही तेच झाल.

शानबा५१२'s picture

5 Sep 2010 - 3:08 pm | शानबा५१२

शैलेन्द्र
शैलेन्द्र's picture
रवी, 05/09/2010 - 15:03

सुशांत , खरंच अर्थ हवा आहे?

याचा अर्थ असा आहे की कुटुंबाच्या सौख्याचे रहस्य हे कुटुंबातील लैंगीक तणावाच्या नसण्यात असते(किंवा परिपुर्ण कामसौख्यात असते). हे सुख आयुष्यातील इतर ताणतणावात वाळ्वंटातील हीरवळीसारखे असते.

सौजन्य : शैलेन्द्र.

धन्यवाद्,मित्रा.

विनायक प्रभू's picture

5 Sep 2010 - 3:12 pm | विनायक प्रभू

परिपुर्ण सौख्य असल्याने बाहेरच्या जगातली लस्ट म्हणजेच वखवख नाही. म्हणुन सर्व काही आलबेल म्हणजेच आल इज वेल.

माझ्या अकलीचा घोडा एवढा धावत नाही,म्हणुन समजल नाही.

आपल्याला अर्थ समजला आहे,म्हणुन आता वायफळ चर्चेला पुर्णविराम देउया.

आपणास चिरायु आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

विसोबा खेचर's picture

5 Sep 2010 - 3:24 pm | विसोबा खेचर

आपण अर्थ लावण्याचा ट्राय केला बॉस..नय जमलं..

आपण साला जाम कच्चे आहोत सायबाच्या भाषेत..

तात्या.

युयुत्सु's picture

6 Sep 2010 - 10:08 am | युयुत्सु

मला xyz हे कोण याची उत्सुकता आहे. व्यनि करावा...

विनंती मानायला आवडत,'क्रुपया' हा शब्द टंकायचा त्रास घ्यावा माणसाने.
ह्या माझ्या अपेक्षा नाहीत पण एक सुचवल,असो.
व्यनी केला आहे.

युयुत्सु's picture

6 Sep 2010 - 12:06 pm | युयुत्सु

'क्रुपया' आणि कृपया यातला फरकच जर कळत नसेल तर तो शब्द टंकायचे कष्ट का घ्या. ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Sep 2010 - 10:13 am | llपुण्याचे पेशवेll

Oasisला मराठीत मरुद्यान म्हणतात असे भूगोलाच्या तासाला शिकल्याचे आठवते.

शरद's picture

6 Sep 2010 - 11:14 am | शरद

आपल्या प्रश्नाला मला लागलेला अर्थ असा. वाळवंटात सर्वत्र ओसाड, वैराण, स्नेहहीन, रखरखाट असतो. जीभ ओली करण्याकरिताही पाण्याचा थेंब मिळत नाही, तो दृष्टिक्षेपातही नसतो. अशावेळी जर तुम्हाला एखादे ओऍसिस दृष्टीस पडले तर तुमचा जीव भांड्यात पडतो. तृष्णा निवारण हा एक भाग व मानसिक आधार हा दुसरा. आता आपल्या नेहमीच्या जीवनातही बर्‍याच वेळी वाळवंटाची वाटावी अशी परिस्थीती आजुबाजूला असते. तुकारामांनी म्हटले आहे, "ओस झाल्या दिशा, मज भिंगुळवाणे, जिवलग ते नेणे मज कोणी." या वाळवंटात जर कोणी आपुलकीने, जिव्हाळ्याने विचारपूस केली तर ते ओऍसिसच नव्हे कां ? हा झाला सर्वसाधारण विचार. तुम्हाला जो प्रश्न पडला आहे त्या ठिकाणी फ़क्त sexचा विचार आहे. Lust म्हणजे वासना, शारीरिक आकर्षण. प्रेम नव्हे, आपुलकी नव्हे. क्षणीक व्यवहार. थोडक्यात वाळवंटाचा एक प्रकार. या वाळवंटात जर तुमच्या कुटुंबात तणाव नसतील तर तेही एक ओऍसिसच. आता या विचाराला जास्त फ़ुलोरा आणणे तुमच्यावर अवलंबून.

शरद

शैलेन्द्र's picture

6 Sep 2010 - 2:39 pm | शैलेन्द्र

फुलोर्यामधे मुळ विचार हरवल्यासारखा वाटतोय.