जर्रा खाजवा की

अनाम's picture
अनाम in जनातलं, मनातलं
25 Aug 2010 - 6:51 pm

चला मंडळी डोक खाजवा जरा ;)
आणि '?' च्या जागी योग्य आकडा लावा बर :)
एकदम सोप्प हाय.

आकडा लावा : ;)




१५
१२




२८
२०




४५
३०




६६
४२




?
५६

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

मनीषा's picture

25 Aug 2010 - 6:59 pm | मनीषा

? = ९१

धमाल मुलगा's picture

25 Aug 2010 - 7:00 pm | धमाल मुलगा

आम्ही मटका खेळत नाय. :D
(ह. घ्या. हो!)

८७ असावे असे वाटते आहे मात्र योग्य स्पष्टिकरण मिळालेले नसल्याने फायनल उत्तर आत्ता देत नाही. थोड्या वेळाने देईन. :)

रेवती's picture

25 Aug 2010 - 7:04 pm | रेवती

९१

उत्तर उद्या डिक्लेर करु..
तवर कीप गेसिंग :)

कायतरीच काय?
पुढची आकडेमोड तरी द्या!

हा हा हा बहुगुणींनी वाईट सवय लावली आहे मिपाकरांना.

थोड वेळ वाट पहा.

रेवती's picture

25 Aug 2010 - 7:10 pm | रेवती

बरोब्बर ओळखलेत.

अनामिक's picture

25 Aug 2010 - 7:11 pm | अनामिक

९१

ब्रिटिश टिंग्या's picture

25 Aug 2010 - 7:17 pm | ब्रिटिश टिंग्या

माहिती नाही का.....पण सगळेच ९१ म्हणतात म्हणुन आम्हीसुद्धा ९१.

आगाऊ कार्टा's picture

25 Aug 2010 - 7:21 pm | आगाऊ कार्टा

+ + = ९ ..... ९+३ = १२ / १२ + ३ = १५
+ + = १२ ..... १२ + ८ = २० / २० + ८ = २८
+ + = १५ ..... १५ + १५ = ३० / ३० + १५ = ४५
+ + = १८ ..... १८ + २४ = ४२ / ४२ + २४ = ६६
+ + = २१ ...... २१ + ३५ = ५६ / ५६ + ३५ = ९१

अनामिक's picture

25 Aug 2010 - 7:28 pm | अनामिक

छ्या... किती कष्ट घेतलेत...
१५ २८ ४५ ६६ ? ही सिरीज बघा... २८ येण्यासाठी १३ जमा करा, त्यानंतर १७ जमा, त्यानंतर २१ जमा म्हणून शेवटी २५ जमा करा..

मेघवेडा's picture

25 Aug 2010 - 7:37 pm | मेघवेडा

लोल.. मीही असंच केलं होतं पण घाई नडली .. :(

इतकं करायची पण गरज आहे का?
फक्त पॅटर्न ओळखायचा आहे यात!

५ * ३ = १५
७ * ४ = २८
९ * ५ = ४५
११ * ६ = ६६

म्हणून

१३ * ७ = ९१

यात गुणाकाराचा पहिला आकडा अ‍ॅरिथमॅटीक प्रोग्रेशन मधे वाढणारी विषम संख्या आहे. आणि दुसरा आकडा तर चक्क इन्क्रिमेंटल सेरिज आहे.

--असुर

चला ज्यांच्या प्रयत्न करुन झालाय (चुक का बरोबर ते उद्या पाहु.) त्यांच्या साठी अजुन काही खाद्य....

1,2, 2, 4, 8, 11, 33, ?

27, 82, 41, 124, 62, 31, 94, 47, 142, 71, 214, 107, ?

अनामिक's picture

25 Aug 2010 - 7:44 pm | अनामिक

पहिल्याचे ३७?
हापिसात असल्याने दुसर्‍याचे उत्तर थोड्या वेळाने..

मृत्युन्जय's picture

25 Aug 2010 - 7:50 pm | मृत्युन्जय

1,2, 2, 4, 8, 11, 33, ? - पास

27, 82, 41, 124, 62, 31, 94, 47, 142, 71, 214, 107, ३२२

बाकी हे गणित काही झेपत नाही राव आपल्याला. त्यामुळे उत्तर (जे अर्धे दिले आहे ते पण) चुकले असण्याचीच शक्यता जास्त.

कानडाऊ योगेशु's picture

25 Aug 2010 - 8:50 pm | कानडाऊ योगेशु

1,2, 2, 4, 8, 11, 33, ?

३७.
गुगलबाबा जिंदाबाद.

दुसर्याचे उत्तर अजुन गुगलबाबावर सापडले नाहे :(

इथे सापडले.

( 'ढ'माल मुलगा) योगेशु.

राजेश घासकडवी's picture

27 Aug 2010 - 4:06 am | राजेश घासकडवी

३७ (बहुधा)
३२२ (भागिले २, आणि गुणिले ३ +१ या पद्धतीने माला बनली आहे)

रेवती's picture

25 Aug 2010 - 7:51 pm | रेवती

३६
३२२

दाद's picture

25 Aug 2010 - 7:52 pm | दाद

मिपा वर मटका ? लै वाइट!

ramjya's picture

25 Aug 2010 - 8:22 pm | ramjya

१५+१३=२८

२८+१७=४५

४५+२१=६६...

६६+३५=९१

ramjya's picture

25 Aug 2010 - 8:26 pm | ramjya

६६+२५=९१......गडबडीत ३५ लिहीले.....

मी-सौरभ's picture

25 Aug 2010 - 8:35 pm | मी-सौरभ

लै वर्स आदी दिली व्हती ते दिस आटंवल..

पु. को. शु. :)

मृत्युन्जय's picture

25 Aug 2010 - 9:39 pm | मृत्युन्जय

1,2, 2, 4, 8, 11, 33, ३७
1+1 = 2
2*1 = 2
2+2 = 4
4*2 = 8
8+3 = 11
11*3 = 33
33+4 = 37

एकाआड एक बेरीज आणी गुणाकार आहे. मला तरी हेच बरोबर वाटते आहे. पण माझे गणीताचे अचाट आणी अगाध ज्ञान बघता हे चुकीचे असण्याची शक्यता १००% आहे (इथे प्रोबेबिलिटीचे सगळॅ नियम तुटुन पडतात)

पुढ्ची संख्या १४८ यायला हवी.

सुनिल पाटकर's picture

25 Aug 2010 - 9:59 pm | सुनिल पाटकर

उत्तर - ८३

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Aug 2010 - 10:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

४२

कारण इथे आहे.

चिंतामणी's picture

25 Aug 2010 - 10:07 pm | चिंतामणी

९१

(पण भौ "जर्रा खाजवा की""चे पुढे डोक लिहायला काय हरकत होती.)

९१

पण तुमचे उत्तर काय ते दिले नाहित अजून.