नि:शब्द ……! ! !
प्रीतीची आब अपुल्या,
तू कधी ना राखली,
अर्पिले सर्वस्व तुजला,
परी प्रीत तू ना जाणली.
होता कधी अधिकार तुजवर,
तोहि अता ना राहिला,
आसवाचा हक्क माझा,
तोहि तू ना ठेवला.
विरहाचे दुखः माझे,
सांगू कुणा, आणिक कसे ?
अंतरीचे शब्द शब्द,
नयनांत मी आणू कसे ?
निरंजन वहाळेकर
प्रतिक्रिया
4 Sep 2010 - 4:03 am | यशवंतकुलकर्णी
प्रीतीची आब तिने नेहमीच की रे राखिली
अर्पिले असेलही सर्वस्व तुजला मग प्रित तिने का न जाणली?
होता अधिकार तिजवर, तो तसाच आहे राहिला
आसवांचा हक्क तो ही तसाच आहे राहिला
विरहाचे दु:ख तुझे सांगू नको कोणा कसे
अंतरीचे शब्द तेही नयनांत कधी आणू नको
मला काहीही म्हणायचं नाही बरं का तुमच्या कवितेबद्दल; मी वरची कविता वाचली आणि अगदी न राहवून हे लिहील्या गेलंय.
माफी असावी :)
अवांतर: तुमची कविता वाचताना भाऊसाहेब पाटणकरांच्या शायरीची आठवण झाली.
4 Sep 2010 - 6:49 am | निरन्जन वहालेकर
खुप सुन्दर शिघ्रकाव्य ! धन्यवाद यशवंत कुलकर्णी साहेब ! !
4 Sep 2010 - 8:26 pm | एक अनामी
सुंदर कविता...
अजून एक कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता ओठांवर आली...
"निशब्द आसवांनी समजाविले मनाला,
की शाप वेदनेचा प्रीतीस लाभलेला,
माझ्याच भावनांनी मजलाच दाहिले,
हृदयात दाटलेले हृदयात राहिले..."
8 Sep 2010 - 12:26 pm | Arun Powar
खूप छान..!! कोणत्याही गोष्टीला दोन्ही बाजू असतात.. आणि कवितेलासुद्धा असतात ते पटलं..!!
13 Sep 2010 - 12:00 pm | गंगाधर मुटे
खूप छान..!!