सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
3 Sep 2010 - 10:06 am | नितिन थत्ते
अपणी तो जैसे तैसे
थोडीऐसे या वैसे
कट जायेगी
आपका क्या होगा जनाबे आली
हे गाणे सोपे पण आहे आणि त्याला आवडेल पण गायला. :)
श्लोक म्हणायला त्याला आवडणार पन नाही आणि ते सोपे पण नसतात.
3 Sep 2010 - 10:08 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
हे गाणं नवं का जुनं?
3 Sep 2010 - 10:50 am | नितिन थत्ते
कोणतंही चालेल. (जुनं गाणं बोधप्रदही आहे) :D
बालवयी खेळी रमलो तारुण्य नासले वृद्धपणी देवा आता.... हे आठ वर्षाच्या मुलाने म्हणण्यापेक्षा बरे.
अवांतर : जुन्या गाण्यात "अपनी तो" आहे नव्या गाण्यात "अपणी तो" आहे. :)
3 Sep 2010 - 10:51 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
टंकनचूक, करंगळीचे हाड वाढणे का हेच अभिप्रेत आहे यात फरक न समजल्यामुळे प्रश्न विचारला, जनाबेआली!
3 Sep 2010 - 10:27 am | शिल्पा ब
शुभंकरोती म्हणायला शिकवा.
3 Sep 2010 - 10:50 am | विसोबा खेचर
हे घ्या -
सदासर्वदा योग तुझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा
उपेक्षू नको तू गुणवंता अनंता
रघुनायका मागणे हेचि आता..
तात्या.
3 Sep 2010 - 7:45 pm | मिसळभोक्ता
रामदासस्वामींनी बाकी मनाच्या श्लोकांत भुजंगप्रयात छान पाळला.
पण इथे रघु ठेवले ? रघू हवे ना ? पण मग रघु + उनायका होते.
इथेच रामदास स्वामींचे रामदास झालेत, असे माझे मत आहे.
3 Sep 2010 - 10:56 am | ज्ञानोबाचे पैजार
कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा
सशाने हलविले कान, घेतली सुंदर तान
दिग्दशर्क म्हणाला, व्वा व्वा !
ससा म्हणाला, चहा हवा
कोणास ठाऊक कसा, पण सर्कशीत गेला ससा
सशाने मारली उडी, भरभर चढला शिडी
विदुषक म्हणाला, छान छान !
ससा म्हणाला, काढ पान
कोणास ठाऊक कसा, पण शाळेत गेला ससा
सशाने म्हटले पाढे आणि घडघड वाचले धडे
गुरुजी म्हणाले, शाबास !
ससा म्हणाला, करा पास
4 Sep 2010 - 2:17 pm | सूर्यपुत्र
आम्ही दुसर्या कडव्यातील "शी"मुद्दाम लांबवायचो....
3 Sep 2010 - 11:09 am | वेताळ
पण ऑलटाईम हिट मध्ये....
बाबा लगीन
कोंबडी
अरे दिवानो मुझे पहचानो
ब्राझिल
विठ्ठ्ला कोणता झेंडा
ही गाणि/श्लोक प्रसिध्द आहेत.
अजुन एक दादा महाराजाचे वर ढगाला लागली कळ पाणी...मस्तच आहे.
3 Sep 2010 - 12:21 pm | प्रदीप
हे 'डॉल्बी' नक्की काय प्रकरण आहे? म्हणजे Dolby AC3, Dolby Digital, Dolby E वगैरे सगळे ठाऊक आहे, पण पब्लिक कार्यक्रमात ते नक्की काय वापरतात, व कसे? (हा उल्लेख ह्याच संदर्भात दुसर्यांदा मिपावर गेल्या दोन दिवसात वाचतोय, म्हणून कुतुहूल म्हणून विचारतोय).
3 Sep 2010 - 11:17 am | Nile
भगवद्गीता शिकवा. का ते सांगायला हवे का?
