प्रस्तुत धाग्यावर आता २३० पेक्षा जास्त प्रतिसाद आलेले आहेत. यापुढील चर्चेकरता नवा धागा उघडावा.
- संपादक मंडळ
माझा ऑफिसमेट जयंती (हो, हे मुलाचं नाव आहे, जयंती प्रसाद) अधूनमधून 'बाबागिरी'बद्दल बोलतो. 'बाबा' म्हणजे बाबा अथवा वडील नव्हे, "बाबा" म्हणजे भोंदूबाबा, बाबा-बुवा-बापू-माता-गुरू मधले बाबा! कालसुद्धा जयंती अमका माणूस फारच बाबागिरी करतो असं मला सांगत होता. म्हणून मी त्याला व्याख्या विचारली, "'बाबा' म्हणजे नक्की कोण?" त्याचं उत्तर अगदीच चमत्कारिक नसलं तरीही विचार करण्यायोग्य वाटलं. त्याचं उत्तर असं:
बाबा लोकांची तीन (जयंतीच्या बाबतीत ट्रीलॉजी जुनीच आहे.) लक्षणं असतात. यापुढे या लेखापुरतं 'बाबा' आणि बाबा हे शब्द एकच आहेत असं समजावं.
१. बाबा लोकं अखंड उपदेश करतात; पण त्यातल्या अगदी कमी गोष्टी त्यांच्या स्वतःच्या बाबतीत लागू पडतात.
२. बाबा लोकं कधी कोणाचंही ऐकून घेत नाहीत.
३. बाबा लोकांचे प्रचंड प्रमाणात (प्रमाणात हा शब्द महत्त्वाचा, का ते पुढे येईलच) अनुयायी असतात.
प्रमाण हा शब्द अशासाठी वापरला की, तो आमच्या होस्टेलमधल्या एकाला बाबा म्हणतो. होस्टेलमधले १२-१५ पैकी दहा लोकंतरी त्याचे अनुयायी असतात. उदा: तो म्हणाला आज पिझा खाऊया, की कॅण्टीनमधे जेवणारे सगळे पिझा खायला तयार होतात. आपलं म्हणणं कितीही चुकीचं असलं तरी तेच तो पुढे दामटत रहातो. इ.इ.
असो. तर आमचा हा संवाद सुरू असतानाच माझा मोबाईल वाजला, पाहिलं तर एक एसेमेस. त्याकडे मी दुर्लक्ष केलं आणि मुख्य, महत्त्वाच्या गॉसिपकडे लक्ष दिलं. तर पुन्हा एक एसेमेस. तर मग 'टॅम्प्लीस' घेऊन एसेमेस पाहिले. तर आणखी कोणी "गुरू" आणि "बापू" अनुक्रमे मला रूद्राक्ष आणि मणी विकत होते. 'डीएनडी'ला **वर मारणार्या या लोकांना चार भाषांत चार सणसणीत शिव्या हासडून मी पुन्हा जयंतीशी बोलायला गेले तर जयंती स्वतःच "बाबा" बनल्यागत माझ्याकडे चक्क दुर्लक्ष करता झाला!
मग मीही त्यालाही **वर मारून पुन्हा मराठी आंतरजालाकडे वळले. पाहिलं तर उपक्रमावर अनिरुद्ध बापूंबद्दल ही चर्चा आली होती. मला प्रश्न असा पडला की या बाबा, बुवा, माता, बापू, स्वामी, गुरुंना अनुयायी मिळतातच कसे? तेव्हा एक त्यामानाने जुना टेडवरचा व्हीडीओ आठवला, हा पहा. पण हे सगळं आपल्याकडे असंच होतं का? म्हणजे या व्हिडीओत डेरेक सिव्हर्स म्हणतो त्याप्रमाणे The first follower transforms a lone nut into a leader. हा पहिला अनुयायी कसा मिळवायचा?
प्रतिक्रिया
21 Aug 2010 - 2:24 pm | Nile
केलात ना पुन्हा नाठाळपणा?
21 Aug 2010 - 2:28 pm | परिकथेतील राजकुमार
श्री. निळे व श्री. मृत्युंजय,
अवांतर चर्चांसाठी, स्कोर सेटल करण्यासाठी श्री. विनोबा व श्री. निखलोबा ह्यांनी माड्या चढुन, शेअर्स विकुन अविरत कष्ट घेउन नविन मोड्युल मध्ये देखील खरडफळा व खरडवही उपलब्ध करुन दिली आहे त्याचा लाभ घ्यावा.
21 Aug 2010 - 2:41 pm | मृत्युन्जय
संगती संग दोष: असे म्हणावे काय याला?
20 Aug 2010 - 11:30 pm | अर्धवट
भले शाबास.. 'अवचित उदंड सापडते' म्हणतात ते असं.. लाख बोललात राव
>>आयुष्याकडे बघण्याचे दोन अतिशय भिन्न असे हे कोन आहेत. या दोन्ही भूमीकांमध्ये कुठलीच भूमीका त्याज्य असण्याचं काहीच कारण नाही.
पण ती त्याज्य असून लोकांनी 'भल्या' मार्गाला लागावं अशी अपेक्षा दोघांचीही असणार नाही का.. आणी तो अधिकार दोन्ही बाजुंनी मान्य व्हायला हवा, ही ओघानं येणारी माफक अपेक्षा.
>>लेखिका आपल्या दृष्टीकोनाशी ठाम आहे. इतकी ठाम, की दुसरा दृष्टीकोन असूच शकत नाही, असलाच, तर तो बरोबर/ योग्य असू शकत नाही असं तिला वाटत असावं.
दुसरा दृष्टीकोन नक्कीच असु शकतो पण तो योग्य असेल अस नसेल वाटत प्रामाणिकपणे.
>>कोण भोंदू आणि कोण सद्गुरू हे ज्याचे त्याने आपल्या विवेकबुद्धीने, अनुभवाने ठरवावे.
हितच तर ग्यानबाची मेख आहे ना.. आता विवेकबुद्धी चा ल.सा.वी. काढायचा कसा? लेखीकेला आणि इतर काही जणांना जी भोंदुगीरी स्पष्ट दिसते, ती उरलेल्या इतर काही जणांना नसेल तशी दिसत.. आता ज्यांना दिसते त्यावर घाव घालणे कर्तव्य म्हणुन करत असतील त्या.. (हा मुद्दा आपला अंदाज बरंका.. आक्षेप घेतल्यास मागे घेता येइल.)
21 Aug 2010 - 12:09 am | मृत्युन्जय
हितच तर ग्यानबाची मेख आहे ना.. आता विवेकबुद्धी चा ल.सा.वी. काढायचा कसा? लेखीकेला आणि इतर काही जणांना जी भोंदुगीरी स्पष्ट दिसते, ती उरलेल्या इतर काही जणांना नसेल तशी दिसत.. आता ज्यांना दिसते त्यावर घाव घालणे कर्तव्य म्हणुन करत असतील त्या.. (हा मुद्दा आपला अंदाज बरंका.. आक्षेप घेतल्यास मागे घेता येइल.)
कोणत्या लेखिकेबद्दल बोलता आहात आपण? अदितीतैंना फक्त पहिला अनुयायी कसा मिळवतात हे जाणुन घेण्यात रस आहे.
आणि भोंदुगिरी की अध्यात्म हे दुसरे कोणी कसे काय ठरवु शकतो? ज्याला प्रत्यय येतो तोच ठरवणार ना? हा आता हवेतुन अंगारे काढणारे, सफरचंदातुन अंगठी काढुन देणारे, धुपातुन कमळ उत्पन्न करणारे यांच्याबद्दल म्हणत असाल तर मान्य आहे. खरा साधू कधीच असली भोंदुगिरी करणार नाही.
21 Aug 2010 - 2:00 am | शिल्पा ब
<<<हा आता हवेतुन अंगारे काढणारे, सफरचंदातुन अंगठी काढुन देणारे, धुपातुन कमळ उत्पन्न करणारे यांच्याबद्दल म्हणत असाल तर मान्य आहे. खरा साधू कधीच असली भोंदुगिरी करणार नाही.
हा सत्य सैबबांचा अपमान आहे आणि आम्ही तो सहन करणार नाही....पंत, आपण आपले शब्द मागे घ्या..अन्यथा लढाईला तयार रहा ...(असं काही लोक म्हणण्याची शक्यता आहे एवढंच)
21 Aug 2010 - 2:33 am | Nile
कपाळ प्रत्यय, थापा लेको नुसत्या.
कसा प्रत्यय येतो ते सांगा पाहु जरा क्लीअरकट. तुझे भले होईल, सगळे ठीक होईल, वगैरे वगैरे हवेत गोळीबार कोणीही करेल. पोरगी लग्नाला उभी केली तर तिचे लग्न होईल हे सांगायला बाबा लागतोच कशाला? रोग बिग बरा करणारा बाबा असेल तर त्याला रोग कुठला आहे हे सांग म्हणावं आधी.
21 Aug 2010 - 2:48 am | मृत्युन्जय
प्रत्यय हा नेहेमी बरे झालेले आजार किंवा जिवंत झालेली मृतशरीरे यातुनच यायला पाहिजे असा अट्टाहास का? प्रत्यय म्हणजे काय ऐश्वर्या राय आहे का की प्रत्यक्ष दिसायलाच पाहिजे. प्रत्यय म्हणजे अनुभूती. अलौकिकाचा साक्षात्कार म्हणजे पण अनुभूती आणि इश्वराचे सान्निध्य म्हणजे पण अनुभूती. आता मला देव दिसला म्हणजे काय झाले हे मी फक्त शब्दात सांगु शकतो (बाय द वे मला दिसलेला नाही आहे देव. तसा तो दिसणे शक्य पण नाही. मी तितका धार्मिक मनुष्या नाही). आता त्याचा फोटो नाही ना काढुन आणु शकत ती गोष्ट तुमच्य गळी उतरवण्यासाठी. साद देती हिमशिखरे चे लेखक डॉ. प्रधानांचे असे म्हणणे आहे की शंकर महाराजांच्या कृपेने त्यांना देव दिसला. आता हा प्रत्यय आहे. अनुभूती आहे. यामुळे त्यांची शंकर महाराजांवरची निष्ठा अजुन द्रुढ झाली असेल.
आपल्या चर्चेचा जर आधार घेतल तर शंकर महाराज देखील "बाबा" या सदराखाली येतात. डॉ. प्रधानांना प्रत्यय आला असे त्यांचे म्हणणे आहे त्यामुळे शंकर महाराजांच्या अध्यात्मिक थोरवीबद्दल तेच बोलु शकतात. आपण फारतर असे आपले मत नोंदवु शकतो की आपल विश्वास नाही. जसा माझा विश्वास नाही सध्याच्या कुठल्याच बाबांवर मग ते सत्य साई बाबा असोत सद्गुरु वामनराव पै असोत किंवा बापु असोत. पण माझा विश्वास नाही म्हणजे ज्याचा आहे तो मुर्खच असा निष्कर्ष काढणे मात्र मला अयोग्य वाटते
21 Aug 2010 - 2:53 am | Nile
अहो पण प्रत्यय आला म्हंजे नक्की काय झालं ते तर सांगा की म्हणाव? कसली अनुभुती झाली?
