प्रस्तुत धाग्यावर आता २३० पेक्षा जास्त प्रतिसाद आलेले आहेत. यापुढील चर्चेकरता नवा धागा उघडावा.
- संपादक मंडळ
माझा ऑफिसमेट जयंती (हो, हे मुलाचं नाव आहे, जयंती प्रसाद) अधूनमधून 'बाबागिरी'बद्दल बोलतो. 'बाबा' म्हणजे बाबा अथवा वडील नव्हे, "बाबा" म्हणजे भोंदूबाबा, बाबा-बुवा-बापू-माता-गुरू मधले बाबा! कालसुद्धा जयंती अमका माणूस फारच बाबागिरी करतो असं मला सांगत होता. म्हणून मी त्याला व्याख्या विचारली, "'बाबा' म्हणजे नक्की कोण?" त्याचं उत्तर अगदीच चमत्कारिक नसलं तरीही विचार करण्यायोग्य वाटलं. त्याचं उत्तर असं:
बाबा लोकांची तीन (जयंतीच्या बाबतीत ट्रीलॉजी जुनीच आहे.) लक्षणं असतात. यापुढे या लेखापुरतं 'बाबा' आणि बाबा हे शब्द एकच आहेत असं समजावं.
१. बाबा लोकं अखंड उपदेश करतात; पण त्यातल्या अगदी कमी गोष्टी त्यांच्या स्वतःच्या बाबतीत लागू पडतात.
२. बाबा लोकं कधी कोणाचंही ऐकून घेत नाहीत.
३. बाबा लोकांचे प्रचंड प्रमाणात (प्रमाणात हा शब्द महत्त्वाचा, का ते पुढे येईलच) अनुयायी असतात.
प्रमाण हा शब्द अशासाठी वापरला की, तो आमच्या होस्टेलमधल्या एकाला बाबा म्हणतो. होस्टेलमधले १२-१५ पैकी दहा लोकंतरी त्याचे अनुयायी असतात. उदा: तो म्हणाला आज पिझा खाऊया, की कॅण्टीनमधे जेवणारे सगळे पिझा खायला तयार होतात. आपलं म्हणणं कितीही चुकीचं असलं तरी तेच तो पुढे दामटत रहातो. इ.इ.
असो. तर आमचा हा संवाद सुरू असतानाच माझा मोबाईल वाजला, पाहिलं तर एक एसेमेस. त्याकडे मी दुर्लक्ष केलं आणि मुख्य, महत्त्वाच्या गॉसिपकडे लक्ष दिलं. तर पुन्हा एक एसेमेस. तर मग 'टॅम्प्लीस' घेऊन एसेमेस पाहिले. तर आणखी कोणी "गुरू" आणि "बापू" अनुक्रमे मला रूद्राक्ष आणि मणी विकत होते. 'डीएनडी'ला **वर मारणार्या या लोकांना चार भाषांत चार सणसणीत शिव्या हासडून मी पुन्हा जयंतीशी बोलायला गेले तर जयंती स्वतःच "बाबा" बनल्यागत माझ्याकडे चक्क दुर्लक्ष करता झाला!
मग मीही त्यालाही **वर मारून पुन्हा मराठी आंतरजालाकडे वळले. पाहिलं तर उपक्रमावर अनिरुद्ध बापूंबद्दल ही चर्चा आली होती. मला प्रश्न असा पडला की या बाबा, बुवा, माता, बापू, स्वामी, गुरुंना अनुयायी मिळतातच कसे? तेव्हा एक त्यामानाने जुना टेडवरचा व्हीडीओ आठवला, हा पहा. पण हे सगळं आपल्याकडे असंच होतं का? म्हणजे या व्हिडीओत डेरेक सिव्हर्स म्हणतो त्याप्रमाणे The first follower transforms a lone nut into a leader. हा पहिला अनुयायी कसा मिळवायचा?
प्रतिक्रिया
20 Aug 2010 - 6:03 pm | वेताळ
पहिला तुम्हाला वानर बनता येते का तपासुन पहा.मग बाबा बना व इतराना तुमची वानरे बनवा.
20 Aug 2010 - 6:03 pm | बिपिन कार्यकर्ते
त्याला को-अवतार करून घ्यायचा... शिंपल. एवढंबी कळत नाही तुम्हा झंटलमन लोकान्ला.
20 Aug 2010 - 6:13 pm | अर्धवट
तु माझी अनुयायी हो मी तुझा होतो.. संपला विषय..
बाकी ती चर्चा वाचुन अजुन हसतोय.. थोड्यावेळानं खूप गंभीर होइन कदाचित. :(
20 Aug 2010 - 6:20 pm | असुर
स्वतःचे वडील, आणि शिवाजी महाराज सोडून बाकी सगळ्या बुवा, बापू, बाबा, महाराजांना आम्ही जाहीररित्या फाट्यावर मारतो!
लेख मस्तच! हा प्रश्न मलासुद्धा खूप वेळा पडलाय. कसे काय लोक स्वतःची बुद्धी गहाण ठेवून या 'बाबा' लोकांच्या भजनी लागतात?
(वाचून असेही वाटले की परवाचा 'बापू'पुराणाचा बाण वर्मी लागला की काय? :-) )
20 Aug 2010 - 6:24 pm | अर्धवट
अगदी असेच म्हणतो..
फक्त आमची यादी अजुन लहान आहे ;)
20 Aug 2010 - 6:20 pm | मृत्युन्जय
तो म्हणाला आज पिझा खाऊया, की कॅण्टीनमधे जेवणारे सगळे पिझा खायला तयार होतात.
पिझ्झ्याचे पैसे तो देत असेल हो. शिंपल.
कोणि स्वखर्चाने पिझ्झा खायला घालणार असेल तर आम्ही पन तेवढ्यापुरते अनुयायी व्हायला तयार आहोत
20 Aug 2010 - 6:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बिपिन आणि अर्धवटः
पण या फ्रॉडमधे लोकं सामील होतातच कसे? म्हणजे मला असा प्रश्न आहे की उदा:
... रावण मरणार निश्चित॥ हे वाक्य घेऊ या.
रावण एकतर मेलेला आहेच. त्यातून जन्माला आलेली प्रत्येक गोष्ट, व्यक्ती मरणारच! रावण आणि कौरवच कशाला, राम, कृष्ण, द्रौपदी सगळेच मेले. तर मग हे वेगळं सांगतो आहोत असा आभास कसा काय निर्माण करतात हे भोंदू लोकं?
20 Aug 2010 - 6:24 pm | बिपिन कार्यकर्ते
रावण हे रूपक असू शकतं. तसंही रावण ही वृत्ती आहे, माणूस नाही.
20 Aug 2010 - 6:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
रूपक आहे हे मान्य केलं तर मग जी या वाक्यातली पहिली ओळ आहे, युद्ध माझा राम करणार, ती लोकांना परावलंबी करत नाही का? असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी याप्रमाणे?
20 Aug 2010 - 8:48 pm | प्रियाली
म्हणजे "तुम लडो हम कपडा संभालता है|" की "शिवाजी दुसर्यांच्या घरी जन्माला घालायचा" असे?
21 Aug 2010 - 4:08 am | आमोद शिंदे
होहो असेच :)
21 Aug 2010 - 12:13 pm | मृगनयनी
की "शिवाजी दुसर्यांच्या घरी जन्माला घालायचा" असे?
श्शी!!!! .. दुसर्या घरचा वंश (मग भले तो शिवाजी का असेना! )... पण कुणी स्वतःच्या पोटात का सांभाळतंय? :|
21 Aug 2010 - 5:07 pm | प्रियाली
हेच वाटतंय वरच्या श्लोकातून. तुम्ही श्शी! म्हणाल्याबद्दल धन्यवाद. स्वतः राम व्हा. वानर नको.
21 Aug 2010 - 6:09 pm | मृगनयनी
हेच वाटतंय वरच्या श्लोकातून. तुम्ही श्शी! म्हणाल्याबद्दल धन्यवाद.
प्रियाली ताई, कशाचेही काय धन्यवाद देतेस ?
तू जे लिहिलंस... त्याच्या भावना पोचल्या गं आमच्यापर्यंत.. पण त्याचा शब्दशः अर्थ "घाण" होता.. म्हणून मला अशी प्रतिक्रिया द्यावी लागली! :)
स्वतः राम व्हा. वानर नको.
अगं ... इथेच तर चुकतं ना! .....
आमचा आमच्या अनिरुद्धावर पूर्ण विश्वास आहे... तो आम्हाला दगा देणार नाही, याचीही आम्हाला पूर्ण खात्री आहे..
आणि "राम" हा एकच असतो ना!... आणि "वानरे" खूप सारे असतात!...
रामनामाचा अखंद जप करणार्या वानरांच्या मदतीशिवाय राम समुद्रोल्लंघन करून लंकेला पोचू शकत नाही....
पण "रावणा"चा वध फक्त रामच करू शकतो ना!... "सीताहरण" हे तर केवळ एक कारण होते... पण मूळ उद्देश "रावणाचा विनाश"हाच होता...
अगदी रोजच्या जीवनात सुद्धा.. अनेक "रावण"रुपी सन्कटे येतात... पण माझ्या अनिरुद्धाचे स्मरण केल्यावर त्या सन्कटांचा सामना करण्याचे बळ मला मिळते.... आणि त्या सन्कटाचे निवारण होते...
कदाचित कुणाच्या आयुष्यात अनिरुद्धा'ऐवजी दुसर्या कुठल्या गुरुचेही नाव असू शकते... कारण गुरुमुळे तुमच्या जीवनाला दिशा मिळते....
अर्थात... अनेक भोन्दु बुवा-देखील आहेत.. समाजात... मला इथे त्यांची नावं घ्यायची नाहीयेत... त्यान्च्याबद्दल टी.व्ही.चॅनेल वरती... बर्याचे गोष्टी पहयला आणि ऐकायला मिळतात... त्यामुळे कुणी कुठला "गुरु" करावा.. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे....
|| जे जे मजसाठी उचित, तेचि तू देशिल निश्चित..... नाही तक्रार राघवा|| या उक्तीप्रमाणे जे मजसाठी योग्य आहे, ते मला माझा "गुरु" देणारच आहे.. असा विश्वास मनात बाळगणे गरजेचे आहे... अर्थात याचा अर्थ "असेल माझा हरि, तर देइल खाटल्यावरी".. असा होत नाही....
पण स्वामी समर्थ, साईबाबा, कलावतीआई, गजानन महाराज..., अनिरुद्ध बापू... या आणि इतर -खरोखर गुरु म्हणण्यायोग्य अशा व्यक्तींचे एकच सांगणे असते... की ,
"तुम्ही जे काही कर्म करताय.. ते मला अर्पण करा..आणि माझ्यावर दृढ श्रद्धा ठेवा... तुमच्या दिवसभराच्या कामाची सुरुवात करताना... माझे स्मरण करा.. आणि म्हणा... " स्वामी/ बापू/ आई ........ आज मी हे जे काही करते आहे.. तुम्ही माझ्याकडून ते व्यवस्थित पार पाडुन घ्या..."
अर्थात.. एकदा गुरुला शरण गेल्यावर आणि जीवनातले प्रत्येक काम गुरुला अर्पण केल्यावर. (मानसपूजा).. तुमचे काम नक्की यशस्वी होते..... प्रत्येक पायरीवरती... तुमचा गुरु तुम्हाला सांभाळुन घेतो...
हा माझा स्वतःचा अनुभव आहे....
कारण कुणी काहीही म्हटले, तर "कर्ता" हा नेहमी "गुरुच" असतो....
त्यामुळेच जर माझ्या गुरुने मला अभयवचन दिलेले आहे, की "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" .. तर मग मला इतर कुणाला भिण्याचे कारण काय ?
गुरुच्या अभयवचनावरती गाढ विश्वास असणारी माणसे आयुष्यात कधीच वाया जात नाहीत.. आणि नेक काम करताना.. कितीही अडथळे आले... तरी कुणालाही घाबरत नाहीत... आणि त्यांच्या हातून अयोग्य असे काहीही... घडू शकत नाही!