3 Sep 2010 - 11:17 am | परिकथेतील राजकुमार
सध्या "मुन्नी बदनाम हुई" हि मलाईकादेवीची आरती / स्तवन खुप लोकप्रीय झाले आहे, ते शिकवावे. ह्या गाण्याचा व्हिडो सुद्धा उपलब्ध आहे तु-नळी वर.
3 Sep 2010 - 11:36 am | बबु
ज्ञानेश्वरीतील मंगलाचरण म्हट्ल्यास समयोचित होईल.
ॐ नमो जी आद्या I वेद प्रतिपाद्या I जय जय स्वसंवेद्या I आत्मरुपा II
देवा तूचि गणेशु I सकलमतिप्रकाशु I म्हणे निव्रुत्तिदासु Iअवधारिजो जी II
हे शब्दब्रह्म अशेषI तेचि मूर्ती सुवेष I जेथ वर्णवपु निर्दोष I मिरवत असे II
अकार चरण युगुल I उकार उदर विशाल I मकार महामंडळ I मस्तकाकारें II
हे तिन्ही एकवटले I तेथ शब्दब्रह्म कवळले I तें मियां गुरुकृपा नमिलेI आदिबीज II
आता अभिनव वाग्विलासिनी I जे चातुर्यार्थ कलाकामिनी I ते शारदा विश्वमोहिनी I
नमस्कारिली मियां II
लता मंगेशकरांची सीडी मिळ्ते.
3 Sep 2010 - 11:52 am | मदनबाण
मध्यंतरी यू ट्युबवर बाप्पाची मस्त श्लोक पाहिले होते,आत्ता शोधाया गेलो ते सापडेना !!! :(
तवा तुम्हीच तिकडे शोधण्याचे कष्ट घ्या.
3 Sep 2010 - 12:06 pm | नगरीनिरंजन
पसायदान
3 Sep 2010 - 12:18 pm | अवलिया
श्लोक, स्तोत्र हवे असल्यास भीमरुपी, रामरक्षा यापासुन सुरवात करा. वल्लभाचार्यांचे मधुराष्टक मस्त आहे, लहान मुलांना आवडते. उच्चार चांगले असल्यास चर्पट्पंजरिका पण चालु शकेल.
आताच ह्या वयात एकदम गीता शिकवल्यास बुद्धीला जड झाल्याने कुर्हाडीचा दांडा गोतास काळ होउन मोठेपणी हिंदूविरोधी होऊ शकतो. स्वतः त्याला समजुन घ्यायची इच्छा होईल तेव्हाच वाचु द्या. :)
गाणी हवी असल्यास खूप बालगीते आहेत त्यातले निवडा !
3 Sep 2010 - 12:29 pm | विसोबा खेचर
हे बाकी मस्त.. :)
3 Sep 2010 - 12:41 pm | नगरीनिरंजन
इथे मुलांची मराठी बोलायची मारामार आणि संस्कृत कशाला आणखी?
3 Sep 2010 - 12:45 pm | अवलिया
संस्कृतचा गोडवा अवीट आहे असे आमचे परममित्र तात्या एके ठिकाणी म्हटले होते. (संदर्भ हाताशी नाही सापडला की देतो). अर्थात त्यांनी म्हटले नसते तरीही सत्य बदलत नाही.
संस्कृत अवघड आहे असे ज्यांना वाटते त्यांनी "प्रयत्न करुन बघा ! झालाच तर फायदाच होईल !! "
3 Sep 2010 - 12:48 pm | परिकथेतील राजकुमार
मराठी शिका नाहीतर संस्कृत शिका पण मुख्य म्हणजे सुसंस्कृत व्हा.
3 Sep 2010 - 12:52 pm | अवलिया
सुसंस्कृत होणे यात योग्य संस्कार होणे हा महत्वाचा भाग आहे.
3 Sep 2010 - 1:21 pm | वेताळ
व चांगले संस्कार व्हावे असे वाटत असेल तर हिंदु सणा खेरीज इतर कोणता चांगला शिक्षक सापडणे कठीण आहे.
3 Sep 2010 - 2:24 pm | नितिन थत्ते
मला होळी, गटारी अमावस्या आणि दिवाळी हे सण आवडतात.
