रान संपत्ती

जागु's picture
जागु in जनातलं, मनातलं
1 Sep 2010 - 4:54 pm

पावसांच्या सरी चालू झाल्या की निसर्ग आपली ही संपत्ती उधळायला सुरुवात करतो. त्या संपत्तीपैकीच ही काही रान फुले व झाडे. निसर्गाकडू आपल्याला ही संपत्ती विनामुल्य, विनाकष्ट मिळत असते. ही छोटी मोठी रानफुले, झाडे आपल्या नजरेला, मनाला अगदी गारवा देउन जातात. मनाचा, शरीराचा थकवा ह्यांच्या सहवासाने कुठे दुर पळतो त्याचा पत्ता लागत नाही. फक्त आपण त्यांच्याकडे डोळसपणे पाहील पाहीजे. निसर्गाने दिलेल्या ह्या संपत्तीची नजरेने लूट करुन पहा.

हे गोंडे नेहमीच कोणत्याही रानात, रस्त्यावर स्वागतासाठी ताठ सज्ज झालेले असतात.

तेरडा हा तर सगळ्यांच्याच परिचयाचा. नेहमीच हसत उभे असलेले हे फुल. पिठवरीला ह्या झाडाला पुजेचा मान मिळतो. ह्याची फळ खुप गमतीशिर असतात. लहानपणी ही तयार झालेली फळ तोडायची आणि हलकेच हाताने दाबायची मग हे फळ फुटून त्याचा आकार किडीप्रमाणे होतो. मग ते किडीच्या आकाराचे फळ कोणाच्यातरी अंगावर फेकून घाबरवायचे असा गमतीशीर खेळ असायचा.

ही आहे कोरांटी. माझ्या रानभाज्यांच्या सिरिजमधली भाजी. हे तिचे आलेले फुल. ही फुले आलेली झाडे जिथे मोठ्या संख्येने असतात तेथे काश्मिर असल्याचा भास होतो. लहान असताना आमच्या समोरच्या पडीक जागेत ही झाडे मोठ्या प्रमाणात होती. सगळे त्याला काश्मिरच म्हणायचे. ह्या फुलांमध्ये मधही असते. लहानपणी ही फुले काढून त्याची मध चोखण्याचाही टाईमपास चालु असायचा. तसेच ह्या फुलांचे गजरेही करायचो आम्ही.

अळू हा सुद्धा सगळ्यांच्याच परिचयाचा. त्याला आलेले हे फुल केवड्याच्या पातीसारखे भासते.

हे निसर्गाचं एक इटूकल पिटूकल बाळ अगदी बाळबोधपणे आपल्या बाललिला करत डोलत असत.

निसर्गाच्या ह्या पांढर्‍या फुलांचा अविष्कार अगदी नजर खिळवुन ठेवतो.

हे रोपट पहा कस तोर्‍यात मिरवतय. खाली पसरलेल्ल्या कवळ्याच्या रोपांना सांगत आहे माझी पान तुमच्यापेक्षा लांब आणि रंगित आहेत अगदी मोरपिसासारखी.

निसर्गाने ह्या रोपट्याला पहा कस रंगवुन टाकलय. निसर्गाच्या ह्या वरदानाने हे रोपट स्वतःला आकर्षीत करुन घेत आहे.

छायाचित्रणआस्वाद

प्रतिक्रिया

लहानपनीची आठवण झाली...त्या फुलांची नाव माहिती नव्हती...हो पण आम्ही सुद्धा ह्या गमती खूप केल्यात.

सूड's picture

1 Sep 2010 - 6:38 pm | सूड

नेहमीसारखंच नवीन माहिती देणारा...

रेवती's picture

1 Sep 2010 - 6:50 pm | रेवती

फुलांची माहिती छानच जागु!
कोरांटीचे फुलं भाद्रपदात खूप प्रमाणात येतात.
गौरींच्या पुजेसाठी आम्ही ही फुलं तोडून आणायचो.

स्वाती२'s picture

1 Sep 2010 - 7:03 pm | स्वाती२

छान लेख! लहानपणच्या अनेक आठवणी जागवल्यास.

पैसा's picture

1 Sep 2010 - 7:54 pm | पैसा

असेच म्हणते!

शिल्पा ब's picture

1 Sep 2010 - 11:49 pm | शिल्पा ब

नेहमीसारखाच मस्त लेख...तुमच्या लेखातुन छान माहीती मिळते..असेच लिहित जा.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

2 Sep 2010 - 12:53 am | जाई अस्सल कोल्हापुरी

मस्त्...छान वाटलं.!

सुनील's picture

2 Sep 2010 - 1:03 am | सुनील

मस्त!

ऑफीसात फोटो दिसत नाहीत. घरी जाऊन बघेन.
इथे देखील खूप रानफुलं दिसतात. पैकी हे ब्लू कॉर्नफ्लॉवर. मी एका कादंबरीत वर्णन वाचलं होतं की - हिज आईज वेअर ब्लू अ‍ॅज कॉर्नफ्लॉवर.
From Lotus

हे आमच्या व्हरमाँट चं स्टेट फ्लॉवर - रेड क्लोव्हर

From Lotus

शुचि's picture

2 Sep 2010 - 5:24 am | शुचि

लेख आणि फोटो आवडले.

जागुताई मस्त माहिती दिलीस... :)
अळुला आलेले फुल तर मी पहिल्यांदाच पाहिले !!! :)

नगरीनिरंजन's picture

2 Sep 2010 - 10:55 am | नगरीनिरंजन

असेच म्हणतो.
कर्दळीची फुलेही फार सुंदर असतात.

विसोबा खेचर's picture

2 Sep 2010 - 10:59 am | विसोबा खेचर

मनमोहक..!

वेताळ's picture

2 Sep 2010 - 11:16 am | वेताळ

सगळी फुले ओळखीची आहेत. आता तर इकडे आमच्या भागात सगळीकडे तर निसती त्याची उधळण सुरु आहे.
दोन नंबर्चा फोटोमधले झाड आमच्या इथे त्याला गौरीचे रोप म्हणतात. गौरीच्या दिवशी मुली त्याचा जुडगा बांधुन,तो जुडगा तांब्यात ठेवतात. दुपारी नटुन थटून मिरवणुकीने त्याचे नदीत विसर्जन करतात.
पन्हाळा व जोतीबाच्या डोंगरावर तर ही फुले बघितली तर मन एकदम ताजे टवटवीत होते. परत एकदा धन्यवाद.

सुहास..'s picture

2 Sep 2010 - 12:18 pm | सुहास..

झ का स !!

परिकथेतील राजकुमार's picture

2 Sep 2010 - 1:13 pm | परिकथेतील राजकुमार

जागु तै नेहमीप्रमाणेच 'लै भारी' लेखन :)

स्मिता_१३'s picture

2 Sep 2010 - 3:12 pm | स्मिता_१३

जागु ताई,

नेहमी प्रमाणे छान आणि उपयुक्त माहीती. तुझ्या निरिक्षणाला दाद !

सगळ्या सगळ्यांना मनापासुन धन्यवाद.