टीप : आयुष्यात माणसे अनेक सवयींचे गुलाम असतात... अनेक लोकांसमोर लाचार असतात.... नाईलाजाने का होईना.. पण स्वतःच्या स्वार्थासाठी ते अनेक गोष्टींना, व्यक्तींना शरण जातात.... उदा. बॉस.
आणि ही शरणागती पत्करताना ते अभिमानाने सांगतात... आमच्या संसारासाठी, नोकरीसाठी मी असं केलं... मी माझ्या बॉसच्या "फेवर" मध्ये आहे... त्यामुळे कसलीच भीति नाही.... इ इ. अनेक गोष्टी..... तिथे त्यांचा 'कर्ता' त्यांचा बॉस असतो...
पण देवाला शरण जाणे, किन्वा गुरुप्रति पूर्ण विश्वास मनी बाळगणे.. खूप जणांना कमीपणाचे वाटते...
देवासमोर माथा टेकणे.. म्हणजे स्वकर्तृत्वावर अविश्वास दाखवणे... असे बर्याच जणांना वाटते...
पण देवासमोर काय किन्वा गुरुसमोर काय ... शरणागती पत्करणे म्हणजे... कधीही दगा न देणार्या शक्तीला आपले म्हणणे- हेच होय!
देव /गुरु हा सम्पूर्ण आयुष्याचा कर्ता आहे, हीच गोष्ट नेमकी बरेच जण दुर्लक्षित करतात.. आणि स्वतःच्या खोट्या अहंकाराला कवटाळत बसून आपापल्या कर्तृत्वाचे गोडवे गातात...
त्यामुळे "युद्ध माझा रामच करणार आहे!..- कारण तो कर्ता आहे.
. विश्वाचा स्वामी गुरुदेव- दत्त हाच माझा मूलाधार आहे.- शक्तीचा मूलस्त्रोत!
... मी यःकश्चित वानर आहे.... हे माझे अहोभाग्य आहे.. की "रावणाच्या" विनाशासाठी रामप्रभूंची मदत करण्यासाठी माझा हातभार लागणार आहे.... आणि पर्यायाने रामाची माझ्यावर कृपादृष्टी असल्यामुळे माझ्या आयुष्यातल्या "रावणांचा"- सन्कटांचा चुटकीसरशी विनाश होणार आहे.....
_________________________
आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, एखाद्याच्या श्रद्धेचा कधीही अपमान करू नये... अगदी एखाद्याच्या वैयक्तिक आकसापोटी किमान कुणाच्या "गुरुजनां" वर चिखलफेक होणार नाही. आणि कुणाच्या श्रद्धेचा अपमान होणार नाही.. याची प्रत्येकाने काळजी घ्यावी! _/\_
22 Aug 2010 - 3:37 am | आमोद शिंदे
"तुम्ही जे काही कर्म करताय.. ते मला अर्पण करा..आणि माझ्यावर दृढ श्रद्धा ठेवा... तुमच्या दिवसभराच्या कामाची सुरुवात करताना... माझे स्मरण करा.. आणि म्हणा... " स्वामी/ बापू/ आई ........ आज मी हे जे काही करते आहे.. तुम्ही माझ्याकडून ते व्यवस्थित पार पाडुन घ्या..."
हाण्ण! वानर असा विचार कधीही करु शकणार नाही. त्यासाठी माणूसच हवा. ताई तुम्ही वानर नाही.
22 Aug 2010 - 11:56 am | Pain
गुरुच्या अभयवचनावरती गाढ विश्वास असणारी माणसे आयुष्यात कधीच वाया जात नाहीत.. आणि नेक काम करताना.. कितीही अडथळे आले... तरी कुणालाही घाबरत नाहीत... आणि त्यांच्या हातून अयोग्य असे काहीही... घडू शकत नाही!
not necessarily.
असे न झाल्याची माझ्याकडे उदाहरणे आहेत.
तुमची श्रद्धा आहे आणि तुमची संकटे दूर होतात / बळ मिळते. यात स्पष्ट परस्परसंबंध नाही. फक्त नशीब/रॅंडम इव्हेंट/ प्रोबॅबिलिटीचा भाग आहे.
23 Aug 2010 - 12:17 am | अर्धवटराव
मृगनयनीजी,
तहान लागली असता पाणि पिण्याने तृप्ती येते, हा अनुभव ज्याने घेतला त्यालाच पाण्याचे महत्व कळेल.
हे कळून देखील पाण्याचे महत्व नाकारणे हि अंधश्रद्धा, आणि अनुभवाविण उगाच उदोउदो करणे हि देखील अंधश्रद्धा. शेवटी ज्याचि त्याची वेळ असते...
(अर्धजागृत) अर्धवटराव
23 Aug 2010 - 2:39 am | प्रियाली
हे धादांत चुकीचे आहे. कामे यशस्वी आणि अयशस्वी होण्यात कोणत्याही देवा-गुरुचा हात नाही.
दुसर्या शब्दात तुमचा जो गुरु आहे तो इतर कोणाचा "भोंदूबाबा"ही असू शकेल. तसे असल्यास तुम्ही त्याचा उदो-उदो केल्याने त्याच्या भावना दुखावण्याचा संभव आहे. याची काळजी तुम्ही कधी केलीत का? जर केली नसेल तर त्याने तुमची काळजी करावी आणि तुमच्या श्रद्धेला दुखवू नये असे तुम्हाला वाटू नये.
बाकी आपले विचार मला पटत नाहीत हे वेगळ्याने सांगायला नकोच.
23 Aug 2010 - 6:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> कामे यशस्वी आणि अयशस्वी होण्यात कोणत्याही देवा-गुरुचा हात नाही.
असं कसं ? प्रयत्न जेव्हा संपतात तेव्हा देवावर हवाला सोडला जातो तेव्हा यश मिळाले तर देवाचा [गुरुची काही आयड्या नाही] हात नक्की असावा असे वाटते. गीतेत भगवंत श्रीकृष्णाने म्हटले आहे की,
''अधिष्ठानं,तथा कर्ता करणं च पृथग्विधम्
विविधाश्च पृथग्चेष्टा, देवं चैवान्न पंचमम्'' [जालावरील दुवाअजून काही दुवे ]
स्थळ, प्रत्यक्ष कर्ता, नानाप्रकारची साधने, कर्त्याच्या क्रिया, या चार कारणाशिवाय जोडीला दैव हे एक पाचवे कारण आहे असे म्हटले आहे. त्यामुळे आपला या दैवावर विश्वास आहे. उपप्रतिसादापूरता हा विषय आमच्यासाठी संपला.
-दिलीप बिरुटे
23 Aug 2010 - 6:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आणि प्रयत्न संपलेच नाहीत तर?
23 Aug 2010 - 6:30 pm | प्रियाली
हा केवळ मनाची समजूत घालण्याचा प्रकार आहे.
जग दैवावर विश्वास ठेवून चालत नाही. :) तसे असते तर पहिली चार कारणे बाजूला ठेवून पाचव्यावरच अवलंबून राहीला असता मनुष्य. जेव्हा सर्व उपाय थकतात तेव्हाच माणूस दैवावर हवाला सोडतो. त्यावरून दैवावरचा विश्वास ध्यानात यावा.
अरेच्चा! सुरुवातही आपणच करायची आणि शेवटही आपणच करायचा. नो प्रॉब्लेम! चालू द्या.
23 Aug 2010 - 9:32 pm | अनाम
अहो प्रा.डॉ. जेव्हा आपले प्रयत्न संपलेलेल असतात तेव्हा कदाचीत दुसर्या एखद्या मित्राचे/नातेवाईकाचे प्रयत्न चालुच नसतील कशावरुन.
तुमचा मुद्दा पटला नाही.
पण आपण स्वतःच विषय संपवलायत तर बोलणेच खुंटले :)
23 Aug 2010 - 10:26 pm | विकास
हे खरे आहे, पण या संदर्भात देखील कृष्णाचे एकच वाक्य घेऊन त्याचा संदर्भ देणे हे थोडेसे आउट ऑफ कॉन्टेक्स्ट होते असे वाटते. जरी संपूर्ण गीतेच्या संदर्भात नाही तरी त्याच्या पुढच्याच श्लोकाशी याचा प्रत्यक्ष संदर्भ लावताना त्याचा अर्थ वेगळा होतो. खालील ओळी मराठीतील आहेत:
आता कृष्ण धर्माप्रमाणेच ही कारणे अधर्माची पण आहेत असे म्हणतो. मग जो स्वतःसंदर्भात "स्थापावया पुन्हा धर्म, जन्मतो मी युगे युगे" असे म्हणतो तो या पाचव्या हिश्श्यात स्वतःचा हात आहे असे कसे म्हणेल? माझ्या मते त्याचे अर्जुनाला इतकेच समजावणे होते की गोल सेटींग, अँबिशन, डिजायर, साधने (मटेरीयल्स अँडा मेथड्स) असे सगळे ठरवून मग मनापासून प्रयत्न करूनही कधी कधी जेंव्हा हवे ते मिळत नाही तेंव्हा त्याचे जे स्पष्टीकरण देता येत नाही त्याला दैव म्हण आणि सोडून दे आणि तिथेच चिकटून (रडत) न बसता पुढचे प्रयत्न कर. हे दैव म्हणजे घासकडवी महाराजांया गोडेल गुरूजींनी सांगितलेल्या "अपुर्णतेच्या सिद्धांतासारखे" आहे.
20 Aug 2010 - 9:26 pm | Nile
बिकांचे इथले (फक्त काही) प्रतिसाद वाचुन आम्ही त्यांचे अनुयायी झालेलो आहोत. इतरांचे (विरोधी)तर्क आम्ही वाचलेले नाहीत, त्याची आम्हाला गरजही वाटत नाही.
जय बिकाबाबा! जय बिकाबाबा!! जय बिकाबाबा!!!
(आम्ही जर त्यांचे पहिले अनुयायी (मग बिकांच्या रिटायरमेंटनंतर मीच की त्यांच्या खुर्चीचा दावेदार? संपादकाची खुर्ची नाही हो "बाबा"खुर्ची म्हणतोय मी) असु तर आम्ही धाग्यातील मुख्य प्रश्नाचे उत्तर देउ)
20 Aug 2010 - 6:20 pm | परिकथेतील राजकुमार
अश्रद्धांनी श्रद्धावंताची व त्यांच्या श्रद्धेची खिल्ली उडवण्यासाठे उघडलेला धागा !!
I was an atheist till i realised i was GOD !
20 Aug 2010 - 6:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बरं, मग तुमची कोणावर श्रद्धा असते ती कशामुळे? समोरचा माणूस आपल्यापेक्षा काहीही वेगळा दिसत नाही, करत नाही, तरीही त्याच्यावर तुम्ही श्रद्धा ठेवता का? त्यापेक्षा दगडाला देव मानणं जास्त संयुक्तीक वाटतं. दगड किमान आपल्यापेक्षा वेगळातरी असतो!!
20 Aug 2010 - 6:33 pm | मृगनयनी
अश्रद्धांनी श्रद्धावंताची व त्यांच्या श्रद्धेची खिल्ली उडवण्यासाठे उघडलेला धागा !!
:) १०८ % सहमत!!!
स्कोर सेटल करण्यासाठी पातळी सोडून दिलेले प्रतिसाद संपादित करण्यात येतील हे ध्यानात घ्यावे. - संपादक मंडळ.
20 Aug 2010 - 8:28 pm | नितिन थत्ते
>>स्कोर सेटल करण्यासाठी पातळी सोडून दिलेले प्रतिसाद संपादित करण्यात येतील हे ध्यानात घ्यावे. - संपादक मंडळ
धिस इज नॉट फेअर. :(
सदर आयडीच्या खास अॅबिलिटीज लक्षात घेऊन [हे आव्हान]. दिले होते.
संपादकमंडळाने अशी पार्शालिटी केल्यावर मग वॉक ओव्हर दिल्यासारखेच झाले की.
:)
संपादक मंडळास निवेदन : सदर निषेध या विशिष्ट इश्यूपुरताच आहे याची नोंद घ्यावी. :)
21 Aug 2010 - 2:55 am | मिसळभोक्ता
>>स्कोर सेटल करण्यासाठी पातळी सोडून दिलेले प्रतिसाद संपादित करण्यात येतील हे ध्यानात घ्यावे. - संपादक मंडळ
बिसलेरीच्या पाण्याच्या पाणीपुर्या खाण्यात मजा येत नाही, हे संपादक मंडळाला कधी कळेल ?