बादवे, आम्ही जर एक बाटली घशात रीती केली तर आम्हाला पण लै प्रत्यय अन लै अनुभुत्या येतात हे तुम्हाला आम्ही सांगितले का?
21 Aug 2010 - 2:27 pm | मृत्युन्जय
अहो देव दिसला. त्याचे सान्निगघ्य जाणवले. आता हे ज्याचे त्यालाच जाणवणार ना. त्याचा फोटो तर नाही काढुन ठेवु शकत. आणि देव म्हणजे काही दारु नाही की दुसर्याला पण त्याच्या अस्तित्वाचा साक्षात्कार व्हावा. देवाचा भप्कारा असा जाणवत नाही दारुसारखा.
बादवे, आम्ही जर एक बाटली घशात रीती केली तर आम्हाला पण लै प्रत्यय अन लै अनुभुत्या येतात हे तुम्हाला आम्ही सांगितले का?
चांगली गोष्ट आहे. काय काय प्रत्यय येतात? की तुम्ही एक बाटली घशात रीती केल्यावर इतरांना देव अस्तित्वात नसल्याची अनुभूती होते?
बाकी बाटलीची नशा पण फक्त पिणार्यालाच चढते. न पिताच दारु कोणाला चढुच शकत नाही असे म्हणण्यात काहीच हशील नाही आहे. नाही का?
22 Aug 2010 - 6:38 am | Nile
दिसला? आम्हालापण दाखवा. मी उद्या मला राक्षस दिसला म्हणेन, विश्वास ठेवाल का?
आम्हाला आम्हीच बापु असल्याची अनुभुती होते, व्हाल का अनुयायी? ठेवाल का विश्वास?
21 Aug 2010 - 12:07 pm | मी ऋचा
>>साद देती हिमशिखरे चे लेखक डॉ. प्रधान
साद देती हिमशिखरे चे लेखक डॉ. प.वि. वर्तक आहेत ना?!?....(चु भु द्या घ्या)
21 Aug 2010 - 12:11 pm | सहज
http://mr.upakram.org/node/530#comment-7629
अतर्क्य
प्रेषक प्रकाश घाटपांडे (सोम, 07/09/2007 - 10:27)
साद देती हिमशिखरे हे पॊल ब्रॆंटन चे जी के प्रधान यांनी अनुवादित केलेले आहे. यात असे अतर्क्य अनुभव आहेत.साधना मिडिया सेंटर शनिवार पेठ पोलिस चौकी समोर पुणे फोन नं ०२० २४४५९६३५ येथे व्यवस्थापक श्री माटे याम्चेकडे सर्व यादी आहे.
प्रकाश घाटपांडे
http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b58387&lang=marathi
21 Aug 2010 - 1:08 pm | मी ऋचा
धन्यवाद..
21 Aug 2010 - 9:05 am | आळश्यांचा राजा
हीच माफक अपेक्षा मी व्यक्त केलेली आहे. आपले तेच बरोबर असे (या विषयामध्ये) कुणालाच म्हणता येणार नाही.
असं असेल. म्हणूनच मी या धाग्यावर वेळ घालवतोय. कारण लेखिकेच्या सिन्सिरिटीबद्दल शंका नाही. धुरळा उडवून गंमत बघण्याचा हेतू आहे असं वाटलं असतं तर आम्ही पण झाडावर बसलो असतो.
हेच मलाही वाटतं. पण यानिमित्तानं मला काही वाटलं ते मी लिहिलं आहे.
21 Aug 2010 - 2:28 am | Nile
श्री आळश्यांचा राजा यांचा प्रतिसाद टिपीकल, दोन्ही लोकांना जगुद्या टाईप आहे.
अरे च्यायला दोन्ही मतांचा आदरच करायचा असेल तर काथ्याकुटात काय विड्याचे पान कुटायचे? स्पष्ट शब्दांत प्रतिवाद करत आहे, वैयक्तिक काही नाही.
ह्या फक्त शब्दांच्या कोलांट्या आहेत. मनुष्य २+२= ४ वर विश्वास कसा ठेवतो आणि भाकडकथांवर विश्वास कसा ठेवतो या दोन परस्परविरोधी बाजु आहेत. त्यामुळे कोण काय समजतं वगैरे शब्दांच्या फिरविण्याने काहीही हशील होणार नाही. दोघांनाही सुखी केल्याचे फुकाचे समाधान मात्र मिळु शकेल.
असहमत. तुमच्या मतानुसार एखाद्या (सर्वमान्य)चुकीच्या समजुतीचे पण समर्थन होउ शकेल, म्हणजे जे चुक ते त्याज्य असु नये का?
[उदाहरण म्हणुन २+२=४ घेच गणित घ्या. एक म्हणतो बरोबर एक म्हणतो चुक. मग तुमची वाक्यं
]
वरील स्पष्टीकरण हास्यास्पद वाटले का? मलाही तसेच वाटले.
उरलेला प्रतिसाद, इतकी वर्षे कसे कोणी विरोध केला नाही वगैरे वगैरे आहे. ते सोडा. आज आम्हाला जे चुक आहे वाटले ते चुक आहे आम्ही का म्हणु नये? पुराणातली वांगी आता त्यात काय काय सारुन भरलेली वांगी झाली आहेत त्याचे काय?
21 Aug 2010 - 8:46 am | आळश्यांचा राजा
दोन्ही लोकांनी जगणे यात इतके आक्षेपार्ह काय आहे?
दोन्ही मतांचा आदर हेदेखील एक मतच आहे.
हे जग आणि एकूणच माणसाचे आयुष्य २+२=४ इतके सहज सोपे सरळ असते तर तुम्हाला हा प्रतिवाद करण्याचे कष्ट घेण्याची गरज पडली नसती. हा घागा निघाला नसता. आणि बुद्धापासून अरविंद/ रमण महर्षी "भाकडकथांवर" विश्वास ठेऊन आपले आयुष्य ''वाया'' घालवत फिरत बसले नसते.
मी असे मत व्यक्त केलेले नाही. अध्यात्मावर विश्वास असणे, आणि खरा गुरू आणि भोंदू बाबा यांच्यातला फरक न ओळखता येणे याविषयी मी बोलत आहे. अध्यात्म सरसकट चुकीचे आहे ही सर्वमान्य समजूत आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
मी असाही युक्तीवाद केलेला नाही, की इतकी वर्षे कसा काय कोणी विरोध केला नाही. काही सर्वमान्य वंदनीय लोकांचा दाखला माझा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी दिला, एवढेच. ते लोक चुकीचे होते असं तुम्ही आपलं मत ठरवू शकता. त्याला माझी हरकत नाही. कारण मी जगा आणि जगू द्या टाइपचा टिपिकल संतुलित माणूस आहे. मीच बरोबर आहे, दुसरे चुकीचे आहेत असे आयुष्यातले अंतिम सत्य मला गवसलेले नाही. त्यामुळे मीच जगले पाहिजे असंही मला वाटत नाही.
21 Aug 2010 - 9:09 am | Nile
काथ्याकुटाचा उद्देश काय चुक काय बरोबर याचा उहापोह करणे असतो. त्यामुळे दोघे जगा पण भांडु नका मताला इथे फारसे महत्त्व नाही. ;-)
इथे दोन पैकी एक मत चुक आहे असे असाच वाद आहे. त्यामुळे दोन्ही मतांचा आदर असला तरी इथे(काथ्याकुटात) त्या आदराचे काय काम असा प्रश्न पडतो. :-)
लोक रस्त्यावरच्या भोंदु वैद्यावर पण विश्वास ठेवतात, लोक भविष्य सांगणार्या पोपटावर (अन आक्टोपस इ.वर) पण विश्वास ठेवतात. अंगात येण्याचे नाटक करणार्या बाईवर पण लोक विश्वास ठेवतात. तस्मात जगात लोक कशावर विश्वास ठेवतील काही सांगता येत नाही. त्यामुळे भाकडकथांवर विश्वास ठेवुन आयुष्य घालत लोक बसत असतील तर त्यात मला नवल नाही.
मुद्दा आहे विश्वास असण्याचे कारण दिसत नाही. अनुभुती येते प्रत्यय येतो ला मी वरती लिहलेलेच लागु आहे. तसे प्रत्यत ते वैद्य, पोपट अहो इतकेच काय तर वर्तमान पत्रात येण्यार्या राशीभविष्याचेपण येतात लोकांना.
कोणीका लोक असेनात, ते लोक बरोबर होते असे जो पर्यंत पटत नाही तो पर्यंत त्यांचे म्हणणे "महावाक्यम" आमच्याकरता तरी शक्य नाही.
21 Aug 2010 - 9:35 am | आळश्यांचा राजा
(मताचा) आदर ठेऊन भांडणे, आणि आदर न ठेवता भांडणे असे चॉइस आहेत म्हणायचे. माझा चॉइस पहिला. त्यामुळे तुमच्याही मताचा आदर आहे! असहमत आहे, इतकेच.
ज्याच्या त्याच्या विश्वासाचा प्रश्न आहे. माझ्या आयुष्यावर माझे स्वतःचे संपूर्ण नियंत्रण आहे असा एखाद्याला विश्वास असू शकतो. त्यातही नवल नाही.
तुम्हाला कारण दिसत नाही. दुसर्या कुणाला दिसू शकणार नाही का?
शंभर टक्के सहमत. मी हेच म्हणतो. तुम्हाला जो माणूस भोंदू वाटतो, तो बरोबर आहे, असे एखाद्याला पटले, तर त्याला त्याचे म्हणणे ''महावाक्यम'' वाटणे यात काय चूक आहे?
काथ्याकूट म्हणजे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान असायला हवे असे काही नसावे!
(टीप - कुठल्याही विशिष्ट व्यक्तींचे समर्थन नाही. फक्त विचार.)
(स्मायली नसल्याने माझ्या अतिरिक्त गांभीर्याबद्दल शंका येऊ शकतात. कृपया नसाव्यात!)
21 Aug 2010 - 9:48 am | Nile
इथे कुणाला प्रत्यय आला आहे का? नसल्यास त्याला कसे पटते हा प्रश्न आहे. अश्या लोकांना मी भोंदु म्हणतो आणि त्यांच्या चुकीच्या मताचा आदर करु शकत नाही.
दुसर्या कोणाला दिसत असेल तर ते सांगावे, नुसते अमक्याला प्रत्यय आला वगैरे वाक्येच लिहल्याने कारण दिसत नाही.
हाच तर मुद्दा आहे, बरेच लोक न पटताच ते वाक्य गात सुटतात म्हणुनच आदर नाही आणि विरोध आहे.
21 Aug 2010 - 3:39 pm | आळश्यांचा राजा
कडवी भूमीका आवडली. सिन्सिअरली. नो उपरोध.
विवेकानंद नरेन्द्र असताना असेच "प्रत्यय आलाय का? देव पाहिलाय का? उगाच थापा मारत फिरु नका'' म्हणत असत असं वाचल्याचं आठवतं. (त्यांना तसा प्रत्यय आलेला माणूस भेटला, आणि त्यांनी विवेकाने परीक्षा करून त्याला स्वीकारला हा भाग निराळा.)
एवढे बोलून थांबणार होतो.
पण आपले याच चर्चेतले इतरत्र असलेले प्रतिसाद पाहिले. आणि वाटलं की आपण दुसर्याच्या श्रद्धांची टिंगलही सुरू केलेली आहे. आपण इतके बरोबर आहोत की दुसरे कुठलेही मत चुकीचे असलेच पाहिजे या बौद्धिक अहंकाराचे रहस्य काय असावे बरे?
अमके म्हणजे कोण ते सांगतो. काही उदाहरणे. रामकृष्ण परमहंस. विवेकानंद. अरविन्द. ज्ञानेश्वर. तुकाराम. रामदास. या अमक्यांना आपल्या संस्कृतीमध्ये ''आप्त'' असा शब्द आहे. म्हणजे आपल्या/ समाजाच्या हिताची काळजी वाहणारे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींना आप्तवचन असा शब्द आहे. आप्त कुणाला मानावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. (वर एकांनी म्हटले आहे, ते फक्त त्यांचे वडील आणि शिवाजी महाराजांना मानतात.) सगळ्याच गोष्टी प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध करुनच स्वीकारणार असा बाणा असतो कुणाचा. ठीक आहे. तो बाणा असे लोक नेहमीच पाळतात का हा संशोधनाचा विषय आहे. पण आप्तवचन पाळणारे लोक असतात, म्हणजे, आप्तांनी सांगितलेल्या गोष्टीत काही अर्थ आहे असे मानणारे. ते लोक म्हणजे मूर्ख असे समजणे हा कोणता शहाणपणा आहे? बरे, असेही लोक असतात, जे या आप्तांच्या वचनातील निवडक भाग घेतात. म्हणजे समजा विवेकानंदांनी अंधश्रद्धांवर कडाडून हल्ला चढवलेला आहे, आणि तसेच, गूढ अनुभवांच्या सत्यतेबाबत स्वतःला आलेले ''प्रत्यय'' ही लिहिलेले आहेत. तर मंडळी त्या गूढ अनुभवांना डोळ्यांआड करणार. किंवा अंधश्रद्धाविषयक विचारांना सोयीस्कर बगल देणार. ह्या दोन्ही भूमीका नक्कीच शहाणपणाच्या नाहीत.
कुठले प्रामाण्य योग्य मानावे यावर हजारो वर्षांपासून वाद झडत आलेत. अजून झडत राहतील. मिसळपाववर अंतिम विजेता जाहीर होणार नाहीये. पण चर्चा करताना आपले मत आग्रहाने जरूर मांडा, पण मांडताना विरुद्ध मत मांडणार्याला मूर्ख समजून एवढा कंटेम्प्ट दाखवू नका.
(टिपिकल संतुलित)
21 Aug 2010 - 6:10 pm | आमोद शिंदे
>>विवेकानंद नरेन्द्र असताना असेच "प्रत्यय आलाय का? देव पाहिलाय का? उगाच थापा मारत फिरु नका'' म्हणत असत असं वाचल्याचं आठवतं. (त्यांना तसा प्रत्यय आलेला माणूस भेटला, आणि त्यांनी विवेकाने परीक्षा करून त्याला स्वीकारला हा भाग निराळा.) <<
त्यांना तो प्रत्यय कसा आणून दिला असावा ह्यावर काही शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. त्यातले मुद्दे इथे दिले तर समाज नावाचा गुंता हा धागा फाडून खाईल. त्यामूळे ते जाउ द्या..
मला एक सांगा मुंबईतील लोकलमधे अमूक एक जडी बुटी खाल्ली की काही अवयव इंच भराने वाढतात असल्या जाहिराती लावलेल्या असतात. त्याचा अनेकांना प्रत्यय आल्याचा दाखलाही दिलेला असतो. अशा जाहिरातींनाही तुम्ही अश्याच संतुलित डोक्याने पाहता का?
21 Aug 2010 - 7:01 pm | आळश्यांचा राजा
व्यनि केलात तरी चालेल. उत्सुकता आहे.''शोधनिबंधा''विषयी. कुणी लिहिला आहे बाय द वे? आणि असेच ''शोधनिबंध'' अन्य साधुसंतांविषयी पण निघाले असतीलच. तेही कळवा. म्हणजे मिपा व्यवस्थापनाला कळवू आपण ते कोपर्यात लावलेले दोन बाबांचे फोटो काढून टाका म्हणून.
हो. संतुलित डोक्याने पाहतो! त्रागा करुन घेत नाही!
21 Aug 2010 - 7:30 pm | आमोद शिंदे
त्रागा मीही करुन घेत नाही. पण संतुलित डोक्याने पाहता म्हणजे नक्की काय करता? प्रत्यय घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करता का?
लेनचा धागा बंद पाडण्याचे स्मर्थन करणार्यांना व्य.नि. करण्याची इच्छा नाही. क्षमस्व!
21 Aug 2010 - 8:32 pm | आळश्यांचा राजा
अरेरे मुकलो मी ज्ञानप्राप्तीला. लेनधाग्याच्या बंदीचे समर्थन करुन काय हा अनर्थ ओढावून घेतला मी...
21 Aug 2010 - 8:41 pm | आमोद शिंदे
अर्थातच! झुंडशाहीने चर्चा बंद पाडल्या की सगळेच जण मुकतात.
पण ह्याचे काय?...
त्रागा मीही करुन घेत नाही. पण संतुलित डोक्याने पाहता म्हणजे नक्की काय करता? प्रत्यय घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करता का?
22 Aug 2010 - 12:30 am | आळश्यांचा राजा
"झुंडशाहीने लेनधागा बंद करणार्या/ बंदीचे समर्थन करणार्या" लोकांना व्यनि करण्याची इच्छा नाही, पण प्रतिसादांतून संवाद साधण्याची उदारता आहे हे बघून हेलावून गेलो. (मी झुंडशाहीत सामील होऊन धागा बंद पाडतो ही नवीनच माहिती मिळाली. भारी माणूस दिसतो मी झुंड गोळा करतो म्हणजे!)
तुमच्या त्या जाहिरातीचे मी काय करतो ते सांगतो, पण अगोदर मला तो तुमचा शोधनिबंध कुणाचा आहे ते तरी सांगा. (मुद्दे नंतर बघू.) की झाकली मूठ सव्वा लाखाची? मी त्या जाहिरातीचा प्रत्यय घ्यायचा प्रामाणिक की काय तो प्रयत्न करतो की दुर्लक्ष करतो की अँग्री यंग मॅनसारखा फाडून टाकतो हे समजल्याने इथल्या चर्चेला/ विषयाला काहीच फरक पडत नाही, पण तुमचा तो शोधनिबंध समजला तर रामकृष्ण- विवेकानंद नावाच्या बाबांची भोंदूगिरी बाहेर पडून आमच्यासारखे अज्ञ आत्मे मुक्त तरी होतील.
(बोलणे जरा लागलेले दिसते. माफ करा. नथिंग पर्सनल. :-) )
22 Aug 2010 - 3:48 am | आमोद शिंदे
प्रतिसादातून साधलेला संवाद खाजगी नसतो सार्वजनिक असतो. जरा कुठे वेगळा विचार मांडला की व्यनिच्या पडद्याआड गुपचुप खाजगीत त्यावर चर्वण करावे आणि जाहीररीत्या मात्र गुळमुळीत कुंपणावरचे सांडत राहावे हा मला बोटचेपेपणा वाटतो. मी इथे काही लोकप्रियतेची स्पर्धा जिंकायला येत नाही.
पातळी न सोडता मांडलेले कुठलेही विचार इथेच धाग्यावर मांडायचे अभिव्यक्ति स्वातंत्र्य असावे जे तुमच्या सारख्या समाजाच्या गुंत्याचे दाखले देऊन चर्चा बंद पांडणार्यांमूळे इथे नाही. त्यामुळे तुमच्याशी व्यनितून चर्चा होऊ शकत नाही. क्षमस्व. काय असेल ते इथेच!
पर्सनल घेण्याचा प्रश्नच नाही. तुमचे नावही मला माहित नाही. हा मुद्दा काढून तुम्हीच पर्सनल घेत आहात असे तर सुचित करत नाही आहात ना?
22 Aug 2010 - 1:30 pm | आळश्यांचा राजा
कबूल. आमचा (आपल्या मते असलेला) बोटचेपेपणा कबूल. पण आपला परखडपणा पण आपण (जाहीररीत्या) मांडत नाहीच आहात. म्हणजे तो मांडण्यासारखा नाही हे समजलेले दिसते.
पातळीची आपली व्याख्या आपल्याच इथे खाली दिलेल्या (आता उडालेल्या) टवाळ प्रतिसादाने पुरेशी स्पष्ट झालेली आहे. शिवाय मी काही इथला सर्वसत्ताधारी नाही की आला विरोधी विचार की उडव. (मला इथे कुणी ओळखतच नाही मुळात.) तेंव्हा मला/ माझ्या "झुंडशाहीला" घाबरून शोधनिबंधाचा हवाला द्यायचा, पण डिटेल्स द्यायचे नाहीत असा बोटचेपेपणा करायची आपल्याला गरज नसावी.
आग्रह नाही. मर्जी आपली. शोधनिबंध पहायची सिन्सिअर इच्छा होती. व्यनि ही नाही, इथेही नाही. कसे होणार आमचे!
थँक्स! मीही पर्सनल घेत नाही. :-)
22 Aug 2010 - 9:03 pm | आमोद शिंदे
पण आपला परखडपणा पण आपण (जाहीररीत्या) मांडत नाहीच आहात. म्हणजे तो मांडण्यासारखा नाही हे समजलेले दिसते.
तो "इथे" मांडण्या सारखा नाही, ज्याला कारण तुमच्या सारखे चर्चा बंद करायला लावणारे आहेत. इथला "इथे" हा शब्द तुम्ही चलाखीने गाळलेला आहे. माझ्याकडे शोध निबंधाचे पान नंबर सहीत सायटेशन्स आहेत. काही भाग आंतराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पुस्तकातील आहे. पण तो इथे देऊन नव्याने वाद मला सुरु करायचा नाही. कारण तुमच्यासारखे लोक झुंडशाहीने अशा चर्चा बंद पाडतात त्यामूळे माझा वेळ मला वाया घालवायचा नाही.
दुसरा मुद्दा म्हणजे पातळी सोडलेल्या वाक्याचा. माझ्या त्या वाक्यात काहीही पातळी सोडून नव्हते. कसलाही अपशब्द, अश्लिल भाषा, वैयक्तिक शिवीगाळ असले काहीही नव्हते. पण त्यावर तुम्ही जो चारित्र्य हनन वगैरे कांगावा केलात त्यामूळेच तो प्रतिसाद उडवला गेला. बापू आणि अप्सरा हे कुणी इथले सभासद नाहीत, त्यामुळे वैयक्तिक घेण्याचा प्रश्नच नव्हता.
22 Aug 2010 - 10:00 pm | आळश्यांचा राजा
आमच्या “कांगाव्या”ला “इथे” इतके महत्त्व आहे हे समजून अंगावर मणभर मांस चढले! बिचारे संपादक आणि त्यांचा रिमोट कंट्रोल मी! तुम्हाला वाटले ते तुम्ही लिहिले, आम्हाला वाटले ते आम्ही लिहिले. इथे अधिकार असणाऱ्यांनी त्यांचा निर्णय घेतला. त्याचं श्रेय/ अपश्रेय मला दिलंत. क्या बात है!
