हा पहिला अनुयायी कसा मिळवायचा/मिळतो/ते?
प्रस्तुत धाग्यावर आता २३० पेक्षा जास्त प्रतिसाद आलेले आहेत. यापुढील चर्चेकरता नवा धागा उघडावा.
- संपादक मंडळ
माझा ऑफिसमेट जयंती (हो, हे मुलाचं नाव आहे, जयंती प्रसाद) अधूनमधून 'बाबागिरी'बद्दल बोलतो. 'बाबा' म्हणजे बाबा अथवा वडील नव्हे, "बाबा" म्हणजे भोंदूबाबा, बाबा-बुवा-बापू-माता-गुरू मधले बाबा! कालसुद्धा जयंती अमका माणूस फारच बाबागिरी करतो असं मला सांगत होता. म्हणून मी त्याला व्याख्या विचारली, "'बाबा' म्हणजे नक्की कोण?" त्याचं उत्तर अगदीच चमत्कारिक नसलं तरीही विचार करण्यायोग्य वाटलं. त्याचं उत्तर असं:
बाबा लोकांची तीन (जयंतीच्या बाबतीत ट्रीलॉजी जुनीच आहे.) लक्षणं असतात. यापुढे या लेखापुरतं 'बाबा' आणि बाबा हे शब्द एकच आहेत असं समजावं.
१. बाबा लोकं अखंड उपदेश करतात; पण त्यातल्या अगदी कमी गोष्टी त्यांच्या स्वतःच्या बाबतीत लागू पडतात.
२. बाबा लोकं कधी कोणाचंही ऐकून घेत नाहीत.
३. बाबा लोकांचे प्रचंड प्रमाणात (प्रमाणात हा शब्द महत्त्वाचा, का ते पुढे येईलच) अनुयायी असतात.
प्रमाण हा शब्द अशासाठी वापरला की, तो आमच्या होस्टेलमधल्या एकाला बाबा म्हणतो. होस्टेलमधले १२-१५ पैकी दहा लोकंतरी त्याचे अनुयायी असतात. उदा: तो म्हणाला आज पिझा खाऊया, की कॅण्टीनमधे जेवणारे सगळे पिझा खायला तयार होतात. आपलं म्हणणं कितीही चुकीचं असलं तरी तेच तो पुढे दामटत रहातो. इ.इ.
असो. तर आमचा हा संवाद सुरू असतानाच माझा मोबाईल वाजला, पाहिलं तर एक एसेमेस. त्याकडे मी दुर्लक्ष केलं आणि मुख्य, महत्त्वाच्या गॉसिपकडे लक्ष दिलं. तर पुन्हा एक एसेमेस. तर मग 'टॅम्प्लीस' घेऊन एसेमेस पाहिले. तर आणखी कोणी "गुरू" आणि "बापू" अनुक्रमे मला रूद्राक्ष आणि मणी विकत होते. 'डीएनडी'ला **वर मारणार्या या लोकांना चार भाषांत चार सणसणीत शिव्या हासडून मी पुन्हा जयंतीशी बोलायला गेले तर जयंती स्वतःच "बाबा" बनल्यागत माझ्याकडे चक्क दुर्लक्ष करता झाला!
मग मीही त्यालाही **वर मारून पुन्हा मराठी आंतरजालाकडे वळले. पाहिलं तर उपक्रमावर अनिरुद्ध बापूंबद्दल ही चर्चा आली होती. मला प्रश्न असा पडला की या बाबा, बुवा, माता, बापू, स्वामी, गुरुंना अनुयायी मिळतातच कसे? तेव्हा एक त्यामानाने जुना टेडवरचा व्हीडीओ आठवला, हा पहा. पण हे सगळं आपल्याकडे असंच होतं का? म्हणजे या व्हिडीओत डेरेक सिव्हर्स म्हणतो त्याप्रमाणे The first follower transforms a lone nut into a leader. हा पहिला अनुयायी कसा मिळवायचा?
प्रतिक्रिया
बाजूला सरका. मलापण जागा हवीय
पॉपकॉर्न वगैरे आपापलं आणायचं
मी तर
विकासदादा,आलाच आहात तर बसा
हा भला थोरला पॉपकॉर्नचा फोटो
एलेमेंटरी माय डियर वॉटसन - शे. हो. उवाच
लोकांचे प्रॉब्लेम?
सहजकाका आमचे लै प्राब्लेम्स
?
तेहेतीस कोटी देवांवर श्रद्धा
लो कर लो बात!
वा तुम्ही आमचे सगळे प्राब्लेम
घ्या!
नो, इन दॅट केस यु वान्ट टु
कुठल्याही व्यक्तिला नेहेमीच
साफ असहमत
मुळात कुठलाही माणुस जन्मजात
अश्रद्ध
उदाहरण चुकीचे आहे असे वाटते.
खंप्लिट रांग
आज पर्यंत मी ज्या ज्या
श्रद्धा आणि अंधश्रद्धा
मला तर लोटन बाबा फार
बाकी काहीही म्हणा, एवढं लोळून
परिस्थितीने गांजलेले लोक
बाय.. एवढे विवीध उपाय मिळतायत
आप कतार मे खडे है. कृपया
लगेच श्री.* अदिती अम्मा देवी
अनामिक देवा, माझा अभ्यास नको
एकच श्री लिहिल्या बद्दल जाहीर
धाग्यात दिलेली तीन लक्षणेच
एका बाबाची एकलेली कहाणी.......
माझ्याकडे कुणीही कसल्याही
उद्या तुमच्याकडे येउन
कोणाही भोवती किमान पाच दहा
द्विशतकी धागा
मिरासदार
बाबागिरी/ बुवाबाजी
हे उत्तर आवडले..योग्य वाटते
किंचित बदल
मान्य आहे. अज्ञेयवाद्याला
नाही हो!
अवश्य
राजेसाहेब, तुमचा प्रतिसाद
ओह! हे वाचायचं राहिलंच. एनी
अज्ञेयवादी याचा अर्थ
सहमत आहे. अभ्यास करण्याची
खुपच संतुलित आणि मुद्देसुद
हे संतुलनाचे स्तोम फारच झाले
तुम्ही स्वतःच्या हाताने
Pagination