3 Sep 2010 - 2:30 pm | अवलिया
क्या बात है !
होळी शिकवते आपल्यातले दुर्गुण जाळुन टाका
गटारी शिकवते अतिरेक करु नये. प्रायश्चितरुपी श्रावणात संयम पाळावा
दिवाळी शिकवते दिव्याचे महत्व. कुटुंबीयांनी एकत्र जमुन आनंद साजरा करावा.
वा ! थत्तेंची निवड अगदी सुयोग्य असुन प्रत्येकाला मार्गदर्शक अशीच आहे.
जियो थत्ते ! जियो !!
3 Sep 2010 - 10:22 pm | राजेश घासकडवी
वरून व्ह- साठी फ- करणे हे आठवलं.
3 Sep 2010 - 1:17 pm | अश्विनीका
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करु काय जाणे
अपराध माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा तू , घाल पोटी
-----------------------------------------------------------
जय गणेश जय गणेश जय गणेश देवा , माता जाकी पार्वती पिता महादेवा.
एकदंत दयावंत चार भुजाधारी,
माथे पे तिलक सोहे , मूस की सवारी
पान चढे फूल चढे और चढे मेवा
लडूवन का भोग लगे , संत करे सेवा
जय गणेश जय गणेश देवा , माता जाकी पार्वती पिता महादेवा.
अंधन को आख देत , कोढीन को काया
बांझन को पुत्र देत , निर्धन को माया
सूर्य शाम शरण आये , सफल कीजे सेवा
सूर्य शाम शरण आये , सफल कीजे सेवा
जय गणेश जय गणेश देवा , माता जाकी पार्वती पिता महादेवा.
इथे चाल ऐकत येइल - http://www.lyricsmasti.com/song/6404/get_lyrics_of_Jai-Ganesh-Jai-Ganesh...
3 Sep 2010 - 2:29 pm | अर्धवट
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...
3 Sep 2010 - 4:21 pm | जागु
प्रिया हे गणपती स्तोत्र आणि मारुती स्तोत्र आहे हे तिला रोज म्हणायलाही चांगल आहे.
|| श्री गणपती स्तोत्र ||
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम ||
भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये || १ ||
प्रथमं वक्रतुंडं च एकदंतं द्वितीयकम ||
तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम || २ ||
लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च ||
सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्णं तथाष्टमम || ३ ||
नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम ||
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम || ४ ||
द्वादशितानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः ||
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो || ५ ||
विद्यार्थी लभते विध्यां धनार्थी लभते धनम ||
पुत्रार्थी लभते पुत्रन मोक्षार्थी लभते गतिम || ६ ||
जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासै: फलं लभेत ||
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: || ७ ||
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत ||
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: || ८ ||
इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम ||
|| श्री मारुती स्तोत्र ||
भीमरुपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती| वानरी अंजनीसुता, रामदुता प्रभंजना||१||
महाबली प्राणदाता, सकळा उठवी बळे| सौख्यकारी शोकहंता, धूर्त वैष्णव गायका|| २||
दीननाथा हरीरुपा, सुंदरा जगदंतरा| पातालदेवता हंता, भव्य सिंदुर लेपना|| ३||
लोकनाथा, जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना| पुण्यवंता, पुण्यशिळा, पावना परितोषका|| ४||
ध्वजांगे उचली बाहो, आवेशे लोटला पुढे| काळाग्नी काळरुद्राग्नी, देखता कांपती भये|| ५||
ब्रम्हांडे माईली नेणों आंवाळे दंतपंक्ती| नेत्राग्नी चालील्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळे|| ६||
