✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

प्रांतांच्या गोष्टी - काही संदर्भ

आ
आळश्यांचा राजा यांनी
Sat, 08/28/2010 - 23:34  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4818 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

डीआरडीए

श्रावण मोडक
Sat, 08/28/2010 - 23:46 नवीन
डीआरडीए प्रोजेक्ट डायरेक्टर - प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा - महाराष्ट्रातही आहे. अर्थात, तुम्ही म्हणता तसे हे जिल्हा परिषदेच्या सीईओपेक्षा किंचित दुय्यम पद. थोडे बाजूलाच असलेले असावे.
  • Log in or register to post comments

थँक्स!

आळश्यांचा राजा
Sat, 08/28/2010 - 23:59 नवीन
बरोबर. इथे कलेक्टर हाच सीइओ असतो. डीआरडीए ही निमसरकारी यंत्रणा आहे. सरकारी नोकर इथे डेप्युटेशनवर आलेले असतात. शासकीय भाषेत फॉरिन सर्विसचे नियम/ सेवाशर्ती त्यांना लागू होतात. जिल्हा परिषदा जिथे परिपक्व झालेल्या आहेत, तिथे ही यंत्रणा धूसर होत जाते. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सदस्य निरनिराळ्या समित्यांच्या मार्फत कार्यकारी बनतात. मंत्री बनण्याचे प्रशिक्षण देणार्‍या शाळेचे पोटेन्शियल या व्यवस्थेत (जिप) आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

खूप उपयोगाची माहिती, धन्यवाद!

बहुगुणी
Sun, 08/29/2010 - 01:02 नवीन
हे सगळं फ्लो चार्ट च्या स्वरूपात दाखवता आलं तर समजायला खूप सोपं जाईल असं वाटतं. मला अभिप्रेत असलेल्या फ्लो चार्ट चं उदाहरण या दुव्यावर आहे. आणि तो फ्लो चार्ट दाखवाल तेंव्हा आमदार/ खासदार/ लोकनियुक्त प्रतिनिधी यात कुठे कुठे (!) येउ शकतात हेही सांगणार का? (मी 'सूज्ञ' नाही हे वेगळे सांगायला नकोच! :-))
  • Log in or register to post comments

तुम्ही दिलेली लिन्क छान आहे.

आळश्यांचा राजा
Sun, 08/29/2010 - 08:32 नवीन
तुम्ही दिलेली लिन्क छान आहे. मला फ्लो चार्ट इथे बनवता येणे अवघड आहे. विशेष टिप्पणी टाकण्याचे कारण होते. काही ठिकाणी, चर्चांमधे सरसकट राजकारण्यांना कुठल्याही गोष्टीसाठी जबाबदार धरण्याची आपल्याला सगळ्यांनाच (जनरली) सवय असल्याचे दिसून येते. उदा. खासदारांचे पगार. त्यांचे काम नेमके काय आहे याचा विचार न करता हे लोक देश चालवतात असे अतिसुलभीकरण केले जाते. ही मंडळी प्रशासनावर खूप प्रभाव टाकू शकतात, टाकतही असतात. पण प्रशासकीय व्यवस्था चालवणे हे त्यांचे काम नव्हे. आपल्या व्यवस्थेमध्ये पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह हे लोकांनी निवडून दिलेल्या आमदार खासदारांमधून होतात. त्यामुळे प्रत्येक आमदार/ खासदार हा एक पोटेन्शियल मंत्री असतो. पण म्हणून काही तो एक्झिक्युटिव्ह होत नाही. लेजिस्लेटरच राहतो. असे असले तरीही निवडणुका एक्झिक्युटिव्ह मुद्द्यांवरच होत असल्यामुळे आमदार/ खासदारांचा लेजिस्लेटिव्ह रोल मागे राहतो. यातूनच आमदार/ खासदार लोकल एरिया डेव्हलपमेंट फंड नावाचा घटनात्मक रचनेला बगल देणारा प्रकार निघाला आहे. या फंडातून नेमकी कशा प्रकारच्या विकासाची कामे होतात हे बघण्यासारखे असते. जिल्हा प्रशासनामध्ये लोकनियुक्त प्रतिनिधींना बराच वाव आहे. विकासाच्या सर्वच कामांमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो कार्यकारी या भावाने. सरपंच, पंचायत समिती सभापती, जि.प. अध्यक्ष हे लोक कार्यकारी, म्हणजेच एक्झिक्युटिव्ह असतात. कसेही असले तरी निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणून एकूणच आमदार/ खासदारांची जबाबदारी मोठी आहे हे खरेच. निव्वळ लेजिस्लेटर्स असले तरीही प्रशासनाला धाकात ठेऊन कामे करवून घेणे त्यांना मुळीच अशक्य नाही. असे होताना फारसे दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

खुप गुंतागुंतीची रचना आहे

अमोल खरे
Sun, 08/29/2010 - 18:46 नवीन
आणि वर काम तर काही करत नाहीत ही लोकं.........मंत्री + सरकारी अधिकारी म्हणजे एक डेडली कॉम्बिनेशन आहे. :) प्रांताच्या गोष्टी वाचताना मजा मात्र येते. पण असे किती क्लीन लोकं आहेत प्रशासनात तो पण एक चर्चेचा विषय आहे. अविनाश धर्माधिकारी, अरविंद ईनामदार, किरण बेदी....... प्रायव्हेट क्षेत्रात असती तर कुठच्या कुठे गेली असती ही लोकं.....गव्हर्मेंट मधे राहिल्यामुळे ती लोकं कुठल्या कुठे फेकली गेली. असो. माहिती बद्दल आभार. जनरल नॉलेज साठी चांगली आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

टुकुल
Mon, 08/30/2010 - 13:00 नवीन
रचना खुपच गुंतागुंतीची आहे, दोन-तीन वेळा वाचल्यावर थोड समजल्यासारख वाटतय :-) --टुकुल
  • Log in or register to post comments

तुमच्या प्रांतांच्या गोष्टी व

यशोधरा
Mon, 08/30/2010 - 14:18 नवीन
तुमच्या प्रांतांच्या गोष्टी व हा लेख ह्या सर्वांची प्रिंट घेऊन शांतपणे वाचायची इच्छा आहे. तुम्ही प्रवानगी दिली तर प्रिंट घेईन, आणि त्यांचा दुरुपयोग, लेखन चोरी वगैरे होणार नाही, ही खात्री बाळगावी.
  • Log in or register to post comments

धन्यवाद मालक तुमच्या

निखिल देशपांडे
Mon, 08/30/2010 - 20:21 नवीन
धन्यवाद मालक तुमच्या प्रांताच्या गोष्टीत येणारे संदर्भ गरजेचे होतेच ते उत्तमरीत्या कळले सुद्धा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा