चिंतनिका

धोंडोपंत's picture
धोंडोपंत in जनातलं, मनातलं
7 Apr 2008 - 10:00 pm

लोकहो,

हल्ली सर्वत्र सत्संगाचे मळे पिकले आहेत. अनेक मेडिटेशन, सेल्फ इम्प्रूव्हमेंट शिबीरे, आर्ट ऑफ लिव्हिंग वगैरे वगैरे गोष्टींचा सुळसुळाट झाला आहे.

हे सर्व पाहिल्यावर आम्हीही आयुष्य जरा गंभीरपणे घेतले. आम्हांला आमच्या चिंतनातून जे नवनीत मिळाले ते असे.....

..

..
आपण आयुष्यात काही वेळा गंभीरपणे विचार केला पाहिजे.

अंतर्मुख होऊन स्वत:ला काही प्रश्न विचारले पाहिजेत. त्यांची उत्तरे शोधली पाहिजेत.

ते प्रश्न म्हणजे.....

आपण कोण आहोत?

आपण कोठून आलो आहोत?

आपण कोठे चाललो आहोत?

आणि

जेव्हा आपण तिथे पोहोचू

तेव्हा
..

..

..

..

..

तिथले बार उघडे असतील का?

आपला,
(प्रश्नबंबाळ) धोंडोपंत

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

रामदास's picture

7 Apr 2008 - 10:47 pm | रामदास

Brutus....Thou too?

विसोबा खेचर's picture

8 Apr 2008 - 7:17 am | विसोबा खेचर

जेव्हा आपण तिथे पोहोचू
तेव्हा
तिथले बार उघडे असतील का?

हा हा हा! आपण एक काम करूया धोंड्या! तिथले बार केव्हा उघडे असतील ही चौकशी करूनच येथून निघू म्हणजे पदरी निराशा यायची नाही! :))

आपला,
(हुश्शार!) तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Apr 2008 - 8:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंत,सध्या संस्थळावर अध्यात्माच्या विचारातील अर्थ शोधण्याची लाट आलेली आहे आम्हाला वाटले त्या लाटा इकडेही आल्या की काय ? :)असो,आपण कोण आहोत?
आपण कोठून आलो आहोत?
आपण कोठे चाललो आहोत?
या तीनही प्रश्नांचे उत्तर  'माहित नाही' असे आहे.
(देवधर्मवाला प्रा.डॉ )
जेव्हा आपण तिथे पोहोचूतेव्हातिथले बार उघडे असतील का?
तिथले बार बंद असतील तर दुसरीकडे शोधु पण दोन घोट घेतल्याशिवाय परत जायचे नाही !!!!:))))

(दोन पेग वाला प्रा.डॉ )