पुनरागमन..

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
29 Aug 2010 - 6:10 pm

मायबाप मिपाकर,
नमस्कार!!

अखेर.. यक्षनगरीत परतले आहे. जवळ जवळ अडीच महिन्यांच्या सुट्टीनंतर २७ ऑगस्टला मी अमेरिकेत परत आले आहे.
काही परिहार्य कारणांमुळे, ३० जुलै ऐवजी २७ ऑगस्टला यावं लागलं.

"गंध हलके हलके..!!" प्रकाशीत झाला. प्रकाशन सोहळ्याला खूपशा माझ्या आंतरजालीय मित्र मैत्रीणींनी उपस्थिती लावली होती. माझं मन खूप भरून आलं. इतके दिवस आंतरजालावर राहून काहीतरी नक्कीच मिळवलं याचं समाधान झालं.

प्रकाशन सोहळ्याचा वृत्तांत बिपिनदाने लिहिलेला वाचला मी. पण तेव्हा वेळेआभावी सविस्तर प्रतिसाद देऊ शकले नाही.
धन्यवाद बिपिनदा!!

आता, आता पुन्हा नव्याने मिपाकरांच्या सेवेत रूजू होते आहे... आधीही भरपूर प्रेम दिलंत यापुढेही असेच प्रेम आणि विश्वास दाखवाल अशी आशा आहे.

(खूप जणांनी घरच्या नंबरवर फोन केले, पण मी इथे नसल्यामुळे..त्यांना फोनवर भेटू शकले नाही. तेव्हा.."आता काय सेलेब्रिटी झालीये.. आपल्याशी कशाला ही बोलेल..!!! आता हीची अपॉईंट्मेंट घ्यावी लागेल..!!" ;) असे विचार करण्यार्‍यांनी माझी अडचण समजून घ्यावी.. :) मी अजूनही "प्राजु"च आहे.. अगदी "प्राजु" मधला उकार सुद्धा र्‍हस्वच आहे अजून, दीर्घ केला नाहीये... तर मी काय बदलेन!!) ;)

धन्यवाद!!!

आपलीच पूर्वीचीच,
सर्वव्यापी (की तापी)..

हे ठिकाणप्रकटन

प्रतिक्रिया

रेवती's picture

29 Aug 2010 - 6:12 pm | रेवती

स्वागत!
फिकट अक्षरात लिहिलेल्या मजकूराची गरज नव्हती.

अमोल खरे's picture

29 Aug 2010 - 6:28 pm | अमोल खरे

आणि अल्बम प्रकाशित झाल्याबद्दल अभिनंदन.

बहुगुणी's picture

29 Aug 2010 - 6:36 pm | बहुगुणी

आता 'जे न देखे रवी' मध्ये तर लिहाच, पण घसघशीत अडीच महीने स्वदेशात राहून आलात तर तिथे काय काय बदल अनुभवले तेही 'जनातले मनातले' मध्ये सविस्तर येऊ द्यात.

प्राजु's picture

29 Aug 2010 - 6:57 pm | प्राजु

नक्कीच!! :)

मी-सौरभ's picture

29 Aug 2010 - 11:53 pm | मी-सौरभ

आता तुमची लेखणी परजा...
मिपाला त्याची गरज आहे :)

ऋषिकेश's picture

29 Aug 2010 - 11:57 pm | ऋषिकेश

पुन्हा नव्याने स्वागत!

सुहास..'s picture

30 Aug 2010 - 12:18 am | सुहास..

मला धागा ऊघडताना वाटल ! प्राजुतैंची एखादी नवीन कविता आहे की काय ? छ्या भ्रमनिरास झाला !!

अवांतर : झाल्या की हो तुम्ही खरोखरच्या सेलोब्रेटी !!

गंध आवडला हे वेगळे सांगण्याची गरज नसावी .

शैलेन्द्र's picture

30 Aug 2010 - 7:38 pm | शैलेन्द्र

वेल्कम वेल्कम....

आता एखादी छान कविता येवुद्या...

लवकरच लेखणी घेईन हाती. थोडी सेटल होऊद्या.