निवेदनः सदर "अरेरे" हे बिसलेरीपर्यंतच मर्यादित आहे याची नोंद घ्यावी.
21 Aug 2010 - 4:16 am | आमोद शिंदे
सहमत आहे. त्यातून हे तर मिसळपाव. तर्रीऐवजी बिसलेरीचे पाणी मिसळल्यासारखे नको
21 Aug 2010 - 9:17 am | विकास
बिसलेरीच्या पाण्याच्या पाणीपुर्या खाण्यात मजा येत नाही, हे संपादक मंडळाला कधी कळेल ?
संपादक मंडळाचे योग्य ठिकाणी विरझण घालायचे धोरण आहे...
21 Aug 2010 - 6:01 pm | आमोद शिंदे
विरझण शब्द काळजाला भिडला.
23 Aug 2010 - 4:50 pm | विकास
विरझण शब्द काळजाला भिडला.
त्याचं काय आहे, योग्य वेळेस विरझण घातले नाही तर दुध देखील नासून वाया जाते. :-)
20 Aug 2010 - 11:18 pm | मृत्युन्जय
स्कोर सेटल करण्यासाठी पातळी सोडून दिलेले प्रतिसाद संपादित करण्यात येतील हे ध्यानात घ्यावे. - संपादक मंडळ.
फक्त संपादितच केले जाणार असतील तर काही हरकत नाही. आम्हीही आमचा उजेड पाडुन घेउ म्हणतो मग.
21 Aug 2010 - 4:07 am | आमोद शिंदे
>>युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||>>
तसेच हा मजकूरही संपादित केला जावा. विनोद तर सांगायाचा पण हसायचं मात्रनाही ही बळजबरी नको हो :)
21 Aug 2010 - 11:33 am | मृगनयनी
स्कोर सेटल करण्यासाठी पातळी सोडून दिलेले प्रतिसाद संपादित करण्यात येतील हे ध्यानात घ्यावे. - संपादक मंडळ.
:( :(
अरे बापरे!!! .. मी दिलेले "रोशनी"चे उदाहरण कुणीतरी इतके "वैयक्तिक" घेईल... याची कल्पनाच नव्हती मला! :|
___________
पण "उपक्रम" या दुसर्या संकेतस्थळावरील लिन्क मिसळपाव'वरती देऊन अनिरुद्ध बापूंबद्दल भाष्य करणे,
माझ्या (मृगनयनी'च्या) स्वाक्षरी मध्ये असलेल्या "अनिरुद्ध महावाक्यम्" वरती जाणीवपूर्वक वैयक्तिक पातळीवर येऊन असभ्य भाष्य करणे... त्याची मस्करी करणे... इ गोष्टी करणार्या मिपासदस्यांबद्दल "सम्पादक मन्डळ" काय बरे करू शकेल? इन फॅक्ट, ते काही करू शकेल का? ! ? ! ?
(अर्थात "अशा" सदस्यांना आणि त्यांच्या चेष्टांना मी महत्व देत नाही... ही गोष्ट वेगळी!.... पण "पातळी सोडून न वागण्या"संदर्भात माननीय सम्पादक मन्डळाने "इतरां"कडे ही लक्ष द्यावे, ही नम्र विनन्ती!
21 Aug 2010 - 11:40 am | Nile
ह्या अन्यावाचा तोडगा बापुंनाच विचारावा काय?
21 Aug 2010 - 1:35 pm | राधिका
अगं मृगा, तू इतकी का पझेसीव्ह होतीयेस?
पॉझीटीव्हली घेना थोडं, अदितीने जी उपक्रमावरची लिन्क दिलेली आहे, ती वाचली.
तिथे कुणीतरी तुला अप्सरा म्हणाले ना! :) तुझे फोटो मी पाहिलेत, तुझे डोळे आणि तू खरंच खूप सुन्दर आहे! अप्सरेपेक्षाही सुन्दर!
"मृगनयनी बाईंनाही बोलवा इकडे, आम्ही त्यांचे स्वागतच करु -अप्सरा आली- असे म्हणुन"
असंच काहीसं कुणीतरी म्हटलं ना! ,
मग 'तू अप्सरेसारखी सुन्दर आहेस, हे उपक्रम-वाल्यांनाही माहित आहे, आणि तू तिथे गेलीस, तर तुझे स्वागतच होइल' - हे मिपकरांनाही कळावे म्हणूनच अदितीने हा धागा काढला नसेल कशावरून ?
अनिरुद्धबापूंबद्दल तुझ्या मनात श्रद्धा असेल, आणि त्यांच्याबद्दल कुणी वाईट बोलत असेल, तर तुझ्या श्रद्धेला फरक पडणार आहे का? नाही ना., झालं तर मग! तू इतरांकडे लक्ष देऊ नकोस!
प्लीज गं, तू असा त्रागा नको करून घेउस, आमच्यासारख्या तुझ्या बर्याच 'हितचिन्तकाना' आणि 'चाहत्यांना' नाही आवडणार हं ते! :)
21 Aug 2010 - 1:52 pm | मृगनयनी
तिथे कुणीतरी तुला अप्सरा म्हणाले ना! तुझे फोटो मी पाहिलेत, तुझे डोळे आणि तू खरंच खूप सुन्दर आहे! अप्सरेपेक्षाही सुन्दर!
"मृगनयनी बाईंनाही बोलवा इकडे, आम्ही त्यांचे स्वागतच करु -अप्सरा आली- असे म्हणुन"
असंच काहीसं कुणीतरी म्हटलं ना! ,
अगं राधिका ताई, किती कौतुक करशील ? :)
मग 'तू अप्सरेसारखी सुन्दर आहेस, हे उपक्रम-वाल्यांनाही माहित आहे, आणि तू तिथे गेलीस, तर तुझे स्वागतच होइल' - हे मिपकरांनाही कळावे म्हणूनच अदितीने हा धागा काढला नसेल कशावरून ?
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
असेल असेल... कदाचित म्हणूनच काढला असेल धागा!
या "इतरां" ' चे सुप्त हेतू *भ्य जनांच्या ध्यानीच येत नाही गं!!!!! ;)
प्लीज गं, तू असा त्रागा नको करून घेउस, आमच्यासारख्या तुझ्या बर्याच 'हितचिन्तकाना' आणि 'चाहत्यांना' नाही आवडणार हं ते!
अं ! हो! ... माझ्या हितचिन्तकांसाठी आणि चाहत्यांसाठी मला त्रागा करून नाही चालणार!
:)
______________________
धन्यवद राधिका ताई! :)
21 Aug 2010 - 8:52 pm | आमोद शिंदे
स्कोर सेटल करण्यासाठी पातळी सोडून दिलेले प्रतिसाद संपादित करण्यात येतील हे ध्यानात घ्यावे. - संपादक मंडळ.
माझ्या मते पातळी सोडून दिलेले सगळेच प्रतिसाद संपादित करावेत.
23 Aug 2010 - 3:04 pm | मितभाषी
आमीबी एकशाट परशेंट शहमत.
20 Aug 2010 - 6:38 pm | असुर
>>>अश्रद्धांनी श्रद्धावंताची व त्यांच्या श्रद्धेची खिल्ली उडवण्यासाठे उघडलेला धागा !!<<<
श्रद्धावान आणि अंधश्रद्धाळू यात अंमळ गल्लत होते आहे की काय? माझ्या मते हा धागा लोकांतील अंधश्रद्धेला उद्देशून आहे.
बाबा लोकांच्या भजनी लागलेले हे 'अंधश्रद्धाळू' क्याटेगरीत येतात.
--असुर
20 Aug 2010 - 6:59 pm | परिकथेतील राजकुमार
मला असे वाटत नाही बॉस.
मी मागे पण हे उदाहरण दिले होते, माझ्या आजीला वयोमानाने गुडघेदुखीचा अथवा इतर काही त्रास खुपदा जाणवायचे. बरेचदा तिला डोकेदुखी अथवा इतर काही त्रास चालू झाला की ती गजानन महाराजांची पोथी काढुन वाचायला बसायची, आणि गंमत म्हणजे तिचा त्रास कमी व्हायचा अथवा जाणवणेच बंद व्हायचा.
१) दुसर्या एखाद्या कामात मन गुंतल्याने कदाचीत तिला दुखण्याचा विसर पडत असावा
अथवा
२) आता आपले दुखणे कमी होणारच हा आत्मविश्वास मनात जोर धरत असल्याने देखील असे होत असणार
ह्या दोन्ही शक्यता जरी गृहित धरल्या तरी तिला पोथी वाचनातुन वा नामःस्मरणामुळे त्रासातुन मुक्ती मिळत असेल तर मी तिला अंधश्रद्धाळु का म्हणावे ? अशा वेळी मग तीच्या भक्तीवर अथवा श्रद्धेवर शंका कशी उपस्थीत करावी ?
एखाद्या बुवा अथवा बाबांच्या सल्ल्याने / धाकाने एखादी व्यक्ती दारुच्या व्यसनातुन मुक्त झाली तर ती व्यक्ती व तिचे कुटुंबीय अशावेळी त्या माणसाला देवच मानु लागतात. त्यांना चुक कसे म्हणावे ? अशावेळी त्यांची अंधश्रद्धा बघत बसावे का झालेला फायदा ?
मानसीक रुग्णाला अथवा अस्वस्थ माणसाला मानसोपचार तज्ञाशी बोलल्याने आपला प्रोब्लॅम डिस्कस केल्याने जसे बर्याचदा मोकळे वाटते अथवा अडचणीतुन मार्ग काढण्याची उभारी मिळते अगदी तसेच एखाद्या माणसाला ह्या बुवा / बाबांच्या सहवासात होत असेल तर आपण त्याच्या श्रद्धेवर (तुमच्या भाषेत अंधश्रद्धेवर) बोट का ठेवावे ?
(सात वाजत आल्याने सध्या येवढेच ;) बाकीचे उद्या उतरल्यावर)
20 Aug 2010 - 7:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पुन्हा माझा प्रश्न होता तिथेच राहिला:
परा, तुझ्या आजीने कोणाकडून तरी गजानन महाराजांचं नाव ऐकलं? त्या कोणीतरी आणखी कोणाकडून? असं करत, तो पहिला भक्त कसा मिळाला/मिळवला??
गजानन महाराजांची गोष्ट, त्यांचा काळ तर तसा फार जुना नाही. मग त्यांच्या पहिल्या भक्ताबद्दल काय माहिती उपलब्ध आहे?
कोणी कोणावर विश्वास ठेवावा का नाही याबद्दल मला काहीही बोलायचं नाहीये. माझाही माझ्या बॉसवर विश्वास आहे. तो जेव्हा मला सांगतो, "पुन्हा एकदा अमुक एक प्रोसिजर करून पहा." मी मुकाटपणे करुन पहाते. हा त्याच्या अनुभवावर विश्वास असतो. आणि अजून वीस वर्षांनी माझाही अनुभव असेल (बहुदा!) तेव्हा मीसुद्धा असं सांगू शकेन. पण हा अनुभव कुठून आला हे सगळं शोधता येतं. बाबा-बुवांचं काय? ज्यांना अशा गोष्टी माहित असतील त्यांनी लिहाव्यात अशी विनंती.
20 Aug 2010 - 7:09 pm | परिकथेतील राजकुमार
अग ते माझे उत्तर तुला न्हवते ग. त्या वरच्या प्रतिसादातील प्रश्नाला उत्तर होते.
बाकी प्रत्येकाचा पहिला भक्त तो स्वतःच असतो ;) निट विचार केल्यास हे नक्की पटेल तुला.
20 Aug 2010 - 7:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वतःबद्दल ही गोष्ट खपू देणारा माणूस स्वतःचा 'भक्त' असेल असं वाटत नाही.
स्वतःलाही प्रश्न विचारण्यास न घाबरणारा माणूस अगदीच काही गुलबकावलीच्या फुलाएवढा दुर्मिळ नसतो. असे बरेच लोकं मी पाहिल्यामुळे मलातरी हे पटत नाही.