बाय द वे, तो शोधनिबंध सापडला मला. त्यामुळे तुमच्यावरचा (असं काही माहीत नसल्याचा)आरोप मागे. माझे “इथे” असलेले “वजन”, “महत्त्व” आणि त्याचा तुमच्यासारख्या विचारवंतांना होणारा त्रास लक्षात घेता आपण त्यावर “इथे” काही चर्चा आणलीत तर आमच्याकडून हाताची घडी तोंडावर बोट! प्रॉमीस!
आपल्या दोघांच्या या संवादात या चर्चेत काहीच भर पडत नाही. त्यामुळे आमच्याकडून पूर्णविराम!
:-)
23 Aug 2010 - 8:13 pm | आमोद शिंदे
माफ करा पण तुम्ही रिमोट कंट्रोल आहात किंवा तुमच्या इथल्या सत्ताधार्यांवर अंकुश आहे असे मला सुचवायचे नव्हते. तुमच्या सारखे लोक विनाकारण बाऊ करतात आणि मग बिसलेरीच्या पाणीपुर्या खाव्या लागतात इतकेच सुचवायचे होते. तुमची प्रतिक्रिया येईपर्यंत संपादक मंडळाला त्यात काहीही वावगे वाटले नव्हते. तुमचा प्रतिसाद आल्या नंतर कशाला उगीच कटकट म्हणून त्यांनी माझा प्रतिसाद उडवला असावा.
शोधनिबंध सापडल्या बद्दल अभिनंदन. मला त्यावर इथे चर्चा करायची नाही. तुम्ही तोंडावर बोट ठेवणार असलात तरी बाकीच्यांचे काय? विचारांची मुस्कटदाबी कोणा एकट्याने थांबल्याने बंद होणार आहे का? समाजाची गुंतवळ काढणारे बाकीचे आहेतच की.
चला माझ्याकडूनही पूर्णविराम.
22 Aug 2010 - 7:03 am | Nile
तुम्ही दिलेले आप्तांची उदाहरणे शतके ते काही शतके पुर्वीची आहेत. पृथ्वी सपाट आहे ह्या विचाराच्या आधीच्या ज्ञानाला सरळसोटपण स्विकारणे मला शक्य नाही.
जर आप्तांची श्रद्धा/विचारसरणी इ. खरे आहे तर आज ते कुणी सिद्ध का करु शकत नाही? विवेकानंदांनंतर अजुन कोण म्हणतो मी देव पाहिला? परमहंसानंतर कोण आहे जो मला देव दाखवेल?
त्या दोघांना दिसला की नाही माहित नाही, त्यांबद्दल फारसे वाचलेले नाही तेव्हा मतप्रदर्शन करत नाही. (विवेकानंदांना परमहंसांनी, 'देवाच्या आराधनेपेक्षा दिनदुबळ्यांची सेवा कर' या अर्थाचा काहीतरी सल्ला दिला होता असे कुठल्यातरी मिशनच्या पुस्तकात वाचल्याचे आठवते, पण संदर्भाविना दावा करत नाही)
राहता राहिला विषय टिंगलीचा, एक उदाहरण म्हणुन, मागे कुणीतरी न्युटनच्या तिसर्या नियमाने पुर्नजन्म सिद्ध करता येतो असे म्हणले होते. हा विचार हास्यास्पद आहे याचा आदर करणे मला तरी शक्य नाही. तसेच इथे जे काही दावे हास्यास्पद आहे त्यांचा आदर करणे म्हणजे स्वत:च्या मतांची चेष्टा करणे.
बाकी इतरांच्या मतांचा आदर वगैरे म्हणताता मी रामयणातल्या लिहलेल्या दोन ओळी, ज्यात वास्तवच लिहले होते, त्या संपादित करण्याची (म्हणजेत माझ्या मताचा अनादर) मागणी इथे अनेकांनी केलली पाहिलीच असेल. चुकीच्या मतांचा आदर करतो असे खोटे खोटे म्हणण्यापेक्षा ती मते हास्यास्पद आहे असे म्हणणे केव्हाही उचित.
उदाहरणच घ्यायचे तर, लेन धाग्यामधील विचारांना तुम्ही विरोध केला होताच पण तो धागाही संपादित करायची विनंती केलीत. जर तुम्हाला सर्व मतांचा आदर आहे तर संपादित व्हावे अशी इच्छा का?
जाता जाता: "संसारी पुरुष(असुनही) जो देव-धर्मात वेळ घालवतो(जास्त महत्त्व देतो?) तो एक मुर्ख" असेच काहीसे एक लक्षण रामदासांनी दासबोधात दिले आहे असे आठवते, दासबोध हातात नसल्याने नेमकी ओळ आठवत नाही.
22 Aug 2010 - 3:46 pm | आळश्यांचा राजा
पृथ्वी सपाट नाही, आणि सूर्याभोवती फिरते हे पाचव्या शतकात आर्यभट्टांनी, आणि नंतर वराहमिहीर व (बाराव्या शतकात) भास्कराचार्यांनी स्पष्ट केलेले होते. मी उल्लेखिलेल्या आध्यात्मिक आप्तांना याची कल्पना असावी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, स्थितप्रज्ञ प्रपंचात नसूनही असल्यासारखा भासतो, ज्याप्रमाणे सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसूनही फिरल्यासारखा भासतो. (ओवी संदर्भ शोधून अवश्य देईन.) आजही आप्तांची श्रद्धा/ विचारसरणी खरे आहे हे सिद्ध करणारी माणसे नाहीत असे म्हणणे रॅशनल नाही. अॅबसेन्स ऑफ एव्हिडन्स इज नॉट एव्हिडन्स ऑफ अॅबसेन्स. परीक्षा न करता केवळ आपल्याला समजत नाही म्हणून एका महान संस्कृतीचा आधार असलेला आध्यात्मिक विचार, त्यावर आधारीत असलेली भारतीय दर्शने किरकोळीत मोडीत काढणे याला काय म्हणावे तुम्हीच सांगा. माझ्याकडून एखादा कठोर शब्द निघायचा.
आप्तांना दिसलेली दर्शने मला दिसेपर्यंत मी ती खरी मानणार नाही अशी भूमीका मांडलीत तर मान्य आहे. (आपण तशी मांडलेली नाही हा भाग वेगळा.) पण मी खरी मानणार नाहीच, उलट खोटीच मानणार, यात काही वैज्ञानिक विचार आहे असे मला तरी वाटत नाही. भारतीय दर्शनांचा मूळ आधारच मुळी “दर्शन” आहे. ही दर्शने जगायची असतात, नुसती वाचायची/ चर्चा करायची नसतात. हजारो वर्षांपासून दर्शने पाहिलेल्यांनी (अर्थात द्रष्ट्यांनी) आपले अनुभव/ दर्शने नोंदवून ठेवलेली आहेत. त्यांच्या अनुभवांमध्ये काही विसंगती असत्या तर ते सगळे खोटे बोलतात हे स्पष्ट झाले असते. पण सुसंगती असेल, तर खोटे बोलत नाहीत असे म्हणावे लागते. दर्शनांच्या अभ्यासकांनी वेळोवेळी हे नोंदवून ठेवलेले आहे. भास कशाला म्हणावे, आणि दर्शन कशाला म्हणावे यावर पूर्वमीमांसा-वेदान्तापासून बौद्ध-जैन अशा नास्तीक दर्शनांपर्यंत अनेकानेक तत्त्वज्ञानाच्या शाखांमध्ये चर्चा झालेली आहे. केवळ पृथ्वी सपाट नाही हे समजल्याच्या आधीचा हा विचार होता, त्यावेळी विमाने नव्हती, वीज नव्हती, कंप्युटर नव्हते म्हणून हा (दर्शनांचा) विचार त्याज्य मुळीच ठरत नाही. भौतिक प्रगती आपल्या गतीने होत असते, आध्यात्मिक प्रगती आपल्या गतीने.
अजून म्हणजे, ही दर्शने सांगणारी माणसे एरवी कसले आयुष्य जगत होती हेही पाहणे महत्त्वाचे ठरते. त्यांचे चारित्र्य निष्कलंक असेल, लोककल्याणासाठी झटणारी माणसे असतील, व्यवहारातले त्यांचे वागणे तर्कसंगत असेल, वेडेपणाचे नसेल, तर आणि तरच, अशा लोकांना आप्ताचा दर्जा प्राप्त होतो.
वाचलेले बरोबर आहे. हेच तर खरे अस्सल अध्यात्म आहे.
हा तुमचा विचार झाला. हास्यास्पद मतांचा आदर नका करु, पण ती हास्यास्पद आहेत, तर्कविसंगत आहेत, हे सांगण्याची तुमची पद्धत काही लोकांना आक्षेपार्ह वाटल्यास त्या आक्षेपाचा आदर व्हायला हवा. आक्षेपार्ह वाटणार नाही अशा पद्धतीने काही सांगता येत असेल, तर त्यात स्वत:च्या मतांची चेष्टा होत नाही.
लेनधाग्याला विरोध/ संपादित करण्याची विनंती इत्यादीवर इथे विवेचन केले तर विषयांतर होईल. माझे तिथले प्रतिसाद पुन्हा वाचायची तसदी घेतलीत तर गैरसमज दूर होईल. नाही घेतलीत तसदी, आणि गैरसमज ठेवणारच असाल तर आमच्याकडून नो प्रॉब्लेम! कुणाच्या मते मी प्रतिगामी/ अंधश्रद्ध/ मूर्ख/ झुंडशाहीवर विश्वास ठेवणारा असेन, सर्व संदर्भ उपलब्ध असतानादेखील, तर त्याला माझा नाइलाज आहे.
दासबोधातील मूर्खलक्षणांचा संदर्भ बरोबर आहे. त्यांनी व्यावहारीक सत्ये सांगितलेली आहेतच, सोबत ईश्वरभक्ती, विश्वाची उत्पत्ती इ. आपल्याला (म्हणजे तुम्हाला) न पटणाऱ्या गोष्टींबद्दलही लिहिले आहे. ते नाकारणार असाल, तर त्यांनी सांगितलेली मूर्खलक्षणे पण नाकारायला हवीत. “सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ मूर्ख” मते मांडणाऱ्या माणसाचे काही मोजकेच विचार स्वीकारायचे, बाकीचे टाळायचे हे काही बरोबर नाही. शिवाय, पुस्तक न वाचताच त्यातली उणीदुणी काढणाऱ्यालाही त्यांनी मूर्ख म्हटले आहे, परीक्षा न करता एखाद्या गोष्टीला खोटे ठरवणे हा यातलाच प्रकार ठरतो.
*******
तुमची कडवी रॅशनल भूमीका आवडते हे बोललेलो आहेच. पण ही भूमीका अपुरी आहे. भोंदूगिरीवर आघात करण्यासाठी अध्यात्म नाकारणे गरजेचे तर नाहीच, उलट अध्यात्म नाकारणे हे या भूमीकेसाठी सहायकपण नाही.
22 Aug 2010 - 9:23 pm | ज्ञानेश...
मंत्रमुग्ध झालो.
सखाराम गटण्याच्या तन्मयतेने पुढील वाक्ये लिहून घेतो आहे-
"अॅबसेन्स ऑफ एव्हिडन्स इज नॉट एव्हिडन्स ऑफ अॅबसेन्स."