पुच्छ ते मुर्डीले माथा, किरीटी कुंडले बरी| सुवर्ण कटी कांसोटी , घंटा किंकिणी नागरा|| ७||
ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपात़ळु| चपळांग पाहता मोठे, महाविद्युल्लतेपरी|| ८||
कोटीच्या कोटी उड्डाणे, झेपावे उत्तरेकडे| मंद्रादीसारखा द्रोणु क्रोधे उत्पाटिला बळे|| ९||
आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती| मनासी टाकीले मागे, गतिसी तुळणा नसे|| १०||
अणुपासुनि ब्रम्हांडाएवढा होत जातसे, तयासी तुळणा कोठे, मेरुमंदार धाकुटे || ११||
ब्रम्हांडाभोवते वेढे, वज्रपुच्छे करु शके| तयासी तुळणा कैंची, ब्रम्हांडी पाहता नसे|| १२||
आरक्त देखिले डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा| वाढता वाढता वाढे, भेदिले शून्यमंडळा|| १३||
धनधान्यपशुवृद्धी, पुत्रपौत्रसमस्तही|पावती रुपविद्यादी स्तोत्रपाठेकरुनिया|| १४||
भूतप्रेतसमंधादि रोगव्याधीसमस्तही| नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने|| १५||
हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली बरी| दृढदेहो, निसंदेहो, संख्याचंद्रकळागुणे|| १६||
रामदासी अग्रगण्यु, कपीकुळासी मंडणु| रामरुपी अंतरात्मा, दर्शने दोषनासती|| १७||
|| इती श्री रामदासकृतं संकटनिरसनं मारुतीस्तोत्रं सम्पूर्णं ||
3 Sep 2010 - 9:17 pm | कुक
अलन्कापुरी पुण्यभुमी पवित्र,
तेथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र,
तया आठविता महापुण्य राशी
नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वराशी
3 Sep 2010 - 9:27 pm | मिसळभोक्ता
अलन्कापुरी पुण्यभुमी पवित्र,
तेथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र,
तया आठविता महापुण्य राशी
नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वराशी
लिहिताना स्वत:शी गुणगुणून बघितले, तर नीट लिहायला मदत होईल.
उदा. असे म्हणून बघा.
अलङकापुरी पुण्यभूमी पवित्र, (क च्या आधी ङ येतो, न नाही. भू, भु नाही.)
तेथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र,
तया आठवीता महापुण्य राशी (पुन्हा तेच.)
नमस्कार माझा तया ज्ञानबाशी (सहा सात मात्रा जास्त होतायत)
ज्ञानियांच्या राजाचा उल्लेख करताय राव! काही नियम तरी पाळा.
3 Sep 2010 - 10:20 pm | राजेश घासकडवी
सही बदला चा अर्थ उत्तम सूड असा नसून तुमची स्वाक्षरी बदलून टाका असा आहे.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारची मीटरे ठोकाठोक करून दुरुस्त करून मिळतील.)
अशी हवी.
3 Sep 2010 - 10:22 pm | चतुरंग
-- मिटरठोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारची मीटरे ठोकाठोक करून दुरुस्त करून मिळतील.)
4 Sep 2010 - 8:00 pm | मिसळभोक्ता
हल्ली स्मार्ट मीटरे मिळतात म्हणे. त्यांना ठोकावे लागत नाही. फक्त चुम्माचाटी केली की चालतात. (हा शब्द आता नेहमीच्या वापरात आणण्याचा एक के प्र.)
3 Sep 2010 - 10:12 pm | पिवळा डांबिस
मग हे पाहिजेच!!!
"देवा हो देवा, गणपती देवा,
तुमसे बढकर कौन?
और तुम्हारे भक्तजनोंमें,
हमसे बढकर कौन!!!!"
बधा पहिलं बक्षिस मिळतं की नाही ते!!!!
:)
6 Sep 2010 - 10:41 am | priya_d
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
एवढ्या मोठ्या संख्येत, विविध प्रकारचे प्रतिसाद मिळतील असे वाटले नव्हते. माझा मुलगा 'देवा तुझे किती सुंदर आकाश' हे गाणे आणि मारूती स्तोत्र म्हणणार आहे.
सर्व्वांनी वेळ काढून दिलेल्या प्रतिसादाबद्द्ल पुन्हा एकदा धन्यवाद.
प्रिया