20 Aug 2010 - 7:17 pm | परिकथेतील राजकुमार
बोलणार्याचे तोंड कोण धरणार ?
आता रामराज्यात असा एकच धोबी होता, आता असे अनेक झालेत.. कलियुग हो कलियुग.
20 Aug 2010 - 7:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बोलणार्याचं तोंड धरता येत नाहीच. पण जाहीर निवेदन कधीही दिसत नाही, "मी अमुकतमुक चमत्कार केलेले नाहीत" असं. गाडगेबाबांचे चमत्कार का बुवा कधी कानावर आले नाहीत?
20 Aug 2010 - 7:37 pm | परिकथेतील राजकुमार
आता काय बोलायच !
तो धम्या गावभर सांगत फिरतो की पर्या वेगळ्या नावाने एका ठिकाणी चावट कथा लिहितो ;) मग काही लोक माझ्याकडे आदराने बघतात. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. आता कुठे उगा निवेदन देत बसायचे सांगा.
20 Aug 2010 - 7:42 pm | मृत्युन्जय
पण गजानन महाराजांचे बरेच चमत्कार कानावर पडतात. रामदास स्वामींचे पडतात. त्यांना पण तुम्ही बाकीच्या बुवा बाबांच्या रांगेत उभे करणार का?
20 Aug 2010 - 7:58 pm | अर्धवट
बाकी लोकांच माहीत नाही ब्वॉ.. पण रामदास स्वामींचे काही चमत्कार नाहि ऐकले कधी आपण..
आपल्याला ते आवडतात ते त्यांनी दासबोधात मुर्खांची लक्षणं, स्वदेशाविषयीची कर्तव्य आणि इतर बरंच कायकाय उपयोगी लिवल्यामुळे..
झालंच तर.. कोमलवाणी दे रे राम | मंगल करणी दे रे राम | असं सुंदर काही मागितल्यामुळे
बाकी अशा तथाकथीत चमत्कारामुळे काही आम्हाला समर्थ मोठे वाटत नाहीत...
त्यातुन हल्ली काही असलेच प्रसिद्ध चमत्कार तर ते बहुतेक नंतरच्या पोटभरू मंडळींनी बनवलेले असावेत..
पण त्यांच एकंदरीत सगळं लेखन वाचुन एवढा अंदाज नक्की बांधता येतो.. की आज ते असते आणि असले चमत्कार त्यांच्या कानावर गेले असते तर ते किमान खोटे आहेत एवढं नक्की सांगितलं असतं त्यांनी .. (आणि कदाचित ते चमत्कार पसरवणार्या भक्ताला एका कुबडीत जन्माचा कुबड्या करुन ठेवला असता.. )
बाकी हयात नसलेल्या बुवांना एक बेनिफीट ऑफ डाउट देता येइल.... हयात असलेल्या बुवांनी असं स्पष्टीकरण द्यायला काय हरकत आहे..
अवांतर - एवढी लक्षणं लिहुन अजुन बरीच शिल्लक उरलियेत म्हणा...
20 Aug 2010 - 10:31 pm | मृत्युन्जय
ढीगाने आहेत. पण हे मात्र खरे की ते त्यांनी मी केले म्हनून लिहुन ठेवलेले नाहीत. सज्जनगडावर डझनावारी पुस्तके मिळतील त्यांच्या चमत्कारांविषयी.
त्यातील एक म्हणजे सज्जनगडावर स्वामी फिरत असताना त्याचे उपरणे वार्याने उडुन कड्यावरुन खाली पडते. स्वामी फक्त कल्याणा उपरणे असे म्हणतात आणि कल्याणस्वामी काहीही विचार न करता कड्यावरुन खाली उडी मारतात. एवढ्या उंचावरुन उडी मारुन सुद्धा ते केवळ रामदासस्वामींच्या आशिर्वादाने न खरचटता परत येत्तत.
दुसरे उदाहरण असेच मुसळ्स्वांईंचे पण देत्तात. त्यांना रामदास महाराज जुलुमी कोतवालाच्या तावडीतुन वाचवतात.
तिसरे उदाहरण उद्धव स्वामींचे देतात. जे केवळ रामदास स्वामींचे पांघरून ओढुन घेतात म्हणून यमदूतच काय साक्षात यम सुद्धा त्यांना हातदेखील लावु शकत नाही. उलट दीर्घायुष्याचे वरदान देउन परत जातो.
एक ना अनेक. हे सगळे चमत्कार खरे का खोटे या वादात मला पडायचे नाही. तात्पुरते मानुयात की चक्क निखालस खोटे. पण म्हणुन रामदास स्वामींचे अध्यात्मिक आणि सामाजिक कार्यमहात्म्य नाकारता येते का?
तीच गोष्ट शंकर महाराजांची "साद देती हिमशिखरे" मध्ये डॉ. प्रधानांनी शंकर महाराजांचे कित्येक चमत्कार दिले आहेत.
मी बुवा बाजीपासुन दुर आहे. परंतु मला सरसकट सगळे चोर ढोंगी आहेत हे मात्र मान्य नाही. रामदास महाराज किंवा गोंदावलेकर महाराज यांच्यावर तर मी श्रद्धा थेवुन आहे. आज हे दोघेही हयात नाहीत. जाउन बरीच वर्षे झाली. रामदास महाराज जाउन तर शतके झाली. पण मनाचे श्लोक तर आजही वंद्यनीय आणि वाचनीय आहेत की नाही?
थोडक्यात काय की श्रद्धा कोणी कोणावर ठेवावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
बाकी अजुनही कोणी मूळ प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिलेले नाही आहे की पहिला अनुयायी कसा मिळतो.
20 Aug 2010 - 10:47 pm | प्रियाली
मृत्युंजय,
तुम्हाला रामदास स्वामींचे सामाजिक आणि अध्यात्मिक कार्य मान्य आहे ना. सर्वांनाच असावे. त्यांना चमत्कारांची गरज होती असे का वाटते? शिवाजीला भवानी तलवार मिळते, ज्ञानेश्वर भिंत चालवतात वगैरे सर्व सांगोवांगीच्या कथा असतात.
किल्लेदार यांचा फोटो पाहिलात ना. ज्याला फोटोशॉप माहित नाही त्याला तो चमत्कारच वाटतो. भक्तांना जेव्हा आपला गुरु सर्वश्रेष्ठ आहे हे ठसवून द्यायचे असते तेव्हा तो चमत्कारांचा आधार घेतो. गुरुचेही तेच; मी सर्वात श्रेष्ठ हे त्याला पटवून द्यायचे असते किंवा साक्षात ईश्वर पाठीशी आहे त्यामुळे मी म्हणतो तेच योग्य असे सांगायचे असते तेव्हा तो चमत्काराचा आधार घेतो.
रामदासस्वामींना अशा चमत्कारांचा धनी बनवणे योग्य नाही. त्यांची थोरवी बरीच मोठी आहे.
21 Aug 2010 - 2:33 am | मृत्युन्जय
रामदासस्वामींना अशा चमत्कारांचा धनी बनवणे योग्य नाही. त्यांची थोरवी बरीच मोठी आहे.
धनी मी नाहीच बनवत आहे. हे सगळे पुस्तकात लिहिलेले वाचुन सांगितले हो तुम्हाला. त्यांनी खरेच ते चमत्कार केले की नाहे हे नाही माहिती मला. आणि समजा नसतील हरी केले तरी त्यांची थोरवी तुम्ही पण मान्य करताच ना? मग केवळ एखादा माणुस माधू या कॅटेगरी मध्ये मोडतो म्हणुन किंवा केवळ त्याच्या नावावर काही चमत्कार जमा आहेत म्हणुन तो भोंदु होतो का? किंवा सगळेच साधू भोंदु असतात का? माझा आक्षेप सरसकट सगळ्यांना भोंदू म्हणण्याला आहे.
चमत्कारांची मोजपट्टी बाकी मला पण मान्य आहे. असले चमत्कार दाखवणारे मला पण भोंदू वाटतात. पण अश्या बाबांच्या कच्छपी लागलेले सगळे लोक सरसकट मुर्ख या गटात मोडतात हे देखील मला मान्य नाही.
21 Aug 2010 - 5:13 pm | प्रियाली
याचा परस्पर संबंध काय? म्हणजे थोरवी मान्य करण्याचा आणि चमत्कार करण्याचा? जे चमत्कार करतात त्यांचीच थोरवी मान्य करावी असे काही नसते. तुम्ही ज्या पुस्तकात वाचले त्यात संदर्भसूची वगैरे दिली आहे का? कारण अशी पुस्तके कोणीही लिहू शकतो आणि अशी चमत्कारांची पुस्तके लिहिल्याने आणि ती वाचून त्यावर विश्वास ठेवल्याने हात जोडणार्या श्रद्धावंताची त्यात फसवणूक होत असते.
असे कोण म्हणाले? की साप समजून दोरी धोपटताय?
.
कच्छपी लागणे या शब्दातच मोठी गोम आहे. कुठल्याही गोष्टीच्या कच्छपी लागणे - चहापासून - ड्रग्जपर्यंत हे वाईटच.
21 Aug 2010 - 5:23 pm | परिकथेतील राजकुमार
परमेश्वरा !!!
=)) =))
20 Aug 2010 - 8:02 pm | प्रियाली
गजानन महाराजांनी लिहून ठेवले का की ते चमत्कार करत किंवा त्यांना तशी शक्ती आहे की ही भक्तांनी पसरवलेली कथा आहे?
बाकी, गण गण गणात बोते चा अर्थ माहित आहे का तुम्हाला? कारण तो नेटावर न सुटलेला आणखी एक चिरंतन प्रश्न आहे.
20 Aug 2010 - 8:08 pm | अर्धवट
नक्की माहित नाही बुवा.. कसं कळणार आता..
एक प्रामाणिक शंका - त्यांनी लिहिलेलं काही साहित्य/विचार उपलब्ध आहेत का? त्यावरून कदाचित अंदाज बांधता येउ शकतो त्यांच्या विचारांच्या दिशेचा..
>>बाकी, गण गण गणात बोते चा अर्थ माहित आहे का तुम्हाला? कारण तो नेटावर न सुटलेला आणखी एक चिरंतन प्रश्न आहे.
नाही, मला पण अर्थ माहीत नाही... घरातले म्हणतात हा मंत्र..
एक दोन वेळा विचारला तर फटकारलं मला... पण जिज्ञासा मलापण आहे..
20 Aug 2010 - 8:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
माहित नाही.
पण एक प्रतिगजानन महाराज ठाण्यात बोकाळले आहेत. उगाच गर्दीच्या रस्त्यावर आणखी गर्दी वाढवून ठेवली आहे.
मीनल किंवा यशोधरा या दोघींपैकी कोणीतरी याबद्दल लिहीलं होतं, मिपावरच! शोधायला आत्ता वेळ नाहीये. मिळालं की खरड करते.
20 Aug 2010 - 7:40 pm | असुर
आपल्या तीनही उदाहरणात एक समान धागा आहे तो म्हणजे आत्मविश्वास! आजीचे गुडघे दुखायचे थांबणे, दारू सुटणे, मोकळे वाटणे यात ज्यांचे दु:ख आहे त्यांनीच उपाय शोधलाय, जाणता-अजाणता त्यांनीच स्वत:त तो बदल घडवला आहे. फक्त या बदलाचे शिल्पकार आपणच आहोत याची जाणीव झाली नसेल तर त्याचे श्रेय अजून कुणाला जाऊ शकते.
किंवा आपणच आपल्याला बरे करतोय ही जाणीवच नको असेल (काही गोष्टीत स्वत:वर विश्वास कमी असतो) तरीदेखील त्याचे श्रेय हे उपाय करणाऱ्याला किंवा उपायांना जाऊ शकते.
वरील तीनही उदाहरणात मला हा दुसरा प्रकार जास्त वाटतो.
20 Aug 2010 - 7:45 pm | प्रियाली
यालाच प्लॅसिबो इफेक्टही म्हणता येईल.
परा, बाकीचे सर्व राहू दे पण आजींना त्रास असेल तर योग्य उपचार अवश्य करा. असे त्रास पोथीवाचनाने तात्पुरते थांबले तरी वाढत जाऊन पुन्हा उफाळतात.