"भौतिक प्रगती आपल्या गतीने होत असते, आध्यात्मिक प्रगती आपल्या गतीने."
"भोंदूगिरीवर आघात करण्यासाठी अध्यात्म नाकारणे गरजेचे तर नाहीच, उलट अध्यात्म नाकारणे हे या भूमीकेसाठी सहायकपण नाही."
मी आळशांच्या राजाचा पहिला अनुयायी बरंका अदितीतै. ;)
23 Aug 2010 - 2:10 am | Nile
सपाट पृथ्वीचे एक फक्त उदाहरण म्हणुन दिले होते, सांगायचा मुद्दा निसर्गातील पुष्कळ ज्ञान, जे आज उपलब्ध आहे ते तेव्हा नव्हते, त्यामुळे त्यांची मते आजच्या ज्ञानाच्या कसोटीवर तपासुन पहायला हवीत असा आहे.
पुराणांचे आणि ओव्यांचे बरेच अर्थ काढले जातात, ते कीती खरे कीती खोटे हा वादाचा प्रश्न आहे. (उदा. Nostradamus) पुराणात विमानाचे उल्लेख आढळतात, म्हणजे तुमचा पुर्वीच्या लोकांना विमान तंत्रज्ञान अवगत होते असा निष्कर्ष आहे का? (कदाचित तुम्ही म्हणता तसे पृथ्वी सपाट आहे की नाही यावर खरेच काहीतरी असु शकेल पण मुद्दा तो नाही हे ध्यानात घ्या) अनेक लोकांची आपल्या पुर्वजांना विमानाने उडता येत होते अशी दृढ श्रद्धा आहे.
नसेल, पण तो तपासुन पाहिल्याशिवाय मी ग्राह्य धरत नाही. तुमच्या आणी माझ्या विचारात इथे फरक आहे. तपासल्याशिवाय मी मानु शकत नाही, तुम्ही आपली संस्कृती महान असे समजुन जे काही संस्कृतीत आहे ते चुक असु शकते हे मान्य करायला तयार नाहीत.
बरोबर, पण जो पर्यंत एव्हिडन्स नाही तोपर्यंत एव्हिडन्स आहे पण मिळत नाही असे कसे समजायचे?
खरे आध्यात्म हे असेल तर इतर आध्यात्माच्या नावाने जे चालते त्याचे काय? आध्यात्माच्या नावाखाली बुवाबाजी चालते हे तुम्हाला मान्य आहे का? गोरगरीबांची सेवा करावी, दिनदुबळ्यांना मदत करावी, ह्या उपदेशाचे पालन करायला महान संस्कृतीत शतकांपुर्वीच सांगितलेले हवे असे नाही, त्या करता तुम्हा आम्हाला परमहंसच हवे असे नाही. असे अध्यात्म अंगिकारायला महान संस्कृतीच्या परंपरेची गरज नाही.
खरे अध्यात्म काय आहे, मला फारसे माहित नाही, तुम्ही सांगितलेत (मोठा विषय आहे याची कल्पना आहे) तर आवडेल, मग त्यावर चर्चा करता येईल (जमल्यास) .
पुन्हा तेच म्हणतो, रामदासांच्या मुर्खलक्षणांमधील काही आजच्या काळात सुट होत नाहीत असे मला वाचताना जाणवले होते (आता समोर नसल्याने सांगु शकत नाही) म्हणुन जेवढी मला पटली तेव्हढीच मान्य आहेत. याउलट तुम्ही सरसकट सगळी मान्य केली आहेत(अधोरेखीताचा अर्थ), हाच आपल्या विचारांतील फरक आहे!
असे मी कोठेही म्हणलेले नाही, जी आज माझ्या बुद्धीला पटत नाहीत ती मानणार नाही अशी भुमिका आहे, (असे नसते तर दासबोध, विवेकानंदांचे उदाहरण दिले नसते (फारसे वाचन नसले तरी किरकोळ वाचुन जाणुन घेण्याचा प्रयत्न केला आहे, अजुन वाचेन, पण अनुभवामुळे प्रॉयॉरीटी नाही)). उलट मी माझ्या प्रतिसादांत आधार दाखवा असेच विचारले आहे.
खुशाल! इतका संवेदनशील मी नाही. प्रत्येक जण आपल्या बोलण्या-लिहण्यातुन आपली समज दाखवत असतो, (तसेच मीही दाखवतो माझी अनेकांपेक्षा कमी आहे हे ही मान्य करतो) त्यामुळे कुणाचे मत वगैरे संपादित व्हावे असे मला कधीच वाटत नाही. तुम्हाला काय वाटेल ते लिहा. फक्त मग आम्ही त्यावर हसलो तर तुमच्या संवेदनशीलतेची काळजी घ्या म्हणजे झाले.
पुन्हा, हे कसे यावर उजेड पाडलात तर वाचायला आवडेल.
23 Aug 2010 - 7:39 pm | आळश्यांचा राजा
सपाट पृथ्वी हे उदाहरणच होते हे समजले. आजच्या ज्ञानाच्या कसोटीवर भारतीय दर्शने तपासून पहायला हवीत असे म्हणण्यात आजचे ज्ञान हे परीपूर्ण आहे असे तुम्ही म्हणत नसाल हे गृहीत धरतो. तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा घेतो, की आजचे ज्ञान हे पूर्वीच्या ज्ञानापेक्षा प्रगत आहे. ठीक आहे. कोणत्या बाबतीत प्रगत आहे? भौतिक बाबतीत अवश्य प्रगत आहे. भौतिक ज्ञानानिरपेक्ष काही विचार असू शकतात असे तुम्हाला वाटते का? उदा. “प्रेम”, “करुणा”, “दया”, “शांती”. भौतिक ज्ञानात प्रगती झाली म्हणून या विचारांमध्ये प्रगती व्हायला हवीच, असे काही समीकरण आहे काय? या प्रकारचे विचार विकसित होणे हीपण प्रगतीच आहे हे मान्य आहे का? ज्ञानाच्या अनेकानेक शाखा आहेत, ज्यांच्या प्रगतीसाठी भौतिक प्रगतीचे अधिष्ठान असणे अत्यावश्यक नाही. संगीत, नृत्य, शिल्प, चित्र, राजकीय विचार, तत्त्वज्ञान, इत्यादि. भौतिक प्रगतीसोबत या शाखांमध्ये सुधारणा/ बदल होत जातात हे मान्य आहे, पण या शाखांमध्ये जुने ते चुकीचे ठरत नाही.
Nostradamus चा संदर्भ कशासाठी होता समजले नाही. तो ना आप्त आहे, ना त्याने पुराणे/ ओव्या लिहिल्या आहेत. बाकी आपल्या पूर्वजांना विमाने उडवता येत होती अशी माझी दृढ वगैरे कसलीच श्रद्धा नाही; तसेच, आपले पूर्वज अडाणी होते, आणि गोऱ्या साहेबाची बुके वाचूनच आपण माणसांत आलो अशीही माझी श्रद्धा नाही. जिथे संदर्भ आणि पुरावे मिळतात तिथे असे असे ज्ञान पूर्वी उपलब्ध होते असे म्हणायला हरकत नसावी. ए एल बॅशमचे “दि वंडर दॅट वॉज इंडिया” हे याची प्राथमिक कल्पना येण्यासाठी उत्तम पुस्तक आहे. अवश्य पहावे. इतिहास संशोधनाचा आधार घेऊन लिहिलेले सुरेख पुस्तक आहे.
माझे असे विचार आहेत हा निष्कर्ष काढत असाल तर मी सांगण्यात पुरेसा स्पष्ट नाही, किंवा तुम्ही वाचण्यात काही सोडले आहे. आपली संस्कृती महान आहे हे मी अवश्य म्हटलेले आहे. अजूनही म्हणतो. जे काही संस्कृतीत आहे ते चूक असू शकत नाही असे मात्र मी म्हटलेले नाही, म्हणणारही नाही. महान म्हणजे परफेक्ट, परीपूर्ण नव्हे. “परीक्षा न करता केवळ आपल्याला समजत नाही म्हणून एका महान संस्कृतीचा आधार असलेला आध्यात्मिक विचार, त्यावर आधारीत असलेली भारतीय दर्शने किरकोळीत मोडीत काढणे याला काय म्हणावे तुम्हीच सांगा.” हे मी म्हटलेले आहे. परीक्षा करा, असेच मी म्हटले आहे. तपासल्याशिवाय ग्राह्य धरणार नाही, ठीक. तपासल्याशिवाय अग्राह्यपण धरू नका. तपासायची तयारी नसेल, वेळ नसेल, प्रायॉरिटी नसेल, तर विषय बाजूला ठेवा. चुकीचाच आहे, म्हणून त्यावर तुटून पडू नका. हे माझे म्हणणे आहे.
क्वांटम मेकॅनिक्स नाही कळत आम्हाला. मग काय ते चूक ठरते काय? प्रयोगांती काही निष्कर्ष नेहेमीच सत्य आढळतात, अशी ग्वाही समाजमान्यता असलेले काही शास्त्रज्ञ देतात, म्हणून एखादे शास्त्र आपण तपासल्याशिवायच ग्राह्य मानतो की नाही? की तिथे पण हाच बाणा असतो, कुणीही म्हटले तरी मी स्वत: जोपर्यंत तपासत नाही, तोपर्यंत ग्राह्य धरणार नाही, हं?
इथे एक फरक भौतिक आणि अध्यात्मशास्त्रात अवश्य आहे – ऑबजेक्टिव्हिटी आणि सबजेक्टिव्हिटी. पण अध्यात्मशास्त्राचे स्वरुपच असे आहे, की तिथे ऑबजेक्टिव्हिटी एका मर्यादेपलीकडे नाही राहू शकत. अंतर्मनाची रहस्ये ज्याची त्यालाच समजून घ्यावी लागतात. प्रत्येकाला स्वत:च्या मनाचा आश्रय घेऊन अशा आध्यात्मिक सत्यांना पडताळून पहावे लागते. आप्तांनी पडताळून पाहिलेली आहेत. त्यांची शतकानुशतके चालत आलेली पडताळणी सुसंगत आहे; आणि ही सुसंगती, तसेच आप्तांचे चारित्र्य हा अध्यात्मावरच्या माझ्या, तसेच अनेकांच्या श्रद्धेचा आधार आहे. या आप्तांना मी शास्त्रज्ञांचाच दर्जा देतो. कारण ते प्रयोगांती अनुभवसिद्ध निष्कर्षांना पोचलेले आहेत.
दर्शनांची तोंडओळख तर करून घ्या. नाही पटली तर द्या सोडून. ती चूक आहेत असा निष्कर्ष काढण्यासाठी पुरेसा अभ्यास केला पाहिजे.
हं. हे अमुक अमुक अस्तित्त्वात नाही, असा निश्चित पुरावा असेल तरच त्याला एव्हिडन्स ऑफ ऍबसेन्स म्हणायचे. उदा. परग्रहावर जीवसृष्टी आहे की नाही? असल्याचा पुरावा नाही. नसल्याचा तरी पुरावा आहे का? म्हणून ते वाक्य. (ऋणनिर्देश – आदरणीय कार्ल सगान.)
मी अध्यात्म कशाला म्हणतो – चमत्कारांना नाही. कुठलाच आप्त चमत्कार करुन दाखवत नाही. आप्त तर्कसुसंगत बोलतात. दया, करुणा, क्षमा, शांती यांची अनुभवसिद्ध शिकवण देतात. पैसा घेऊन भविष्य सांगणाऱ्यांचा ते कडक निषेध करतात. याहीपुढे, दया, क्षमा, करुणा, शांती हेही साध्य नसते. साधन असते. मोक्षाप्रत जाण्यासाठी. मोक्ष म्हणजे मनाचा विकास, उत्क्रांती. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, याला अंत नाही असे माझे मत आहे. हे एक अनुभवसिद्ध शास्त्र आहे, आणि मनाचा विकास करण्याच्या काही पद्धती हजारो वर्षांच्या परंपरेतून विकसित आणि सिद्ध झालेल्या आहेत असे मी मानतो. ईश्वरभक्ती ही अशा काही पद्धतींपैकी केवळ एक पद्धत आहे. ईश्वर न मानतादेखील अध्यात्म अवश्य करता येते, उदा. बुद्धाची शिकवण. मनाचा असा विकास होत असताना काही गूढ अनुभूती येतात असे आप्तांनी म्हटले आणि लिहून ठेवले आहे. ते मी “आप्तवचन” म्हणून पाहतो, आणि तशा अनुभूती मला अजून आलेल्या नाहीत म्हणून (काहीच प्रयत्न न करता) नाकारत नाही. स्वत:ला अनुभव येईपर्यंत सस्पेंडेड ठेवतो. (नाकारणे आणि स्वीकारणे यापेक्षा वेगळा पर्याय असू शकतो.) आत्मनो मोक्षार्थं जगद-हिताय च हे ब्रीद असलेले अध्यात्म मी मानतो. माझ्या मते अध्यात्म म्हणजे सत्याचा शोध. मनाचा विकास. सत्याचा शोध बुद्धीनेही घेता येतो. उदा. रिचर्ड डॉकिन्स यांनी क्रांतीकारक विचार मांडून जगाचे आणि अस्तित्वाचे कोडे उलगडायला ईश्वराची किंवा मेटॅफिजिक्सची गरज नाही हे स्पष्ट केलेले आहे. मला हे विचार छान वाटतात. बरोबरही वाटतात. पण अशा प्रकारचा अभ्यास सत्यशोधनासाठी अपुरा आहे, त्यासाठी स्वत:च्या मनाचा अभ्यास हा तितकाच आवश्यक आहे, आणि त्यासाठी अध्यात्माधारित जीवनशैलीची गरज आहे असे माझे नम्र मत आहे. अध्यात्म म्हणजे काहीतरी चमत्कार, मायथॉलॉजी, कर्मकांडे, देवपूजा वगैरे असे समजून त्याच्या नादाला न लागता, परंतु जीवनात अध्यात्मातीलच कल्याणकारी तत्त्वे अंगीकारणारी अनेक सूज्ञ माणसे मी पाहिली आहेत, पाहतो आहे. माझे स्वत:चे वडील त्यातलेच आहेत. माझ्या देवभक्तीला ते हसतात, कधी काळजी पण करतात. तर माझ्या मते ते आध्यात्मिकच आहेत. त्याला ते तसे म्हणत नाहीत एवढेच; आणि आध्यात्मिक अभ्यासाची दारे त्यांनी (दुर्दैवाने) स्वत:साठी बंद करुन घेतलेली आहेत. याचा मला खेद वाटतो.
या उपदेशाचे पालन करायला परमहंस किंवा महान संस्कृतीची परंपरा यांची गरज नाही असे म्हणता. ठीक आहे. तुम्हाला चाकाचा पुन्हा एकदा शोध लावायचा असेल तर लावत बसा. ऑलरेडी जे विकसित झालेले आहे ते नाकारायचे (अभ्यास न करताच), आणि पुन्हा तेच शोधायला सुरुवात करायची असेल तर अवश्य करा.
अध्यात्माच्या नावाखाली बुवाबाजी चालते, हे मान्य आहे का आणि त्याचे काय असा प्रश्न विचारलात. माझे इथलेच प्रतिसाद वाचले असतील तर हा प्रश्न यायला नको होता. अशी बुवाबाजी चालते त्याला अध्यात्म कसे काय जबाबदार बॉ? नोकियाचे नकली मोबाइल बाजारात येतात म्हणून नोकिया कंपनीने आपले प्रॉडक्शन बंद करावे की काय? बुवाबाजी चुकीची म्हणून अध्यात्म चुकीचे कसे काय? ईश्वरावर श्रद्धा ठेवणे चुकीचे कसे काय?
नेमकी कोणती मूर्खलक्षणे आजच्या काळात सुट होत नाहीत असे तुम्हाला जाणवले होते याचे एखादे जरी उदाहरण दिले तरी मला आपल्या कालसंगत वैज्ञानिक विचारसरणीची खात्री पटेल. दासबोध शोधून वेळ मिळेल तेंव्हा सांगा. घाई नाही. मी सरसकट सगळी मूर्खलक्षणे मान्य केलेली आहेत. हा आपल्या विचारांतला फरक आहे, हे मान्य आहे.
याशिवाय़, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता, की, तुम्हाला साफ चुकीच्या, अडाणी, मूर्ख वाटणाऱ्या कल्पना मांडणारा माणूस काही काही गोष्टी मात्र फारच छान सांगतो, पटण्यासारख्या सांगतो. एरवी तो भोंदू असतो, वेडा असतो, असं तुमच्या म्हणण्यातून दिसतं.
गुड. अजून वाचेन म्हणता, आनंद आहे. अवश्य वाचा. माझे शब्द मागे घेतो.
:-)
पुरेसा उजेड पडला असावा. अजून थोडा पाडतो. भोंदूगिरीवर आघात करण्यासाठी ते भोंदू चूक कसे ते दाखवावे लागते. अध्यात्मच चूक म्हटले की अध्यात्म सांगणारे सगळेच चूक ठरतात. मग आप्त चुकीचे ठरतात. मग आप्तांत आणि भोंदूंमध्ये काय फरक उरतो? म्हणून, असा फरक स्पष्ट करण्यासाठी, अध्यात्म काय ते स्पष्ट झाले पाहिजे. मग त्याचा योग्य वापर कसा, आणि अयोग्य कसा यावर प्रकाश टाकता येतो.
याशिवाय, टिंगल टवाळी करुन बाबालोकांवर श्रद्धा असणारे लोक दुखावून तुमचे काहीच ऐकायच्या स्थितीत रहात नाहीत. मग तुमचा भोंदूगिरीवर आघात कसा काय यशस्वी होणार? मग तुम्ही पुन्हा लोकांनाच दोष देणार – आम्ही योग्य ते सांगतो, ते यांना कळत नाही, आणि वगैरे वगैरे.
संयम ठेऊन सगळे वाचले असेल असे गृहीत धरतो, आणि वाचल्याबद्दल (सर्वांचेच) आभार मानतो!
(देवभोळा)
23 Aug 2010 - 8:43 pm | आमोद शिंदे
>>क्वांटम मेकॅनिक्स नाही कळत आम्हाला. मग काय ते चूक ठरते काय?
अजिबात नाही. क्वांटम मेकॅनिक्स मधे "आम्हीच म्हणतो तो अंतिम शब्द." "अमुक एक बाबाने सांगितले आहे ते परम सत्य,त्यावर कुणीच खल करायचा नाही" असल्या विधानांना थारा नाही.
क्वांटम मेक्यानिक्स हे बरोबर की चूक हा प्रश्नच इनवॅलीड आहे. ते जर बरोबर आहे हे निश्चित झाले असते तर त्यावरच्या रिसर्चला पूर्णविराम दिला नसता का?
तुम्ही अध्यात्मात बुवाबाजी आहे हे मान्य करता. बाकीचे अध्यात्म सोडून तुर्तास ह्या नुसत्या बुवाबाजीवर लक्ष केंद्रित करुया कारण ही चर्चा एका भोंदू बापू विषयी आहे.
जे (सो कॉल्ड) चांगले अध्यात्म आहे ते कृपया इथे आणू नका त्याने नविन फाटे फुटतील. तुम्हाला हा बापू भोंदू वाटतो का त्यावर मत मांडा. {ज्यावर तुमचे म्हणणे असे आहे की तुमचा त्याविषयी अभ्यास नाही आणि वरवर जितके दिसत आहे (महावाक्यम वगैरे) त्यावरुन तुम्हाला मत बनवायचे नाही.}
23 Aug 2010 - 10:17 pm | आळश्यांचा राजा
साहेब, साहेब!
एवढी घाई कशाला करता प्रतिसाद द्यायची! सावकाश वाचा. "क्वांटम मेकॅनिक्स नाही कळत आम्हाला. मग काय ते चूक ठरते काय?" याच्या मागे, पुढे बरंच लिहिलं आहे.
असो. आपण बरोबर. आम्ही चूक. कुंपणावरचे आळशी लोक. मूर्ख. अंधश्रद्ध. बोटचेपे. अभ्यास नसलेले आणि मत न बनवणारे.
आम्हाला आत्मसाक्षात्कार घडवल्याबद्दल ऋणी आहे. आणि आपल्याशी इथे संवाद साधण्याचा योग घालून दिल्याबद्दल (आम्ही मानीत असलेल्या) परमेश्वराच्या चरणी नतमस्तक आहे!
(उपकृत)
23 Aug 2010 - 2:58 am | अर्धवटराव
मला हे इतकं व्यवस्थीत मांडता आले नसते.
(खुश) अर्धवटराव
23 Aug 2010 - 10:22 pm | आळश्यांचा राजा
अर्धवटरावांच्या मनातलं कोण बोललंय ते समजत नाहीय. ज्याचा प्रतिसाद त्यांच्या वर येईल तो त्यांच्या मनातलं बोलतोय. काहीतरी गडबड आहे.
एक सजेशन - प्रतिसादांना नंबर द्यावेत, आणि प्रतिसादावर असं यावं - हा प्रतिसाद अमुक अमुक नंबरच्या प्रतिसादाला/ मूळ लेखाला.
21 Aug 2010 - 4:26 am | आमोद शिंदे
>> गजानन महाराज, अनिरुद्ध बापू, साईबाबा यांच्याविषयी मला विशेष माहिती नाही. त्यांचे काही साहित्य (असल्यास) वाचलेले नाही. त्यांनी काही ध्यान पद्धती शिकवली असल्यास माहीत नाही. त्यांनी कुणाला लुबाडले आहे की कसे, हे माहीत नाही. त्यांच्या शिष्यांपैकी कुणी (सार्वजनीक आयुष्यात) आउटस्टॅंडींग पर्सनॅलिटी आहे की नाही तेही माहीत नाही. त्यामुळे ते भोंदू की सद्गुरू याविषयी मला काहीच बोलता येणार नाही. >>
मग कशाला बोलताय?
21 Aug 2010 - 8:49 am | आळश्यांचा राजा
कशासाठी बोलतोय ते प्रतिसादात पुरेसे स्पष्ट केलेले आहे. तुम्हालाच काय म्हणायचे आहे ते नेमके सांगा. असे तुकडे काढून पेस्ट करून संदर्भ तोडून विचारु नका.