20 Aug 2010 - 7:50 pm | परिकथेतील राजकुमार
ती चार वर्षापुर्वीच उपचारांच्या पलिकडे गेली. त्यामुळे आता काय नाही.
20 Aug 2010 - 7:51 pm | प्रियाली
ओक्के. कळले.
20 Aug 2010 - 7:54 pm | असुर
सॉरी परा! माझा भावना दुखवायचा मुळीच हेतू नव्हता.
--असुर
20 Aug 2010 - 7:55 pm | परिकथेतील राजकुमार
ओ असुरराज काय राव तुम्ही पण ? :)
20 Aug 2010 - 8:06 pm | असुर
जाउ दे राव! आपण या चर्चेतून आउट! बाकी खव आहेच.
21 Aug 2010 - 4:06 am | आमोद शिंदे
आमच्या आजीचे पण गुडघे दुखायला लागल्यावर तिने पोथी वाचायला घेतली. गुढघे राहीले बाजूला ते वाचून तिचे डोके भणभणायला लागले. तुम्ही गुडघेदुखीचे क्रेडिट पोथीवाचनाला दिलेत तसेच डोकेदुखीचे क्रेडीटही पोथीवाचनाला द्यावे का?
21 Aug 2010 - 10:39 am | सुहास..
छान चर्चा !!पण चावुन चोथा झालेला विषय !!पुन्यांदा डॉन्याचा लेख आठवला !!
बाकी चालु द्या, वाचतोय,पुलेशु ई. ई.
20 Aug 2010 - 6:49 pm | मृगनयनी
प्रतिसादासाठी जागा राखून ठेवत आहे!
:)
__________________
आज शुक्रवार!
खाजवून खरूज काढणार्या पापी लोकांना सुबुद्धी देण्यासाठी जोगेश्वरीजवळ प्रार्थना करायचीये!....
उगीच उशीर नको हो व्हायला! :)
|| जय महिषासुरमर्दिनी ||
20 Aug 2010 - 6:51 pm | असुर
>>>उगीच ते "ऑम्लेट" कोणत्या अन्ड्याचं आहे? ते अन्डं कोणत्या कोम्बडीने दिलं आहे... ती कोम्बडी किती वर्षांची आहे.....इ. इ... विचार करू नये!!!!
तो विचार करायला "दत्तगुरु" समर्थ आहेत! <<<
का उगाच त्या दत्तगुरुंना असले तामसी विचार करावयास लावताय?
--असुर
21 Aug 2010 - 4:18 am | आमोद शिंदे
चला म्हणजे जोगेश्वरीच्या कृपेने ||खाजवणार्याची खरुज मरणार निश्चित ||
21 Aug 2010 - 1:35 am | Nile
म्हणजे पर्याचे मित्र लहानपणी देवाबरोबर गोट्या खेळत होते!! मजा होती लेकांची.
21 Aug 2010 - 4:10 am | आमोद शिंदे
राजकुमार, खिल्ली उडवण्याचे वावडे तुम्हाला कधी पासून? तुमच्या सारख्यांचे खट्याळ प्रतिसाद वाचण्यासाठी तर आम्ही इथे येतो.
कोण कुठल्या बापू टिपूला इतके महत्व देताय? :)
20 Aug 2010 - 6:24 pm | प्रियाली
१. रस्त्यावर मारामारी सुरु झाली की गर्दी जमते. जमलेल्या गर्दीला काय चाललंय हे बर्याचदा माहितही नसतं आणि मागे उभे असलेल्यांना दिसतही नसतं. फक्त काहीतरी दिसेल, ऐकू येईल म्हणून गर्दी करून उभे राहण्यात त्यांना गंमत येत असते .
२. आपला पुढला रस्त्यातल्या लहानशा खड्ड्यावरून उडी मारून गेला म्हणून पाठचाही उडी मारून जातो हे दृश्य पाहिले आहे का? रस्त्याला वळसा घालून जाणे शक्य असले तरी.
या जगात सर्वात सोपी गोष्ट म्हणजे भक्त मिळवणे. ;) लोकांना आपल्या बुद्धीचा वापर करायचा नसला की भक्त जन्माला येतो.
20 Aug 2010 - 6:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुझं म्हणणं अगदी मान्य आहे, प्रियाली. तू या प्रतिसादात म्हटलं आहेस त्याप्रमाणे ही गर्दी बुद्धी न वापरणार्यांचीच असणार.
पण पहिला बुद्धीविरोधक आणि/किंवा भक्त मिळवणार कसा?
20 Aug 2010 - 6:51 pm | प्रियाली
खाली विकास म्हणतात पहिला प्रतिसादक मिळवणे सोपे असते. भक्त मिळायला थोडा वेळ लागतो पण मला तसा फरक दिसत नाही. ;)
लोक रोजच्या कटकटींनी इतके गांजलेले असतात की मी मार्ग दाखवतो (खड्ड्यावरून उड्डाण करण्याचा) असे म्हटले की मागे जाणारे भेटतातच.
पहिला भक्त हा बरेचदा घरचाच असतो. आई, बायको, मामा, आत्या वगैरे असा काही बाबा-बुवांवरून अनुभव आहे.
20 Aug 2010 - 8:35 pm | विकास
लोक रोजच्या कटकटींनी इतके गांजलेले असतात की मी मार्ग दाखवतो (खड्ड्यावरून उड्डाण करण्याचा) असे म्हटले की मागे जाणारे भेटतातच.
जर एखाद्यास "बाबा" होयचे म्हणून तो प्रयत्न करत असला, पण त्याला कोणीच अनुयायी मिळत नसले म्हणून गांजलेला असेल तर दुसरा एखादा बाबा त्याला, "मार्ग दाखवतो", असे म्हणेल का? का येथे देखील "राज को राज रेहेनेदो", अर्थात ट्रेड सिक्रेट सांगितले जात नसेल? ;)
20 Aug 2010 - 8:46 pm | प्रियाली
प्रश्नात गडबड आहे. असं होत नाही. मागे अभिषेक बच्चनचा एक चित्रपट आला होता. आता नाव नेमके आठवत नाही. त्यात विजयराज का अशा काहीशा नावाचा एक कॉमेडियन दिल्लीला येतो आणि नाडला जातो असा प्रसंग आहे. इतका नाडला जातो की अंगावर घालण्यास कपडे उरत नाहीत. वेड लागायची पाळी आलेल्या अवस्था झालेली असते आणि त्याला घालावयास एक परकर मिळतो. लोकांना शिव्याशाप देत फिरणार्या या माणसाला सर्व "परकरवाले बाबा" म्हणून नमस्कार करू लागतात. ;)
20 Aug 2010 - 8:49 pm | अनामिक
तो महान चित्रपट "रन" असावा बहुतेक... आणि परकरवाले बाबा नाही काही, "पेटीकोट बाबा"... दर्शनाला येणारे लोक त्या बाबांना पेटीकोट चढवतात.
20 Aug 2010 - 8:53 pm | प्रियाली
बरोबर! पेटिकोटवाले बाबा! ;)
चित्रपट थोडा जुना आहे.
आठवले!!!!! पांडुरंग शास्त्री नाहीत. चित्रपटाचे नाव आठवले - ब्लफमास्टर.
त्यातील कव्वा बिर्यानीचा जोक पाहण्यासारखा आहे - पांचट आणि भंकस.
20 Aug 2010 - 11:16 pm | स्वप्निल..
चित्रपटाचे नाव "रन"च .. एका तेलुगु/तमिल चित्रपटाचा रीमेक आहे
20 Aug 2010 - 8:57 pm | विकास
चित्रपटाचे नाव काय? (करमणूक प्रधान असल्यास पहायला आवडेल). :-)
20 Aug 2010 - 6:56 pm | मदनबाण
लोकांना आपल्या बुद्धीचा वापर करायचा नसला की भक्त जन्माला येतो.
आम्ही उगाच भक्त प्रल्हादाच्या गोष्टी वाचण्यात वेळ वाया घालवला म्हणायचे तर !!!
असो... नारायण !!! नारायण !!! ;)
20 Aug 2010 - 7:02 pm | परिकथेतील राजकुमार
वाचण्यात का बघण्यात रे मदना ??
20 Aug 2010 - 7:21 pm | मदनबाण
वाचण्यात... आणि ती कथा वाचतानाच एक गोष्ट मला कळली ती म्हणजे... ॐ नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र नारदाने भक्त्त ध्रुवाला विष्णू प्राप्तीसाठी ( दर्शना साठी)दिला.
वरच्या माझ्या प्रतिसादात प्रल्हादाच्या जागी ध्रुव असे वाचावे.
( भगवंताचा फुल टाईम दास)
21 Aug 2010 - 11:41 am | मी ऋचा
>>>( भगवंताचा फुल टाईम दास)
मी (भगवंताचा फुल टाईम पास) असे वाचले ;)
20 Aug 2010 - 6:26 pm | अर्धवट
मुद्द्याला अनुसरून पण धाग्याला अवांतर एक कविता आठवली..
संत संदीप खरे यांचीच आहे... बघा पोचतय का? ;)
एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा खर तर गाभा-यातच भर पडत असते
की कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना,
पण प्रामाणिकपणे चिकटुन राहिल्याच्या पुण्याईची !
एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा होते निर्माण
देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची !
एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा को-या नजरेने पाहत राहतो
सभोवतालच्या हालचाली, भाविकाच्या जत्रा...
कोणीतरी स्वत:चे ओझे , स्वत:च्याच पायावर
साभाळत असल्याचे समाधान लाभते देवलाच !
म्हणून तर एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदचित !
पण मिळते आकठ समाधान एक सहकारी लाभल्याचे
देऊळ बद झाल्यावर एक मस्त आळस देउन
बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता
देव म्हणतो, " दर्शन देत जा अधुन मधुन........
तुमचा नसेल विश्वास आमच्यावर,
पण आमचा तर आहे ना ! "
देवळाबाहेर थाबलेला एक खरा खुरा नास्तिक
कटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारिने पाठवतो देवळात
तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन
अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे....
20 Aug 2010 - 6:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
"संत" संदीप खरे यांना नास्तिक म्हणजे काय किंवा देवावर विश्वास नाही म्हणजे काय हे कळलेलं नाही एवढंच या कवितेतून मला कळलं. पुढे?
20 Aug 2010 - 6:38 pm | अर्धवट
चुकलो बाय... पुढं काय नाय.. कविताच मागं घेतो..
बाकी चालु द्या..
23 Aug 2010 - 12:24 am | अर्धवटराव
अगदी समर्पक कविता !!
(देवाला गुदमरुन सोडणारा) अर्धवटराव
20 Aug 2010 - 6:39 pm | विकास
सर्वप्रथम तुमच्या या सहकारी मित्राचे नाव आणि म्हणणे ऐकून, त्याचा निषेध करायला म्हणून या बुवाबाबांनी जर, "आम्ही आमची जयंती करून देणार नाही" असा आदेश दिला, तर किती बरे होईल! ;)
हा पहिला अनुयायी कसा मिळवायचा?
ते कदाचीत पहीला प्रतिसादक मिळवण्यापेक्षा अवघड असावे. ;) मात्र अनुयायी केवळ अध्यात्मिक क्षेत्रातच नाही तर इतर कुठल्याही क्षेत्रात जे मिळवतात ते कितीही (अध्यात्मात) भोंदू आणि (इतर क्षेत्रात) लबाड असले तरी त्यांच्यात काहीतरी enterprising आणि marketing skills असतात असे नक्कीच वाटते. :-)
20 Aug 2010 - 6:49 pm | मदनबाण
जयंती स्वतःच "बाबा" बनल्यागत माझ्याकडे चक्क दुर्लक्ष करता झाला!
हा बाबा नक्कीच ज्ञानी दिसतोय !!! ;)
(मदन बाबा प्रेम नगरीवाले)... ;)
20 Aug 2010 - 6:55 pm | चतुरंग
मला वाटलं अदिती काय 'करिअर' वगैरे बदलायचा विचार करते आहे की काय? ;)
पहिला अनुयायी मिळवणे हे तितकेसे अवघड नसावे.