21 Aug 2010 - 6:31 pm | आमोद शिंदे
जी स्पष्टपणे भोंदूगिरी दिसते आहे तिथे परखडपणे तसे मांडावे, किंवा नयनी ह्यांच्या सारखे सरळ या बुवांना शरण तरी जावे. उगाच माझा अभ्यास नाही मी काही बोलणार नाही वगैरे गुळमुळीत भुमिका चर्चेच्या व्यासपीठावर घेण्यात काय हशील? बोलायचेच नाही तर टंकायचे तरी कशाला?
21 Aug 2010 - 7:11 pm | आळश्यांचा राजा
बोललो आहे. नक्कीच बोललो आहे. आणि बरंच बोललो आहे. गुळमुळीत भूमीकाही घेतलेली नाही. तुम्ही जी भूमीका घेताय ती बौद्धिक अहंकाराची आहे, असे ''परखडपणे'' मांडलेले आहे. तुम्ही ज्याला ''स्पष्टपणे भोंदुगिरी दिसते'' म्हणता ती स्पष्ट करून सांगितलेली नाहीच. नुसतेच भोंदू भोंदू म्हणताय. म्हणजे जे स्वतःला समजत नाही ते सगळे भोंदू. सर्वमान्यपणे ज्या लोकांवर आक्षेप नसतात, अशा निरपवाद व्यक्तींबाबत कसल्यातरी ''शोधनिबंधांचा'' हवाला देता. हा कुणाचा शोधनिबंध तेही तुम्हाला माहीत नाही. ही भोंदूगिरी नाही काय?
टीका करणे किंवा शरण जाणे हेच दोन मार्ग जगात आहेत असं समजणं हीच सर्वात मोठी भोंदूगिरी आहे. तिसरं मत असेल तर काय म्हणे बोलू नका.
21 Aug 2010 - 7:35 pm | आमोद शिंदे
हा शोधनिबंध कुणी लिहिला हेही मला माहित नाही हा शोध तुम्ही कशावरुन लावला?
युद्ध कुणी दुसराच करणार। मी वानर बसून खाणार॥ असल्या भंपक वाक्यांना भोंदू सिद्ध करावे लागत नाही, उलटा हे बापू भोंदू नाहीत हे सिद्ध करावे लागते.
"तुम्ही जे काही कर्म करताय.. ते मला अर्पण करा..आणि माझ्यावर दृढ श्रद्धा ठेवा... तुमच्या दिवसभराच्या कामाची सुरुवात करताना... माझे स्मरण करा.. आणि म्हणा... " स्वामी/ बापू/ आई ........ आज मी हे जे काही करते आहे.. तुम्ही माझ्याकडून ते व्यवस्थित पार पाडुन घ्या..."
हे असले वाचले की त्यावर कुंपणावर बसणे मी पसंत करत नाही, हा मूर्खपणा आहे हे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे. तुमचे मत वेगळे असल्यास त्या मताचा आदर आहे.
22 Aug 2010 - 12:35 am | आळश्यांचा राजा
'युद्ध दुसरे कुणी करणार वगैरे' मधली भोंदूगिरी तुम्हाला स्पष्ट दिसते, आणि 'शोधनिबंध कुणी लिहिलाय हेही तुम्हाला माहित नाही हे आम्हाला कसे समजले' हे स्पष्ट दिसत नाही म्हणजे नवल आहे.
यातला सूर्यप्रकाशाइतका स्वच्छ मूर्खपणा दिसल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
आमच्या (वेगळ्या आणि अर्थातच सूर्यप्रकाशाइतक्या स्वच्छ मूर्ख) मताचा आदर राखल्याबद्दल धन्यवाद!
(आभारी)
22 Aug 2010 - 3:56 am | आमोद शिंदे
>>'युद्ध दुसरे कुणी करणार वगैरे' मधली भोंदूगिरी तुम्हाला स्पष्ट दिसते, आणि 'शोधनिबंध कुणी लिहिलाय हेही तुम्हाला माहित नाही हे आम्हाला कसे समजले' हे स्पष्ट दिसत नाही म्हणजे नवल आहे. <<
तुम्हाला कसे समजले हा माझा प्रश्न नाहीये. हा शोध कशाच्या जोरावर लावलात असे म्हंटले आहे.
>>आमच्या (वेगळ्या आणि अर्थातच सूर्यप्रकाशाइतक्या स्वच्छ मूर्ख) मताचा आदर राखल्याबद्दल धन्यवाद!
होय तुम्हीही वरील वाक्यात उल्लेख केलेले आचरण करत असाल तर तो मूर्खपणाच आहे. दुसयाचा मताचा मूर्ख असले तरी आदर आहेच. दुसर्याचे मतांची मुस्कटदाबी करणारा मी नाही हे एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल.
21 Aug 2010 - 7:26 am | अरुण मनोहर
आळशांचा राजा येवढे लांब लचक प्रतिसाद टंकू शकतो, म्हणजे तो आता आळशांचा राजा राहिला नाही.
मला वाचायला देखील प्रचंड आळस आला.
--- आळशांचा महाराजा.
------- (कृपया लोळून घ्यावे. स्मायली नाही, म्हणून येवढे टंकावे लागले.)
20 Aug 2010 - 10:49 pm | नितिन थत्ते
माझा एक मित्र म्हणतो की तो श्रद्धाळू (=बाबाभक्त) असता तर जास्त सुखात राहिला असता.
आयुष्यातले कितीतरी निर्णय स्वतः च्यायचा किंवा त्यावर विचार करायचा त्रास टळला असता.
20 Aug 2010 - 11:04 pm | मृत्युन्जय
श्रद्धाळू =बाबाभक्त
हे काही पटले नाही. बाबाभक्त नसलेले पण श्रद्धाळु असु शकतात. आणि बाबाभक्त पण प्रत्येक गोष्टीसाठी सल्ला घ्यायला जात असतील असे वाटत नाही.
20 Aug 2010 - 11:09 pm | नितिन थत्ते
त्याला बाबाभक्त असेच म्हणायचे असते.
बाबाभक्त (जिवंत) बाबांचा सल्ला घेतल्याशिवाय काही करीत नाहीत. अगदी हॉस्पिटलातून डिस्चार्ज कधी घ्यायचा हेही.
21 Aug 2010 - 12:03 am | मृत्युन्जय
अहो पण बाबाभक्त नसलेले श्रद्धाळु असतातच ना. त्यांचे काय? श्रद्धाळु = बाबाभक्त म्हणले की बाबाभक्त नसलेले पण श्रद्धा असलेले (देवावर) पण एलिमिनेट होतात. त्याचे काय? मी देवावर श्रद्धा ठेवुन आहे पण प्रत्येक गोष्टीसाठी देवाचा कौल मागत नाही. स्वतःचे निर्णय स्वतःच घेतो. तर मग मी नक्की कुठल्या वर्गात मोडतो?
21 Aug 2010 - 12:24 am | Nile
देवावर श्रद्धा ठेवुन आहात म्हणजे नक्की काय हे सांगता का? मग वर्गवारी करणे सोपे पडेल. :-)
21 Aug 2010 - 2:44 pm | मृत्युन्जय
देव या संस्थेवर श्रद्धा ठेवुन आहे.
21 Aug 2010 - 7:32 pm | आमोद शिंदे
देव ही संस्था आहे? ह्या संस्थेचे संस्थापक कोण संचालक मंडळ कोण?
21 Aug 2010 - 1:50 am | विकास
(कुठलेही) राजकारणी = (कुठल्याही) बाबांचे अनुयायी
जनता = राजकारण्यांची अनुयायी
तुम्हीआम्ही = जनता
म्हणून तुम्हीआम्ही = बाबांचे अनुयायी ;)
21 Aug 2010 - 7:43 pm | आमोद शिंदे
जनता = राजकारण्यांची अनुयायी
इथे फसले गणित.
20 Aug 2010 - 11:22 pm | रेवती
नितिन थत्ते यांच्याशी सहमत.
बाबा/अम्मा भक्त हे स्वत: विचार करण्याचे कष्ट वाचवू शकतात.;)
अमूक एक निर्णय घेताना मनाला होणारा व्यायाम टळला कि सगळं कोणावर तरी सोडून देवून चालत असतं.;)
बुवांनी सांगितलेलं बरोबर ठरलं कि वा!! वा!! आणि चूक ठरलं कि 'हे घडावं असं नियतिच्या मनात होतं' म्हणायला मोकळे!
22 Aug 2010 - 4:25 am | आमोद शिंदे
अगदी बरोबर आहे. आणि तरीही असल्या बुवांना भोंदू आणि भक्तांना मूर्ख म्हणायचे नाही.
21 Aug 2010 - 2:42 am | Nile
अहो कसलं काय अन कसलं काय हो! जगात मुर्खांची काय कमी आहे का? हे बाबा बुवाच्या मागे लागणारे लोक म्हणजे मेंढ्यांच्या कळपासारखे. पुढची मेंढी जाईल तिच्यामागे मान खाली घालुन चालणारे. आता पुढची मेंढी आंधळी असली तरी ते मागच्यांना काय माहित सांगा?
फुक्कट रिकामा वेळ अन अंगातल्या धमकेचा अभाव असला की आयतं माळ जपत प्रत्ययाची वाट पहाणं न जमायला काय झालंय? तासावर मजुरी मिळणारा कधी तासभर पुजा करताना पाहिलाय काय? त्याला पोटभर जेवण म्हणजे त्याची आत्मक्षांती अन रात्रीची दगडावरची झोप म्हणजे मोक्ष!
* अनावश्यक भाग संपादित *
21 Aug 2010 - 9:40 am | नगरीनिरंजन
हे बरोबर बोललास. लोकांनाच काही तरी टेकू लागत असतो. त्यामुळे बाबा लोक अनुयायी शोधत नसून अनुयायी लोकच एखादा बाबा (किंवा अम्मा) शोधत असतात. अशा बाबा/अम्माला मग देवत्व बहाल करुन त्याच्या मर्कटलीलांमधूनही काही तरी दैवी संकेत काढून त्याप्रमाणे वागतात आणि मग प्रोबॅबिलिटीच्या नियमाप्रमाणे कधी घाट्यात जातात तर कधी फायद्यात. तोट्यात जाणारे आपलं पूर्वाश्रमीचं पाप समजून गप बसतात आणि फायद्यात जाणारे बाबा की जय म्हणून नाचायला लागतात. असा मग मोठा होत जातो बाबा.
अवांतरः गजानन महाराज एका लग्नात टाकून दिलेल्या पत्रावळींमधून वेचून अन्न खाताना प्रथम सापडले होते असं वाचल्याचं अंधुक आठवतंय. खरं खोटं तेच जाणे.
अति अवांतरः 'गण गण गणात बोते' चा अर्थ कोणालाच कसा माहिती नाही? आणि विचारला तर त्यांचे भक्त का रागावतात? माझ्या एका मित्राने मला सांगितला होता तोच तर अर्थ नाही ना त्याचा?
21 Aug 2010 - 11:58 am | अरुण मनोहर
गण गण गणात बोते, हे खरे "गण गण गणात बा ते" असे वाचायचे असते.
गुगलून खालील अर्थ मिळाला-
दासगणू महाराज लिखित श्री गजानन विजय ह्या चरित्रग्रंथात त्या अभंगाचा अर्थ दिला आहे...