पुलंच्या भाषेत सांगायचे तर "बेंबट्या, कुंभार हो जगात गाढवांस तोटा नाहीं!"
(पालथा घडा)चतुरंग
21 Aug 2010 - 4:14 am | आमोद शिंदे
"बेंबट्या, कुंभार हो जगात गाढवांस तोटा नाहीं!"
युद्ध माझा राम करणार| गाढव माझ्यात संचार करणार
कुंभार जिंकणार निश्चित|| :)
21 Aug 2010 - 12:58 pm | मृगनयनी
पहिला अनुयायी मिळवणे हे तितकेसे अवघड नसावे.
पुलंच्या भाषेत सांगायचे तर "बेंबट्या, कुंभार हो जगात गाढवांस तोटा नाहीं!"
ह्म्म्म्म ! अगदी खरं आहे ! :)
"प्रतिसाद" खेचण्यासाठी बाबा-बुवांच्या विषयाव्यतिरिक्त दुसरा "हुकमी एक्का" असू शकतो का? ;)
नाही तर ते कुठल्या तरी स्त्री-मुक्ती चळवळीच्या की कुठल्याश्या म्हातार्या परदेशी "आयडॉल " बद्दल धागा काढला जातो .....
आणि धाग्याचं नाव वाचून _त्रा सुद्धा ढुन्कून बघत नाही... त्या धाग्याकडे! .. मग २ दिवस वाट पाहिली जाते....आणि मग नन्तर "बान्ध" सुटल्यावरती आपल्या कम्पूतल्या प्रत्येकाला "व्यनि" किन्वा 'फोन' करून करून हैराण केले जाते,
"ए.. टाक ना प्रतिसाद माझ्या धाग्याला.. कसेही टाका.. पण टाका.. ना..... काय ** राव... काय रे **शेठ.... मी एवढं स्त्री-मुक्ती'बद्दल लिहिलय.. पर्शियन की (रशियन.. की अमेरिकन ;) ) आयडॉल' टाकलाय... लिहा ना.. काहीतरी... 'कोरम' भरलेला दिसला पाहिजे!!!!!.. तुम्ही माझ्या गोटातले ना!!!! ;) =)) =)) .. बास काय रे हुप्प्या!!! =)) =)) =)) =)) =))
इ. इ. .... मुक्तवचने उधळून "कोरम" भरवला जातो! ;)
पण येवढे श्रम करण्यापेक्षा.. एखाद्या "सेन्सीटिव्ह" विषयावर काही तरी लिहिले... प्रसन्गी दुसर्या "सन्केतस्थळा"चा आधार घेतला... तर कुठे बिघडले ? ? ? ?? ;) "सम्पादक मन्डळा"ची परवानगी असल्यावर काय अशक्य आहे? ? ? ? ?
नाही का? मग भले... या सन्केतस्थळावरील .. .. .. "श्रद्धावानां"च्या भावना दुखावल्या गेल्या तरी चालतील.. पण आपले स्वतःचे नाव "रोशन" झाले पाहिजे! नाही का? ;) ;) :|
आणि मग सगळी कुम्भारा'च्या कम्पूतली शिस्तबद्ध गाढवे जमतात... आणि सुरू होतात!
बाबा-बुवांना शिव्या घालता घालता... हिन्दु देवदेवतांचीही टर उडवली जाते... रामाला लाचार केले जाते... लक्ष्मणाला अपशब्द वापरले जातात.... पण त्याचं गाढवांना काय हो! ... गाढवंच ती.... बुद्धीचा काय सम्बंध?...
कुम्भार स्वतःच निर्बुद्ध असल्यावर गाढवांकडून तरी काय अपेक्षा करणार ? :|
आता या समूहातली कुम्भाराची गाढवे कोणती? भाड्याने आणलेली कोणती ? ... हे मात्र सांगणं.. मुश्कील होतं! ;)
पण सांगायचा उद्देश इतकाच... की गाढवांना तोटा नाही हो!!....
21 Aug 2010 - 2:40 pm | नितिन थत्ते
हांग आश्शी.
आव्हानाचं सार्थक झालं बुवा.
21 Aug 2010 - 6:22 pm | आमोद शिंदे
तुमच्या त्या "युद्ध कोणी दुसराच करणार। मी वानर बसून खाणार" असल्या महावाक्याने आमच्या भावना दुखावतात त्याचे काय? आम्ही घेतला का कधी आक्षेप त्यावर. प्रत्येकाला आपापल्या बुद्धीचे प्रदर्शन करण्याची समान संधी असावी.
20 Aug 2010 - 7:25 pm | अनाम
माताय पॉपकॉर्न, चणे, दाणे, लाह्या जे काय मिळेलत ते घेउन या रे.
झाडावर जागा रिझर्व करुन बसलो आहे.
आवांतरः बाकी आम्हाला अ.बापुंचा फोटु पाहिला की खात्यापित्या चाळीतला गवळी भाई आठवतो. (कर्णिने नाय हो चेहर्या मोहर्याने. ;) )
20 Aug 2010 - 7:40 pm | अर्धवट
खरं हो...
माझ्या एका साध्यासुध्या मित्रानं एका पानपट्टीवाल्याला विचारलं होतं.. तुम्ही अरुण गवळींचा फोटो का लावलाय दुकानात म्हणून.. बिच्चारा..
आता साधी विडी घ्यायला तो पानपट्टीवाला सोडुन पुढच्या चौकात पायपीट करत जावं लागतं बिचार्याला..
बाकी चालु द्या...
21 Aug 2010 - 6:04 pm | आमोद शिंदे
माझ्या एका साध्यासुध्या मित्रानं एका पानपट्टीवाल्याला विचारलं होतं.. तुम्ही अरुण गवळींचा फोटो का लावलाय दुकानात म्हणून.. बिच्चारा..
अगायायायायायाया...खपलो वारलो हसून हसून
20 Aug 2010 - 8:23 pm | यशोधरा
बाजूला सरका. मलापण जागा हवीय बसायला. माझ्यासाठी पण पॉपकॉर्नचा पुडा सांगा.
20 Aug 2010 - 8:33 pm | बिपिन कार्यकर्ते
पॉपकॉर्न वगैरे आपापलं आणायचं गं... पण हरकत नाही. नीट सांभाळून बस. पडशील एखाद वेळेस हसताना वगैरे...
हे घे
20 Aug 2010 - 8:39 pm | विकास
मी तर या प्रतिसादाच्या शिर्षकाचा आधी भलताच अर्थ घेतल्याने जागा पकडून बसणार होतो ;) पण नंतर कळले की हे दोन आयडीज ना उद्देशून संबोधन आहे, एकाच आयडीला नाही. :-) आणि काहीच थ्रील वाटेनासे झाले. :(
20 Aug 2010 - 8:44 pm | यशोधरा
विकासदादा,आलाच आहात तर बसा थोडावेळ, हे बिपिनदादा महाराजांनी आणलेले पॉपकॉर्न खाऊन जा. पॉपकॉर्नची इच्छा केली की पॉपकॉर्न हजर! समस्त बापू लोकांला हे कांपिटीशन व्हनार हाय!
अवांतरः बिपिनदादा थँक्यू :)
23 Aug 2010 - 8:15 pm | आमोद शिंदे
हा भला थोरला पॉपकॉर्नचा फोटो इथून कृपया कुणी संपादक काढून टाकेल काय? स्क्रोल करताना मधेच येतो आणि भातातल्या खड्या सारखा खटकतो.
20 Aug 2010 - 7:32 pm | सहज
उत्तर - सुरवातीला लोकांचे प्रॉब्लेम सोडवा. ते सुटले की बायप्रॉडक्ट = ऑपॉप भक्त!
20 Aug 2010 - 7:36 pm | प्रियाली
असहमत!! ;)
आमच्या शेजारच्या बिल्डींगमध्ये एका गुजराथी बाईच्या नवरात्रीच्या दिवसांत अंगात येत असे. एकदा तिने सांगितले की इथे कोणाची तरी आंगठी हरवली आहे आणि ती समोरच्या खांबाच्या उजवीकडे पडली आहे.
अहो! काय आश्चर्य? आंगठी लगेच मिळाली. लोकांनी बाईंच्या पायावर लोळण घेतली.
दुसर्या दिवशी बाईंचे शेजारी सांगतात की ती आंगठी बाईंचीच होती. गेली कित्येक वर्षे त्यांच्या बोटात पाहिली होती.
यावरून, स्वतःचे प्रॉब्लेम सोडवले तरी भक्त मिळतात असे वाटते. ;)
21 Aug 2010 - 8:44 am | Nile
सहजकाका आमचे लै प्राब्लेम्स आहेत देउ काय तुम्हाला सोडवायला? ;-)
21 Aug 2010 - 9:08 am | सहज
अरे तु तर बिकाबाबाला शरण गेला आहेस ना? तरी तुला प्रॉब्लेम्स? मार्केट डाउन करु नकोस बिकाबाबांचे!
21 Aug 2010 - 9:15 am | Nile
तेहेतीस कोटी देवांवर श्रद्धा ठेवणारे आम्ही दोन बाबांचे अनुयायी नाही का होउ शकत?
(तिकडे साउथ मध्ये आंबाबाई (की भगवान) अन तो कल्की नाही का "नवरा-बायको" अवतार? दोघांना फुल्ल मार्केट आहेच. तुम्ही आणि बिका दोघे साटेलोटे करुन वेळा ठरवुन घ्या, एक बॉम्बे स्टाक एक्स्चेंज दुसरा एन. वाय! ;-) )
21 Aug 2010 - 10:01 am | सहज
>आम्ही दोन बाबांचे अनुयायी नाही का होउ शकत? ...तुम्ही आणि बिका दोघे साटेलोटे करुन वेळा ठरवुन घ्या
इथे मी बाबा / बापू/ बुवा / गुरु इ. कसलाही दावा न करता, नाईल स्व:ताच अनुयायी व्हायला उतावीळ दिसतोय. यावरुन पहीला अनुयायी कसा 'मिळतो' याचे प्रात्याक्षीक मिळाले की.
21 Aug 2010 - 10:05 am | Nile
वा तुम्ही आमचे सगळे प्राब्लेम सोडवणार असाल तर तुम्हाला बाबाच काय देव पण करुन टाकु की आम्ही. =))
पण आधी प्राब्लेम्स सोडवा मग करु.
21 Aug 2010 - 10:08 am | सहज
प्रियाली तै, आय रेस्ट माय केस :-)
21 Aug 2010 - 10:12 am | Nile
नो, इन दॅट केस यु वान्ट टु सॉल्व युअर (धीस) प्रॉब्लेम फर्स्ट. ;-)
20 Aug 2010 - 7:41 pm | मृत्युन्जय
कुठल्याही व्यक्तिला नेहेमीच अद्भुताचे अलौकिकाचे वेड असते. मुळात कुठलाही माणुस जन्मजात निरीश्वरवादी नसतो. त्याच्या आयुष्यातील काही घटना त्याच्या परमेश्वरावरची श्रद्धा एकतर अजुन प्रगाढ करतात किंवा त्याला नास्तिक बनवतात.
परमेश्वरावरची श्रद्धा ही आयुष्यातल्या अनपेक्षिताचे पडसाद असतात. अनपेक्षितपणे चांगली गोष्ट घडली तर परमेश्वरावरची श्रद्धा वाढते आणि अनपेक्षित आरिष्टामुळे तोच माणुस नास्तिकही बनु शकतो.
कुठल्याही बुवा बाबावरची श्रद्धा ही त्या परमेश्वरावरच्या श्रद्धेचे एक्स्टेंशन असते. बुवा किंवा बाबांवरचे श्रद्धा ही एखाद्या माणसाची मानसिक गरजही असु शकते. कधीकधी ही मानसिक गरजच अध्यात्माचे स्वरुप धारण करते. एखाद्याला नैराश्येच्या गर्तेतुन जो बाहेर काढतो तोच माणुस त्याच्यासाठी मग परमेश्वराचा अवतार बनतो. मानसिक आजार हा जागातला सर्वात मोठा आजार आहे. प्रत्येक माणुस कधी ना कधीतरी डिप्रेशन मधुन जात असतो. त्यावेळेस जर त्याला अश्या मानसिक आधारतुन काही फायदा होत असेल तर वाईट काहीच नाही.
राहता राहिल प्रश्न पहिला अनुयायी मिळायचा. तर या प्रश्नाचे उत्तर बापुच जाणोत.
20 Aug 2010 - 7:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
साफ असहमत. घरून बंबार्डींग झाल्यामुळेच माणूस, खरंतर मुलं, देवावर विश्वास ठेवायला शिकतात.
एखाद्या घटनेमुळे निरीश्वरवादी होणारा माणूस माझ्यातरी बघण्यात नाही; (माझ्यासकट) माझे अनेक मित्र निरीश्वरवादी आहेत, ते सगळे व्यवस्थित विचार करून या विचारापर्यंत आले आहेत. हा दुसर्या चांगल्या चर्चेचा विषय होऊ शकतो. पण तरीही मूळ गृहितकाला साफ विरोध!!
20 Aug 2010 - 10:35 pm | मृत्युन्जय
मुळात कुठलाही माणुस जन्मजात निरीश्वरवादी नसतो.
ठीक आहे मी वेगळ्या शब्दात मांडतो मुळात कुठलाही माणुस जन्मजात आस्तिक नसतो तसा निरीश्वरवादीही नसतो
20 Aug 2010 - 10:44 pm | नितिन थत्ते
निरीश्वरवादी नसतो हे मान्य (कारण ईश्वर म्हणजे काय हे कुठे माहिती असते?)
पण मूल अश्रद्ध मात्र असते. म्हणजे आपली आई आपल्याला दूध देणार आहे अशी श्रद्धा नसते त्यामुळे ते दूध मिळेपर्यंत रडत असते. किंवा आपले खेळणे घरी आलेले पाहुणे बाळ घेऊन जाणार नाही अशी श्रद्धा त्याला ठेवता येत नाही. पहिले काही दिवस आई शाळेत सोडते तेव्हा ती थोड्यावेळाने आपल्याला घेऊन जाणार आहे ही श्रद्धा नसते. :)
ही श्रद्धा अनुभवांती निर्माण होत जाते.
21 Aug 2010 - 1:54 pm | मृत्युन्जय
उदाहरण चुकीचे आहे असे वाटते. असे बघा. या बाबतीत लहान मुलांचेच कशाला मोठ्या माणसांचे पण उदाहरण घ्या ना. मोठेपणी तुम्ही म्हणता तशी श्रद्धा निर्माण झालेली असते तरी माणुस दु:खीकष्टी होतो , टेन्शन घेतो. आणि हे सगळे तो देवावार किंवा बाबावर श्रद्धा असुन करतो. लहान मुलांचे तसेच आहे. श्रद्धा किंवा विश्वास म्हणा हवा तर, त्यांनाही असतो. पण रडणे ही स्वाभाविक क्रिया असते. मोठा माणुस प्रार्थना करतो, लहान मुले वेगळ्या प्रकारे व्यक्त करतात एवढेच.
21 Aug 2010 - 2:03 am | Nile
आज पर्यंत मी ज्या ज्या अंधश्रद्धाळु लोकांना माझा देव नावाच्या फुटकळ संकल्पनेवर विश्वास नाही असे सांगितले आहे त्यांचे मला साधारण एकाच अर्थाचे उत्तर येते "तुझ्यावर अजुन प्रसंग*/वेळ नाही आला/ली" . इथे हे प्रसंग/वेळ म्हणजे फक्त वाईटच असतात, जिथे मनुष्य असहाय्य असतो ते पसंग. त्यामुळे तुमचे वाक्य खंप्लिट रांग आहे इतके नमुद करतो.
आपलं तर सपष्ट मत आहे, जे माहित नव्हतं त्याला 'देव' नाव दिलं का साला ताप नाय डोक्याला.
अहो, लहानपणी आईबाप आपल्या पोराला "आइच्या पोटात बेबी कुठुन आली"चं उत्तर देवाची कृपा देतात ना तसेच. ज्यांची बुद्धी काही गोष्टी समजुन घेण्यात अपरी असते त्यांच्या तब्येतीला देव संकल्पनेच्या कुबड्या बरोबर मानावतात. बुद्धीने धडधाकट असलेल्यांना अश्या कुबड्यांची गरज कशाला?
*(हा प्रसंग म्हणजे अतीप्रसंग नाही बरंका रे चावट परा)
21 Aug 2010 - 2:39 pm | मृत्युन्जय
आज पर्यंत मी ज्या ज्या अंधश्रद्धाळु लोकांना माझा देव नावाच्या फुटकळ संकल्पनेवर विश्वास नाही असे सांगितले आहे
श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यात फरक आहे नाही का?
त्यांचे मला साधारण एकाच अर्थाचे उत्तर येते "तुझ्यावर अजुन प्रसंग*/वेळ नाही आला/ली" . इथे हे प्रसंग/वेळ म्हणजे फक्त वाईटच असतात, जिथे मनुष्य असहाय्य असतो ते पसंग. त्यामुळे तुमचे वाक्य खंप्लिट रांग आहे इतके नमुद करतो.
इतरांनी काय सांगितले त्याच्यावरुन माझ्या मतावर भाष्य करु नये हे उत्तम. देवावर विश्वास चांगल्या गोष्टींमुळे सुद्धा बसतो. आणि कधी कधी कुठलीही चांगली वाईट घटना न घडता सुद्धा बसतो. मी या प्रकारातला श्रद्धाळु आहे.
आणि जर तुमचा देव नावाच्या संकल्पनेवर विश्वास नसेल तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. श्रीराम लागूंचा देखील नाही आहे. लाखातल्या ५-७ लोकांचा नसल्यामुळे देव नावाची संस्था नष्ट होत नाही.
बाकी हा फुटकळ शब्द काही रुचला नाही. असो. तुमची मर्जी. देव करो आणि तुमचा स्वत:च्या संकल्पनेवरचा विश्वास अढळ राहो.
आपलं तर सपष्ट मत आहे, जे माहित नव्हतं त्याला 'देव' नाव दिलं का साला ताप नाय डोक्याला.
उदा?
अहो, लहानपणी आईबाप आपल्या पोराला "आइच्या पोटात बेबी कुठुन आली"चं उत्तर देवाची कृपा देतात ना तसेच. ज्यांची बुद्धी काही गोष्टी समजुन घेण्यात अपरी असते त्यांच्या तब्येतीला देव संकल्पनेच्या कुबड्या बरोबर मानावतात. बुद्धीने धडधाकट असलेल्यांना अश्या कुबड्यांची गरज कशाला?
उदा?
बाकी देव कुबडी म्हणुन वापरत असाल तर तुम्ही दुबळे नक्कीच. पण माणुस दुबळा आहे म्हणुन देव अस्तित्वात नाही असा अर्थ तर होत नाही ना?
बाकी तुम्ही खंप्लिट रांग म्हणा आम्ही खंप्लिट करेक्ट म्हणतो. फरक कोणाला पडतो इथे?
22 Aug 2010 - 6:35 am | Nile
एखाद्या आपली श्रद्धा हीच अंधश्रद्धा आहे हे माहित नसेल तर तो तिला श्रद्धाच म्हणतो. नागाची पुजा, वडाच्या झाडाची पुजा वगैरे लोक श्रद्धेनेच करतात. पुर्वी आकाशात स्वर्ग आहे आणि जमिनीखाली नरक आहे अशीही लोकांची श्रद्धा होती, अजुनही असेल काहींची.
देव नावाची संस्था कशी आहे काय आहे वगैरे सांगितलेत तर बरे होईल. अश्या कुठल्याही संस्थेबद्दल ऐकुन नाही.
20 Aug 2010 - 7:42 pm | मदनबाण
मला तर लोटन बाबा फार आवडतात... :)
बोला लोटन बाबा की जय !!! :)
20 Aug 2010 - 8:41 pm | शिल्पा ब
बाकी काहीही म्हणा, एवढं लोळून लोळूनच जायचं तर तेवढी विल-power हवीच...आणि लोळणे, घास खाणे आणि एका पायावर ६ महिने उभे राहणे यापलीकडे या बाबाने काही केलं दिसत नाही..
तेवढं करायलाही मानसिक ताकद हवीच म्हणा..
असो..तुमचं चालु द्या.
20 Aug 2010 - 8:13 pm | नगरीनिरंजन
परिस्थितीने गांजलेले लोक पाहून त्यांना जपजाप्य किंवा तत्सम प्रकार करायला सांगायचे. बर्याच लोकांना असं सांगितलं की योगायोगाने एखाद्याची परिस्थिती आपोआप सुधारते. त्याला वाटतं बाबाची कृपा! झालं मिळाला अनुयायी आणि प्रचारक.
20 Aug 2010 - 8:15 pm | अर्धवट
बाय..
एवढे विवीध उपाय मिळतायत तुला.. ट्राय नक्की कर.. पीआर चं काम मला बरंका.. मीडिया वगैरे सगळ मॅनेज करतो नीट.. बाकी टक्केवारीचा व्यनी केलाय.. थोडं मागंपुढं करून करुन टाकु..
20 Aug 2010 - 8:18 pm | बिपिन कार्यकर्ते
आप कतार मे खडे है. कृपया लास्ट नंबर वर उभा रहो.
20 Aug 2010 - 8:21 pm | अनामिक
लगेच श्री.* अदिती अम्मा देवी डोळ्यासमोर हुब्या र्हायल्या.
*श्री का लिहिले म्हणून विचारू नये!
20 Aug 2010 - 8:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अनामिक देवा, माझा अभ्यास नको तिथे चांगला आहेच. ;-)
असो. पहिला अनुयायी कसा मिळवला याच्या गोष्टी कोणीही देत नाहीये. अजून काही महिन्यांनी ही नोकरी संपली की काय करावं हा प्रश्न अजून सुटलेला नाहीये. मायबाप मदत करा हो!
21 Aug 2010 - 9:23 am | नगरीनिरंजन
एकच श्री लिहिल्या बद्दल जाहीर निषेध. बाबा आणि अम्मांना किमान दोन श्री लावले पाहिजेत असा नियम आहे हे तुम्हाला माहिती नाही वाटतं.
20 Aug 2010 - 8:29 pm | रेवती
धाग्यात दिलेली तीन लक्षणेच पुरेशी आहेत पहिला भक्त मिळवायला.
तरीही बरेच दिवस वाट पहावी लागेल असे दिसताच सर्वसाधारणपणे लोक करू धजावणार नाहीत असे धाडसी विधान करावे. त्याप्रमाणे वागावेच लागते असे नाही, पण नुसते म्हणत रहावे. आश्चर्यचकित झालेल्यांपैकी एकतरी मासा गळाला लागतो असा स्वानुभव आहे. ;)
20 Aug 2010 - 8:48 pm | वेताळ
चार शिकलेले मित्र एका ठिकाणी रात्री दारु पित बसले होते. त्याच्या व्यवसायाबद्दल गप्पा चालु होत्या. विषयाविषयातुन एकाने त्याना एका नावाजलेल्या संताबद्दल व त्याच्या वस्तुबद्दल माहिती दिली. अमुक ह्या संताने त्याच्या वस्तु अमुक ठिकाणी एका व्यक्तीजवळ ठेवल्या आहेत. व सदर वस्तु परत नेण्याकरिता पुढच्या जन्मी परत येईन असे सांगितल्याचे कथन केले. त्यातल्या एका मित्राची ट्युब पेटली. त्याने काही दिवसानंतर त्या व्यक्तीच्या घरी जावुन मी संत असुन मागच्या जन्मीच्या ह्या ह्या वस्तु मला परत करा म्हणुन सांगितले. काही वेळा नंतर त्या कुंटुबाची खात्री पटली कि तो संत परत जन्म घेवुन वस्तु परत मागायला आला आहे. मग काय वस्तु मागणारा फुल्ल टाईम बाबा बनला.
असे काय घडले तर तुम्ही पण बाबा किंवा अम्मा बनु शकता.
20 Aug 2010 - 8:50 pm | अर्धवट
माझ्याकडे कुणीही कसल्याही वस्तू ठेवलेल्या नाहियेत..