त्या सूत्रमय भजनाचा। अर्थ ऐसा वाटतो साचा।
गणी या शब्दाचा। अर्थ, मोजी हाच असे।।
जीवात्मा म्हणजे गण। तो ब्रह्माहून नाही भिन्न।
हे सुचवावया कारण। गणात हा शब्द असे।।
बोते हा शब्द देखा। अपभ्रंश वाटे निका।
बाते हा शब्द ऐका। तेथे असावा नि:संशय।।
बा या शब्दे करून। घेतले पाहिजे मन।
ते हे आहे सर्वनाम। गण शब्दाऐवजी आलेले।।
म्हणजे मना दिसे नित्य। जीव हा ब्रह्मास सत्य।
यात स्पष्ट अर्थ दिला आहेच... मुळातच हे एक सूत्रमय भजन आहे असे दासगणू महाराज म्हणताहेत हे ध्यानी घ्यावे, ते शब्द एकमेकांशी सूत्राप्रमाणे संबंधित आहे...
21 Aug 2010 - 4:56 pm | चिन्मना
मी दररोज पूजा करतो. तस्मात मला काहीही उद्योग नाही, माझ्याकडे भरपूर वेळ आहे, अंगात धमक नाही आणि मी मूर्ख आहे असा "प्रत्यय" आणून दिल्याबद्दल निळोबांचे धन्यवाद.
जाताजाता: तुमच्या उदाहरणातले तासावर मजूरी करणारे, हातावर पोट असणारे अनेक मजूर पाहण्यात आहेत. पण त्यातला एकही अश्रद्ध दिसला नाही.
22 Aug 2010 - 6:55 am | Nile
अशिक्षित अडाणी मजुरांना पुजा पाठ करण्यापेक्षा रोजची मजुरी महत्त्वाची वाटते यातच सगळे आले. तुम्ही सुशिक्षित दगडाची/धातुची पुजा करण्यात वेळ घालवता या पेक्षा अजुन काय लिहावे?
22 Aug 2010 - 11:16 pm | मृत्युन्जय
चुकताय निळुभाउ. रोजची मजुरी बांधकाम मजुरांना काय आणि मोठ्या कोर्पोरेटस मध्ये काम करणार्या मजुरांना काय दोघांनाही महत्वाची असते. हातातले काम सोडुन पुजा करणारे नक्कीच मुर्ख. पण वेळ मिळेल तसे का होइना देवाची आठवण ठेवणारे यात येत नाहीत.
आणी आपला मुख्या आक्षेप कुठल्या गोष्टीला आहे ते कळाले तर बरे होइल. मुर्तीपुजेला विरोध आहे की देव या संकल्पनेलाच?
23 Aug 2010 - 2:17 am | Nile
आक्षेप अंधश्रद्धेला आहे, चुकीच्या समजुती-रुढींमुळे समाजात चालणार्या मुर्खपणाला आहे. देवाच्या नावाखाली चालणार्या लुबाडणुकीला आहे.
देव संकल्पनेवर विश्वास नसला तरी लोकांच्या देव नावाच्या वैयक्तीक समजुतीला विरोध नाही. देव संकल्पनेची गरज अनेकांना आहे असे वाटते. कुणाला देव आहे असे मानल्याने वैयक्तीक काही फायदा होत असेल(इतरांचे काही नुकसान, फसवणुक न करता) तर आनंदच आहे.
21 Aug 2010 - 9:41 am | अप्पा जोगळेकर
ब्रम्ह तेथे माया, वॄक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया.
सौजन्य - प्र.के. अत्रे
23 Aug 2010 - 4:00 pm | मितभाषी
ब्रम्ह तेथे माया, वॄक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया.
सौजन्य - प्र.के. अत्रे
अगागागा ठॉय. फुटलो.
=)) =)) =))
ते "हुप्या तिथे वानरे" असेही करता येइल.
गवश्या.
22 Aug 2010 - 10:31 am | शिल्पा ब
अजून चालूच का? बारं..
बाकी वैयक्तिक चिखलफेक करण्याची काहीही गरज नाही...
22 Aug 2010 - 8:01 pm | पैसा
थोडं विषयांतर होतंय, पण मध्यंतरी एक नित्यानंद स्वामी नेट वर व्हिडिओ रुपे धमाल उडवत होता. तसंच कोणा पायलट बाबाने एका साध्यासुध्या अपंग अनुयायाला जिवंत समाधी घ्यायला लावल्याचं ऐकिवात आलं होतं. या असल्या भोंदू बाबांना कोण आणि कसे आवरणार?
22 Aug 2010 - 10:23 pm | शिल्पा ब
२००वा प्रतिसाद माझा.. :-)
22 Aug 2010 - 10:30 pm | चिंतामणी
झाली झाली झाली.
अपेक्षीत डबल सेंचुरी झाली.
लगे रहो.
23 Aug 2010 - 4:23 pm | धमाल मुलगा
आयच्या गावात!!!!!
अजुन चालुच है का हे दळण?
आयला, त्या कोण त्या अनिरुध्दबाप्पूंचं नाव घेऊन त्याआडुन आपण किती अश्रध्द आहोत आणि कसे बरोबरच्च आहोत ह्याच्या टिमक्या वाजवायचा कंड अजुनही नाहीच शमला का?
एव्हढीच एनर्जी है तर चला, तुम्हाला चार सामाजिक कामं देतो. हल्ली देणग्यांचा ओघ असतो पण स्वयंसेवक मिळत नाहीत. चला, तुमची एनर्जी कारणी लाऊ....
बोला कोण कोण येतंय वृध्दाश्रमात वेळ्+सेवा द्यायला? बोला कोण कोण येतंय SAA चं काम करायला? उगं येतंय टायपायला म्हणुन कडाकडा भांडत बसतेत नळावरच्या बायांसारखे!
स्वतःला जे नाही करायचं त्याबद्दल कोणी सांगितलं की वस्सकन अंगावर येता येतं, तसं दुसर्याच्या श्रध्दांवर वाटेल तसे आरोप करताना हीच बुध्दी कुठं जाते?
आता बास करा की हे चवचाल चाळे.
असो.
हे आकाशातला बापा, माझ्या मेंढपाळा, ह्या अज्ञ बालकांना क्षमा कर, कां की ते काय करत आहे हे त्यांनाच कळत नाही.
-फादर धमाल दिब्रेटो.
23 Aug 2010 - 5:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हा प्रतिसाद इतर कोणाला उद्देशून नसल्यामुळे तो सदर लेखाला उद्देशून आहे अशा समजातून पुढील प्रतिसाद लिहीला आहे. हा समज चुकीचा असल्यास पुढील वाक्ये वाचू नयेत.
१. लेखात कुठेही अनिरूद्ध बापूंचा उल्लेख नाही.
२. आपण अश्रद्ध आहोत असा कुठेही लेखात उल्लेख नाही.
३. दुसर्यांच्या श्रद्धांवर लेखात कुठेही हल्ला नाही.
४. माझ्या प्रतिसादांमधे कुठेही अनिरूद्ध बापूंवर टीका नाही. त्यांच्या महावाक्यात मला खोट दिसते आहे ते योग्य का अयोग्य असा प्रश्न विचारला आहे, त्याचे उत्तर मिळण्याऐवजी हीन पातळीवरची टीका माझ्यावर झाली (जी आकाशातल्या असलेल्या/नसलेल्या बापाला प्रिय झाली; त्याबद्दल संपादकांचे आभार).
५. टायपायला येतं म्हणूनच लोकं इथे टंकतात हा गैरसमज आहे.
६. प्रतिसाद किंवा लेख टाकण्यासाठी टी/कॉफी ब्रेक पुरतो; वृध्दाश्रमात वेळ्+सेवा द्यायला हा वेळ पुरणार नाही.
७. या लेखातून, प्रतिसादांतून, वाद-विवादांमधून कुणाचाही काडीइतका फायदा झाला नसेल तर एकवेळ तक्रार करायला जागा आहे. पण एक मिनीट ... ज्या लोकांना एवढी "मारामारी" वाचायला वेळ नाही त्यांनी एवढे प्रतिसाद असलेला धागा उघडू नये. अशाच प्रकारची तक्रार करायची असेल तर प्रत्येक प्रतिसादात लांबलचक स्वाक्षर्या टाकणार्यांचीही करता येईल. लांबलचक म्हणजे काय ही गोष्ट व्यक्तीसापेक्ष बदलते.
८. इतरांची ती अंधश्रद्धा आपली ती श्रद्धा हे चुकीचं आहे तर दुसर्यांची शक्ती प्रतिसाद टंकण्यात व्यर्थ जात हे ही आपण ठरवू शकत नाही.
९. नळावरच्या बायांसारखे हा शब्दप्रयोग सेक्सिस्ट आहे म्हणून त्याचा निषेध!
असो, सध्या माझा टीब्रेक संपल्यामुळे प्रतिसाद आवरता घेते.
23 Aug 2010 - 6:43 pm | धमाल मुलगा
माझ्या मुळ प्रतिसादात असलेल्या ह्या अधोरेखीत वाक्यांतुन अनेकवचन प्रतीत होते. त्यामुळे 'केलेला प्रत्येक विरोध हा मलाच आहे' अशा फोबियात नाही राहिले तरी चालेल. :)
अर्थात, आपल्या प्रतिसादातील
ह्या सुचनेचे पालन करणेत आले आहे. :) कोणतीही मुक्ताफळे वाचणेत आली नाहीत.
मंडळ आभारी आहे.
अवांतरः सार्वजनिक गणपती उत्सवाची वर्गणी घ्यायला कधी येऊ हो ताई? :P
23 Aug 2010 - 6:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
याचप्रमाणे निरीश्वरवाद्यांनी श्रद्धेची चिकित्सा करणारा प्रत्येक लेख आपल्यालाच डोळ्यासमोर ठेवून लिहीलेला नाही हा निरोप ज्यांना खिल्ली उडवल्यासारखी वाटते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे.
अवांतराचे उत्तरः कोण गणपती? धन्यवाद. :-)
23 Aug 2010 - 7:01 pm | धमाल मुलगा
हा हा हा! ज्यांना 'कुठे कसं काय शिजतं' ते कळत नाही त्यांना हे वाक्य अत्यंत प्रामाणिक वाटलं नाही तरच नवल. :)
आम्ही आजकाल एव्हढे दुधखुळे राहिलो नाही....दुर्दैवानं!
>>अवांतराचे उत्तरः कोण गणपती? धन्यवाद.
अरेरे..सगळ्यांच्या लाडक्या गणपतीबाप्पांचं नाव काढताच आपण इतक्या शांततेत विचारलंत म्हणजे छान प्रगती आहे. :)
बोला......गणपतीबाऽऽऽप्प्पाऽऽऽ मोऽऽऽअऽरया!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
23 Aug 2010 - 6:43 pm | धमाल मुलगा
प्रकाटाआ.
23 Aug 2010 - 8:30 pm | मृत्युन्जय
मिपाचा धाग्यावरच्या प्रतिसादांचा विक्रम काय आहे? कारण उद्या सकाळपर्यंत या धाग्याने बहुधा ओळळपरेडला मागे टाकले असेल.
धर्माची गोळी नेहेमीच कशी बरोबर लागु पडते?
23 Aug 2010 - 10:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बाबा-बुवा-माता-बापू हा धर्म आहे हे ही मला माहित नव्हतं!