आधी खुलासा केलेला बरा. ;)
20 Aug 2010 - 10:38 pm | मृत्युन्जय
उद्या तुमच्याकडे येउन "तुमच्याकडे कोणीही कुठल्याही वस्तु ठेवलेल्या नाहीत असे" तुम्हाला सांगुन मी बाबा बनु शकतो काय? ;)
20 Aug 2010 - 8:54 pm | अनामिक
कोणाही भोवती किमान पाच दहा विश्वासू लोकांची गर्दी असतेच... मग त्या पाच दहा जणांना तुम्ही तुम्हाला झालेला साक्षातकार सांगीतला तर २-४ जणांचा तरी विश्वास बसेलंच, झाले अनुयायी तय्यार! आणि मग ही चेन अॅमवे सारखी वाढतच जाणार, नाही का?
20 Aug 2010 - 9:00 pm | शिल्पा ब
द्विशतकी धागा दिसतोय...
आमच्यापेक्षा भारी आईडिया सुचली आदितीमायेला... ;)
20 Aug 2010 - 9:26 pm | मिसळभोक्ता
मिरासदारांची "एका भुताचा जन्म" ही कथा अवश्य वाचावी.
20 Aug 2010 - 10:20 pm | आळश्यांचा राजा
धागालेखिकेचा उद्देश श्रद्धावंतांची टवाळी करण्याचा नसावा असं वाटतंय, म्हणून हा प्रतिसाद लिहिण्यासाठी वेळ घालवायला हरकत नाही.
लेखात असा प्रश्न उपस्थित केलेला आहे, की “या बाबा, बुवा, माता, बापू, स्वामी, गुरुंना अनुयायी मिळतातच कसे?” मला वाटतं असाच प्रश्न श्रद्धावंतांनापण पडू शकतो, की या अश्रद्धांना कसं काय वाटत नाही, आपण गुरूला शरण जावं, जगण्याचा अर्थ समजून घ्यावा. हे स्वत:ला इतकं शहाणं समजतात, तरी इतके अज्ञानी असतात, स्वत:च्या शिरावर जगण्याचा भार घेऊन दु:खी आयुष्य जगत राहतात.
अश्रद्ध म्हणतो, you show me first, then I believe. सश्रद्ध म्हणतो, you believe, and you shall see. हा तिढा केंव्हाच सुटणे शक्य नाही. आयुष्याकडे बघण्याचे दोन अतिशय भिन्न असे हे कोन आहेत. या दोन्ही भूमीकांमध्ये कुठलीच भूमीका त्याज्य असण्याचं काहीच कारण नाही. रामकृष्ण परमहंस आणि ईश्वरचंद्र विद्यासागर ही दोन उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत. पहिले टोकाचे सश्रद्ध; इतके की ज्या कालीला बघायची आस होती ती दिसत नाही तर आपली मुंडी कापून घ्यायला तयार झाले. दुसरे म्हणायचे काय करू मी त्या कालीला बघून? ती आहे की नाही हेपण नक्की माहीत नाही. समजा असली, तरी ती दिसून काय फरक पडणार आहे, जगातली दु:खं कमी होणारेत का? पण दोघांनाही एकमेकांच्या मार्गांविषयी हरकत नव्हती. ईश्वरचंद्र कधी रामकॄष्णांना वेडा म्हणाले नाहीत, आणि रामकृष्ण त्यांना कधी मूर्ख म्हणाले नाहीत, उलट म्हणाले, त्यांच्या हृदयात मानवप्रेमाचा ईश्वर वास करतोय, त्यांना कालीच्या दर्शनाची आवश्यकता नाही.
असो. आता “बाबा, बुवा, माता, बापू, स्वामी, गुरुंना” अनुयायी मिळण्याविषयी. ही तर आपल्या देशात चालत आलेली हजारो वर्षांची परंपरा आहे. यांना अनुयायी मिळतातच कसे, किंवा पहिला अनुयायी कसा काय मिळतो हा प्रश्न पडायचे खरे तर कारण नाही. प्रश्न पडला आहे, कारण मला वाटतं लेखिका आपल्या दृष्टीकोनाशी ठाम आहे. इतकी ठाम, की दुसरा दृष्टीकोन असूच शकत नाही, असलाच, तर तो बरोबर/ योग्य असू शकत नाही असं तिला वाटत असावं. रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, अरविंद, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदासादि संत यांच्याविषयी तिची काय मते आहेत हे जाणून घ्यायला आवडेल. तात्पुरते असे गृहीत धरतो, की तिच्या मते हे लोक भोंदू नाहीत. यांच्याविषयी प्रचलित असलेल्या चमत्कारांच्या कथांविषयी मी काही बोलणार नाही. पण यांच्या साहित्यात लोकशिक्षणासोबतच अनेक गूढ आध्यात्मिक अनुभूतींचे वर्णन आहे. ते नाकारणार का? आणि अशा गूढ आध्यात्मिक अनूभूतींची वर्णने वर्षानुवर्षे चालत आलेली आहेत, आणि अशा व्यक्तींना आपला समाज वंदनीय ठरवीत आलेला आहे. त्यांना वेडं ठरवलेलं नाही.
वरील मान्य असेल, तर आता मुद्दा येतो, की खरा गुरू कोण आणि खोटा कोण. (वरील मान्य नसेल तर मुद्दा निकाली निघाला! सगळेच “गुरू” खोटे!) यावर वेळोवेळी अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींनी भाष्य केलेले आहे. गौतम बुद्धापासून विवेकानंदांपर्यंत अनेक विभूतींनी अशा खोट्या बुवांची लक्षणे सांगीतलेली आहेत. रामकृष्णांनी नागाचा आणि साध्या सापाचा दृष्टांत दिलेला आहे. विवेकानंद म्हणतात जिथे अस्सल आहे, तिथे नक्कल असणारच. जास्त फायदा असेल तर नक्कल नक्कीच असणार. खरे गुरू, खरं अध्यात्म आहेच आहे, म्हणूनच खोटे भोंदू गुरू, खोटं अध्यात्म पण आहे. एक खरा गुरू असेल तर हजार/ लाख भोंदू बाबा निघणारच.
कोण भोंदू आणि कोण सद्गुरू हे ज्याचे त्याने आपल्या विवेकबुद्धीने, अनुभवाने ठरवावे. गजानन महाराज, अनिरुद्ध बापू, साईबाबा यांच्याविषयी मला विशेष माहिती नाही. त्यांचे काही साहित्य (असल्यास) वाचलेले नाही. त्यांनी काही ध्यान पद्धती शिकवली असल्यास माहीत नाही. त्यांनी कुणाला लुबाडले आहे की कसे, हे माहीत नाही. त्यांच्या शिष्यांपैकी कुणी (सार्वजनीक आयुष्यात) आउटस्टॅंडींग पर्सनॅलिटी आहे की नाही तेही माहीत नाही. त्यामुळे ते भोंदू की सद्गुरू याविषयी मला काहीच बोलता येणार नाही. कुणाच्या मते ते भोंदू असतील तर तसे त्यांनी दाखवून द्यावे. उगीच टवाळी कशाला करायची? अशा बाबांवर श्रद्धा ठेवणारे लोक असतात त्यांची उगाच खोड काढून कसला विकृत आनंद मिळतो हे माझ्या समजण्यापलीकडचे आहे. जर या भोंदू बाबांच्या तावडीत सापडलेल्या बिचाऱ्यांची दया येत असेल, तर भोंदू बाबांचे अध्यात्म कसे चुकीचे आहे, आणि व्यक्तीसाठी आणि समाजासाठी कसे हानीकारक आहे याची चर्चा जरूर व्हावी. आम्ही बघा कसे शहाणे, हे बाबा लोकांकडे आपली बुद्धी गहाण ठेवणारे लोक कसे मूर्ख आहेत, असा फुकाचा अहंकार दाखवून निखळ करमणुकीचाही हेतू साध्य होत नाही, कारण काही लोक त्यात नक्कीच दुखावले जातात.
(सहिष्णु)
20 Aug 2010 - 10:24 pm | शिल्पा ब
हे उत्तर आवडले..योग्य वाटते
20 Aug 2010 - 10:28 pm | प्रियाली
you show me first, then I believe, असे अज्ञेयवादी म्हणतो. अश्रद्ध म्हणतो, आय डोन्ट बिलिव, पिरिअड.
20 Aug 2010 - 10:33 pm | आळश्यांचा राजा
मान्य आहे. अज्ञेयवाद्याला अश्रद्ध म्हणता येईल का? कारण अश्रद्ध नेहेमीच "आय डोन्ट बिलिव, पिरिअड." म्हणणार नाही. "दिसल्यावर" तो नक्कीच म्हणेल, ओके, नाउ आय बिलिव्ह.
20 Aug 2010 - 10:38 pm | प्रियाली
नाही हो तसे काही होणार नाही. अश्रद्ध म्हणजे काय हे कळण्याकरता उपक्रमावरील काही चर्चा अवश्य वाचा.
20 Aug 2010 - 10:59 pm | आळश्यांचा राजा
अवश्य वाचीन, आणि विचार करीन. थँक्स!
वेल! तुम्हाला काय म्हणायचंय ते आलं लक्षात. पण इथे विषयांतर होतंय. माझा प्रतिसादातला तो शब्द बदलल्याने मला काय म्हणायचंय ते बदलत नाही. असो.
21 Aug 2010 - 12:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
राजेसाहेब, तुमचा प्रतिसाद नीट, वेळ काढून वाचते आणि धागा मागे गेला असेल तर आपण खरडी-व्यनीतूनही बोलू शकतो.
माझे व्यक्तीगत आयुष्यातही असे मित्र आहेत ज्यांचे कोणी ना कोणी गुरू आहेत, पण ते गुरू 'बाबा' नाहीत; मार्ग दाखवणारे आहेत, प्रयत्न करायला सांगणारे आहेत; हवेतून अंगठी काढून दाखवणारे आणि नळातून पाणी आणून देणारे नाहीत. त्या अर्थानेतर पुस्तकं, काही मित्रं, काही आप्त हे ही आपले गुरू असतातच ना!!
माझा संपूर्ण रोख भोंदू बाबांवर आहे. संडासात पाणी आणून देणार्या 'बाबां'ना पहिले अनुयायी मिळतातच कसे, लोकं डोकं बाजूला ठेवायला एवढे का उतावळे असतात असा मला प्रश्न पडला आहे.
22 Aug 2010 - 10:46 pm | आळश्यांचा राजा
ओह! हे वाचायचं राहिलंच.
एनी वे, श्री घासकडवींनी क्लास उत्तर दिलेले आहेच. आणि तुमचा प्रश्न थोडासा बाजूला ठेऊन मी माझंच एक तुणतुणं पुढील काही प्रतिसादांमध्ये वाजवत बसलो होतो!
21 Aug 2010 - 11:42 am | अप्पा जोगळेकर
अज्ञेयवादी याचा अर्थ ईश्वराच्या अस्त्त्वाचे ज्ञान आपणास नाही असे मानणारा असे कुठेतरी वाचल्याचे आठवते. म्हणजे थोडक्यात ज्यांना कुठलाच स्टान्स घ्यायचा नाही(आस्तिक अथवा नास्तिक) यांच्यासाठी चांगला पर्याय आहे. चूक किंवा बरोबर कसाही असो पण एक स्टान्स असला पाहिजे.
21 Aug 2010 - 7:49 pm | आमोद शिंदे
सहमत आहे. अभ्यास करण्याची इच्छा नसणारे आळशी लोक* कुंपणावरची भुमिका घेतात.
(*हे आळश्यांच्या राजाला उद्देशून नाही)
20 Aug 2010 - 11:00 pm | मृत्युन्जय
खुपच संतुलित आणि मुद्देसुद प्रतिक्रिया आहे, मूळ प्रश्नाचे उत्तर दिलेले नसले तरीही.
21 Aug 2010 - 2:29 am | Nile
हे संतुलनाचे स्तोम फारच झाले आहे ब्वॉ!
अहो रामदासांनीच सांगितलं आहे, नाठाळाचे माथी हाणु काठी, काय समजलात?
21 Aug 2010 - 2:22 pm | मृत्युन्जय
तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या डोक्यावर काठी मारुन घेणार की काय मग ? :P